Tuesday, May 14, 2019

मनाचे पिंजरे

 










परिचय :




अनंत काणेकर (1905-1980) यांचे शिक्षण बी.ए.,एल.एल.बी.पर्यंत झाले. पुरोगामी विचारसरणीचे कवी व लेखक. ‘चांदरात’ व इतर कविता, विडंबने, निसर्ग वर्णनपर कविता, कोळ्यांच्या जीवनावरील गीते, ‘चित्रा’, ‘आशा’ इ. साप्ताहिकाचे संपादक. लघुकथा, कविता, एकांकिका, प्रवास वर्णन, टीका, लघुनिबंध, नाटके इ. साहित्यप्रकार हाताळले. 1957 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.



मूल्य :  व्यक्तिमत्त्व विकास
साहित्य प्रकार :  लघुनिबंध
संदर्भ ग्रंथ :  उघड्या खिडक्या
मध्यवर्ती कल्पना : आपल्याला एखादी वस्तू वा विषय साधा वाटतो, पण लेखक जेव्हा त्या वस्तूकडे अथवा विषयाकडे पाहतो तेव्हा त्याला त्यामध्ये एखादा मौलिक विचार सापडतो. तसेच छत्रीसारखा विषयक, परिस्थितीच्या पिंजèयात सापडून मानवाचे व्यक्तिमत्त्व खुरटत चालले आहे.

नारायण सीताराम फडके



टीपा : लघुनिबंध -  साध्या साध्या विषयातून लेखकाने वाचकांशी मारलेल्या गप्पा! लघुनिबंधाला कोणताही विषय वर्ज्य नसतो. लेखकाच्या अंतरंगात उठलेले विचारांचे तरंग व त्यापासून वाचकांना मिळणारा आनंद असे लघुनिबंधाचे स्वरूप. याचे जनक नारायण सीताराम फडके होय. ते लघुनिबंधाला ‘गुजगोष्ट’ म्हणत.







 प्र. १ :   योग्य तो पर्याय निवडून लिहा. 

१) 'मनाचे पिंजरे' या पाठाचा प्रकार कोणता? 
अ) कथा ब) वैचारिक क) ललित ड) लघुनिबंध

२) लघुनिबंधाचे जनक --- 
अ) वि. स. खांडेकर ब) ह.ना. आपटे क) बाबुराव अर्नाळकर ड) ना.सी. फडके

३) इ.स. ---------- साली अनंत काणेकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 
अ) १९५५ ब) १९५७ क) १९६० ड) १९७०

४) मनाचे पिंजरे हा पाठ या संग्रहातून निवडला आहे. 
 अ) गुजगोष्टी ब) पिकली पाने क) रुपेरी वाळू ड) क्ष उघड्या खिडक्या.

५) मनाचे पिंजरे या पाठाचे मूल्य ------ 
अ) खरेपणा ब) वृक्षप्रेम क) मानवता ड) व्यक्तीमत्व विकास

उत्तर : १) ड - लघुनिबंध, २) ड - ना. सी. लो फडके, ३) ब - १९५७ ४) ड - उघड्या ५) ड - व्यक्तीविकास


प्र. २ खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात  लिहा. 

१) लेखकाने पावसाच्या सुरवातीस छत्री किती रुपयाला विकत घेतली? 
उत्तर : लेखकाने पावसाच्या सुरवातीस छत्री १२ रुपयांना विकत घेतली.

२) लेखक कोणत्या गोष्टीच्या विरुध्द आहे?
 उत्तर :लेखक छत्री वापरण्याच्या विरुध्द आहे.

३) मानवाच्या मुक्तीसाठी काय केले पाहिजे?
 उत्तर : मानवाच्या मुक्तीसाठी परिस्थितीचे पिंजरे तोडून टाकायला पाहिजेत.

 ४) दान धर्माची सुरवात कोठून व्हायला हवी? 
उत्तर : दान धर्माची सुरवात स्वत:च्या घरापासून  व्हावी.

५) पुढल्या वर्षीपासून लेखक कोणते आंदोलन करणार आहेत?
उत्तर : पुढल्या वर्षीपासून लेखक छत्री छप्पर न मुर्दाबाद अर्थात छत्री मुर्दाबाद हे आंदोलन सुरू करणार आहेत.

 प्र. ३ : पुढील प्रश्नांची उत्तरे तीन ते चारओळीत लिहा.

१) दुकानदाराला आश्चर्य वा वाटले?  
 उत्तर : पावसाळ्याच्या सुरवातीस लेखक छत्री घेण्यासाठी जुन्या बाजारात गेले आणि कमीत कमी किमतीची छत्री त्यांनी मागितली पण १२ रुपयांची छत्री लेखकाने निवडली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले

२) आपण छत्री दुस-याकरता घेतो असे लेखक का म्हणतात?
३) उत्तर : लेखक म्हणतात पावसातून आपण छत्री न घेता चाललो तर लोक का भिजत चालता? असे विचारतात किंवा कोण हा वेडा? अशा अर्थाने टकमक पाहतात. म्हणून आपण छत्री दुस-यासाठी घेतो असे लेखक म्हणतात.

  ३) मनाचे पिंजरे कोणकोणते आहेत?
उत्तर : सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक पिंजरे आहेत. प्रत्येकवेळी आपण इतरांचाच विचार करतो. त्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास न होत नाही.

प्र. ४ : पुढील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा. 

१) पावसाळ्याचा हिशेब लेखकाने कसा घातला आहे? 
उत्तर : अनंत काणेकर आपल्या मनाचे पिंजरे या लघुनिबंधात पावसाळ्याचा हिशोब घालताना म्हणतात, पावसाळा चार महिने १२० दिवस असतो. त्यापैकी ६० दिवस नेहमी पाऊस पडतो. त्यातून तीस दिवस रात्रीचा पडतो. राहिलेले तीस दिवस तोही सारखा पडत नाही. घरी असताना, कामावर असताना असे १५ दिवस जातात. उरले १५ दिवस थोडा झिमझिम पडला तर झाडाखाली एखाद्या कोप-यात थांबून आपण सहज घरी जाऊ शकतो. असे ७ दिवस जातात. आता राहिले आठ दिवस. त्यात आपण जायला आणि जोराचा पाऊस पडायला असा योगायोग फार तर चार वेळा येतो म्हणजे चार महिन्यात चार वेळाच छत्रीचा उपयोग होतो. असा पावसाळ्याचा हिशोब लेखकाने घातला आहे.

प्र. ५ संदर्भासह स्पष्टीकरण करा. 

१) ''पण ती घेऊ नका, संबंध पाणी अंगावर येईल बघा' 
उत्तर :वरील वाक्य 'मनाचे पिंजरे' या अनंत काणेकरांनी लिहिलेल्या लघुनिबंधातून निवडले असून उघड्या खिडक्या या संग्रहातील आहे. पाठाचे मूल्य व्यक्तीमत्व विकास आहे. पावसाळ्यापुर्वी एखादी छत्री खरेदी करावी म्हणून लेखक जुन्या बाजारात गेले अगदी कमी किमतीची असावी म्हणून फाटक्या छत्रीची निवड केली. त्यावेळी दुकानदाराने ते वाक्य म्हटले आहे.




अनंत काणेकारांची ग्रंथसंपदा 


 

























अनंत काणेकर

(२ डिसेंबर १९०५- ४ मे १९८०)

चतुरस्त्र लेखक, नाट्य व वृत्तपत्र क्षेत्रातही मुशाफिरी.


कवी व लघुनिबंधकार म्हणून ओळख स्थापित केलेल्या अनंत काणेकरांनी नाट्य व वृत्तपत्र क्षेत्रातही मुशाफिरी केली. काणेकरांचा आधुनिकतेकडे ओढा होता तसंच नवतेचं त्यांना आकर्षण होतं. त्यांच्या साहित्यकृतींमधून हे दिसून येतं. कथा, कविता, नाटक, निबंध तसंच वृत्तपत्रीय लेखन करताना त्या त्या साहित्यप्रकारांतील साचेबंदपणाला फाटा देऊन ते लेखन अधिक जिवंत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या लेखनात मिस्कील खेळकरपणा व चिंतनशीलतेचा आगळा संगम आढळून येतो.


 अनंत काणेकरांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील पोलिस खात्यात नोकरीला होते; परंतु ते अडीच-तीन वर्षांचे असताना वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचं पालनपोषण त्यांची आजी व मामांनी केलं. मुंबईच्या चिकित्सक समूह शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं. मुंबईच्याच सेंट झेवियर्स महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. त्यानंतर त्यांनी एल.एल.बी. करून वकिलीची सनद घेतली; परंतु त्यांच्या आत्मचरित्रातील नोंदींनुसार एकाच व्यवसायात ते स्थिरावल्याचं दिसत नाही. १९३० साली वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोन-तीन वर्षं वकिली केल्यानंतर त्यांनी काळा कोट उतरवला तो कायमचाच. १९२७ साली काही काळ त्यांनी जाहिरातींचा व्यवसाय केला होता, तर १९५०च्या सुमारास कोळसानिर्मितीचा व्यवसायही केला होता. या दोन्ही व्यवसायांत त्यांना यश मिळालं नाही. मात्र, या धडपडींमधून त्यांचा हरहुन्नरीपणा दिसून येतो. १९३५ ते ४१ या काळात ‘चित्रा’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी पत्रकारिता केली. नंतर ते अध्यापन क्षेत्राकडे वळले. खालसा व सिद्धार्थ या महाविद्यालयांमध्ये त्यांनी मराठी विषय शिकवला.
 काणेकरांवर सुरुवातीच्या काळात मार्क्सवादाचा मोठा प्रभाव होता. १९३०च्या सुमारास ते मार्क्सवादी चळवळीत सक्रिय होते. काँग्रेसच्या १९३१च्या कराची येथील अधिवेशनात मिठाच्या कायद्यासंबंधी महात्मा गांधी व ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड अर्विन यांच्यात झालेल्या करारावर शिक्कामोर्तब होणार होतं. या अधिवेशनाच्या आधी दोन दिवस भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आलं होतं. या क्रांतिकारकांच्या रक्ताने माखलेल्या लॉर्ड आयर्विन यांच्याशी गांधीजींनी हातमिळवणी करू नये म्हणून निषेध नोंदवण्यासाठी कराचीला गेलेल्या कम्युनिस्टांमध्ये काणेकरांचाही समावेश होता. त्यांचे कम्युनिस्ट मित्र डॉ. य. ग. चिटणीस यांनी मुंबईत कामगारांसाठी ‘लेबर कॉलेज सुरू केलं होतं. तिथे ट्रेड युनियन कार्यकर्ते तयार करण्यासाठी ते वर्ग घेत असत. याच काळात क्रांतिकारक मानवेंद्र रॉय यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यांचा प्रभाव काणेकरांवर पडला. नंतरच्या काळातही साम्यवादी समाजवादावरची त्यांची निष्ठा कायम राहिली. मार्क्सवादी पत्रकार प्रभाकर पाध्यांशी त्यांचा स्नेह होता.
 के. नारायण काळे, श्रीधर विनायक वर्तक या समविचारी मित्रांच्या साथीने १९३३ साली त्यांनी ‘नाट्य मन्वंतर’ ही संस्था सुरू केली. ‘आंधळ्यांची शाळा’ हे वर्तकांचं नाटक त्यांनी रंगभूमीवर आणलं. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रामुख्याने इब्सेनची नाटकं मराठीत रूपांतरित करून रंगमंचावर आणली. इब्सेनच्या ‘डॉल्स हाऊस’चा ‘घरकुल’ हा अनुवाद त्यांनी केला. त्याचप्रमाणे १९३८ साली ‘निशिकांताची नवरी’ व १९५४ साली ‘झुंज’ ही त्यांची अनुवादित नाटकं प्रकाशित झाली. याशिवाय ‘धूर आणि इतर एकांकिका’, ‘सांबर’ आणि इतर एकांकिका संग्रह प्रसिद्ध आहेत. केशवराव दाते, केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे या त्या काळातील मातब्बर कलावंतांनी ‘नाट्य मन्वंतर’ला साथ दिली.
 याच काळात काणेकर कविताही लिहीत होते. वस्तुत: शालेय जीवनातच त्यांनी काही कविता लिहिल्या होत्या. तथापि, त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘चांदरात व इतर कविता’ प्रकाशित होण्यास १९३३ साल उजाडलं. त्याआधी या संग्रहातील काही कविता ‘रत्नाकर’ या त्या काळातील लोकप्रिय मासिकातून प्रसिद्ध झाल्या होत्या. काणेकरांनी कथालेखनही भरपूर केलं. ‘जागत्या छाया’, ‘मोरपीस’, ‘दिव्यावरती अंधेर’, ‘काळी मेहुणी व इतर कथा’ हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह. मात्र, लघुनिबंधकार म्हणून त्या काळातील वाचकांवर त्यांची अधिक छाप पडली. ओघवती, मिस्कील, साधी-सोपी शैली, सर्वसामान्यांना भिडणारे साधे साधे अनुभव आणि त्यातून मांडलेलं जीवनविषयक साधं तत्त्वज्ञान ही त्यांच्या लघुनिबंधांची वैशिष्ट्यं ठरली. ‘पिकली पाने’, ‘शिंपले आणि मोती’, ‘तुटलेले तारे’, ‘उघड्या खिडक्या’, ‘प्रकाशाची दारे’ असे त्यांचे अनेक लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत.
 काणेकरांच्या प्रवासवर्णनांमधून त्यांचं कलंदर, संवेदनशील, निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व प्रकट होतं. ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’, ‘आमची माती, आमचे आकाश’, ‘निळे डोंगर, तांबडी माती’, ‘लाल ताऱ्यांच्या प्रकाशात’ ही त्यांची गाजलेली प्रवासवर्णनं आहेत.
 नाटककार मो. ग. रांगणेकर यांच्याबरोबर काणेकरांनी ‘चित्रा’ साप्ताहिक सुरू केलं. या साप्ताहिकात राजकीय बाजू सांभाळण्याची जबाबदारी काणेकरांनी घेतली होती. चित्रपट, रंगभूमी व संपादनाची बाजू मो. ग. रांगणेकर सांभाळत होते. या संपादकद्वयीने साप्ताहिकाच्या आशय आणि मांडणीत नावीन्यपूर्ण बदल घडवून आणले व साप्ताहिकांची चाकोरी मोडली. वेगवेगळ्या लेखमाला, नवनवीन सदरं, भाषा व मांडणीतील त्यांच्या प्रयोगांचं नंतर इतरांनी अनुकरण केलं. विनोदी शैलीत गंभीर स्वरूपाची टीका प्रसिद्ध करण्याचं त्यांचं तंत्र यशस्वी ठरलं. ‘चित्रा’नंतर अनंत काणेकरांनी स्वत:चं ‘आशा’ हे साप्ताहिक सुरू केलं होतं. ‘चित्रा’ व ‘आशा’ या साप्ताहिकांमधील लेखनात त्यांनी विविध विषय हाताळले.
 १९५७च्या औरंगाबाद येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. त्यांच्या छापील अध्यक्षीय भाषणात संयुक्त महाराष्ट्र चळवळीला विरोध करणाऱ्या नेत्यांवर सभ्य भाषेत पण बोचरी टीका त्यांनी केली होती. संमेलनातील प्रत्यक्ष भाषणात त्यांनी हा भाग वगळावा म्हणून त्यांना काही मंडळींनी विनंती केली होती. त्यामुळे काणेकर छापील भाषण बदलणार अशी चर्चा सुरू झाली होती; पण प्रत्यक्ष भाषणात काणेकरांनी तो भाग जास्त ठासून वाचला व आपल्या बाणेदारपणाचं दर्शन घडवलं.
 १९६५ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ‘सोविएत लॅण्ड नेहरु’ पारितोषिकाचेही ते मानकरी ठरले. १९७९ साली त्यांचं ‘अनन्तिका’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं.
 डाव्या विचारांकडे ओढा असलेले आधुनिकतावादी आणि त्याचबरोबर रसिकता व सौंदर्यदृष्टी जपणारं हे कलंदर व्यक्तिमत्त्व ४ मे १९८० या दिवशी अनंतात विलीन झालं.

लेखन : मनोहर सोनवणे


No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024