Tuesday, May 14, 2019

वाटणी


                                       

परिचय : 

रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म 1940) यांची कथा ग्रामीण जीवनावर आधारलेली आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण व्यक्तिरेखा, त्यांच्या कथा व व्यथा याचे सुरेख चित्रण त्यांच्या कथांतून केले आहे. ग्रामीण जीवनातील उणिवा, तेथील दारिद्र्य याबद्दल वाटणारी खंत ठिकठिकाणी जाणवते. त्यांची भाषा ग्रामीण मातीत जन्मली व वाढली आणि त्यामुळे त्या भाषेतील सर्व लकबी, त्यातील रांगडेपणा तसाच गोडवा त्यांच्या कथेत आढळतो. म्हणूनच त्यांची कथा मनात घर करून राहते. ‘माळरान’, ‘बोळवण’, ‘मळणी’ इ. कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘मळणी’ या कथासंग्रहाला व ‘पाचोळा’ या लघुकादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.




       
 





 


मूल्य :  सामाजिक समस्या
साहित्य प्रकार :  ग्रामीण कथा
संदर्भ ग्रंथ :  मळणी कथासंग्रह


 खालील पश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. 

1) दोघा जावांचं  बोलणं गणातात्यांना कसं झोंबत होते? 
उ. दोघा जावांचं बोलणं गणातात्यांना डागण्या दिल्यासारखे झोंबत होते.

2) तात्यांच्या घरी पंचमंडळी का जमली होती? 
उ. तात्यांच्या घरी पंचमंडळी वाटणी करण्यासाठी जमली होती.

3) तात्यांनी किती वाटण्या करण्यास सांगितल्या? 
उ. तात्यांनी तीन वाटण्या करण्यास सांगितल्या.

 ४. वाटणी या पाठाचा प्रकार कोणता?
उत्तर : वाटणी या पाठाचा प्रकार ग्रामीण कथा आहे.

५.  वाटणी कथेत मुले कोणाकोणाची वाटणी करत आहेत?
उत्तर : वाटणी कथेत मुले आई-वडीलांची वाटणी करत आहेत.

६.  वाटणी हा पाठ कोणत्या संग्रहातून निवडलाआहे?
उत्तर : वाटणी हा पाठ मळणी या संग्रहातून निवडला आहे.

७. गणातात्यांची किती जमीन होती?
उत्तर : गणातात्यांची २७ एकर जमीन होती.

८.  वाटणीचा हा घोळ केव्हापासून चाललेला होता?
उत्तर : वाटणीचा घोळ गेल्या सहा महिन्यापासून चालला होता.

९. रा. रं. बोराडे यांच्या कोणत्या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला आहे.
उत्तर : रा. रं. बोराडे यांच्या मळणी या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे


खालील पश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा. 

1) मुलांनी आईबापाबद्दल कोणता निर्णय घेतला होता? 
उ. : गणातात्यांच्या दोन्ही मुलांनी शेती आणि घरादारांच्या वाटण्या करून वेगळं राहायचा निर्णय घेतला होता. इतकेच नव्हे तर आईबापाचीही ते वाटणी करणार होते. आईला एकाने तर बापाला एकाने सांभाळायचे असा मन हेलावून टाकणारा निर्णय त्यांनी घेतला होता.

3) वाटणीच्या घोळाने घरात काय घडत होते? 
उ : गणातात्यांच्या दोन्ही मुलांना वाटणी पाहिजे असल्याने सहा महिन्यापासून त्याचा परिणाम घरात जाणवत होता. घरात कटकटी अधिक वाढत होत्या. त्यामुळे कधी शेतातील कामे खोळंबून राहात होती तर कधी घरातील चूल बंद पडत होती. वाटणीच्या आठ दिवस अगोदर घरातील धूसफूस अधिकच वाढली होती.

3. खालील पश्नांची   उत्तरे द्या. 

1. तात्यांच्या घरात धुसफूस का वाढली होती? त्यावर त्यांनी कोणता उपाय सूचविला? 
उ. : गणातात्यांना दोन मुले होती. दोघांचीही लग्ने झाले होती. गेल्या सहा महिन्यापासून त्या दोघांनाही एकत्र राहायला नकोसे वाटत होते. वाटण्या करून वेगळं राहण्यासाठी घरात घोळ सुरू होता. घरात भांडणतंटा वाढला होता. घरातल्या कटकटीमुळे शेतातील कामे व्यवस्थित व हंगामशीर होत नव्हती. ती खोळंबून राहात हाती. कधी कधी चूलही पेटत नव्हती. गेल्या आठ दिवसांपासून धूसफूस अधिक वाढल्याने वाटण्या होणे फार चांगले असे गण्यातात्यांना वाटू लागले. म्हणून वाटणी हाच त्यावर उत्तम उपाय आहे पण तीन वाटण्या करण्यास त्यांनी अनुमती दिली.


2.    तात्यांना धाकट्या मुलाचा का राग येत होता?
उत्तर : रा. रं. बोराडे यांच्या वाटणी या ग्रामीण कथेत गणातात्यांची दोन मुले वाटणी मागत होती. बाकी साच्या गोष्टींची वाटणी झाली होती. पण गणातात्या म्हणाले, तीन वाटण्या करा. दोघा भावांच्या दोन आणि आम्हा दोघांची एक, तेव्हा धाकडा मुलगा चिडून म्हणाला ते नाही जमायचं. लंगोटीभर जमीन मिळवून ठेवलीय. तेव्हा हा घाव तात्यांच्या जिव्हारी लागला. सत्तावीस एकर जमीन होती. त्यापैकी निम्म्याच्या वर जमीन तात्यांनीच मिळवली होती. म्हणून त्यांना राग आला होता.त्यापैकी निम्म्याच्या वर जमीन तात्यांनीच मिळवली होती. म्हणून त्यांना राग आला होता.

3)   शेवटी गणातात्यांनी कोणता निर्धार व्यक्त केला? का?
उत्तर : रा. रं. बोराडे यांच्या वाटणी कथेत मुलांनी आईवडीलांना एकेकाकडे ठेवायचे ठरवले होते. म्हणजे ज्याच्याकडे आई, दुस-याकडे वडीलांनी राहायचे. म्हणजे त्यांच्याही वाटण्या केल्या होत्या. गणातात्यांना खूप दुःख झाले. तेव्हा पाटील म्हणाले काय करता? गणातात्या म्हणाले, आम्हाला वाटण्या नको आणि दोघांनी दोन जागी राहणं नको, आम्ही नवराबायको एकाच जागी राहणार. वाटल तर कुणी धान्य द्यावं नाहीतर खाऊ मोलमजुरी करून, कारण आयुष्यभर मुलांसाठी दोघे झिजले. आता उतारवयात का वेगळं व्हायचं? सुख-दुःख वाटूनच घेऊ म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. लेखकाने सामाजिक प्रश्नावरचे भाष्य केले आहे.

४)  गणातात्यांना कोणत्या गोष्टीची कल्पना आली होती?
गणातात्या वाड्याच्या पाय-या चढत होते. ओसरीवर खूप माणसे जमली होती. गणातात्यांची चाहूल लागताच सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. देवबा पाटील आले होते. तेव्हाच गणातात्यांना वाटणी होणार याची कल्पना आली होती.

५)  मुलांना आई-बापांबद्दल कोणता निर्णय घेतला होता?
उत्तर : मुलांनी शेतीच्या घरादाराच्या भांड्यांची वाटणी करून घेतली होती. आता आई कोणाकडे रहायची, तात्या कोणाकडे रहायचे एवढाच प्रश्न उरला होता. एका ६ महिने आईला दुस-यांने त्यावेळी वडीलांना सांभाळायचे ठरवले होते.


 प्र. ४ : संदर्भासह स्पष्टीकरण करा. 
 १)  मग पोटापाण्याचं कसं करताव?
उत्तर : हे वाक्य वाटणी पाठातील असून, रा. रं. बोराडे यांच्या मळणी संग्रहातून ही ग्रामीण कथा निवडली आहे. दोन्ही मुलांनी आपल्या दोघांच्या वाटण्या केल्या म्हणताना गणातात्या म्हणाले, आम्ही दोघं एकाच ठिकाणी राहू, तेव्हा पाटील वरील वाक्य म्हणाले. 


 खालील वाक्पचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 

1) जिव्हारी झोंबणे- मनाला लागणे
2) हेटाळणी करणे- तिरस्कार करणे,
3) शिळ्या कढीला ऊत-जुन्या गोष्टी उकरून काढणे.
4. गुत्त घेणे- ठेका घेणे
5) पांग फेडणे- उपकार फेडणे.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024