Tuesday, May 14, 2019

स्वरगंगा

स्वरगंगा  : गंगुबाई हनगल 


परिचय : 


प्रा. संध्या व्यंकटेश देशपांडे (जन्म 1958) आर.पी.डी. कॉलेज बेळगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, भूमिका आणि लेखनकार्य. नाट्यांकुर या संस्थेची स्थापना. ‘अजन्मा’, ‘आक्रित’, ‘अकल्पित’, ‘वॉज आय राँग’ या एकांकिका. ‘अश्वदा’ ही कादंबरी, ‘अंतस्थ’ हे नाटक, ‘मानवतावादी बसवण्णा (अनुवादित), स्वरगंगा (चरित्र) असे त्यांचे लेखनकार्य आहे. ‘अंतस्थ’ या नाटकास रत्नागिरीच्या श्रीरंग संस्थेचा लेखन पुरस्कार, कृ.ब.निकुम्ब पुरस्कार, गो.म. कुलकर्णी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.



मूल्य : चिकाटी, ध्येयनिष्ठा
साहित्य प्रकार : व्यक्तिचित्र
संदर्भ ग्रंथ :  स्वरगंगा
मध्यवर्ती कल्पना : गंगूबाई हनगल हिंदुस्थानी संगीतातील एक अग्रगण्य नाव. किराणा घराण्याची गायकी त्यांनी परदेशातही लोकप्रिय केली. त्यांच्याबद्दलची माहिती येथे देण्यात आली आहे.

टीपा :
किराणे घराणे - ग्वाल्हेर, जयपूर इत्यादि हिंदुस्थानी संगीत परंपरेपैकी एक परंपरा. अब्दुल करीम खाँ साहेब हे या घराण्याचे संस्थापक.
बेंद्रे मास्तर - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे मराठी व कन्नड भाषेत लिहिणारे साहित्यिक. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते.
पंचम जॉर्ज, किंग मेरी - इंग्लंडचा राजा व राणी. 


अब्दुल करीम खाँ 
दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे 
सवाई  गंधर्व 

भीमसेन जोशी 
पंचम जॉर्ज, किंग मेरी


शंकराचार्य 

गंगुबाईंचे  जन्मस्थान 



 




 


प्र.1  खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 

1) किराणा घराण्याचे संस्थापक कोण?
उत्तर : अब्दुल  करीम खाँ साहेब हे किराणा घराण्याचे संस्थापक होत.

2) हुबळीला असताना गंगूबाईनी संगीताचे धडे कोणाकडून घेतले?
उत्तर : कृष्णाचार्य हुलगूर

3) बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनात गाताना गंगूबाईंना कोणते भय वाटत होते?
उत्तर : गांधीजी, नेहरू, जीना, गंगाधर देशपांडे सारखी बडी मंडळी व्यासपीठावर होती त्यामुळे गाणे चांगले होईल की नाही याची भय वाटत होते.

4) गंगूबाईंनी कोणत्या प्रकारची गाणी गायिली नाहीत?
उत्तर : भावगीते, भक्तिगीते गायिली नाहीत.

5) सरकारी शाळेतील प्रार्थना गंगूबाईंना का आवडत नसे?
उत्तर : त्या शाळेत जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचा गौरव असणारी गाणी प्रार्थना म्हणून गायली जात.

6) बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर : महात्मा गांधी

7) गंगूबाईंनी कोणत्या चित्रपटात भूमिका केली?
उत्तर : मामा वरेरकरांच्या विजयाचेे लग्न या चित्रपटात भूमिका केली.

अवांतर प्रश्न

1.  गंगुबाई हनगल हे नाव कोणत्या घराण्याशी संबंधित आहे ?
उत्तर : किराणा घराण्याशी

2.  गंगुबाई हनगल हे नाव कोणत्या प्रकारच्या संगीताशी संबंधित आहे ?
उत्तर : हिंदुस्थानी संगीत

3. गंगुबाई हनगल यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?
उत्तर : 5 मार्च 1913 रोजी झाला.

4.  गंगुबाई हनगल यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर : धारवाड येथील शुक्रवार पेठेत.

5. गंगुबाईंच्या आईचे नाव काय होते ?
उत्तर : अंबाबाई

6. गंगुबाईंवर स्वरांचा पहिला संस्कार कोणी घडविला ?
उत्तर : त्यांची आई अंबाबाईनी.

7. गंगुबाईंची आई अंबाबाई कोणते संगीत गात असत ?
उत्तर : कर्नाटकी संगीत

8. किराणा घराण्याचे संस्थापक कोण ?
उत्तर : अब्दुल करीम खाँ

9. बहुत अच्छा बेटी! अब खूब खाना और बहुत गाना’’ असे उद्गार कोणी काढले ?
उत्तर : अब्दुल करीम खाँ

10. वयाच्या सातव्या वर्षी गंगुबाईना कोणत्या शाळेत दाखल करण्यात आले ?
उत्तर : धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयात.

11. गंगुबाईंनी कोणत्या विद्यालयात देशप्रेमाचे धडे गिरवले.
उत्तर : धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयात.

12. बेंद्रे मास्तर कोण होते ?
उत्तर : द.रा. बेंद्रे हे मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक होते.

13. गंगुबाईनी टिळकांना कोठे पाहिले ?
उत्तर : धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयात.

14. राष्ट्रीय शाळेत कोणती प्रार्थना म्हणण्यात येत असे ?
उत्तर :  वंदे मातरम.

15.सरकारी शाळेत त्या काळात कोणती प्रार्थना म्हणण्यात येत असे ?
उत्तर :  जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचा गौरव असणारी गाणी म्हणण्यात येत असे.

16. गंगुबाईच्या बालपणातील महत्त्वाची घटना कोणती ?
उत्तर : बेळगावचे काँग्रेस अधिवेशन.

17. बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर : महात्मा गांधी.

18. बेळगावचे काँग्रेस अधिवेशन केव्हा झाले ?
उत्तर :  1924 साली.

19. बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनात गंगुबाईनी काय केले ?
उत्तर : गंगबाई व त्यांच्या सहकाèयांनी स्वागत गीत गायिले.

20. स्वागतगीत शिकविण्यासाठी कोठून मास्तर आणण्यात आले होते ?
उत्तर : मैसुरू

21. बेळगाव काँग्रेस अधिवेशनात व्यासपीठावर कोण बसले होते ?
उत्तर :  महात्मा गांधी, पं. नेहरू, महम्मदअली जीना, गंगाधर देशपांडे.

22. बेळगाव अधिवेशनाच्यावेळी गंगुबाईंच्या मनात कोणती भीती निर्माण झाली होती ?
उत्तर : आपल्या जातीवरून आपला अपमान होईल.

23. स्वागतगीत चांगले झाल्याबद्दल गंगुबाईंनी कोणी शाबासकी दिली ?
उत्तर : महात्मा गांधींनी

24. गंगुबाईंची जात कोणती होती ?
उत्तर : गंगामत म्हणजे कोळी किंवा नावाडी.

25. गंगुबाईंनी हुबळीला कोणाकडे संगीत शिक्षण घेतले?
उत्तर : कृष्णाचार्य हुलगूर

26. गंगुबाईंच्या गळ्यावर कोणती शस्त्रक्रिया करण्यात आली ?
उत्तर :  टॉन्सिलची

27. कोणत्या शस्त्रक्रियेमुळे गंगुबाईंचा आवाज पुरुषी झाला ?
उत्तर : टॉन्सिलच्या शस्त्रक्रियेमुळे.

28. कुंदगोळ येथे गंगुबाईनी कोणाकडे संगीताचे शिक्षण घेतले ?
उत्तर :  सवाई गंधर्व

29. सवाई गंधर्वांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर :

30. गंगुबाईनी किराणा घराण्याचे संगीत पहिल्यांदा कोणाकडून घेतले ?
उत्तर : सवाई गंधर्व

31. कुंदगोळात गंगुबाईंबरोबर संगीताचे शिक्षण कोण घेत असत ?
उत्तर : भीमसेन जोशी

32. खर्ज-रियाजाची सवय गंगुबाईना कोणी लावली ?
उत्तर :  गुरु सवाई गंधर्व यांनी.

33. कोणाचा मुलगा आजारी व मतिमंद होता ?
उत्तर : सवाई गंधर्व

34. मुलाच्या उपचारासाठी सवाई गंधर्व कोणत्या गावी येऊन राहिले ?
उत्तर : हुब्बळी

35. हुब्बळीत सवाई गंधर्वांना राहण्यासाठी कोणी खोल्या दिल्या.
उत्तर : गंगुबाई हनगल.

36. गंगुबाई सवाई गंधर्व यांच्याकडे किती वर्ष संगीत शिकल्या ?
उत्तर :  पंधरा वर्षे.

37. गंगुबाईनी कोणाला संगीत शिकविण्याची विनंती सवाई गंधर्वांना केली ?
उत्तर : आपली मुलगी कृष्णा हिला.

37. मुलीला संगीत शिकविण्यासाठी गंगुबाई सवाई गंधर्वांना किती फी देत असत ?
उत्तर : पन्नास रुपये.

38. कोणाच्या शाळेत गाण्याच्या कार्यक्रमावेळी सवाई गंधर्वाना पाहून गंगुबाईंची घाबरगुंडी उडाली ?
उत्तर : फकिराप्पा कुंदगोळ

39. कोणामुळे आपले गाणे जगभर पसरले आहे अशी गंगुबाईंची भावना होती ?
उत्तर : आपले गुरुजी व शारदांबेच्या आशीर्वादामुळे.

40. आपले स्वामी/गुरुजी कोण आहेत असे गंगुबाईंच्या आईने सांगितले ?
उत्तर : शृंगेरीचे शंकराचार्य

41. हुब्बळीत शृंगेरीचे शंकराचार्य कोणाकडे आले होते ?
उत्तर : डॉ. वागळे कुटुंबीयांकडे.

42. गंगुबाईंना शृंगेरीस येऊन गाण्याचा कार्यक्रम करण्यास कोणी सांगितले ?
उत्तर : शृंगेरीचे शंकराचार्य

43. शृंगेरी मठात गाणे गायल्याबद्दल शंकराचार्यांनी त्यांना काय दिले ?
उत्तर :  शारदांबेच्या अंगावरील वस्त्र.

44. गंगुबाईंनी कोेणत्या प्रकारची गीते गायिली नाहीत ?
उत्तर :  भावगीते, भक्तीगीते.

45. कोणत्या चित्रपटात गंगुबाईंनी भूमिका केली ?
उत्तर : मामा वरेरकरांच्या विजयाचे लग्न.

46. कोणत्या देशात गंगुबाईंनी किराणा घराण्याची श्रीमंती पोचविली ?
उत्तर : नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी.

47. किती विद्यापीठांनी गंगुबाईंना डॉक्टरेट देऊन गौरविले?
उत्तर : सहा विद्यापीठांनी

48. गंगुबाईना शारदांबेच्या अंगावरचे वस्त्र कोणी दिले ?
उत्तर : शृंगेरीच्या शंकराचार्यांनी.

49. गंगुबाईंचे निधन केव्हा झाले ?
उत्तर : 21 जुलै 2009 रोजी.

50. गंगुबाईंनी मरणोत्तर कोणता संकल्प केला होता ?
उत्तर : नेत्रदानाचा.







प्र. 2 खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार वाक्यात लिहा. 

1) गंगूबाईंना कोणकोणत्या उपाधीनी व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? 
उ. : गंगूबाई हनगल हिंदुस्थानी संगीतातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांना अनेक पुरस्कार व उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मिवभूषण, पद्मभूषण, तानसेन, केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, माणिरत्न, कर्नाटकभूषण, गोदावरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर सहा विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट देऊन गौरविले आहे. संगीत सरस्वती, संगीत सम्राज्ञी, भारतीय कंठ अशा उपाधीही त्यांना मिळाल्या आहेत.

2) गंगूबाईंच्या गळ्यावर शस्त्रक्रिया का झाली? त्याचा परिणाम काय झाला? 
उ. : गंगूबाईंचा आवाज अतिशय पातळ, नाजूक आणि बारीक होता. त्या गाऊ लागल्या की त्यांचा घसा दुखू लागे. म्हणून डॉक्टरांनी त्यांना टॉन्सिलचे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांचा आवाज पूर्णत: बदलून गेला. तो पुरुषी झाला. पण गंगूबाई त्यामुळे खचल्या नाहीत ही एक दैवी देणगी आहे. असे समजून जिद्दीने गाण्याचा सराव करू लागल्या.

प्र. 3) खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा. 

1)  बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनच्या घटनांचे वर्णन करा. 
उ. : 1924 साली बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. म. गांधी अधिवेशनाचे अध्यक्ष व ते सुध्दा बेळगावला होणाया अधिवेशनचे. या बातमीचे साया परिसरात चैतन्य पसरले होते. या कार्यक्रमाचे स्वागतगीत गाण्याचा मान गंगूबाई व त्यांच्या शाळेतील इतर विद्यार्थिनींना मिळाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 11 होते. स्वागतगीत, शिकविण्यासाठी म्हैसूरहून एक शिक्षक आले होते.व्यासपीठावर गांधीजी, नेहरू, महम्मदअली जिना, गंगाधर देशपांडे इ. बडी नेते मंडळी होती. मनात भिती असूनही सगतगीत इतके उत्तम झाले की, पत्यक्ष गांधीजींनी त्यांना शाबासकी दिली. गंगूबाईंची जात कोळी असल्याने त्या अधिवेशनात जातीवरून आपला अपमान होईल, असे त्यांना वाटले, पण तसे काही घडले नाही. या घटना दीर्घकाळ त्यांच्या स्मरणार्थ राहिल्या.

2 comments:

  1. Replies
    1. गंगूबाईंनी आपल्या गुरुंना कोणती गुरुदक्षिणा दिली

      Delete

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024