लेखक परिचय :
म्हाइंभट : तेराव्या शतकात महाराष्ट्रात उदयास आलेल्या व विकसित झालेल्या महानुभाव पंथाने चरित्रलेखनाची एक नवी परंपरा मराठीत निर्माण केली. या चरित्रमालेतील अखेरचा गं्रथ म्हणजे ‘स्मृतिस्थळ’ होय. महानुभाव पंथांचे आद्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ह्यांचे पट्टशिष्य भटोबास उर्फ नागदेवाचार्य ह्यांच्या उत्तरायुष्यातील श्रीचक्रधरस्वामींच्या निर्वाणानंतरच्या आठवणी व त्यांनी आपल्या स्मरणातून सांगितलेली श्रीचक्रधरांची वचने येथे आलेली आहेत. नागदेवाचार्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूबरोबर म्हाइंभट, महदाइसा, नरेंद्र इ. लेखक कवींचे संदर्भ देणारा ग्रंथ म्हणूनही ‘स्मृतिस्थळा’ला महत्त्व आहे.
हा गं्रथ केव्हा व कोणी लिहिला यासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. हा ग्रंथ कोणा एका लेखकाचा नसून त्यात अनेकांच्या पाठातील कमी अधिक मजकूर मिसळला गेला असावा असे ‘स्मृतिस्थळ’चे संपादक ना.वा. देशपांडे यांनी म्हटले आहे. नागदेवाचार्यांच्या निधनानंतर (इ.स.1312) ‘स्मृती’चे लेखन झाले असावे.
तेराव्या शतकातील महानुभाव गद्य वाङ्मयात भाषेचे संवादरूप, बोलीतील जिवंतपणा, अल्पाक्षरत्व व शब्दांची लय ह्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडते. 193 क्रमांकाच्या ह्या स्मृतीत अस्पृश्यता निर्मूलनासंबंधीचा विचार स्पष्टपणे मांडला गेला आहे.
मूल्य : अस्पृश्यता निर्मूलन
साहित्य प्रकार : प्राचीन गद्य
संदर्भ ग्रंथ : स्मृतिस्थळ (संपा.ना.वा.देशपांडे)
मध्यवर्ती कल्पना : 193 क्रमांकाच्या ह्या स्मृतीत अस्पृश्यता निर्मूलनासंबंधीचा विचार स्पष्टपणे मांडला गेला आहे.
शब्दार्थ आणि टीपा
म्हाइंभट-लीळाचरित्राचा कर्ता, आद्य मराठी चरित्रकार; करवतीयेचे-(करवती म्हणजे वस्त्राचे केलेले उदकपात्र) त्या पात्रातील; दोही देवांचा-श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी ह्यांचा महानुभाव पर्याय कृष्णावतार मानतात म्हणून त्यांचा; संबंधु-सहवास; आबाइसा-नागदेवाचार्याची माता; भटोबास उर्फ नागदेवाचार्य-श्रीचक्रधरानंतरचा महानुभावपंथाचा प्रमुख अनुयायी व आचार्य; पात्र-व्यक्ती; दैव भाग्य-दुर्भाग्य; सिक्षापीली-शिकविले, शिकवणूक दिली, शिकवण; अनुतापली-पश्चाताप झाला; शोधु-पाठभेद.
उत्तर : चक्रधरस्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होत.
2. कोथळोबा हा कोण होता?
उत्तर : कोथळोबा हा श्री चक्रधरांच्या परिवारातील एक सामान्य शिष्य होता.
3. उमाइसा का कोपली?
उत्तर : कोथळोबाने तिच्या पात्रातील पाणी पिल्यामुळे उमाइसा कोपली.
4. म्हाइंभटानी उमाइसेस कोणती आज्ञा केली?
उत्तर : म्हाइंभटानी उमाइसेस कोथळोबाला दंडवत घालण्याची आज्ञा दिली.
5. उमाइसा कोणाकोणाला माता आणि बंधू मानीत होती?
उत्तर : उमाइसा ही आबाइसाला माता व भटोबासला बंधू मानीत होती.
6. कोणत्या दोन देवांचा संबंध उमाइसाला घडला असे म्हाइंभट म्हणतात?
उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी ह्यां दोन देवांचा संबंध उमाइसाला घडला असे म्हाइंभट म्हणतात.
उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी या दोन देवतांचा तुला सहवास लाभला, आबाइसासारखी माता व भटोबासासारखे बंधू तुला लाभूनसुद्धा तुझे अज्ञान अजून फिटले नाही कोथळोबाने तुझ्या पात्रातून पाणी पिले हे तुझे दुर्भाग्य नव्हे अशी शिकवण दिली.
2. उमाइसेस पश्चाताप का झाला?
उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी या दोन देवतांनी जातपात न मानता महानुभाव पंथाचा प्रसार केला होता. परंतु यांच्या सहवासात राहिलेली उमाइसा शूद्र कोथळोबाने तिच्या पात्रातून पाणी पिल्यामुळे कोपली होती. पण हे तुझे दुर्भाग्य नव्हे अशी म्हाइंभटाने तिची कानउघाडणी केल्यानंतर उमाइसेस पश्चाताप झाला.
3. या पाठाच्या आधारे महानुभाव पंथाची शिकवण लिहा.
उत्तर : तेराव्या शतकात उदयास आलेल्या महानुभाव पंथाने जाती पाती बाजुला सारून आपल्या पंथाचा महाराष्ट्रभर प्रसार केला होता. श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधर स्वामी हे या पंथांचे दैवत होते. महानुभाव पंथीय त्यांना कृष्णावतार मानत. महानुभाव पंथांचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या शिष्यगणात सर्व जातीधर्माचे लोक होते. एकत्रच ते रहात होते. खात पित होते. चूक झाल्यास क्षमायाचना करण्याची व आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करण्याची पद्धत या पंथात होती. मराठी भाषेतून त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. तसेच आपल्या गुरुंच्या स्मृती त्यांनी लिखित स्वरूपात जतन करून ठेवल्या आहेत.
1. उमाइसेने कोथळोबाला दंडवत का घातले ?
उत्तर : कोथळोबाने उमाइसाच्या पात्रातील पाणी तिला न विचारता पिले होते. त्यामुळे तू शूद्र असून माझ्या पात्रातील पाणी का पिलेस म्हणून उमाइसा त्याच्यावर चिडली होती. हे बोलणे ऐकल्यावर म्हाइंभटानी तिला ज्यांचा सहवास लाभला होता त्या गोविंदप्रभू व चक्रधरस्वामींच्या शिकवणीची आठवण करून दिली. आबाइसा व भटोबाससारखे माता व बंधू लाभूनसुद्धा असे वागल्याबद्दल म्हाइंभटांनी तिची कानउघाडणी केली; त्यांने तुझ्या पात्रातून पाणी पिले ते तुझे दुर्भाग्य नव्हे.अशी शिकवण त्यांनी दिल्यामुळे आपल्या कृतीचा तिला पश्चाताप झाला. म्हाइंभटाच्या आज्ञेनुसार तिने क्षमा मागण्यासाठी कोथळोबाला दंडवत घातले.
2. म्हाइंभटाना उमाइसेच्या वागण्याचे आश्चर्य का वाटले ?
उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी सारख्या कृष्णावतारांचा उमाइला सहवास लाभला होता. आबाइसासारखी माता व भटोबासांसारखे बंधू तिला लाभले होते. या साèयांनी अस्पृश्यता न पाळता पंथांचे कार्य केले होते. अशा लोकांच्यात राहूनही उमाइसाने त्यांचे गुण आत्मसात करण्याचे सोडून स्वत:चा मूळ गुणधर्म सोडला नव्हता. तहानलेल्या कोथळोबाने तिच्या पात्रातील पाणी पिल्यामुळे ती त्याच्यावर कोपली होती. तिने त्याची शूद्र म्हणून हेटाळणी केली होती. यामुळेच म्हाइंभटाना उमाइसेच्या वागण्याचे आश्चर्य वाटले.
उत्तर : संदर्भ : हे विधान ‘म्हाइंभटी शिक्षापणी’ या ‘स्मृतीस्थळ’मधून घेण्यात आलेल्या पाठातील आहे. याचे संपादक ना.वा.देशपांडे आहेत. उमाईसेने कोथळोबाला असे म्हटले आहे.
स्पष्टीकरण : कोथळोबाला तहान लागली तेव्हा त्याने उमाइसेच्या करवती(उदकपात्र) मधील पाणी तिला न विचारता पिले. हे पाहून संतापलेल्या उमाइसाने तू शूद्र असून माझ्या करवतीचे पाणी का प्यालास असे प्रश्न त्याला केला.
2. ‘‘घाला कोथळेयांसि दंडवत:’’
उत्तर : संदर्भ : हे विधान ‘म्हाइंभटी शिक्षापणी’ या ‘स्मृतीस्थळ’मधून घेण्यात आलेल्या प्राचीन गद्यातील आहे. याचे संपादक ना.वा.देशपांडे आहेत. म्हाइंभटानी उमाइसेला दिलेली ही आज्ञा आहे.
स्पष्टीकरण : केवळ आपल्या पात्रातील पाणी पिल्यामुळे उमाइसेने कोथळोबाची शूद्र म्हणून हिणवणी केल्यावर म्हाइंभटानी उमाइसेला उपदेश करताना सांगितले की त्याने तुझ्या पात्रातील पाणी पिले हे तुझे दुर्भाग्य नव्हे. त्यावर पश्चातापदग्ध झालेल्या उमाइसाला त्यांनी (म्हाइंभट) कोथळोबाला दंडवत घालून क्षमायाचना करण्यास सांगितले.
3. ‘‘नेणेचि बा: चुकलीये पापीणि:’’
उत्तर : संदर्भ : सदर विधान ना. वा. देशपांडे यांनी संपादित केलेल्या महानुभाव पंथीयांच्या ‘स्मृतीस्थळ‘ या ग्रंथातून घेण्यात आलेल्या म्हाइंभटी शिक्षापणी’ या पाठातील आहे. पश्चातापदग्ध उमाइसेने हे कोथळोबाला म्हटले आहे.
स्पष्टीकरण : शूद्र म्हणवून कोथळोबाची हिणवणी केल्यानंतर म्हाइंभटानी उमाइसेची कानउघाडणी केली व तिला लाभलेल्या थोर पुरुषांच्या सहवासातून तू काहीस काही शिकली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर उपरती झालेल्या उमाइसाला त्यांनी दंडवत घालून कोथळोबाची माफी मागण्यास सांगितले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून तिने कोथळोबाला दंडवत घातले व म्हटले माझ्या हातून चूक झाली. पाप घडले आहे. मी पापीणी आहे. मला क्षमा कर.
प्र. 5. जोड्या जुळवा
अ. ब
1. करवती अ) रागावली
2. कोपली ब) सारंगपंडित पत्नी
3. कोथळोबा क) लीळाचरित्र कर्ता
4. म्हाइंभट ड) सामान्य शिष्य
5. उमाइसा इ) वस्त्राचे उदकपात्र
उत्तर : अ. ब
1. करवती अ) वस्त्राचे उदकपात्र
2. कोपली ब) रागावली
3. कोथळोबा क) सामान्य शिष्य
4. म्हाइंभट ड) लीळाचरित्र कर्ता
5. उमाइसा इ) सारंगपंडित पत्नी
2. माता = आई, देवी, जननी
3. बंधु = भाऊ, बांधव, आप्त
4. पात्र = भांडे, पान,
5. दंडवत = साष्टांग नमस्कार,
6. अनुताप = पश्चाताप, पस्तावा
म्हाइंभट : तेराव्या शतकात महाराष्ट्रात उदयास आलेल्या व विकसित झालेल्या महानुभाव पंथाने चरित्रलेखनाची एक नवी परंपरा मराठीत निर्माण केली. या चरित्रमालेतील अखेरचा गं्रथ म्हणजे ‘स्मृतिस्थळ’ होय. महानुभाव पंथांचे आद्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ह्यांचे पट्टशिष्य भटोबास उर्फ नागदेवाचार्य ह्यांच्या उत्तरायुष्यातील श्रीचक्रधरस्वामींच्या निर्वाणानंतरच्या आठवणी व त्यांनी आपल्या स्मरणातून सांगितलेली श्रीचक्रधरांची वचने येथे आलेली आहेत. नागदेवाचार्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूबरोबर म्हाइंभट, महदाइसा, नरेंद्र इ. लेखक कवींचे संदर्भ देणारा ग्रंथ म्हणूनही ‘स्मृतिस्थळा’ला महत्त्व आहे.
हा गं्रथ केव्हा व कोणी लिहिला यासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. हा ग्रंथ कोणा एका लेखकाचा नसून त्यात अनेकांच्या पाठातील कमी अधिक मजकूर मिसळला गेला असावा असे ‘स्मृतिस्थळ’चे संपादक ना.वा. देशपांडे यांनी म्हटले आहे. नागदेवाचार्यांच्या निधनानंतर (इ.स.1312) ‘स्मृती’चे लेखन झाले असावे.
तेराव्या शतकातील महानुभाव गद्य वाङ्मयात भाषेचे संवादरूप, बोलीतील जिवंतपणा, अल्पाक्षरत्व व शब्दांची लय ह्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडते. 193 क्रमांकाच्या ह्या स्मृतीत अस्पृश्यता निर्मूलनासंबंधीचा विचार स्पष्टपणे मांडला गेला आहे.
मूल्य : अस्पृश्यता निर्मूलन
साहित्य प्रकार : प्राचीन गद्य
संदर्भ ग्रंथ : स्मृतिस्थळ (संपा.ना.वा.देशपांडे)
मध्यवर्ती कल्पना : 193 क्रमांकाच्या ह्या स्मृतीत अस्पृश्यता निर्मूलनासंबंधीचा विचार स्पष्टपणे मांडला गेला आहे.
शब्दार्थ आणि टीपा
म्हाइंभट-लीळाचरित्राचा कर्ता, आद्य मराठी चरित्रकार; करवतीयेचे-(करवती म्हणजे वस्त्राचे केलेले उदकपात्र) त्या पात्रातील; दोही देवांचा-श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी ह्यांचा महानुभाव पर्याय कृष्णावतार मानतात म्हणून त्यांचा; संबंधु-सहवास; आबाइसा-नागदेवाचार्याची माता; भटोबास उर्फ नागदेवाचार्य-श्रीचक्रधरानंतरचा महानुभावपंथाचा प्रमुख अनुयायी व आचार्य; पात्र-व्यक्ती; दैव भाग्य-दुर्भाग्य; सिक्षापीली-शिकविले, शिकवणूक दिली, शिकवण; अनुतापली-पश्चाताप झाला; शोधु-पाठभेद.
स्वाध्याय
प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते?उत्तर : चक्रधरस्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होत.
2. कोथळोबा हा कोण होता?
उत्तर : कोथळोबा हा श्री चक्रधरांच्या परिवारातील एक सामान्य शिष्य होता.
3. उमाइसा का कोपली?
उत्तर : कोथळोबाने तिच्या पात्रातील पाणी पिल्यामुळे उमाइसा कोपली.
4. म्हाइंभटानी उमाइसेस कोणती आज्ञा केली?
उत्तर : म्हाइंभटानी उमाइसेस कोथळोबाला दंडवत घालण्याची आज्ञा दिली.
5. उमाइसा कोणाकोणाला माता आणि बंधू मानीत होती?
उत्तर : उमाइसा ही आबाइसाला माता व भटोबासला बंधू मानीत होती.
6. कोणत्या दोन देवांचा संबंध उमाइसाला घडला असे म्हाइंभट म्हणतात?
उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी ह्यां दोन देवांचा संबंध उमाइसाला घडला असे म्हाइंभट म्हणतात.
प्र. 2. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. म्हाइंभटानी उमाइसेस कोणता उपदेश केला?उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी या दोन देवतांचा तुला सहवास लाभला, आबाइसासारखी माता व भटोबासासारखे बंधू तुला लाभूनसुद्धा तुझे अज्ञान अजून फिटले नाही कोथळोबाने तुझ्या पात्रातून पाणी पिले हे तुझे दुर्भाग्य नव्हे अशी शिकवण दिली.
2. उमाइसेस पश्चाताप का झाला?
उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी या दोन देवतांनी जातपात न मानता महानुभाव पंथाचा प्रसार केला होता. परंतु यांच्या सहवासात राहिलेली उमाइसा शूद्र कोथळोबाने तिच्या पात्रातून पाणी पिल्यामुळे कोपली होती. पण हे तुझे दुर्भाग्य नव्हे अशी म्हाइंभटाने तिची कानउघाडणी केल्यानंतर उमाइसेस पश्चाताप झाला.
3. या पाठाच्या आधारे महानुभाव पंथाची शिकवण लिहा.
उत्तर : तेराव्या शतकात उदयास आलेल्या महानुभाव पंथाने जाती पाती बाजुला सारून आपल्या पंथाचा महाराष्ट्रभर प्रसार केला होता. श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधर स्वामी हे या पंथांचे दैवत होते. महानुभाव पंथीय त्यांना कृष्णावतार मानत. महानुभाव पंथांचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या शिष्यगणात सर्व जातीधर्माचे लोक होते. एकत्रच ते रहात होते. खात पित होते. चूक झाल्यास क्षमायाचना करण्याची व आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करण्याची पद्धत या पंथात होती. मराठी भाषेतून त्यांनी आपल्या पंथाचा प्रसार केला. तसेच आपल्या गुरुंच्या स्मृती त्यांनी लिखित स्वरूपात जतन करून ठेवल्या आहेत.
प्र. 3. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाच-सहा ओळीत लिहा.
1. उमाइसेने कोथळोबाला दंडवत का घातले ?उत्तर : कोथळोबाने उमाइसाच्या पात्रातील पाणी तिला न विचारता पिले होते. त्यामुळे तू शूद्र असून माझ्या पात्रातील पाणी का पिलेस म्हणून उमाइसा त्याच्यावर चिडली होती. हे बोलणे ऐकल्यावर म्हाइंभटानी तिला ज्यांचा सहवास लाभला होता त्या गोविंदप्रभू व चक्रधरस्वामींच्या शिकवणीची आठवण करून दिली. आबाइसा व भटोबाससारखे माता व बंधू लाभूनसुद्धा असे वागल्याबद्दल म्हाइंभटांनी तिची कानउघाडणी केली; त्यांने तुझ्या पात्रातून पाणी पिले ते तुझे दुर्भाग्य नव्हे.अशी शिकवण त्यांनी दिल्यामुळे आपल्या कृतीचा तिला पश्चाताप झाला. म्हाइंभटाच्या आज्ञेनुसार तिने क्षमा मागण्यासाठी कोथळोबाला दंडवत घातले.
2. म्हाइंभटाना उमाइसेच्या वागण्याचे आश्चर्य का वाटले ?
उत्तर : श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी सारख्या कृष्णावतारांचा उमाइला सहवास लाभला होता. आबाइसासारखी माता व भटोबासांसारखे बंधू तिला लाभले होते. या साèयांनी अस्पृश्यता न पाळता पंथांचे कार्य केले होते. अशा लोकांच्यात राहूनही उमाइसाने त्यांचे गुण आत्मसात करण्याचे सोडून स्वत:चा मूळ गुणधर्म सोडला नव्हता. तहानलेल्या कोथळोबाने तिच्या पात्रातील पाणी पिल्यामुळे ती त्याच्यावर कोपली होती. तिने त्याची शूद्र म्हणून हेटाळणी केली होती. यामुळेच म्हाइंभटाना उमाइसेच्या वागण्याचे आश्चर्य वाटले.
प्र. 5. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1. ‘‘तू शूद्र माझीये करवतीयेचे पाणि का प्यालासि:’’उत्तर : संदर्भ : हे विधान ‘म्हाइंभटी शिक्षापणी’ या ‘स्मृतीस्थळ’मधून घेण्यात आलेल्या पाठातील आहे. याचे संपादक ना.वा.देशपांडे आहेत. उमाईसेने कोथळोबाला असे म्हटले आहे.
स्पष्टीकरण : कोथळोबाला तहान लागली तेव्हा त्याने उमाइसेच्या करवती(उदकपात्र) मधील पाणी तिला न विचारता पिले. हे पाहून संतापलेल्या उमाइसाने तू शूद्र असून माझ्या करवतीचे पाणी का प्यालास असे प्रश्न त्याला केला.
2. ‘‘घाला कोथळेयांसि दंडवत:’’
उत्तर : संदर्भ : हे विधान ‘म्हाइंभटी शिक्षापणी’ या ‘स्मृतीस्थळ’मधून घेण्यात आलेल्या प्राचीन गद्यातील आहे. याचे संपादक ना.वा.देशपांडे आहेत. म्हाइंभटानी उमाइसेला दिलेली ही आज्ञा आहे.
स्पष्टीकरण : केवळ आपल्या पात्रातील पाणी पिल्यामुळे उमाइसेने कोथळोबाची शूद्र म्हणून हिणवणी केल्यावर म्हाइंभटानी उमाइसेला उपदेश करताना सांगितले की त्याने तुझ्या पात्रातील पाणी पिले हे तुझे दुर्भाग्य नव्हे. त्यावर पश्चातापदग्ध झालेल्या उमाइसाला त्यांनी (म्हाइंभट) कोथळोबाला दंडवत घालून क्षमायाचना करण्यास सांगितले.
3. ‘‘नेणेचि बा: चुकलीये पापीणि:’’
उत्तर : संदर्भ : सदर विधान ना. वा. देशपांडे यांनी संपादित केलेल्या महानुभाव पंथीयांच्या ‘स्मृतीस्थळ‘ या ग्रंथातून घेण्यात आलेल्या म्हाइंभटी शिक्षापणी’ या पाठातील आहे. पश्चातापदग्ध उमाइसेने हे कोथळोबाला म्हटले आहे.
स्पष्टीकरण : शूद्र म्हणवून कोथळोबाची हिणवणी केल्यानंतर म्हाइंभटानी उमाइसेची कानउघाडणी केली व तिला लाभलेल्या थोर पुरुषांच्या सहवासातून तू काहीस काही शिकली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर उपरती झालेल्या उमाइसाला त्यांनी दंडवत घालून कोथळोबाची माफी मागण्यास सांगितले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून तिने कोथळोबाला दंडवत घातले व म्हटले माझ्या हातून चूक झाली. पाप घडले आहे. मी पापीणी आहे. मला क्षमा कर.
प्र. 5. जोड्या जुळवा
अ. ब
1. करवती अ) रागावली
2. कोपली ब) सारंगपंडित पत्नी
3. कोथळोबा क) लीळाचरित्र कर्ता
4. म्हाइंभट ड) सामान्य शिष्य
5. उमाइसा इ) वस्त्राचे उदकपात्र
उत्तर : अ. ब
1. करवती अ) वस्त्राचे उदकपात्र
2. कोपली ब) रागावली
3. कोथळोबा क) सामान्य शिष्य
4. म्हाइंभट ड) लीळाचरित्र कर्ता
5. उमाइसा इ) सारंगपंडित पत्नी
1. संपूर्ण पाठ आजच्या प्रमाण मराठीत लिहा.
तहानलेल्या कोथळोबाने एके दिवशी उमाइसाच्या करवतीच्या (वस्त्राचे उदकपात्र ) पात्रातील पाणी तिला न विचारताच पिले. हे ज्यावेळी उमाइसाला समजले त्यावेळी उमाइसाला राग आला. चिडून ती कोथळोबाला म्हणाली, तू शूद्र आहे आणि माझ्या पात्रातील पाणी तू कशाला पिलेस. हे उमाइसेचे उद्गार म्हाइंभटानी ऐकले. आणि ते उमाइसाला म्हणाले, हे असे काय? तुला तर श्री गोविंदप्रभू व श्री चक्रधरस्वामी या दोघांचा सहवास लाभला आहे. (उमाइसा ही चक्रधरांची शिष्या होती.) आबाइसासारखी माता व भटोबास ऊर्फ नागदेवाचार्यांसारखे बंधू तुला लाभले आहेत.(या साèयांनीही अस्पृश्यता पाळली नव्हती.) यांचा सहवास लाभूनही तुझे अज्ञान (अस्पृश्यतेबाबतचा विचार) तू नष्ट करू शकली नाहीस. असे तुला काय झाले आहे? कोथळोबासारख्याने जर तुझ्या करवतीमधील (उदकपात्र) पाणी पिले असेल तर ते तुझे दुर्भाग्य नव्हे. अशी शिकवण म्हाइंभटानी दिली. त्यावेळी उमाइसाला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. मग म्हाइंभटानी तिला कोथळोबास दंडवत (साष्टांग नमस्कार) घालण्यास सांगितले. त्यांची आज्ञा मानून उमाइसाने कोथळोबाला दंडवत घातले. आणि म्हणाली माझे चुकले, मी पाप केले आहे. मला माफ कर. मग कोथळोबाने तिला उठवून क्षमा केली.2. समानार्थी शब्द लिहा.
1. शूद्र = अस्पृश्य, दलित2. माता = आई, देवी, जननी
3. बंधु = भाऊ, बांधव, आप्त
4. पात्र = भांडे, पान,
5. दंडवत = साष्टांग नमस्कार,
6. अनुताप = पश्चाताप, पस्तावा
Please send your contact no or email address.I want to learn Smrutisthal from You
ReplyDelete