Tuesday, May 14, 2019

रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र


                               
कवी परिचय :      नरेंद्र पंडित अयाचित
रामदेवरायाच्या दरबारी नरेंद्र, शैल्य व नृसिंह हे तीन भाऊ दरबारी कवी होते. यापैकी शैल्य याने रामायणावर रचना केली. तर नृसिंहाने ‘नलोपाख्यान’ रचले. नरेंद्राने श्री कृष्णचरित्रावर रचना करण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे ‘रुक्मिणी स्वयंवर’ ही 1880 ओव्यांची रचना केली. नरेंद्र पंडित अयाचित यांनी 1293 मध्ये त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला. या काव्यातील शब्दसौंदर्य व अर्थसौंदर्य यामुळे राजाच्या मनात असूया निर्माण झाली. त्यांने द्रव्यलोभ दाखवून ते काव्य आपल्या नावावर करण्यास सांगितले. नरेंद्राने यावर दिलेले उत्तर तडफदार होते. ‘राजे हो : आमुचेया कविकुला बोलू लागेल,’’ त्यावर राजाने धमकी दिली. म्हणून तीनही भावांनी दुरुस्तीची सबब सांगून काव्य घरी नेले व एका रात्रीत त्याची नक्कल उतरविली. परंतु ते फक्त 900 ओव्याच नकलू शकले व ग्रंथ राजाकडे दिला. या घटनेमुळे राजाला उपरती झाली व त्यांने महानुभाव संप्रदायी नागदेवाचार्यांचा मार्ग अनुसरला. नरेंद्राच्या नावे 900 ओव्यांपैकी 879 ओव्याच राहिल्या.

मूल्य : जिद्द, भक्ती
साहित्य प्रकार :   पंडिती काव्य
संदर्भ ग्रंथ :  रुक्मिणी स्वयंवर  संपादक: वा.ना. उत्पात
मध्यवर्ती कल्पना : विदर्भ देशीच्या भीमक राजाला पाच पुत्र व एक कन्या होती. राजाला आपल्या कन्येचा म्हणजे रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर करून द्यायचा होता. परंतु  रुक्मिणीच्या भावाला रुक्मिला हे मान्य नव्हते. रुक्मि हा बलशाली होता. त्याने आपल्या बहिणीचा विवाह चेदीचा राजा शिशुपाल याच्याशी निश्चित केला. परंतु रुक्मिणीच्या मनात श्रीकृष्णाशी विवाह करावयाचा होता. म्हणून तिने सुदेव या गुरु व ब्राह्मणाकडून श्रीकृष्णाला पत्र लिहून पाठविले. त्याकाळातील हे भक्तीयुक्त प्रेमपत्र आहे.



टीपा :
 राक्षस पद्धतीने विवाहाच्या आठ पदतीपैकी एक पद्धती (प्रकार) १. ब्रह्म २. दैव ३. आर्ष ४. प्रजापत्य ५. गांधर्व ६. आसुर  ७. राक्षस ८. पैशाच्य  यापैकी राक्षस पद्धतीमध्ये  वधूच्या आई वडिलांच्या  परवानगीशिवाय  तिला पळवून नेवून विवाह करणे.

पदमनाभ - ज्याच्या नाभीतून  म्हणजे बेंबीतून पद्म म्हणजे कमळ उगवले आहे, तो विष्णू. विष्णूचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण. या कमळात ब्रह्मदेव जन्मला असे म्हणतात.




कवितेचा सरळ अर्थ -

  • हे कृष्णा ! तीनही भुवनात सुंदर असे सद्गुण माझ्या कानावर पडले आणि माझ्या सकल श्रमाचे हरण झाले. (कष्ट संपले). जे सौंदर्य बघून डोळ्याचे सार्थक व्हावे अशा तुझ्या पायाशी माझे डोळे जडले आहेत. ।।1।।
  • सौंदर्य, कुलशील आणि विद्यावान अशी तुला साजेलशी या जगात कुणीही नाही याची जाणीव असूनही मी एक चांगल्या कुळातील कन्या तुलाच पती म्हणून स्वीकारू इच्छिते दुसèया कोणालाही नाही. ।।2।।
  • माझ्या मनाने मी तुझी पत्नी झाले आहे. त्यामुळे मला  वाचविण्यासाठी तू ताबडतोब धाव घे. शिशुपाळरूपी कोल्हा केव्हा धाड घालील हे कळेना आणि त्याने तुझ्यासारख्या सिंहाच्या मालकीच्या भागावर धाड घालून पळवून न्यावे हे तुला आवडणार नाही.  ।।3।।
  • तुझे वर्णन ऐकल्यापासून तुझ्या प्राप्तीसाठी मी अनेक व्रते केली, नियम धरले, देव, गुरु आणि ब्राह्मणांची सतत पूजा केली. दारी आलेल्या कोणाही याचकास परत पाठविले नाही. या सगळ्यातून मला जे पुण्य मिळाले आहे, तेच तुला इकडे यावयास तयार करेल.  ।।4।।
  • चेदीचा राजा शिशुपालाचे रक्षण करण्यासाठी मगध देशीचा राजा जरासंध आणि त्याच्याबरोबर विदुरथ वगैरे राजे स्वत:चे सैन्य घेवून आले आहेत तुझ्या बाहू पराक्रमाने त्या सर्वांना शिक्षा करून मला राक्षस पद्धतीने पळवून ने.  ।।5।।
  • माझा भाऊ रुक्मी याच्याशी भांडण केल्याशिवाय माझे हरण करण्याचा दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही. आमच्या कुळाच्या पद्धतीप्रमाणे लग्नाआधी कुलदेवतेचे दर्शन घ्यावयाचे असते, त्यासाठी मी वनात शिरणार आहे. तेथून तू मला पळवून ने.  ।।6।।
  • हे पद्मनाभा, ही माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर मी माझी जीभ हासडून जीव देईन. त्यानंतर पुढे शंभर जन्म घेऊन उग्र तपश्चर्या करेन आणि प्रत्यक्ष भगवान शंकरही ज्याला वंदन करतो असे तुझे पाय मी मिळवेन.  ।।7।।

एक वाक्यात उत्तरे द्या. 

1) रुक्मिणी कोणत्या देशाची राजकन्या होती? 
उत्तर : रुक्मिणी विदर्भ देशाची राजकन्या होती. 

2) रुक्मिणीच्या गुरुंचे नाव काय?
उत्तर : रुक्मिणीच्या गुरुंचे नाव सुदेव होते. 

3) शिव कोणाचे पाय नमितो? 
उत्तर : शिव श्रीकृष्णाचे पाय नमितो.

4.नरेंद्र कोणाच्या दरबारात कवी होते ?
उत्तर :रामदेवरायाच्या दरबारात होते.

५ . रुक्मिणीच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर : भीमक

6. . रुक्मिणीचे लग्न कोणाशी ठरविले होते ?
उत्तर : शिशुपाल

७.  रुक्मिणीने कोणाकडून श्रीकृष्णास पत्र लिहिले ?
उत्तर : सुदेव

तीन - चार वाक्यात उत्तरे लिहा. 

1) कृष्णाला काय आवडणार नाही असे रुक्मिणी म्हणते? 
उत्तर : रुक्मिणीचे श्रीकृष्णावर पेम असते. त्यावेळी ती म्हणते की, शिशुपालरुपी कोल्ह्याने जर धाड घालून मला (रुक्मीणीला) पळवले तर सिंहासारख्या कृष्णाला ते आवडणार नाही. 

2) श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी रुक्मिणीने काय-काय प्रयत्न केले आहेत? 
उत्तर : तिनही भूवनात सुंदर असे सदगुण असलेल्या श्रीकृष्णाचे वर्णन ऐकल्यापासून रुक्मिणीने त्याच्या प्राप्तीसाठी अनेक व्रते केली, नियम धरले, देव, गुरु, ब्राह्मणांची सतत पूजा केली. दारी आलेल्या याचकास परत पाठवले नाही. 

3) आपण श्रीकृष्णाला मनाने वरले आहे हे रुक्मिणी कसे सांगते? 
उत्तर : रुक्मिणी म्हणते की, ‘‘‘‘ हे कृष्णा तुला साजेलशी, कुलशील आणि विद्यावान या जगात कुणीही नाही. याची जाणीव मला आहे. तरीही तीन भवनात सुंदर असे सदगुण ऐकून माझे तुझ्यावर पेम जडले आहे. आणि पती म्हणून मी तुलाच स्वीकारलेल आहे. दुसया कोणालाही नाही. अशापकारे ती कृष्णाला पत्रातून सांगते.

४)  शिशूपालाच्या रक्षणासाठी कोण कोण आले होते ?
उत्तर : मगध देशाचा राजा जरासंध, विदुरथ  राजे हे सर्व सैन्य घेऊन शिशूपालाच्या रक्षणासाठी आले.शिवाय रुक्मिणीचा भाऊ रुक्मी ही होता.

5) श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे ?
उत्तर : कवी नरेंद्र यांनी लिहिलेल्या या ग्रंथात रुक्मिणीचे श्रीकृष्णावर प्रेम आहे तिने पती म्हणून त्यालाच वरले आहे श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावी म्हणून तिने अनेक व्रते केली तरीही श्रीकृष्णाची प्राप्ती झाली नाही तर जीभ हासडून जीव देईन असे म्हणते त्यानंतर शंभर जन्म घेऊन उग्र तपश्चर्या करून श्रीकृष्णाला मिळवेनच असे म्हणते



4) संदर्भासह स्पष्टीकरण करा. 
1) न लाविले कधीच विन्मुख याचकाते 
उत्तर : संदर्भ : वरील काव्यपंक्ती ‘‘रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र या कवितेतील असून या कवितेचे कवी ‘‘नरेंद्र आहेत. 
स्पष्टीकरण : रुक्मिणीचा भाऊ रुक्मिने रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी ठरवले. पण ते तिला मान्य नसते. म्हणून ती श्रीकृष्णाला पत्र लिहिते. त्यावेळी कृष्णाला प्राप्त करण्यासाठी आपण कोणकोणते पयत्न केले आहेत हे सांगताना ती वरील ओळख म्हणते. 




No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024