Tuesday, May 14, 2019

आई समजून घेताना

इलंदा  कांबळे 



 लेखक परिचय : 


उत्तम मारुती कांबळे (जन्म 1956) ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘श्राद्ध’, ‘अस्वस्थ’, ‘नायक’ या कादंबèया, ‘रंगमाणसांचे, ‘कथा माणसांच्या’, ‘कावळे आणि माणसं’, ‘परत्या’, ‘न दिसणारी लढाई’ हे कथासंग्रह तसेच ‘देवदासी’ आणि ‘नग्नपूजा’, ‘भटक्याचे लग्न’, ‘कुंभमेळा’ अनिष्ट प्रथा हे संशोधनपर ग्रंथ तसेच ‘जागतिकीकरणात माझी कविता’, ‘नाशिका तू एक सुंदर कविता’, ‘पाचव्या बोटावर सत्य’ हे कविता संग्रह आणि ‘आई समजून घेताना’ व ‘वाट तुडवताना’ ही आत्मकथने तसेच ‘थोडस वेगळं’, ‘तिरंग्यातून गेला बाप’ ही ललित पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी अनेक ग्रंथाचे संपादन केले आहे. ‘आई समजून घेताना’ या पुस्तकाचे कन्नड, इंग्रजी व ब्रेल लिपीत रूपांतर झाले आहे. यांनी 2010 साली ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

मूल्य :  मातृमहिमा
साहित्य प्रकार :  आत्मकथन
संदर्भ ग्रंथ : ‘आई समजून घेताना’

उत्तम मारुती कांबळे ग्रंथसंपदा 





 



प्र. १ :  एका वाक्यात उत्तरे द्या. 

1) आक्काचे माहेर कोणते? 
उ. : आक्काचे माहेर टाकळीवाडी हे होय.

2) आक्काने डोक्यावरून काय आणले? 
उ. : आक्काने डोक्यावरून लाकडाची मोळी आणली होती.

3) लेखकाला रोज किती भाकरी खायला मिळे? 
उ. : लेखकाला रोज दीड भाकरी खायला मिळे.

4) आईला इतिहास कोणी नाकारला होता? 
उ. : आईला इतिहास समाज व्यवस्थेने नाकारला होता.

5) आई आपले भविष्य कोठे पहात होती? 
उ. : आई स्वत:चे भविष्य लेकरांच्या भविष्यात बघत होती.

6)  लेखक आईला काय म्हणत असत? 
उत्तर : लेखक आईला आक्का असे म्हणत असत.

7)  लेखकाने संध्याकाळी आईला कोणती बातमी सांगितली? 
उत्तर : सातवीच्या वर्गात आपण पहिल्या नंबरने पास झालो ही बातमी सांगितली.

8) भाकरी थापता थापता आई काय म्हणाली? 
उत्तर : भाकरी थापता थापता आई म्हणाली पास झालास पण पुढील शिक्षणाचे काय?

9)  लेखकाचे वडील कोठे काम करत होते?
 उत्तर : लेखकाचे वडील सुरवातीस मिलिट्रीत काम करीत असत.

10) आईने थळोबास कोणता नवस केला होता? 
उत्तर : आईने थळोबास नवस केला की, ‘पोराला यश दे तुला नारळ देईन.

प्र. २ :  रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 

१) आईची सारी ताकद - लढाईतच खर्च होत असे

२) नवरा मेल्यावर काय - होत ते रांडमुंड बाईलाच माहित

३) माझे सारे शब्द तिने केलेल्या – जन्माला आले आहेत

 उत्तर : १) भाकरीच्या  २) दु:ख  ३) लढाईतून






प्र. ३ :  खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा. 


1) आईचा चेहरा गंभीर का झाला? 
उ. : लेखक सातवीच्या परीक्षेत पहिल्या नंबरने पास होतात. घरची परिस्थिती खूप हालाकीची असते. आपला मुलगा हुशार आहे. पण पुढच्या शिक्षणाच्या खर्चाच्या चिंतेन लेखकाच्या आईला घेरलेले असते. पुढच्या शिक्षणाच्या खर्चाचा ताळमेळ कसा लावावा या काळजीतच आईचा चेहरा गंभीर झाला होता.

2) अण्णाने काय-काय करावे असे आईस वाटे? 
उ. : लेखकाच्या वडिलांना म्हणजे अण्णांना दारु पिण्याचे व्यसन होते. म्हणून अण्णान दारु सोडावी, रोज कामाला जावे, पैसे मिळवावेत, संसारासाठी वापरावेत, पोरांना शिक्षणासाठी द्यावेत, घर बांधावं, पोरांना कपडे द्यावेत व आपल्या संसाराकडे लक्ष द्यावे असे आईला नेहमी वाटे.

3) माळावरच्या थळोबावर लेखकाचा विश्वास का नव्हता.? 
उ. : माळावरच्या थळोबा देवावर त्यांच्या आईचा विश्वास असतो. म्हणून ती थळोबाकडे आपल्या मुलाच्या यशासाठी पार्थना करते. पण लेखकाच्या थळोबावर विश्वास नसतो. कारण रात्रंदिवस राबणाया आणि असंख्यवेळा पाणी पिऊनच भूक मारणाया आपल्या आक्काच्या मदतीला देव येत नव्हते. उलट देवालाच नारळ नैवेद्य लागत असे.

४)  लेखक बातमी सांगतो म्हटल्यावर आई काय म्हणाली? 
उत्तर : आई म्हणाली कसली बातमी?  भारा वाहून डोक्याला कड आल्या. आई किती करेल? याचा कोणी विचार करत नाही. म्हणजे आईने विषय बदलला.

५) लेखकाने आईस तू काळजी करू नको असे का म्हटले? 
उत्तर : लेखकाच्या लक्षात आले की, खर्चाचे काळजीने आई आनंद व्यक्त करू शकत नव्हती. तेव्हा त्यांना वाटल आईला समजून घ्यायला हवे, ते म्हणाले त काळजी करू नको. मी रायबागला बोर्डिंगात जाईन, तिथे जेवण, शिक्षण, राहण मोफत आहे आणि रायबागला मी चालत जाईन.


प्र. ४ :  पाच सहा वाक्यात उत्तरे द्या. 

1) आपला मुलगा पास झाल्याचा आनंद आक्का का व्यक्त करू शकत नव्हती? 
उ. : लेखक सातवीच्या परीक्षेत शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होतात. ही बातमी आक्काला सांगितल्यावर तिलाही आपल्यासारखा खूप आनंद होईल असे लेखकाला वाटते. पण तसे झाले नाही. लेखकाने आपण पास झाल्याची बातमी सांगूनही आक्काच्या चेहयावर आनंदापेक्षा काळजीच जास्त जाणवत होती. आपला मुलगा हुशार आहे. त्याला जर आपण पुढं शिकवल तर आपले भविष्य उजळेल असे तिला वाटते. पण हे जरी खर असल तरी घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आपल्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा खर्च कसा करायचा, पैसे कोठून जमवायचे या काळजीने आक्का आनंद व्यक्त करत नव्हती.

प्र. ५ : संदर्भासह स्पष्टीकरण करा. 

१)  बाबा थळोबा माझ्या पोराला कामात यश
उत्तर : वरील वाक्य आई समजून घेताना या उत्तम कांबळे लिखित पाठातील असून सातवी पास झाल्यास शिक्षण घेण कठीण आहे हे लक्षात आल्यावर लेखक रायबागला शिक्षण घेईन तिथे सर्व मोफत आहे. ते ऐकून तिला धीर आला व थळोबा नावाच्या ग्रामदेवाला तिने वरील वाक्य म्हणून नारळ देण्याचा नवस केला.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024