या संदर्भातील माहिती युट्यूब वर पाहण्यासाठी क्लिक करा CLICK ME
कवी परिचय :
केशवकुमार (1898-1969) यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे होय. यांनी वाङ्मयाच्या विविध क्षेत्रातून संचार केला आहे. ते कवी, नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, विनोदी लेखक, प्रभावी वक्ते, झुंझार पत्रकार, विडंबनकार म्हणून प्रसिद्ध. त्यांची ‘मी उभा आहे’, ‘लग्नाची बेडी’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘उद्याचा संसार’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘तो मी नव्हेच’ इ. नाटके गाजली. ‘कèहेचे पाणी हे आत्मचरित्र. ‘झेंडुची फुले’ हा विडंबन गीतांचा संग्रह. कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. 1942 साली नाशिक येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
‘दंवाचे थेंब’ या केशवसुतांच्या मूळ कवितेवरून केशवकुमारांनी ‘पाहुणे’ ही विडंबन कविता रचिली आहे.
मूल्य : कोडगेपणाची चीड
साहित्य प्रकार : विडंबन गीत
संदर्भ ग्रंथ : झेंडुची फुले
मध्यवर्ती कल्पना : पाहुणे खरेतर देवाचे रूप मानले जातात. पण या महागाईच्या दिवसात असे पाहुणे गाठ पडले तर गृहिणीची कशी पंचाईत होते, ते या कवितेतून दाखविले आहे. या कवितेत पहाटेच अचानक येऊन ठाण मांडणारे पाहुणे हे चोरटे, कोडगे, आळशी आहेत. त्यांचा विनोदी पद्धतीने उपहास केला आहे.
टीपा : पाहुणे ही कविता विडंबन या प्रकारची असून विडंबन हा ‘पॅरोडी’ या इंग्रजी शब्दाला पर्याय आहे यामध्ये प्रसिद्ध अशा मूळ कवितेच्याप्रमाणे पद्य रचना केली जाते. पण उपहासात्मक विपर्यास केला जातो. आणि हसत हसत दोष दिग्दर्शन होते. प्र.के. अत्रे यांनी हा काव्यप्रकार मराठीत आणला. त्यानंतर ज.के.उपाध्ये, डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी हा प्रकार रुजविला.
केशवसुत |
‘दंवाचे थेंब’ ही मूळ कविता केशवसुतांची आहे. त्या कवितेत पहाटे पडणाèया दंवाच्या थेंबांना बघून बाळाला वाटणारे कुतूहल व आईला वाटणारे निसर्गप्रेम व्यक्त झाले आहे. पण या विडंबनपर कवितेत पहाटेच अचानक येऊन ठाण मांडणारे पाहुणे हे चोरटे, कोडगे, आळशी आहेत. त्यांचा विनोदी पद्धतीने उपहास केला आहे. केशवसुतांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ते ओळखले जातात.
कवितेचा सारांश :
दवाचे थेंब ही मूळची केशवसुतांची कविता आहे. त्यात छोट्या मुलाला झाडांवरील दवाचे थेंब पाहून कुतूहल वाटते. त्याचे विडंबन केशवकुमारांनी केले आहे. यात दवाऐवजी अचानक आलेल्या पाहुण्यांना पाहून वैतागलेल्या आईची व्यथा त्यांनी विडंबनाच्या रूपातून मांडली आहे.
दवाचे थेंब ही कविता पहाटे दवाचे थेंब पाहून एका लहान मुलाला वाटणा-या कुतूहलाची आहे. त्यात पुन्हा त्या दवबिंदूला सूर्य नेईल हे वाटल्यावर तिला आपली या मुलाच्या अगोदरची वारलेली मुले आठवली आणि ती देवाला म्हणाली, देवा एवढा तरी (बाळू) राहू दे! या सगळ्यांचे विडंबन केले आहे आणि या पाहुण्यांचे दोष दाखवले आहेत. सकाळीच ओटीवर (सोप्यावर) झोपलेल्या पाहुण्यांना पाहून कुतूहलाने बाळ्याने आईला विचारले. आई हे कोठून आलेत ग? आपल्याच नात्यातले वाटतात ते बाबांच्या पेटीतून पाने, विड्या न विचारता घेत आहेत. त्याला आई म्हणते हळू बोल, जेथून कावळे, गिधाडे, घारी, डोंगळे, डास, कीडे न सांगता येतात ना, तेथूनच हे आले आहेत आम्हाला छळायला! खोकला, ताप दुखणी ज्याप्रमाणे येतात ना? तेथूनच आले आहेत. यांना घरदार नाही ते इथेच ठाण मांडणार आहेत. लवकर जाणार नाहीत. वर्षभर राहतील कदाचित. आपले कसे होणार? याची तिला काळजी वाटते व रडू येते. अखेरीस ती म्हणते देवा येवढा तरी जाऊ दे! केशवकुमारांच्या या कवितेतील पाहुणे हे अनाहूत आहेत. ते कोडगे, आळशी चोरटे आहेत. ते अनेक दिवस ठाण मांडून बसले आहेत. इतरांच्या परिस्थितीची (आर्थिक, सामाजिक जाणीव नसल्याप्रमाणे ते वागतात. महागाईच्या दिवसांत गृहिणीला त्यांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणीही येते. पण पाहुणे निर्दयी व कठोर आहेत.
प्र. १ : खालीली ओळीतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
१) पाहुणे पसरले ओटी वरी बघुनी आज ----- झी
२) बाबांच्या ------ पळविलीत विड्यांचे जुडगे.
३) तेथूनीच आले येथे हे ------ आम्हाते
४) पाहुणे मागचे स्मरले ------ पाणी आले.
५) देवा रे! मग ती स्फुदे एवढा तरी ------
उत्तरे : १)-प्रभाती, २) पेटीतूनगे, ३) छळावया, ? ४) डोळ्यातूनी, ५) जाऊ दे.
२. एका वाक्यात उत्तरे द्या.
1) बाळ्याने आईला काय विचारले?उत्तर : काल संध्याकाळी आपल्या घरी नव्हते मग आज हे पाहुणे कोठून आले असा पश्न बाळ्याने आईला विचारला.
2) पाहुणे कोठे पसरले होते?
उत्तर : पाहुणे ओसरीवर पसरले होते.
3) पाहुणे राजरोसपणे कशावर हल्ला करतात?
उत्तर : पाहुणे राजरोसपणे खाऊच्या डब्यावर हल्ला करतात.
४) बाळ्याने आईला काय विचारले?
उत्तर : बाळ्याने विचारले, आई काल संध्याकाळी आपल्या घरी कोणी नव्हते मग आज हे कोठून आले?
५) आईच्या डोळ्यात पाणी का आले?
उत्तर : मागले पाहुणे आठवून आईच्या डोळ्यात पाणी आले.
६) पाहुणे केव्हा आले?
उत्तर : पाहुणे सकाळीच आले होते.
तीन-चार वाक्यात उत्तरे द्या.
1) पाहुणे कोठून आले असे आई मुलाला सांगते?
उत्तर : कौतुकाने उत्सुकलेला बाळ्या पाहुणे कोठून आले असा पश्न जेव्हा आईला विचारतो, तेव्हा आई सांगते की कावळे, गिधाडी, घारी, डोंगळे, डास, घुंगरटी त्याचबरोबर खोकला ताप ही दुखणी आम्हास छळावयास तसेच हे पाहुणेपण आले आहेत.
2) शेवटी आई का गहिवरते?
उत्तर : आईला बाळ्या जेव्हा विचारतो की, ‘‘हे पाहुणे केव्हा जाणार? यांना घरदार नाही काय? त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देताना आईला मागे पाहुणे आठवतात व तिला गहिवरून येते. कारण मागे आलेले पाहुणे अनेक दिवस ठाण मांडून बसलेले होते. त्याचपमाणे हे ही पाहुणे ठाण मांडून बसले तर पंचाईत होईल असे तिला वाटते. त्यांची व्यवस्था कशी लावायची चिंतेत ती गहिवरते. महागाईच्या दिवसांत पाहुणचार करणे तिला जड जाणार हीच चिंता तिला ग्रासते आहे.
३) पाहुणे कोठून आले असे आईला वाटते?
उत्तर : कावळे, डास, गिधाड, घारी, चिलटे, डोंगळे तसेच खोकला, ताप हे आजार जेथून येतात तेथूनच हे पाहुणे आले आहेत, असे आईला वाटते.
४) पाहुण्यांचे वर्तन कसे आहे?
उत्तर : पाहुणे आगांतूक आहेत. त्यांना यजमानांच्या परिस्थितीचा विचारही करावा वाटत नाही.
सात-आठ वाक्यात उत्तरे लिहा.
1) पाहुणे कसे निगरगट्ट आहेत?उत्तर : पाहुणे कोणत्याही पकारची पूर्वसूचना न देता कवीच्या घरी पहाटे पहाटेच हजर होतात व घराच्या ओसरीवर पसरलेले असतात. स्वत:च्या घरात असल्यासारखेच ते वागतात. सर्वांच्या समोरच स्वयंपाक घरातील खाद्यपदार्थाच्या डब्यावर हल्ला करतात. वडिलांच्या पान सुपारीच्या पेटीतून पानाचे जुडगे पळवितात. स्वत:च्या वर्तनाचे त्यांना काहीच वाटत नाही. अशापकारे पाहुणे निगरगट्ट आहे.
२) माणसाला येणारी दुखणी आणि पाहुणे यातील साम्य कसे वर्णन केले आहे?
उत्तर : केशवकुमारांच्या पाहुणे या कवितेतलि पाहुणे हे दुखण्याप्रमाणे न सांगता अचानक येतात. केव्हा जाणार ते दोघेही सांगत नाहीत. पाहुणे आणि दुखणी छळतात. पैशांनी आणि त्रास देऊन ते छळतात. त्या दोघांचा पाहुणचार करताना आई वैतागते. ते केव्हा जातील असे वाटत राहते. ते जावेत असे वाटून आईला त्रासाने रडू येते, असे दोघांत साम्य आहे.
३) कवितेच्या आधारे पाहुण्यांच्या स्वभाव दोषांचे वर्णन करा.
उत्तर : केशवकुमारांच्या पाहुणे या विडंबन कवितेतील पाहुणे हे अनाहूत आहेत. ते कोडगे, आळशी चोरटे आहेत. ते अनेक दिवस ठाण मांडून बसले आहेत. इतरांच्या परिस्थितीची (आर्थिक, सामाजिक जाणीव नसल्याप्रमाणे ते वागतात. महागाईच्या दिवसांत गृहिणीला त्यांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणीही येते. पण पाहुणे निर्दयी व कठोर आहेत.
संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) हं हळू बोल, तनयातेउत्तर : संदर्भ : वरील काव्यपंक्ती पाहुणे या कवितेतील असून ही कविता केशवकुमार यांनी लिहिलेली आहे.
स्पष्टीकरण : घरी आलेले पाहुणे कोणताही विचार न करता वाट्टेल तसे वागत असतात. त्यांचे वर्तन बघून बाळ्याला आश्चर्य वाटते व तो आईला यांचे घरदार नाही का असा पश्न विचारतो. त्यावेळी आईने वरील उद्गार काढले आहेत.
२) देवा रे मगती स्फुदे! एवढा तरी जाऊदे!
उत्तर : ही ओळ केशवकुमारांच्या पाहुणे (झेंडूची फुले) या विडंबन प्रकारच्या कवितेतील असून, आलेल्या पाहुण्यांच्या वर्तनाने आई कंटाळली आहे. कारण ते आळशी चोरटे आहेत. अखेरीस ती देवालाच विणवणी करते की हा तरी जाऊ दे!
लेखणी- वाणीने महाराष्ट्र ढवळून काढणारा झंझावात
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
(१८९८- १९६९)
लेखणी आणि वाणी यांच्या साहाय्याने अर्धशतकाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणारं व्यक्तिमत्त्व म्हणून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची ओळख आहे. कवी, लेखक, नाटककार, विनोदकार, चित्रपटकथा लेखक, वृत्तपत्रकार, संपादक, प्रभावी वक्ते, वादविवादपटू, शिक्षणतज्ज्ञ, अस्सल मराठी बाजाचे खुमासदार लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून अत्रे यांची प्रभावशाली कारकीर्द घडली. या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने मानदंड निर्माण करत आपल्या कार्याचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला.
अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ला पुणे जिल्ह्यातील सासवडजवळच्या कर्हा नदीच्या काठावर वसलेल्या कोडीत या गावी झाला. त्यांचे वडील म्यॅट्रिकपर्यंत शिकलेले होते. त्यांचं घराणं शिवकालीन ऐतिहासिक घराण्यांपैकी एक वतनदार घराणं होतं. बापू हे अत्र्यांचं लहानपणचं टोपणनाव. अत्र्यांचं प्राथमिक शिक्षण सासवड इथे झालं. अत्र्यांची आई कलासक्त होती. तिच्यामुळेच त्यांना विविध कलांची, विशेषता नाटकाची आवड लागली. शिवाय सासवड आणि परिसरातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण, ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांच्या बालपणाच्या जडणघडणीस पोषक ठरली. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी एक विनोदी कविता लिहिली आणि आपल्यातील विनोदी लेखकाची चुणूक दाखवून दिली. वाचनाची आवड त्यांना तिथल्या वातावरणातच लागली.
१९११ साली पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्या काळात कला, विद्या, आणि ज्ञान यांचं माहेरघर असलेल्या पुण्याने अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खर्या अर्थाने आकार दिला. भावे हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना काशिनाथ नारायण पटवर्धन, 'दर्पदर्पणकार' चिपळूणकर, पुरुषोत्तम लेले, विद्याधर वामन भिडे असे काही दिग्गज लेखक शिक्षक म्हणून लाभले. नाटकाविषयीची गोडी त्यांना इथल्या वातावरणामुळेच लागली. इथल्याच नाटकांतून त्यांना मराठी रंगभूमीवर प्रवेश करण्याची संधी मिळाली. शालेय वयातच त्यांना राम गणेश गडकरी, बालकवी, तात्यासाहेब कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, रे. टिळक अशा दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभला. गडकर्यांनी त्यांच्या कविता वाचून त्यांना पसंतीची पावतीही दिली. शालेय वयातच अत्र्यांनी 'महाराष्ट्र मोहरा' ही कादंबरी लिहिली आणि 'प्रेमोद्यान' मासिकातून ती क्रमश: प्रसिद्धही झाली. अत्र्यांचं प्रसिद्ध झालेलं हे पहिलं लिखाण. पुढे त्यांनी गोष्टीही लिहायला सुरुवात केली आणि त्या विविध मासिकांत प्रसिद्ध होवू लागल्या. याच काळात त्यांना वक्तृत्त्व कलेचीही आवड लागली. अनेक भाषणं मुखोदगत करत त्यांनी विविध स्पर्धा गाजवल्या.
भावे हायस्कूलमधून म्यॅट्रिकची परीक्षा पास होताच महाविद्यालयीन शिक्षणासाठी अत्र्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही त्यांच्या जडणघडणीस समृद्ध असं वातावरण लाभलं. इथे त्यांना कविता आणि क्रिकेट या दोन गोष्टींविषयी जिव्हाळा वाटू लागला. या काळात त्यांचं राम गणेश गडकरी यांच्या घरी येणं-जाणं होऊ लागलं. गडकर्यांनी त्यांना आधुनिक कवितेचा मार्ग दाखवला. केशवसुत-गोविदाग्रज-बालकवी यांच्या कवितांची मोहिनी त्यांच्यावर होतीच. त्यामुळेच कॉलेजच्या त्रैमासिकात त्यांनी 'मकरंद' या टोपण नावाने कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांचे बरंच कौतुक त्यावेळी झालं. पुढे त्याकाळी प्रतिष्ठित असलेल्या 'मासिक मनोरंजन' या नियतकालिकात त्यांची 'चांदणी' ही कविता प्रसिद्ध झाली. त्याच बरोबर 'उद्यान' नावाच्या प्रसिद्ध असलेल्या मासिकातही त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. कॉलेजच्या काळातच त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलय तयार झालं. कॉलेजच्या विविध साहित्यिक उपक्रमांतही ते हिरिरीने सहभाग घेत असत. रॅंग्लर परांजपे, प्रा. हरिभाऊ लिमये, डॉ. पांडुरंग दामोदर गुणे, प्रा. खाड्ये, वासुदेव बळवंत पटवर्धन अशी नामवंत शिक्षकमंडळी त्यांना इथे लाभली. कॉलेजच्याच वाडिया ग्रंथालयात अत्रे यांना मुबलक साहित्य वाचायला मिळालं. विशेषत: इंग्रजी भाषेतील काव्यं, कादंबर्या, नाटकं त्यांनी अधाश्यासारखी वाचून काढली. त्यांच्या आयुष्यातल्या लेखनाची ही पूर्वतयारीच ठरली .
याच काळात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. १९१९ मध्ये त्यांचं दैवत असलेले राम गणेश गडकरी यांचंही निधन झालं. हे दोनही आधार कोसळल्यामुळे अत्रे असहाय झाले. त्यांचं बी. ए.च्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष झालं. त्याचा परिणाम होऊन ते ही परीक्षा १९१९ साली अक्षरश: काठावर पास झाले. त्यानंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईत आले. सुरुवातीला काही छोट्या नोकर्या केल्यानंतर त्यांना १९२० साली न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्याच काळात वडिलांची आपल्या मुलाने वकील व्हावं ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कायदा शिक्षणाच्या पदवीसाठीही प्रवेश घेतला. पण पुढे १९२१मध्ये प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई सोडावी लागली आणि ते परत पुण्यात परतले. त्यामुळे त्यांनी वकील व्हायची वडिलांची इच्छा अपुरीच राहिली.
पुण्यात आल्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांची हेडमास्तर म्हणून महिना ३५ रुपये पगारावर नेमणूक झाली. या शाळेत त्यांनी अनेक शैक्षणिक बदल करून शाळा नावारूपाला आणली. त्यामुळे ही शाळा 'अत्रे यांची शाळा' म्हणून ओळखली जाऊ लागली. दरम्यान, अध्यापनशास्रातील बी. टी. (मुंबई) आणि पुढे लगेच टी. डी. (लंडन) या पदव्या त्यांनी सन्मानपूर्वक प्राप्त केल्या. लंडन इथे त्यांना जागतिक कीर्तीच्या शिक्षणतज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभलं. त्यातूनच त्यांना नवशिक्षणाचा विचार मिळाला. त्याचा आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीत प्रचार-प्रसार करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यातूनच अत्रे यांनी प्राथमिक शाळांसाठी 'नवयुग वाचनमाला' आणि माध्यमिक शाळांसाठी 'अरुण वाचनमाला' वि. द. घाटे आणि कवी गिरीश यांच्या सहकार्याने सुरू केल्या. या मालांच्या उच्च गुणवत्तेमुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना अधिकृत मान्यता दिली आणि हीच क्रमिक पुस्तकं शाळांतून शिकवली जाऊ लागली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत व जिवंत वाड्मयाची व विचारांची ओळख करून देण्याचा हा प्रयोग राबवणं हे अत्र्यांनी केलेलं फार मोठं आणि महत्त्वाचं शैक्षणिक कार्य मानलं जातं. पुढे त्यांनी पुण्यात धनराज गिरी हायस्कूल आणि मुलींचं आगरकर हायस्कूलही सुरू केलं.
साहित्याच्या प्रांतात १९२१ नंतर त्यांनी केशवकुमार या नावाने कविता लिहायला सुरुवात केली. १९२३च्या आसपास पुण्यात सुरू झालेल्या रविकिरण मंडळाच्या कवींची कविता लोकप्रिय होत होती. अत्रे यांनी माधव ज्युलियन आणि या मंडळातील इतर कवींच्या कवितांची विडंबनं लिहावयास सुरुवात केली. या मंडळातील कवींच्या काव्यावृत्तींचा उपहास करणारी ही विडंबनं खूप लोकप्रिय झाली. त्याचाच 'झेंडूची फुले' (१९२५) हा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. विडंबन कविता मराठीत आणायचं श्रेय अत्रे यांनाच दिलं जातं. त्यांनी शालेय-महाविद्यालयीन काळात लिहिलेल्या कवितांचा 'गीतगंगा' (१९३५) हा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला.
महाविद्यालयीन काळातच राम गणेश गडकरी या थोर नाटककाराचा सहवास त्यांना लाभल्यामुळे त्यांना नाट्यलेखनकलेचं रहस्यही उमगलं. गडकर्यांच्या तसंच त्यांच्या इतर समकालीन नाटककारांच्या नाटकांमुळे अत्रे विशेष प्रभावित झाले. नाटकांमध्ये त्यांनी भूमिकाही केल्या. सुरुवातीला शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी त्यांनी 'गुरुदक्षिणा', 'वीरवचन' व 'प्रल्हाद' अशी नाटकं लिहिली. १९३३ साली 'बालमोहन संगीत मंडळी'चे मालक दामूअण्णा जोशी यांच्या विनंतीवरून अत्र्यांनी 'साष्टांग नमस्कार' हे नाटक लिहिलं. १० मे १९३३ रोजी पुण्याच्या विजयानंद थिएटरमध्ये त्याचा प्रयोग झाला. त्यांचं हे पहिलंच विनोदी नाटक चांगलंच यशस्वी झालं. पुढच्या काळात त्यांनी आलटून-पालटून विनोदी, प्रहसनात्मक, गंभीर नाटकं लिहिली. घराबाहेर (१९३४), उद्याचा संसार (१९३६), पराचा कावळा (१९३८), वन्दे मातरम (१९३७), मी उभा आहे(१९३९), जग काय म्हणेल(१९४०), पाणिग्रहण(१९४६), कवडीचुंबक(१९५०), आणि शेवटच्या काळात (१९६२ ते १९६९) तो मी नव्हेच, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, डॉक्टर लागू, प्रीतिसंगम, ब्रम्हचारी ही त्यांची नाटकं रंगभूमीवर आली व लोकप्रिय ठरली. १९३० नंतर चित्रपटांकडे वळलेल्या प्रेक्षकाला रंगभूमीकडे खेचून आणण्यात अत्र्यांच्या नाटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठी रंगभूमीला त्यामुळे पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. 'तो मी नव्हेच' (१९६२) हे पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचाचं तंत्र वापरून त्यांनी सादर केलेलं नाटक त्यातल्या समकालीन सत्य घटनेच्या ताज्या संदर्भामुळे विशेष गाजलं. त्यामुळे नाट्यतंत्रातही क्रांती झाली.
नाटकांच्या बरोबरीने त्यांनी विनोदी लेखनही भरपूर केलं. साखरपुडा (१९४२), ब्रॅंन्डीची बाटली (१९४४), वामकुक्षी (१९४९) हे त्यांचे विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची चांगुणा (१९५४) ही कादंबरीही प्रसिद्ध आहे. याचबरोबर त्यांनी चित्रपटलेखनही केलं. १९३७ ते १९३९ या काळात त्यांनी बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायक यांच्या 'हंस पिक्चर्स'करिता धर्मवीर, प्रेमवीर, ब्रम्हचारी, बेगुनाह (हिंदी), ब्रान्डीची बाटली व अर्धांगी अशा चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. पुढे १९४० साली मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक झाल्यानंतर त्यांनी स्वत:चीच 'अत्रे पिक्चर्स' ही कंपनी सुरू केली. 'श्यामची आई', 'महात्मा फुले' असे काही दर्जेदार चित्रपट त्यांनी निर्माण केले. साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारित असलेल्या 'श्यामची आई' या चित्रपटाला १९५४ मध्ये राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णपदक, तर 'महात्मा फुले' या चित्रपटाला १९५५ मध्ये रौप्यपदक देऊन गौरवण्यात आलं.
मराठी साहित्यात त्यांचे अनेकांशी वाद झाले. अत्रे-भावे वाद, अत्रे-फडके वाद, अत्रे-वरेरकर वाद असे वाद प्रसिद्ध आहेत. पुरोगामी दृष्टिकोन आणि भूमिकेतून त्यांनी हे वाद लढवले.
मराठी वृत्तपत्रकारितेतही अत्र्यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. याचा प्रारंभ त्यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाने झाला. १९३७ साली त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या वर्षीच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरून ते निवडूनही आले. १९३८ ते १९३९ या काळात ते स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन झाले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या. कांग्रेसच्या राजकारणाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी 'नवयुग' साप्ताहिक सुरू केलं. त्यातील 'अत्रे उवाच' या अग्रलेखांमुळे आणि पुढे दत्तू बांदेकरांच्या विनोदी सदरामुळे 'नवयुग' अतिशय लोकप्रिय झाले. 'जय हिंद' नावाचं सायंदैनिकही त्यांनी काही काळ चालवलं. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे अत्र्यांनी कॉंग्रेसचा निषेध केला आणि त्यांनी कॉंग्रेस सोडली. पुढच्या काळात ते कॉंग्रेसचे कट्टर विरोधक बनले. १९५५ साली सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं नेतृत्व अत्र्यांनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रसारासाठी त्यांनी १९५६ मध्ये 'मराठा' नावाचं दैनिक सुरू केलं. 'नवयुग' आणि 'मराठा'तून प्रखर जहाल लिखाण करून अत्र्यांनी या चळवळीचा विलक्षण झंझावाती असा परिणामकारक प्रचार-प्रसार केला. या दोन्ही वृत्तपत्रांतून वैविध्द्यपूर्ण विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यातील काही लिखाण पुढे पुस्तकरूपानं प्रसिद्ध झालं.
चरित्र, आत्मचरित्र, आणि व्यक्तिचित्रं याचबरोबर त्यांनी लिहिलेले मृत्युलेख हेही त्यांच्या लिखाणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. 'मी कसा झालो' (१९५३) आणि 'कर्हेचे पाणी' हे सहा खंडात प्रसिद्ध झालेलं आत्मचरित्र यातून केवळ अत्रे या व्यक्तीचे चरित्र आलं नसून तत्कालीन काळ, माणसे आणि घटना यांचंही वैविध्यपूर्ण चित्रण आलं आहे. त्यांनी लिहिलेली 'सूर्यास्त- (पं. नेहरू), ऑस्कर वाइल्ड, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, अब्राहम लिंकन, विनोबा ही चरित्रंही महत्त्वाची आहेत. याचबरोबर भ्रमंती (१९५६), मुद्दे आणि गुद्दे' (१९५६), केल्याने देशाटन (१९६१). समाधीवरील अश्रू (१९६९), आषाढस्य प्रथम दिवसे (१९६९), अध्यापक अत्रे (१९८५), हुंदके (१९८९) इत्यादी पुस्तकंही महत्त्वाची आहेत. त्यांच्या गाजलेल्या भाषणांचेही अनेक संग्रह प्रसिद्ध आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांशा, सुख-दुखं, भाव-भावना, जीवनविषयक समस्या त्यांनी आस्थेने समजून घेतल्या आणि त्यासबंधी भरपूर लेखन केलं. प्रसंगी समाजातील दोषांवर घणाघाती हल्ला चढवण्यासही त्यांच्यातील लेखक-पत्रकार-वक्त्याने कुणाची भीडभाड बाळगली नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरून दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. तिथेही त्यांनी विविध सामाजिक-राजकीय प्रश्नांवर आवाज उठवला. १९६७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीलाही उभे राहिले पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्तच राहिले.
एवढ्या सगळ्या क्षेत्रांवर हुकमत गाजवलेले अत्रे खर्या अर्थाने गाजले ते एक झुंजार पत्रकार आणि लेखक म्हणून. अत्र्यांच्या सर्वच लेखनातून विनोदाचा झरा खळाळताना दिसतो. मानवी वर्तनातील, स्वभावातील विसंगती त्यांनी विनोद हे माध्यम वापरून त्यांच्या लिखाणातून टिपली. त्यांचा विनोद अनेकदा अनेकांना बोचणारा ठरला. कधी कधी त्यात व्यक्तिद्वेष, बाष्कळपणा, शिवराळपणाही जाणवतो, परंतु ताजेपणा आणि जिवंत उत्स्फुर्तता यामुळे त्यात एक नावीन्यही सामावलेलं आहे. हा विनोद त्यांच्या फर्ड्या भाषणातही होता. अत्र्यांचं एकूणच व्यक्तिमत्व धाडसी आणि आक्रमक होतं. लेखक, पत्रकार, वक्ते, विनोदकार म्हणून अत्रे प्रचंड लोकप्रिय ठरले त्याचं रहस्य कदाचित त्यांच्या या आक्रमक वृत्तीत सामावलं असावं.
आयुष्यात अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालून आले. मुंबई इथे १९४१ साली भरलेल्या एकविसाव्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं, त्याचबरोबर १९४२ साली नाशिक येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधीही त्यांना मिळाली.
मराठी माणूस आणि मराठी भाषा ज्यांचा मानबिंदू होता, काव्य, नाटक, शिक्षण, पत्रकारिता, चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत ज्यांनी आपल्या असामान्य कर्तुत्त्वाने अमिट असा ठसा उमटवला अशा आचार्य प्र. के. अत्रे यांचं १३ जून १९६९ रोजी मुंबईत निधन झालं.
- महेंद्र मुंजाळ
00000000000000000000000000000000
एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात !त्यांच्या शेजारून कोलेज ची
मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो ! तो अत्रे ना विचारतो हे
काय आहे? (रुळ दाखवून )
अत्रे : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : तुझी आई आहे .
मुलगा लगेच तिथून सतकतो
--------------------------------------------------------------
हौशी नाटकांच्या प्रयोगाबिषयी बोलताना आचार्य अत्रे भाषणात म्हणाले, "नाटकाच्या तालमी करायच्या नाहीत अन आयत्या वेळी कशीतरी वेळ मारून नेली म्हणजे स्वतःला कृतकृत्य मानायचे हे हौशी नाटकवाल्यांचे एक ठराविक तंत्र होऊन बसले आहे. नाटक बसवायचे म्हणजे वाच्यार्थ्याने अक्षरशः ते खाली बसवूनच दाखवतात." पुढे ते म्हणाले, "अशाच एका हौशी नाटकाच्या प्रयोगाला गेलो असता सर्वात कोणाचे काम चांगले झाले असे सांगण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा प्रॉम्पटरचे काम सर्वान चांगले झाले, असे सांगणे मला भाग पडले..."
--------------------------------------------------------------
एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत.
एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?”
बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”
“व्हय तर!”
“किती कोंबड्या आहेत?”
“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”
“आणि कोंबडे किती?”
“कोंबडा फक्त एकच हाये.”
”एकटा पुरतो ना?”
उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.
--------------------------------------------------------------
१९६५ सालची गोष्ट असावी. नक्की मला आठवत नाही.सांगली मध्ये अत्रे यांचे भाषण होते गावभागात.मी नुकताच खेड्यातून य़ा शहरात आलो होतो,त्यामुळे अत्र्यांच्या भाषणास जायचेच असं ठरवून च सभेस गेलो होतो.दूर अंतरावर उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होतो.एवढ्यात गर्दीतून “अत्रेसाहेब खिशातला हात काढा” असा आवाज ऐकू आला. अत्र्य़ाना खिशात हात घालून बोलण्याची संवय असावी.पण अत्रे महोदयानी शान्तपणे उत्तर दिले कि “तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही”गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि अत्र्यांचे भाषण शांतपणे तसेच पुढे चालू राहिले.
0000000000000000000
कर्तृत्ववान राष्ट्र-’पती’
भूतपूर्व राष्ट्रपती कै० व्ही० व्ही० गिरी यांना एकूण आठ मुले होती.
त्याच्याबद्दल अत्र्यांच्या ’मराठा’ वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असे.
एकदा अत्र्यांनी श्री० गिरी, सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचे एक छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आणि त्याखाली शीर्षक दिले – गिरी आणि त्यांची ’कामगिरी’.
>>>>>>>>>>><<<<<<<<<
सहचारिणी
अत्र्यांची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची गाडी बिघडली म्हणून ते पायीच कामासाठी निघाले.
तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, त्याने ती संधी साधून खवचटपणें विचारले “काय बाबूराव, आज पायीच? गाडी विकली की काय?”
पण अशा प्रसंगी हार मानतील ते अत्रे कसले?
अत्रे म्हणाले, “अरे, आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाहीत बरोबर? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय?”
विरोधक खजिल होऊन निघून गेला.
0000000000000000000
विरोधकांची बाजू त्यांच्यावर त्यांच्याच भाषेत उलटवली!
'नवयुग ' हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं, तशी त्यावेळच्या अन्य नियतकालीकांबरोबर, नवयुगलाही दोन हात करावे लागले. या सगळया खेळात सर्वात जास्त रंगत आणली ती 'नवयुग' विरुध्द 'विविधवृत्त' या दोघांमध्ये नवयुग मधून काँग्रेसच्या धोरणांचा आणि राजकारणाचा पुरस्कार केलेला असायचा तर 'विविधवृत्ता'त काँग्रेसवर टिका असायची. कित्येकदा ही टिका वैयक्तिक पातळीवर सुध्दा होत असे.
पुण्यातल्या एका व्याख्यानात आर्चाय अत्रे म्हणाले, ''काही लोक मला विचारतात की, 'काय हो अत्रे, तुम्ही का तुंरुगात गेला नाहीत? (प्रचंड हशा). त्यांना माझं उत्तर असं आहे, कीं, मी आहे कॉग्रेसचा पठाण किंवा भय्या म्हणा हवे तर. घरमालक गावाला गेले म्हणजे रखवालदाराला त्या घराचा जसा सांभाळ करावा लागतो तसे काकासाहेब गाडगीळ किंवा केशवराव जेधे हे आमचे काँग्रेस पुढारी तुरुंगात गेले की,'साप्ताहिक नवयुग'चा सोरा हातात घेऊन मला या काँग्रेस हाऊसचे रक्षण करीत बसावे लागते. जो कोणी या घरावर दगड फेकील त्याच्या 'लगाव पाठीत सोटा' हे माझे कार्य आहे. तेव्हा मला तुरुंगात जाण्यास वेळ कोठून मिळणार?'' (प्रचंड हशा)
याच व्याख्यानात अत्र्यांनी हिंदूमहासभेच्या नेत्यांची भरपूर खिल्ली
उडवली होती. झालं. तटणिसांनी व्याख्यानाच्या वरच्या विषयाला अनुसरुन एक व्यगंचित्र प्रसिध्द केलं. त्यात पठाणाच्या वेषभूषेत अत्रे 'हिंदूमहासभा' नामक तरुणीचे प्रियाराधन करीत बाजेवर बसले आहेत. आणि उजव्या
बाजूला 'नवयुग'च्या सोटयावर एक कुत्रं तंगडी वर करुन लघवी करत आहे.
व्यंगचित्र प्रसिध्द झाल्यावर अत्रे विरोधकांनी प्रंचड जल्लोष केला. त्यांना वाटलं तटणिसांनी अत्र्यांवर भलतीच मात केली. या असल्या गोष्टींनी अत्रे कसले नामोहरम होतायत.
नवयुगच्या पुढच्याच अकांत अत्र्यांनी तेच व्यंगचित्र जसच्या तसं छापलं. फक्त एकच फरक केला तो म्हणजे, कुत्र्याच्या अगंवर 'तटणीस' अशी ठळठळीत अक्षरं लिहली.
एका व्यंगचित्रामध्ये थोडा बदल करुन ते पुन्हा त्या चित्रकाराच्या किंवा प्रकाशकाच्या अंगावर शिताफीने उलटवून त्याची फटफजिती करण्याच्यां या तंत्राचा महाराष्ट्रतल्या वृत्तपत्रसृष्टीतला तो पहिला नमुना होता.
प्रचारात विरोधी पक्षाची खिल्ली उडवताना. 'ढमढेरे' आडनावाच्या उमेदवारवर कोटी करताना अत्र्यांनी 'ढमढरे म्हणजे ज्यांच्या आडनावात दोन 'ढ' आणि एक 'मढे' आहे' असं सागितलं. यावर तटणिसांना अत्र्यांच्या अडनावात 'ढ' घालण्याची सुरसुरी आली. पण ह्यात आडनावात ते करणं शक्य नव्हतं म्हणून 'विविध वृत्तात' त्यांनी, 'अत्रे यांच मुळ आडनाव गाढवे आहे' असं छापलं त्यावरही अत्रे विरोधक पोट धरधरुन हसले.
तटणिसांच्या या खोडसाळपणाला नवयुग मधून 'गाढव आणि तटणीस' या मथळयाखाली सणसणीत उत्तर दिलं, ते असं :
'' 'विविधवृत्त' चे संपादक श्री.रामभाऊ तटणीस ह्यांनी असा एक नवीन शोध लावला आहे की आचार्य अत्रे त्यांचे मुळ आडनांव 'गाढवे' असे होते. ह्या संशोधनाच्या अनुषंगाने आम्हाला आणखी एक शोध लागला तो असा कीं, कालांतराने गाढवे वंशातल्या एका गाढवाचा एका तट्टाणीशी प्रेमसंबंध जडला आणि त्यापासून त्यांना जी खेचर संतती निर्माण झाली ती पुढे 'तट्टाणीस - तट्टणीस - तटणीस' ह्या नावांनी ओळखली जाऊ लागली. त्या गाढवेवंशी व तटणीसांच्या एकापेक्षाही एक खेचरलीला पाहून गाढवे वंशातल्या लोकांना इतका पच्छात्ताप झाला की, त्यांनी आपलं आडनांव बदलून टाकलं.''
हा खुलासा नवयुगमधे छापून आल्यावर, अत्र्यांना 'गाढवे' ठरवणाऱ्या तटणीसांचं महाराष्ट्रभर हसू आलं. हे झालं वृत्तपत्रीय लढाईतलं ! पण हजरबाबीपणाचा एक किस्सा अफलातून आहे.
अत्र्यांच्या ऑफिसजवळ एक गाढव मरुन पडलं. दोन दिवस त्यांच्याकडे कोणीच लक्षं दिलं नाही. शेवटी त्या गाढवाची दुर्गंधी सुटली. म्हणून अत्र्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्यखात्याशी संर्पक साधला. आरोग्य अधिका-याला ते म्हणाले ''अहो ! गेले दोन दिवस इथं एक गाढव मरुन पडलंय, कोणीच उचलून नेत नाही. आता दुर्गंधी सुटायला लागली आहे. काहीतरी करा आणि ती घाण उचलून टाका''
यावर अधिकाऱ्याला विनोद करायची इच्छा झाली. तो हसून म्हणाला ''काय हे अत्रेसाहेब? रोज तुमच्या पेपरातून एवढी घाण बाहेर काढता. एक गाढव उचललंत तर काय बिघडेल? अधिकाऱ्याला वाटलं आपण आपल्या विनोदाने अत्र्यांना गप्प केलं. तो आपल्या विनोदबुध्दीवर खुष झाला.
''अहो! ती घाण निवारणं मला अवघड नाही. पण आपल्या हिंदू धर्मात अशी प्रथा आहे की माणूस मेल्यावर क्रियाकर्म करायला त्याच्या जवळच्या
नातेवाईकाला बोलावलं जातं, म्हणून आधी तुम्हाला कळवलं. तुम्ही आला नाहीत तर भडाग्नी द्यायला मी आहेच.''
000000000000
हजरजबाबी/ समयसूचक इ.(अत्रे आणि पु.ल.)
आपल्या मराठी साहित्यामध्ये 'विनोद 'विषयाला मोठे स्थान आहे.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,राम गणेश गडकरी,आचार्य प्र.के.अत्रे,पु.ल.देशपांडे ही विनोदाची नामवंत घराणी माहित नसलेला मराठी माणूस विरळाच.अलीकडच्या काही दशकात मात्र अत्रे आणि पु.ल.ह्या जोडीने महाराष्ट्राला खदखदून हसवले.असं म्हणतात अत्र्यांनी मराठी माणसाला हसायला शिकविले आणि पु.लंनी हसवीत ...ठेवले.ह्याचे मुख्य कारण म्हणजे दोघांच्याही जवळ असलेले दोन मोठे गुण /वैशिष्ट्ये. प्रचंड हजरजबाबीपणा आणि समयसूचकता.दोघांच्याही भाषणाला खच्चून गर्दी होत असे.हंशा आणि टाळ्यांचा वर्षाव होत असे.ह्याचे कितीतरी किस्से आणि आठवणी अनेक मराठी माणसाकडे "कायम स्वरूपी ठेव"ह्या सदरात आहेत.समाजातील सर्व घटना, हालचाली ,वैगुण्ये ,माणसांच्या एकेक त-हा,स्वभाव वैशिष्ट्ये इ.इ. त्यांनी आपल्या नजरेने अचूक टिपली होती.आणि तीच आपल्या भाषणातून सर्वांना उलगडून दाखविली आणि सांगितली.मग अनेकांना असे वाटे "अरे हे तर काय साधेसुधे आहे आपल्या लक्षात कसं आलं नाही?इतकी साधी घटना असूनदेखील कुणालाच कशी कळाली नाही?"इ.इ.हाच तर मोठा फरक सर्वसामान्य जनता आणि विनोदी लेखक ह्यांच्या मध्ये आहे.आचार्य अत्र्यांच्या हजर जबाबी पणाचे किस्से तर महाराष्ट्र वर्षानुवर्षे ऐकत आला आहे.हजरजबाबीपणा म्हणजे ताबडतोब उत्तर,तत्काळ फटदिशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे.अत्रे म्हणायचे "प्रश्न दिला की लगेच उत्तर"त्यासाठी वेळ लावायचा नाही.उत्स्फूर्तपणाचे दर्शन घडवायचे.असे झाले की श्रोत्यांना खदखदून हसण्याशिवाय पर्यायच नसतो.वरील दोन्ही गुणांचे दोन्हीही विनोद्वीरांचे दोनच किस्से.:
1) १९६२ साली मी SSCला असताना सातारा येथे भरलेल्या .अ .भा.मराठी साहित्य संमेलनात काव्य गायन होते.प्रत्येक कवींनी आपल्या दोन कविता म्हणायच्या असे ठरले होते.हा कार्यक्रम सुरु झाल्यावर कवी केशवकुमार म्हणजेच अत्रे तेथे आले.रसिकांनी अत्र्यानाही दोन कविता म्हणायचा खूप आग्रह केला.कारण प्रत्येकी दोन कविता हा ठराव होता.शाळेच्या वाचनालयातून "झेंडूची फुले "हा विडंबन काव्य संग्रह मुद्दाम अत्र्यांसाठी मागविला होता.सुरवातीला नेहमीप्रमाणे माईक हातात घेऊन अत्रे म्हणाले "लोक हो, प्रत्येकांनी दोन कविता म्हणायच्या असे ठरले असले तरी मी फक्त माझी एकच कविता म्हणणार आहे" हे ऐकताच एकदम श्रोत्यांनी गलगा/गोंधळ सुरु केला आणि "नाही नाही" दोन दोन......तुम्हीपण दोन कविता म्हणायला पाहिजेत
तेंव्हा अत्रे फटदिशी म्हणाले" एकाचे दोन करायची सवय नाही मला" हे ऐकल्याबरोबर मंडपात नेहमीसारखा प्रचंड हशा झाला आणि अत्र्यांनी आपली "प्रेमाचा गुलकंद "ही कविता सादर केली.श्रोते खुश झाले.ह्या कार्यक्रमाला मी हजर होतो म्हणून तर तुम्हाला सांगता आले ही भाग्याचीच गोष्ट आहे.आता असेच माझे दुसरे भाग्य वाचा.
2)१९८६ किंवा १९८७ साली कोल्हापूरच्या देवल क्लब शताब्दीच्या मुख्य समारंभाला पु.ल.देशपांडे प्रमुख पाहुणे होते.त्यांच्या साहित्य आणि संगीत प्रेमाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे.नेहमीप्रमाणे पु.लंचे भाषण टेप करायचे म्हणून मी टेप घेऊन वेळेआधीच पद्माराजे हायस्कुलमध्ये गेलो होतो.कोल्हापुरातील अनेक दिग्गज आणि बुजुर्ग मंडळी पु.लंचे भाषण ऐकण्यासाठी आली होती देवल क्लबच्या अनेक आठवणी सांगत असताना भाषणाच्या ओघात पु.लंना ठसका लागला.आणि थोडा व्यत्यय आला.तेव्हा बिसलरी बाटलीचा जन्म न झाल्याने टेबलावरील तांब्याभांडेकडे सर्वांचे लक्ष गेले.कोल्हापूरचे तत्कालीन कलेक्टर व्यासपीठावर पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी सवयीप्रमाणे सद्य परिस्थितीचा अंदाज/आढावा घेऊन लगेच स्वतः भांड्यात पाणी ओतून ते पु.लंना पिण्यास दिले.पाणी प्याल्यावर काही क्षणातच भाईनी आपले भाषण सुरु केले आणि पहिलेच वाक्य उच्चारले "कलेक्टर लोक पाणी पाजतात असे ऐकले आहे.पण असे पाणी पाजणारा कलेक्टर कोल्हापूरला मिळाला हे करवीरकरांचे भाग्य "हे वाक्य ऐकताच हंशाटाळ्यांचा पाऊस पडला आणि त्या ओघातच पु.ल.पुढे बोलू लागले.त्यादिवशी अक्षय तृतीया होती.समारोपाच्या वेळीही भाईनी ह्याचा उल्लेख केला आणि शेवटी म्हणाले" देवल क्लबमधील तंबोरे असेच अक्षयपणे वाजत राहोत."ही सदिच्छा व्यक्त करून ते थांबले.(वरील आठवण नंबर 25 "कोट्याधीश पु.ल." मध्ये आहे.
00000000000000
आचार्य आत्रे व जगन्नाथ राव जोशी.
जगन्नाथ राव जोशी हे मोठे ईरसाल व्यक्तिमत्व होउन गेले. जन संघ घडवण्यात ज्या अनेकांनी आयुष्य वेचले ( व पदरी काही पडले नाही - आपल्या दृष्टीने) त्या पैकी एक.ते अविवाहित होते
ते मूळ कानडी असले तरी त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. भाषणे तर अती खुसखुशीत करीत असत. त्यांच्या भाषणात लैगिकता सूचकता , अतिशयोक्ती , बिनबुडाचे आरोप यांची बरसात असे. एकंदर जनसंघ-संघात थोडेसे मिसफिट असणारे व्यक्तिमत्व.
त्यांनी महाराष्ट्र , कर्नाटक , म.प्रदेशातून अनेक निवडणुका लढवल्या ( म्हणजे बहुतेक वेळा पडले). लोकसभे साठी १९६७ सालच्या निवडणुकीमध्ये पुण्यात जगन्नाथ राव विरुद्ध आ. अत्रे सामोरा अमोर उभे होते. त्याच वेळी अत्रे विधान सभेची निवडणूक मुंबईतून लढवत होते. आ. अत्रे नी एका भाषणात जगणनाथ रावां वर भरपूर टीका केली. हया कानाड्याची (उपार्याची) पुण्यात हात भर " - - " फाटेल .....
पुढच्याच सभेत जगन्नाथ रावांनी ही कोटी उलटवली "ज्या अत्र्याचा एक पाय मुंबईत व एक पुण्यात आहे त्याची "- -" सव्वा हात फाटलेलीच आहे , शिवण्याची सोय करायची असेल तर सांगा".
तर हया विद्वान ,सज्जन , निष्ठावान कानाड्याची पुण्यात खरच फाटली , आणि आज असाच एक भ्रष्टाचाराचा शिरोमणी कानाड्या पुण्यात संभावित पणे मिरवतो आहे.
उतार वयात जगन्नाथ राव एकाकी झाले. प्रमोद महाजनांनी त्यांची निष्ठेने सेवा केली. हे ही थोडे अवांतर.
________________________________________________________________
No comments:
Post a Comment