Sunday, May 19, 2019

अभंग त्रिदल


संत गोरा कुंभार
संत मुक्ताबाई
संत नामदेव
संत गोरा कुंभार
 

संत गोरा कुंभांराच्या अभंगाचा भावार्थ लिहा.

सारांश : निसर्गाने मानवाला वाणी दिली त्यामुळेच इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा आहे. अंतरंगातल्या भावसंवेदना व्यक्त करण्यासाठी जिभेचे साधन म्हणजे प्रगतीचे विधान आहे. त्यामुळेच माणूस कोणत्याची गोष्टीची प्रतिक्रिया तात्काळ व्यक्त करू शकतो. मुक्या माणसाला मात्र आपले मन उघड करता येत नाही. सुखदु:ख न सांगता आल्याने आतल्या आत तो घुसमटून जातो. मुक्या माणसाला जरी साखर खायला दिली तरी त्याला तिची गोडी सांगता येत नाही. बोलीच अबोला धारण करते. त्यामुळे शब्दही सुचत नाही.
शब्दाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ ठरते. शब्दच माणसाला अर्थपूर्णता देतात. परंतु जेव्हा शब्दांनाच मुकेपण लाभते तेव्हा संवाद होत नाही. आपला आनंद फक्त मनात राहतो. भक्ती ही अव्यक्त रूप धारण करते तेव्हा ते अद्वैताचे लक्षण असते. परमेश्वर भक्तीचा नि स्तुतीचा हा आनंद मनातच गिळून फक्त गप्प बसावे लागते. त्या परमेश्वराशी तादात्म्य पावले की शब्दांना जागा उरत नाही. रडणारे मूल जेव्हा आईला पिऊ लागते, त्याला जे पाहिजे ते मिळते व ते रडायचे थांबते अगदी तशीच गत संत गोरा कुंभार यांच्या मनाची झाली आहे.
संत नामदेवांशी संवाद साधताना, हा अद्वैत सिद्धांत पटवून देताना संत गोरा कुंभारांनी शब्दापलीकडे परवेश्वर असतो हे सांगितले आहे. मनाची एकाग्रता, तन्मयता, एकरूपता म्हणजे अद्वैत साधणे हाच महत्त्वाचा आनंद संत गोरोबांनी येथे व्यक्त केला आहे.
भक्ती हे मानसिक मुक्तीचे साधन आहे. भक्ती ही मनाची संपन्नता असते. भक्ती ही जगण्याची खरी शक्ती असते. कारण त्यातून भौतिक अहंकाराच्या चौकटी सगळ्या गळून पडतात. आज मात्र ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी आहे, तोच चोर बनतो. लोकांना फसविण्यात पाप करण्यात पुढे असणारी माणसे सुखी कशी असणार ? त्यांची तगमग आणि मानसिक भयावस्था हीच त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरते.
माणसाने माणसावर प्रेम करावे. जेथे चांगुलपणा दिसेल तेथे धावून जावे म्हणजे खरा आनंद मिळतो. संत, नामदेवांना वाटले. ‘मी सर्वात चांगला भक्त’ हा मी पणाच न गेल्याने ते मडके कच्चे राहिले. त्यामुळे संत गोरोबांनी त्यांना जीवनमुक्तीचा खरा मार्ग सांगितला. जगाला शहाणे करायचे तर आपण अगोदर शहाणे असले पाहिजे असा संत गोराबांनी येथे उपदेश केला आहे.

00000000000000000000000



संत मुक्ताबाई

संत मुक्ताबाईंच्या अभंगाचा भावार्थ :

सारांश : या अभंगांना ताटीचे अभंग म्हणतात. ताटी म्हणजे दार. आपल्या ज्ञानी भावाचा रुसवा दूर करायला, त्या बारा तेरा वर्षाच्या मुक्ताईला साèया पुरुषार्थाचा खजिनाच त्याच्यापुढे ओतावा लागला ! सामान्य पुरुषाचा तो राग नव्हता ! एकापेक्षां एक सरस असे हे ताटीचे अभंग आहेत. एवढ्याशा लहान मुलीला योग्यांनाही असाध्य असे हे वैराग्य व अनुभव कोणत्याही शाळेत न शिकता कसा मिळाला याचे नवल वाटते !
ज्यांच्यापाशी दया आहे. क्षमा करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे अशीच मंडळी जगात संत म्हणून ओळखली जातात. ज्यांच्या मनात कशाचा लोभ नाही, ज्यांना कशाचा गर्व नाही. ज्यांनी कशाचा  अहंकार बाळगला नाही अशी मंडळी जगात विरक्त असतात. एकाद्याला कशाचा मोह पडला तर तो माणूस आपण विरक्त म्हणू शकत नाही. आणि या मोहरूपी संसारात माणसाला अनेक गोष्टींचा लोभ जडू शकतो. किंवा अनेक गोष्टींचा अहंकार माणसाला होऊ शकतो. संत माणूसच या सर्व गोष्टीपासून दूर राहू शकतो. ज्याच्या तोेंडात शुद्ध ज्ञान आहे असाच माणूस इहपरलोकी सुखी होऊ शकतो. त्यामुळे ज्ञानेश्वरा साèया खोट्या कल्पना तुम्ही मागे सारा आणि आता दरवाजा उघडा असे आवाहन मुक्ताबाईनी या अभंगातून केले आहे.
00000000000000000000000


संत नामदेव

संत नामदेवांच्या अभंगाचा भावार्थ :

सारांश : या अभंगातून संत नामदेवांनी माणसाने प्रापंचिक जीवनात कसे वागावे याबद्दलचा विचार मांडला आहे. हा संसार मोहरूपी आहे. या जीवनात दुसèया गोष्टीचा मनुष्याला मोह पडू शकतो म्हणून मनुष्याने त्या मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसèयाची बायको ही मातेसमान मानली पाहिजे व त्याच दृष्टीकोनातून तिच्याकडे पाहिले पाहिजे. त्याचप्रमाणे दुसèयाची संपत्तीही आपण दगडासमान (पाषाण) मानली पाहिजे. मनुष्याने संसारात राहताना दुसèयाच्या कल्याणासाठी आपला जीव सार्थकी लावला पाहिजे. दुसèयाचा अंत:करणातील व्यथा ही आपली समजून तिचा परिहार केला पाहिजे. या मोहरूपी संसारात  कोणत्याही गोष्टीची हाव न धरता मिळालेल्या गोष्टीत समाधान मानले पाहिजे.कारण आपण या पृथ्वीतलावर कितीही धन संपत्ती गोळा केली तरी येथून प्रत्येकास कधीतरी परलोकी जायचे आहे. तेथे  जाताना मात्र या साèया गोष्टी येथेच सोडून जाव्या लागणार आहेत. याचसाठी मनुष्याने या मोहमयी गोष्टीत गुंतून न पडता नेहमी संतांच्या सहवासात राहिले पाहिजे. व सतत प्रेमाने हरीचे स्मरण केले पाहिजे. सर्वांच्या प्रती समतेची बुद्धी ठेवूनच संसारातील त्रास पीडा आपण सोडली पाहिजे. परमात्मा हा सर्वकाळी सर्वत्र असतो हा भाव आपण मनात दृढ केला पाहिजे. संत समुदाय जेथे जेथे मिळतील तेथे आपण अगोदर गेले पाहिजे व लोटांगण घालून संतमंडळींचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आणि याची चिंता कधी करू नको तू असे नामदेव सांगतात ही याची खूण मी मनी बाळगली आहे.

00000000000000000000

2 comments:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024