या संदर्भातील माहिती युट्यूब वर पाहण्यासाठी क्लिक करा CLICK ME
परिचय :
मृणालिनी चितळे : मृणालिनी चितळे यांची एकूण 18 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात कथासंग्रह, शब्दांकन,मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी नाटुकली यांचा समावेश आहे. त्यांच्या कर्ता करविता या संपादित पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला आहे. मेळघाटातील मोहोर या पुस्तकासही दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेने त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर बारा वर्षे त्यांनी काम केले आहे
डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे
डॉ. रवींद्र कोल्हे |
डॉ. स्मिता कोल्हे |
उच्च विद्या संपादन करूनही सातपुड्याच्या अति दुर्गम प्रदेशात वसलेल्या बैरागड या भागात राहून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने ते दोघे कार्य करीत आहेत. दारिद्र्यानं पोखरलेल, आजारानं ग्रासलेलं ,अज्ञानाने पिचलेलं गाव त्यांनी दत्तक घेतले . तिथे कोणतीही संस्था न उभारता प्रबोधनाच्या वेगळ्या वाटा त्यांनी शोधल्या. शिक्षणातून, उत्सवातून कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवत ते काम करत राहिले. ते शेतीच्या प्रयोगात शिरले. धर्मांतराच्या प्रश्नांना भिडले. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आयबीएन लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत
https://www.facebook.com/dr.kolhe1985/videos/vl.445787815901233/1239263966217232/?type=1
लेखिका : मृणालिनी चितळे
साहित्य प्रकार : संपादित लेख
मूल्य : सामाजिक बांधीलकी
संदर्भ ग्रंथ : मेळघाटातील मोहोर
मेळघाटचे शिल्पकार
प्र . खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या .
1. मेळघाटचे शिल्पकार पाठाचे लेखक कोण ?उत्तर : मृणालिनी चितळे
2. मेळघाटचे शिल्पकार या पाठाचा वाङ्मय प्रकार कोणता?
उत्तर : संपादित लेख
3. मेळघाटचे शिल्पकार पाठाचे मूल्य कोणते ?
उत्तर :Ÿसामाजिक बांधीलकी
4. मेळघाटचे शिल्पकार हा पाठ या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
उत्तर : मेळघाटातील मोहोर
5. मेळघाटाचे शिल्पकार असे कोणाला म्हटले आहे ?
उत्तर : डॉ.रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे
6. कोल्हे दांपत्य कोणत्या ठिकाणी आपले कार्य करीत आहे ?
उत्तर : बैरागड (महाराष्ट्र)
7. कोल्हे दांपत्याला मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार कोणते ?
उत्तर : महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर व बाया कर्वे पुरस्कार.
8. टपरीपाशी थांबलेल्या मुलाच्या हातात काय होते ?
उत्तर : गुटक्याचं पाकीट
9.डॉक्टरांच्यासांगण्यामुळे मुलं कोणत्या शाळेत भरती झाली ?
उत्तर : आश्रम शाळेत
10. शाळेत जाऊन मुलांनी किती मार्क्स मिळविले ?
उत्तर : 35 ते 40
११. शहरात जाऊन मुलांनी कोणता पोशाख स्वीकारला ?
उत्तर : जीनची पँट आणि पूर्ण बाह्याचा शर्ट
१२. शिबिर कोणासाठी घ्यावीत असे डॉक्टरांना वाटले ?
उत्तर : तरुणांसाठी
१३. कोणत्या वयोगटातील मुलं शिबिरात दाखल झाली ?
उत्तर : 18 ते 20 वयोगटातील
१४. केव्हापासून डॉक्टरांनी मुलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यास सुरुवात केली ?
उत्तर : 1997 सालापासून
१५. शिबिरात शिकविणारे शिक्षक कोठून येत होते ?
उत्तर : बाहेरगावाहून
१६. डॉक्टरांनी संस्था न काढता काय करण्याविषयी कोणाशी चर्चा केली ?
उत्तर : पत्नी डॉ.स्मिता कोल्हे
१७. शिक्षणामुळे माणसांमध्ये ......... यायला मदत होते.
उत्तर : परिपक्वता
१८. ये आदिवासी कभी नही बदलेगा असा कोणाचा दृष्टिकोन असायचा ?
उत्तर : बाहेरगावाहून आलेल्या शिक्षकांचा
१९. शिबिरात कोणत्या विषयांची मुलांना ओळख करून देण्यात येत असे ?
उत्तर : शेती,आरोग्य, पर्यावरण व शासकीय योजना
२०. शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी कोणाची व्याख्याने आयोजित करण्यात येत ?
उत्तर : शासकीय कर्मचाऱ्यांची
All questions and answers
ReplyDeletePach
ReplyDelete