कवी परिचय :
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (1275-1296) मराठीतील महान संतकवी व तत्त्वज्ञ. हे मूळचे नाथ संप्रदायी होते. भागवत संप्रदाय म्हणजेच वारकरी पंथाचे संस्थापक. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरील मराठीत केलेली टीका होय. आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली. ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’ हे इतर गं्रथ तसेच अभंग व पदे ही स्फुट रचना त्यांनी केलेली आहे. ‘ओवी ज्ञानेशाची’ असा त्यांच्या ओवीचा सार्थपणे गौरव केला जातो.
मूल्य : आर्तता, तळमळ
साहित्य प्रकार : (ओवी) विरहिणी
संदर्भ ग्रंथ : सकल संतगाथा
टीपा : विरहिणी - देवाच्या विरहाने आर्त झालेल्या भक्ताच्या अवस्थेचे वर्णन असणारी काव्यरचना.
हे गाणे युट्यूब वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कावळा - हा कवींनी वर्ज्य मानलेला पक्षी आहे पण लोकसाहित्यात तो माहेरचा दूत मानला आहे. या विरहिणीतील स्त्री त्याला प्रेमाने ‘काऊ’ म्हणते. त्यांने ‘पंढरीराव’ घरी येण्याचा शकुन सांगावा असे तिला वाटते.
प्रस्तावना : ‘पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता.
कवितेचा भावार्थ : 1. संत ज्ञानेश्वर सांगतात की, पलीकडे कावळा ओरडत आहे. तो मला नक्कीच काहीतरी शुभशकून सांगत असणार. ज्ञानेश्वरांना असे वाटते, कारण घराजवळ कावळा ओरडला की, घरी कोणीतरी पाहुणा येणार अशी लोकांमध्ये एक समजूत आहे.
2. ओरडणारा कावळा उडाला तर पाहुणा नक्कीच येतो, असाही समज रूढ आहे. म्हणून संत ज्ञानेश्वय त्या कावळ्याला सांगतात की, हे काऊ, तू उडून जा. तू जर उडालास तर तुझ्या पायात सोन्याचे दागिनोालीन. पण माझे पाहुणे पंढरीराय माझ्या घरी केव्हा येतील ते सांग.
3. संत ज्ञानेश्वर पुढे सांगतात की, मी तुला दहीभाताचा घास भरवीन. पण मला प्राणाहूनही प्रिय असलेल्या माझ्या पंढरीरायाविषयी काहीतरी मधुर बातमी मला लवकर सांग.
4. तुझ्या ओठाला मी दुधाची वाटी लावीन. पण माझा विठू कधी येईल याबद्दल मला खरे खरे काय ते सांग.
5. तू आता आंब्याच्या फांदीवर जा. तिथली मधुर मधुर फळे चाख आणि आताच्या आता, या क्षणी मला शुभशकून सांग; म्हणजे माझा विठुराया मला आज भेटेलच अशी खात्री दे. (तू आंब्याच्या डहाळीवरील रसाळ आंब्याचा आस्वाद घे आणि आताच्या आता मला माझा शकुन सांग.)
6. संत ज्ञानेश्वर सांगतात की, पंढरीनाथ भेटणारच असा शकुन सांगणारी ही खूण समजून घ्या
-----------------------------------------------------------------
अवांतर प्रश्न
1. संत ज्ञानेश्वरांना कोणाच्या भेटीची ओढ लागली आहे ?उत्तर : संत ज्ञानेश्वरांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे.
2. कावळ्याच्या ओरडण्यातून काय सूचित होते ?
उत्तर : कावळ्याच्या ओरडण्यातून, पाहुणा म्हणजे विठ्ठल येणार आहे, हा शकुन सूचित होतो, असे मानतात.
3. ‘काऊ कोकताहे’ यामुळे संत ज्ञानेश्वरांनी कोणती खूण जाणली ?
उत्तर : पंढरीरायाचीच भेट होणार, ही खूण ‘काऊ कोकताहे’ यातून संत ज्ञानेश्वरांनी जाणली.
4. विरहिणी म्हणजे काय ?
उत्तर : देवाच्या विरहाने आर्त झालेल्या भक्ताच्या अवस्थेचे वर्णन म्हणजे विरहिणी.
उत्तर : भागवत संप्रदायाचे संस्थाक
संतप ज्ञानेश्वरांना म्हटले जाते.
6. ज्ञानेश्वरांनी कावळ्याला काय म्हटले आहे?
उत्तर : ज्ञानेश्वरांनी कावळ्याला 'काऊ' असे । म्हटले आहे.
7. ज्ञानेश्वरांनी कितव्या वर्षी संजीवन समाधी घेतली?
उत्तर : ज्ञानेश्वरांनी २१ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली?
8. ज्ञानेश्वरांना आपल्या घरी पाहुणे म्हणून र कोण यावे असे वाटते?
उत्तर : ज्ञानेश्वरांना आपल्या घरी पाहुणे म्हणून पंढरीचा राजा पांडुरंगाने यावे असे वाटते.
प्र. 2 खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा.
1. हवा असलेला शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला काय काय देऊ करतो?
उत्तर : कावळ्याने पंढरीचा राणा पांडुरंग आपल्या घरी पाहुणा म्हणून यावा यासाठी काव काव करून शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला दहिभाताचा घास, वाटी भरून दूध, पाय सजविण्यासाठी सोने, रसाळ आंबे देऊ करतो.
प्र. 3 संदर्भासहीत स्पष्टीकरण करा.
1. पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती’’
उत्तर : संदर्भ : संत ज्ञानेश्वरांच्या ‘पैल तो गे काऊ कोकताहे’ या अभंगातून ही ओळ घेतली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ओरडणाèया कावळ्याला हा प्रश्न विचारला आहे.
स्पष्टीकरण : संत ज्ञानेश्वर हे विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. त्याच वेळी पैलतीरावर कावळा ओरडत आहे. कावळा ओरडला की शुभशकुन झाला व पाहुणा येणार असे मानले जाते. ज्ञानेश्वरांच्या ध्यानीमनी पाहुणा म्हणजे पंढरीचा विठ्ठल. म्हणून ते त्या ओरडणाèया कावळ्याला विचारतात, ‘‘पाहुणे पंढरीचे राजे केव्हा येणार आहेत ?’’
वैशिष्ट्य : या प्रश्नातून संत ज्ञानेश्वरांची पंढरीरायाच्या भेटीची ओढ व्यक्त होते.
---------------------------------------------------------------------
७०० वर्षापुर्वी कानडीचा प्रभाव होता हे संत ज्ञानेश्वरांचे वाञमय वाचले की जाणवते. यात प्रत्येक ओळीच्या शेवटी येणारा ऊ हा या काऊ मध्ये पणयेतो. उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । बंगाली भाषेत जसा रविंद्रनाथांनी जिथे तिथे ब आणला जसे वर्षा ऐवजी बर्षा तसाच भाषेला गोडवा आणण्याचा प्रकारअसावा. शकुनाला भारतीय संस्क्रूतीत आणि खास करुन ज्योतिषशास्त्रातफार महत्व दिले आहे. शकुनाचा संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांना सुचावा हे त्या काळाला धरुनच आहे असे वाटते.
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment