या संदर्भातील माहिती युट्यूब वर पाहण्यासाठी क्लिक करा CLICK ME
कवी परिचय :
शाहीर रामजोशी - राम जगन्नाथ जोशी (1772 ते 1812). त्यांचे घराणे वेदशास्त्र संपन्न पंडितांचे होते. वैदिक परंपरेतील रामने तमासगीर व शाहीर लोकांत वावरावे व त्यांच्यासाठी कवित्व रचना करून द्याव्यात हे त्यांच्या परिवारालाच मान्य नव्हे तर समाजालाही रुचणारे नव्हते. पण ते तमाशातच रमले. त्यांच्या रचनामध्ये संस्कृत प्रचुरता दिसून येते. त्यांनी शाहिरी वाङ्मयाला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘भला जन्म हा’ ही लावणी त्यांनी कवी मोरोपंताना म्हणून दाखविली त्याबद्दल त्यांनी त्यांना ‘कवीश्वर’ हे पदवी दिली. रामजोशी म्हणजे ‘लावणीकारांचा तुरा’.
हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा CLICK ME
हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा CLICK ME
मूल्य : भक्ती
संदर्भ ग्रंथ : नवनीत संपादक-परशुराम गोडबोले
मध्यवर्ती कल्पना : ही लावणी आध्यात्मिक, उपदेशपर आहे. यात भक्तीच्या ढोंगीपणावर कोरडे ओढले आहेत व खèया भक्तीची लावणी करून दिली आहे.
टीपा :
शाहीर - तमाशामध्ये गाणी लिहिणाऱ्यास शाहीर म्हणतात.
* रामजोशी शाहीर असल्याने कवितेला लावणीचा बाज आहे. ‘लावणी’ सामान्यपणे शृंगारिक असते परंतु ही लावणी आध्यात्मिक उपदेशपर आहे. मठातील संन्याशांनी धर्मप्रसार भक्ती प्रसार करावा; पण अनेक संन्यासी ते सोडून नुसतेच ढोंग माजवतात. या ढोंगीपणावर टीका करणारी ही लावणी आहे. राम जोशीनी एक मठाधीश सुब्रावजी बुवा यांना पाहिले होते. त्यांचा ढोंगीपणा पाहून ही लावणी लिहिली असे मानले जाते. लावणीचे भेदिक, आध्यात्मिक व बैठकीची असे प्रकार आहेत.
* तीळ, तांदूळ, तूप ही होमामध्ये घालावयाची द्रव्ये (वस्तू) आहेत. शक्यतो तीळ काळे वापरतात याशिवाय इतर अनेक पदार्थही वापरतात.
कवितेचा सुबोध मराठीत अर्थ : -
हे शहाण्या माणसा, मानवाचा श्रेष्ठ जन्म तुला लाभला आहे. याकरिता तू अतिशय आनंदीत झाला आहेस. (हा श्रेष्ठ जन्म तुला ज्या परमेश्वराने दिला त्या) परमेश्वराच्या सेवेचे अमृत तू प्राप्त करून घ्यावेस. या साèया चराचरामध्ये तुझा सांभाळ करण्याचे काम तो परमेश्वररूपी गुरुच करतो आहे. याची जरा जाणीव मनामध्ये ठेव.हटातटाने (हट्टाने) केवळ बाह्य वस्त्रे भगव्या रंगाने रंगवून डोईवर जटा धारण करून ही मठाची उठाठेव व्यर्थ कशासाठी करतो आहेस ? भवसागरातून तरून जाण्यासाठी त्या परमेश्वराचे नामस्मरणच केले पाहिजे. हे नामस्मरण जनसमुदायात राहून करा अगर वनामध्ये राहून करा - ते मनापासून केले पाहिजे हेच खरे. गळ्यात तुळशीच्या केवळ माळा घालून काय उपयोग ? या बाह्य उपचारांनी भवसागर तरून जाण्याचे सामर्थ्य येणार नाही. बाह्य गोष्टींचे अवडंबर माजवून परमेश्वराचे आपण भक्त आहोत असा देखावा तेवढा केल्यासारखे होईल. अंतरंगी मात्र त्या परमेश्वराची ओळखही पटलेली असणार नाही. अंतरंगी रममाण व्हावयाच्या भक्तिररसाशिवाय आपण ‘भक्त’ आहोत असे म्हणण्यात हे शहाण्या माणसा, काही अर्थ नाही. श्रेष्ठ असे हरिनामाचे अमृत टाकून केवळ दूध घेण्यासारखेच होईल.
अंत:करणामध्ये वासनांचा अग्नी पेटून राहिलेला असताना गळ्यामध्ये (विरक्ती निदर्शक अशी ती तुळशीची) माळ घालून काय उपयोग ? केवळ बाह्योपचारी मोठेपणा मिळविण्याचाच तो दांभिकपणा झाला. केवळ धनसंपत्तीचे दर्शन होताच मन तिकडे धाव घेते. परमेश्वर म्हणतो मला चित्तच अर्पण केले पाहिजे- हे कसे बरे तुला कळत नाही ? तू अंतरंगातून परमेश्वराचा भक्त बनलेला नाहीस. केवळ बाहेरून संभावीत बनून दांभिकपणा करीत राहिला आहेस जो मनुष्य केवळ बहिर्मुख राहिला तो नरकाला जातो. (हे तुला माहीत आहे का?) तू पोट भरण्यासाठी नानाविध तèहेच्या खटपटी करतो आहेस. परंतु भक्तिप्रेमाशिवाय श्रीहरीची तुला भेट कशी बरे होईल ? मौन धारण करून गोमुखीत हात घालून जप केल्याचा काहीही उपयोग नाही. केवळ स्वार्थ साधण्याकरिताच तू हा परमार्थही बुडवितो आहेस. हा किती अनर्थ तुझ्या हातून घडतो आहे याची तुला कल्पनाही नाही. कांजीला तू अमृत म्हणून स्वीकारतो आहेस.
टिळा, टोपी, माळा या साèयावर शिळा पडो (या बाह्य उपाधींचा काहीही उपयोग नाही.) तसेच गुहेत बसून जप करण्याचा बहाणा करतो आहेस. तरीही तुझ्यावर त्या श्रीहरीची कृपा होत नाही. मुठीने दर्भाच्या काड्या जाळतो आहेस. गरीब बिचाèया पशूची हत्या करतो आहेस आणि तीळ, तूप, तांदूळ व्यर्थ जाळतो आहेस. मुंडण करून, दंड कमंडलू हाती घेऊन उगाच तुझ्या संन्यासीपणाचे ढोंग माजवतो आहेस. यांने काहीही साध्य होेणार नाही. हे परमेश्वरप्राप्ताची सर्व उपाय खोटे आहेत, चुकीचे आहेत.
मनुष्यप्राणी म्हणून जन्माला येण्याची ही संधी कधी पुन:पुन्हा लाभेल काय ? या दुर्लभ अशा नरदेहात येऊन काय बरे प्राप्त करून घ्यावयाचे ? परमेश्वर हा केवळ भक्तीचा भुुकेला आहे. त्याला केवळ अंतरंग भक्तीच प्रिय आहे हे परमेश्वर प्राप्तीचे वर्म तुझ्या ध्यानात येईना. तुझ्या हातून कर्मही व्यवस्थित घडत नाही आणि धर्मही तुला नीट आचरता येत नाही. अशा द्विधा मन:स्थितीत तू सापडला आहेस. मात्र तो परमेश्वर या कविरायावर पूर्ण फिदा आहे. प्रसन्न आहे....!
----------------------------------------------------------------
प्र. १ : खालील प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रत्येकी ४ पर्याय दिले आहेत योग्य निवडून पुढे लिहा.
१) राम जोशी यांना ----वाङ्मयला प्रतिष्ठा मिळवून दिली.
अ) कादंबरी, ब) चारोळी, क) गझल, ड) शाहिरी.
२) राम जोशींनी ही लावणी ---- म्हणून दाखवली.
अ) वामन पंडीत, ब) मोरोपंत, क) अंबाजीबुवा ड) होनाजी.
३) तुळशीची लाकडे म्हणजे काय?
अ) जपाची माळ, ब) तुळस, क) कमंडलू, ड) पाट.
४) ही ------ तलवार येईल काय पुन्हा?
अ) पुन:पुन्हा, ब) बारबार, क) सरकन, ड) धारदार.
५ ) रामजोशींचे घराणे ----चे होते.
अ) पंडितांचे, ब) ब्राह्मणाचे, क) क्षत्रियांचे, ड) व्यापारांचे.
उत्तरे १)-ड) शाहिरी, २)-क) मोरोपंत, ३)अ) जपाची माळ, ४)-ब) बारबार, ५)-अ) पंडीत.
एका वाक्यात उत्तरे द्या
1) मठाची उठाठेव कोण करतो?उत्तर : मठाची उठाठेव भोंदू साधू करतात
2) हरि कोणावर फिदा आहे?
उत्तर : हरि कविरायावर फिदा आहे
3) मोरोपंतानी रामजोशीना कोणती पदवी दिली?
उत्तर : मोरोपंतानी रामजोशीना ‘‘कवीश्वर ही पदवी दिली.
४) होमामध्ये काय काय जाळतात?
उत्तर : होमामध्ये तीळ, तांदूळ, तूप, दर्भ जाळतात.
2. उत्तरे लिहा.
1) रामजोशींनी ढोंगी भक्तावर कोणत्या शब्दांत हल्ला चढविला आहे ?उत्तर : केवळ हट्टानेच भगवी वस्त्रे धारण करून, डोईवर जटा ठेवून, मठाची स्थापना करून, गळ्यात तुळशी माळा घालून हा सारा व्यर्थ उठाठेव तुम्ही का करता आहात ? मनापासून केलेले नामस्मरण तेवढेच देवाला आवडते. त्याला या बाह्य अवडंबराची गरज नाही. ‘भक्त’ म्हणवून घेणाèयाने भक्तिरसात रममाण झाले पाहिजे. बाह्य गोष्टींचे अवडंबर माजविणे म्हणजे दांभिकपणाच होय. कांजीला अमृत म्हणून कवटाळणे जितके मूर्खपणाचे तितकेच खरी भक्ती टाकून देऊन बाह्य अवडंबरात गुंतणे मूर्खपणाचे. तीळ, तूप, तांदूळ, दर्भ जाळीत यज्ञ करणे व पशुहत्या करणे हे सारेच ढोंग आहे. अशा ढोंगाला परमेश्वर कधीही भुलणार नाही. अशा लोकांचे हातून धर्मही घडत नाही व कर्मही घडत नाही. ही द्विधा मनाची माणसे केवळ नरकालाच जातील. अशी टीका रामजोशी यांनी केलेली आहे.
2. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा या ओळीचे स्पष्टीकरण करा.
उत्तर : भक्ती करताना अनेक ढोंगी बाबा विविध गोष्टींचे अवडंबर माजवतात. जनात एक व मनात एक असे त्यांचे आचरण असते. पत्यक्षात त्यांची परमेश्वरांशी कधीही जवळीक नसते. पण शाहीर रामजोशींच्या मते भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो. तो भक्ताकडून कधीच कोणत्याही पकारची अपेक्षा करत नाही. शुध्द आचरण, सत्य वचन या गोष्टी परमेश्वराला अपेक्षित असतात. भक्तीचा डांगोरा पिटल्याने आपण परमेश्वरापर्यंत जाऊन पोहचू शकत नाही, तर परमेश्वराची निर्व्याज सेवा आपण केली तर ती खरी भक्ती होय.
३) जरा तरी समज धरी अंतरी, असे कवी ? का म्हणत आहेत?
उत्तर : शाहीर राम जोशींच्या भला जन्म हा ही या कवितेतील हा प्रश्न असून ही अध्यात्मिक मात्र (उपदेशपर) लावणी असून परशुराम गोडबोले यांच्या नवनीत पुस्तकातून निवडली आहे. ढोंगी साधू समाजामध्ये दंभाचार माजवतात. त्यांना देवाच्या भक्तीचा अर्थ समजलेला नसतो. बाह्यवर्णन अगदी साधूप्रमाणे पण आतून मात्र हरीशी जणू त्यांचे वाकडेच असते. या जगामध्ये माणसाला तारुण नेणारा गुरुच असतो हे तू समजून घेत आणि व्या बाह्य ढोंग कपडे, जटा, यज्ञ, कधी केसांचे मुंडण हे Tळ सगळे सोडून आणि ख-या भक्तीचे वर्य प्रभूनामात, न, आहे ही समज अंत:करणात ठेव असे म्हटले आहे.
४) ही बारबार तलवार येईल का पुन्हा म्हणजे काय?
उत्तर : शाहीर राम जोशींच्या अध्यात्मिक त, लावणीतून हा भाग निवडला आहे. समाजात धर्माच्या नावाखाली जे ढोंगी साधूचे प्रस्थ मांडले आहे त्यावर समसणून टीका करून कवीने तरुणपणाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामध्ये तारण्यातच ईश्वरप्राप्तीची तयारी करायची असते, असे म्हणून त्यांनी तारण्याला धारदार तलावारीची उपमा दिली आहे. ही तलवार गाजवून अध्यात्माचा पराक्रम करायचा त्यामुळे हे तारुण्य पुन्हा पुन्हा येणार नाही, त्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा, असे त्यांना वाटते. तरुणपणाला तलवारीची उपमा देऊन राम जोशींनी त्यात ला जोश दाखवलाय.
3. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1) ‘‘बाहेर मिरविशी आत हरिशी वाकडे याचा अर्थ काय?
उत्तर : ढोंगी साधू भगवी वस्त्र, कपाळावर टिळा, विविध माळा, केसांच्या जटा वाढवलेल्या असा अवतार करून हरिचे नाव घेत मिरवत असतात. खरंतर हे ढोंगी साधू मनापासून परमेश्वराचे नामस्मरण करतच नाहीत असा याचा अर्थ होतो. जणू त्यांचे हरिशी वाकडेच असते.
संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
1) ‘‘हरिरस सांडून घेशी दुधाउत्तर : संदर्भ : वरील ओळ ‘‘भला जन्म हा या कवितेतील असून या कवितेचे कवी ‘‘शाहीर रामजोशी आहेत.
स्पष्टीकरण : कांही भोंदू भक्त भक्तीचे अवडंबर माजवतात. समाजामध्ये आपणच श्रेष्ठ म्हणून मिरवतात. हरिरुपी रस पाशन करायचे सोडून दुध व इतर पदार्थ खातात हे सांगताना वरील वाक्य म्हटले आहे.
२) भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा!
उत्तर : वरील ओळ राम जोशींच्या भला जन्म हा या अध्यात्मिक लावणीतून निवडली आहे. समाजात धर्माच्या नावाखाली ढोंगी लोकांनी आपला धंदाच उघडला आहे. तो समजून घेतला पाहिजे. कारण देवाला या माध्यमांची गरज नसते. त्याला फक्त खच्या भक्तीची भूक असते, असे त्यांना वाटते.
५) खालील प्रश्नाचे उत्तर सात - आठ ओळीत लिहा.
१) धर्माच्या नावाखाली ढोंगी गुरू काय काय करतो?
उत्तर : राम जोशींची ही प्रसिद्ध अशी अध्यात्मिक लावणी आहे. ही लावणी राम जोशींनी कवी मोरोपंत यांना म्हणून दाखवली तेव्हा मोरोपंतांनी त्यांना कवीश्वर पदवी दिली होती. त्यामध्ये राम जोशींनी ढोंगी साधूवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणतात हे ढोंगी बाबा मोठ्या हट्टाने आपल्या जटा रंगवतात. उगाचच मठाची चौकशी करतात, वनात जातात पण चुकूनसुद्धा हरीचे नाव मनात घेत नाहीत. गळ्यात तुळशीमाळा घालतात, पण हरीशी त्यांचे वाकडेच असते. त्यामध्ये असल्या लोकांबरोबर राहून हे मानवा तू काय अध्यात्म मिळवणार आहेस? हे लोक तीळ, तांदूळ, तूप घालून यज्ञ करतात. दंड कमंडलू धार करतात. या सा-या खोट्या गोष्टी आहेत. हे तारण्य तलवारीसारखे तेज असते. ते पुन्हा पुन्हा येणार नाही. भगवंताला खरी भक्तीच आवडत असते. तुला धर्माचे रहस्य कळत नाही म्हणून तू अशा ढोंगी गुरूंच्या मागे लागतोस हे लक्षात घे. तू तुझे चित्त द्विधा न करता ख-या देवाची भक्ती कर, भक्तीने वाहिलेले १ पान १ फुलसुद्धा त्याला पुरेसे. यापेक्षा नुसते त्याचे नाव घेतले तरी त्याच्यापर्यंत पोचतो पण अशा ढोंगी लोकांनाच समाज पुजतो हेही खरे !
----------------------------------------------------------------
आख्यायिका
राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव तासे असे होते. त्यांच्या घराण्याची वृती जोसपणाची (जोशी) असल्यामुळे कालातरांने तासे हे लुप्त होऊन जोशी हे आडनाव कायम झाले.त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र जगन्नाथ जोशी. राम यांचे वडील जगन्नाथ व त्यांचे बंधू अनंत हे दोघेही वेदशास्त्रसंप्पन होते. त्यांना समाजात मानमान्यता होती, राम यांचा थोरला भाऊ मुदगल भट हा कथा-कीर्तने करी, पुराणेही सांगे. तो त्याची परंपराप्राप्त भिक्षुकीही चालवी. वडील वारल्यावर धाकट्या भावाचा सांभाळ करणे त्यांच्याकडे आले. राम जोशी व्युत्पन्न कवी होते. त्यांच्या मराठी स्फुट सुभाषितांचा संग्रह व रघुवंशाच्या धर्तीवर रचलेले यदुवंश नामक एकोणीस सर्गांचे महाकाव्य उपलब्ध आहे.
राम जोशी यांनीही आपल्याप्रमाणे कीर्तन करावे, भिक्षुकी चालवावी, कुळाची कीर्ती वाढवावी अशी भावाची इच्छा होती. पण राम जोशी लहानपणापासून हूड व उनाड असल्यामुळे त्यांनी भावाच्या इच्छेची कदर केली नाही. ते जात्या बुद्धिमान व प्रतिभावान होते खरे. परंतु तमासगिरांच्या संगतीने त्याला वाईट वळण लागले. लवकरच, त्याने शाळाही सोडली. ते त्यांच्या घरासमोरील धोंडिबा नामक शाहिराकडे अष्टौप्रहर बैठक करू लागले. कधी कधी, ते त्या त्या मंडळींतच जेवणखाणेही करत.
मुदगलभट यांनी त्यांना (भावाला) शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा राम यांनी त्यांच्याशी संबध तोडून टाकले व ते राजरोस तमाशाच्या फडात सामील झाले.
आरंभी, ते धोंडिबा शाहिराला लावण्या रचून देण्याचे काम करत; पुढे, ते स्वत:च तमाशा करू लागले. लवकरच, त्यांचा एक नामवंत तमासगीर म्हणून सर्वत्र लौकिक झाला. त्यांना कीर्ती व संपत्ती मिळाली; तथापि त्यांच्या चैनी व व्यसनी वृतीमुळे ती त्यांना टिकवता आली नाही. शेवटी, ते अगदी कफल्लक बनले व मग पश्चाताप पावून पंढरपूर मुक्कामी वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांच्याकडे विद्याध्ययनासाठी राहिले. त्यांनी तेथे काही वर्षें मन लावून अभ्यास केला आणि उत्तम कीर्तनकार व पुराणिक म्हणून ते पुनश्च सोलापूरला परतले.
राम जोशी सोलापूरला पुराणिक म्हणून किती प्रसिद्ध होते या विषयी एक आख्यायिका सांगतात, ती अशी -
सोलापूरच्या एका प्रसिद्ध मंदिरात राम जोशी यांचे बंधू मुदगलभट महाभारतावर प्रवचन करत असताना एकदा त्यांना ताप येऊ लागला. साहजिकच, पुराणात खंड पडला म्हणून मुदगलभट दु:खी झाले. त्या वेळी राम जोशी सोलापुरास परतले होते. ते मुदगलभट यांच्या घरी आले. त्यांना पाहताच मुदगलभटांस संताप आला व ते राम जोशी यांना ‘कुलांगार’, ‘घरबुडव्या’ अशा शब्दांनी दूषणे देऊ लागले. तथापी राम जोशी रागावले नाहीत. भावाच्या शिव्याशापांवर किंचितही प्रतिवाद न करता ते म्हणाले, "पोथी कोठे आहे? मी आज तुमच्या ऐवजी पुराण सांगतो." मुदगलभटांना राम जोशी यांच्या परिवर्तनाची काही कल्पना नसल्यामुळे ते ओरडून राम जोशी यांना म्हणाले, “डफ वाजवण्यात आणि पुराण सांगण्यात महदंतर आहे." तरीही राम जोशी यांनी अधिकोत्तर केले नाही. ते शांतपणे देवळात गेले व तेथे त्यांनी रसाळपणे पुराण सांगितले. त्यांच्या पुराणकथनावर श्रोते एवढे खुश झाले, की अनेकांनी त्याची स्तुती मुदगलभट यांच्यापुढेही केली.
पुढे राम जोशी यांनी कीर्तने करण्यास सुरुवात केली. बारामतीच्या मुक्कामात बाबुजी नायकांच्या घरी झालेल्या कीर्तनप्रसंगी त्यांची कविवर्य मोरोपंत यांच्याशी भेट झाली. प्रथम भेटीतच मोरोपंतांची त्यांच्यावर मर्जी बसली. राम जोशी यांच्या कवनांवर मोरोपंत एवढे खूष असत, की त्यांना ते पत्रांतून ‘कविप्रवर’ म्हणून संबोधत.
राम जोशी यांनी महाराष्ट्रभर कीर्तने केली. त्यांनी पंढरपूरचे वर्णन, तुळजापूरचे वर्णन, गिरीच्या व्यंकटेशाचे वर्णन इत्यादी लावण्या त्या त्या प्रवासात रचल्या. राम जोशी यांना शेवटी काशी यात्रा करण्याची इच्छा झाली; परंतु त्यांच्या उधळ्या वृतीमुळे यात्रेसाठी लागणारे धन त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी दुसऱ्या बाजीरावाकडे धन देण्याबद्दल अर्ज केला. परंतु बाजीरावाने त्या अर्जाला प्रतिसाद दिला नाही. अन्य काही सोय न झाल्यामुळे त्यांची काशी यात्रेची इच्छा अपुरी राहिली.
राम जोशी हे मुख्यत्वे शृंगार कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची आध्यात्मिक काव्यरचना ही त्यांचा तमाशाचा नाद सुटल्यानंतरची आहे. उपमा, उत्प्रेक्षा, तरल कल्पना आणि अनुप्रास या वाङ्मयीन गुणांनी त्यांचे लावणीवाङ्मय कोणाचेही मन मोहून टाकते. एक नमुना -
राम जोशी यांच्या ठायी पांडित्य व पाचकळपणा, प्रौढता व ग्राम्यता, वैराग्य व विलासीपणा अशा परस्परविरोधी गुणांचा मजेदार संगम झाला होता. त्यांची रचना संस्कृतप्रचुर, भाषा रसाळ आणि वर्णने खुमासदार आहेत.
राम जोशी यांच्या जीवनावर आधारीत व्ही. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट 1947 साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्ये जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्याच वर्षी राम जोशी यांच्या आयुष्यावर आधारीत 'मतवाला शाहीर राम जोशी' हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्याचे लेखन ग. दि. माडगुळकर यांचे होते.
No comments:
Post a Comment