Monday, May 13, 2019

नोकर ? छे, मालक !


परिचय : 


चिंतामण विनायक जोशी (1892-1963) सुप्रसिद्ध मराठी विनोदी लेखक. पुणे येथे जन्म. पालीभाषेचा विशेष व्यासंग. आरंभी शिक्षण खात्यात माध्यमिक शिक्षक. पुढे नोकरीच्या निमित्ताने बडोदा येथे वास्तव्य. पाली, इंग्रजी आणि मराठी विषयाचे अध्यापन. 1928 नंतर बडोदा सरकारचे दप्तरदार. ‘सहविचार’ या नियतकालिकाचे संपादक. ‘एरंडाचे गुèहाळ’, ‘चिमणरावांचे चèहाट’, ‘पुन्हा एकदा चिमणराव’, ‘ओसाडवाडीचे देव’, ‘वायफळाचा मळा’ इ. विनोदीकथासंग्रह प्रसिद्ध. चिमणराव आणि गुंड्याभाऊ हे दोन मानसपुत्र त्यांनी आपल्या साहित्यातून लोकप्रिय केले.
मूल्य :  स्वभावदोष, विनोदनिर्मिती
साहित्य प्रकार :  विनोदी कथा
संदर्भ ग्रंथ :  आणखी चिमणराव

 

 


स्वाध्याय 

प्र.1  खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) लेखकाने स्वयंपाकासाठी कोणाची निवड केली?
उत्तर : लेखकाने स्वयंपाकासाठी वयस्कर बाईची निवड केली.

2) काकूबाईना चहा कोणी करून दिला?
उत्तर : काकूबाईना मैनाने चहा करून दिला.

3) काकू कोणाच्या दर्शनाला गेल्या होत्या?
उत्तर : काकू रामेश्वराच्या दर्शनाला गेल्या होत्या?

4) निरंजनबुवांच्या मठात काकूना काय म्हणत होते?
उत्तर : निरंजनबुवांच्या मठात काकूना ‘संगीत काकू’ म्हणत होते.

5) बोक्याने आपली एकादशी कशी मोडली?

उत्तर : बोक्याने आपली एकादशी पोपटाला खाऊन मोडली.

6) काकूनी कोणता निर्वाणीचा संदेश दिला?
उत्तर : कुत्र्याला तरी घालवून द्यावे अथवा काकूना तरी कायमची रजा द्यावी असा निर्वाणीचा संदेश काकूनी दिला.

7) लेखकाच्या कुत्र्याचे नाव काय होते? 
उत्तर : लेखकाच्या कुत्र्याचे नाव वसंत होते.

8) बुधवारी काकूबाई कोठे गेल्या?
उत्तर : बुधवारी काकूबाई लेखकाच्या मुलांकरिता नाटकाचे फुकट पास आणण्यासाठी गेल्या.

9) काकूंचा आकांत पाहून शेजाèयापाजाèयांना काय वाटले?
उत्तर : काकूंचा आकांत पाहून शेजाèयापाजाèयांना वाटले की, लेखकाचा द्वितीय पुत्र रघुनाथ (राघू) कैलासवासी झाला की काय ?

10) काकूनी सोवळ्याच्या गाठोड्यात काय लपवून ठेवले होते?
उत्तर : काकूनी सोवळ्याच्या गाठोड्यात लोण्याचा डबा लपवून ठेवला होता.

प्र.2 खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1) आजीबाईंनी ............. पितळी पिंजरा घट्ट धरून ठेवला होता. (पोपटाचा)
2) मैनाबाई दोन लाकडं पेटवून ............. चं आधण ठेवा. (भाताचं)
3) भजनं संपल्यावर काकूंची ............. सुरू झाली. (नाट्यगीतं)
4) मोरू आणि राघू यांच्या मदतीने ............. करण्याचे मी ठरविले. (पिठले भात)
5) आधी पोटोबा अन् ............. अशातली ही ठमाकाकू नाही बरं का. (मग विठोबा)
6) काकूंनी साडेदहापर्यंत ............. केली. (पाकसिद्धी)
7) विठ्याबाळा तुझा ............. झाला म्हणायला हरकत नाही. (पुनर्जन्मच)
8) माझी काही एकादशी नि ............. अशातली गत नाही. (दुप्पट खाशी)
9) त्या ............. आक्रोश करणाèया पाखराला पकडून बोका पलीकडल्या घराच्या कौलावर चढून गेला. (प्राणांतिक)
10) बोक्याने दुधाच्या पातेल्यात तोंड घातले आणि मोरूने त्याच्या पाठीत ............. जोराने घातली. (क्रिकेटची यष्टी)

प्र.3 खालील प्रश्नांची उत्तरे तीन ते चार वाक्यात लिहा. 

1) मुलांनी ‘आजीबाई’ म्हणून हाक मारताच काकू रागाने काय म्हणाल्या?
उत्तर : घरी आलेल्या वयस्कर बाईना पाहून मुले आजीबाई आल्या असे ओरडू लागली. त्यावेळी रागावून त्या म्हणाल्या, ‘‘काय बाई, चावट पोरं आहेत ही? मी काय म्हातारी-बितारी आहे, आजीबाई म्हणून घ्यायला? मला काकू म्हणत जा. जर का आजीबाई म्हटलतं तर जळता निखारा लावीन जिभेला.’’

2) लेखकाला व त्यांच्या कुटुंबीयांना जेवण सोडून अर्धपोटी का उठावे लागले?
उत्तर : लेखक व त्याचे कुटुंबीय जेवण करण्यासाठी बसले असताना, भात खाण्यात त्यांचे लक्ष आहे असे पाहून काकूनी तपकिरीची डबी बाहेर काढून त्यातील चिमूटभर पूड नाकपुड्यात कोंबली. दोन पळांनी ‘आक्छ’ असा आवाज काढून त्यांनी जो फवारा उडविला त्याच्या योगे भाजी, पोळ्या आणि भात या सर्व अन्नावर उदकसिंचन झाले. अर्थात वाढलेल्या अन्नाशिवाय आणखी अन्न खाण्याची त्यांना कोणालाच इच्छा झाली नाही. त्यामुळे ते सारेजण अर्धपोटीच ताटावरून उठले.

3) लेखक पाकगृहाच्या दारात उभे राहिल्यावर त्यांना कोणते दृश्य दिसले?
उत्तर : पाकगृहाच्या दारात उभे राहिल्यावर लेखकास दिसले की काकूनी आपला बिछाना पसरला होता. समोर पेटी घेऊन त्या ती वाजविण्यात आणि गायनात गर्क होऊन गेल्या होत्या. त्यांच्या खांद्यावर त्यांचा आवडता पोपट विराजमान झालेला होता आणि बोकोबा मालकिणीला खेटून पहुडले होते.

4) लेखकाने काकूंना कायमचा रामराम का ठोकला?
उत्तर : लेखकाने आपल्या सौ.ची प्रकृती ठीक नसल्यामुळे घरातील कामे करण्यासाठी काकूंना कामावर ठेवले होते. परंतु घरात आल्यापासून त्या स्वत: मालकिणीसारख्या वावरत होत्या. त्यांच्या वागण्याला सारेजण कंटाळले होते. स्वत: काम करण्याऐवजी घरातील सर्व लोकांनाच त्या काम लावत होत्या. आपला वेळ त्या देवपूजेत व भजनात घालवत होत्या. घरातील लोण्याचा डबाही त्यांनी चोरून गाठोड्यात लपवून ठेवला होता. इतर गोष्टींपेक्षा त्यांना आपल्या विठू बोक्याचे व राघू पोपटाचे ममत्व होते. त्यामुळे ज्यादिवशी काकूंच्या बोक्याने दुधाच्या पातेल्यात तोंड घातले आणि मोरूने त्याच्या पाठीत क्रिकेटची यष्टी जोराने घातली. तेव्हा काकूंनी आकाशपाताळ एक केल्याचे पाहून त्याचदिवशी लेखकाने त्यांना रामराम ठोकला.

प्र.4  खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा.

1) लेखकाच्या घरी काकूंचे आगमन कसे झाले?
उत्तर : लेखकाच्या घरी काकू ठरविलेल्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास बैलाच्या छकड्यातून  दाराशी आल्या. छकड्यात दोन ट्रंका आणि सतरंजीत बांधलेली छानदार वळकटी बैठकीवर बांधलेली होती. पुढच्या ट्रंकेवर लाकडी चौकटीत बसविलेला पाण्याचा खुजा आणि मधल्या वळकटीवर बाजाची पेटी आणि मागल्या ट्रंकेवर आजीबाई विराजमान झाल्या होत्या. त्यांनी पोपटाचा पितळी पिंजरा घट्ट धरून ठेवला होता व डाव्या बगलेत आवळून धरलेल्या बोक्याचे डोके त्या डाव्या हाताने कुरवाळीत होत्या. बोका होतात्याला त्या

2) काकड आरतीहून परत आल्यावर काकूंनी लेखकाच्या पत्नीला कोणते उत्तर दिले?
उत्तर : काकड आरतीहून परतलेल्या काकूंना आम्ही तुम्हाला कामाला ठेवलं आहे का तुम्ही आम्हाला ? असा प्रश्न विचारणाèया लेखकाच्या पत्नीला काकूनी सांगितलं की, अहो काऊताई, देवधर्माला कसला तुमचा अडथळा? उलट माझ्या काकड आरतीचं अर्धपुण्य तुम्हाला लागेल. त्यातून मला तुमच्या इथ परकं असं मुळीच वाटत नाही. मग मैनाताईकडून घोटभर चहा मागितला तर त्यात बिघडलं कुठं? मी तिला नातीसारखीच समजते.

प्र.5 संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1) ‘‘भजन आणि भोजन एवढचं तुम्हाला करता येतं वाटतं.’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘नोकर ? छे, मालक!’ या विनोदी कथेतील असून लेखक चिंतामण विनायक जोशी आहेत. ही कथा ‘आणखी चिमणराव’ या पुस्तकातून संपादित करून घेतली आहे. हे वाक्य मैनाताईने चवताळून काकूना म्हटले आहे.
स्पष्टीकरण : रात्रीच्यावेळी स्वयंपाक न करता बाहेरून आलेल्या काकूनी पेटी घेऊन भजन सुरू केले. तेव्हा सर्वांनी पाकगृहाच्या दरवाजात उभे राहून ते पाहिले. तेव्हा काकूबाईंनी लेखकाला सांगितले रोज रात्री घटकाभर भजन करण्याची चाल आहे. तुम्हाला त्रास होत्र असेल तर मी मनातल्या मनात करीन. तेव्हा चवताळून मैनाने त्यांना वरील वाक्य म्हटले आहे.

2) ‘‘मग आजीबाई म्हणवून घ्यायची का लाज वाटते?’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘नोकर ? छे, मालक!’ या पाठातील असून लेखक चिंतामण विनायक जोशी आहेत. ही विनोदी कथा ‘आणखी चिमणराव’ या पुस्तकातून संपादित करून घेतली आहे. हे वाक्य मोरूने काकूना म्हटले आहे.
स्पष्टीकरण : काकूनी स्वयंपाक करण्यासाठी चुलीसमोर बसून सर्व साहित्य मैनाला आणण्यासाठी सांगितले त्यावेळी मैना ते न देता निघून गेली. त्यावेळी लेखकाच्या सौभाग्यवतीने त्यांना मग आजीबाई तुम्ही हो कशाला? असे विचारले. काकूनेही अन्न शिजवून द्यायचं तेवढं काम माझं आहे. बाकी सगळं तुम्ही केलं पाहिजे. सतरावेळा ऊठबस करून माझी कंबर दुखून येते असे सांगितले. तेव्हा मोरू त्यांना वरील वाक्य सुनावतो.

3) ‘‘विठ्या, बाळा तुझा पुनर्जन्मच झाला म्हणायला हरकत नाही.’’



उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘नोकर ? छे, मालक!’ या विनोदी कथेतील असून लेखक चिंतामण विनायक जोशी आहेत. ही कथा ‘आणखी चिमणराव’ या पुस्तकातून संपादित करून घेतली आहे. हे वाक्य काकूनी आपल्या विठू बोक्याला म्हटले आहे.
स्पष्टीकरण : लेखकाच्या वसंत नावाच्या कुत्र्याने काकूंच्या विठू बोक्यावर हल्ला केला. हे पाहण्यासाठी मुले गोळा झाली. तो गोंगाट ऐकून लेखकाला सांगत असलेला एकादशीचा कार्यक्रम बाजूस ठेवून आपल्या शरीराचा तोल सांभाळीत काकूबाई धावत ओसरीवर आल्या व त्यांनी वसंताच्या तावडीतून बोक्याची सुटका केली आणि त्याला कुरवाळीत वरील वाक्य म्हटले आहे.

4) ‘‘आम्ही तुम्हाला कामाला ठेवलं आहे का तुम्ही आम्हाला?’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘नोकर ? छे, मालक!’ या पाठातील असून लेखक चिंतामण विनायक जोशी आहेत. ही विनोदी कथा ‘आणखी चिमणराव’ या पुस्तकातून संपादित करून घेतली आहे. हे वाक्य लेखकाच्या पत्नीने काकूना म्हटले आहे.
स्पष्टीकरण : कामे करण्यासाठी आणलेल्या काकू पहाटेच उठून तुळशीबागेत काकड आरतीला गेल्या होत्या. आठच्या सुमारास त्या घरी परतल्या व आल्या आल्या मैनेला माझ्यासाठी चहा ठेवला की नाही असे विचारले तेव्हा लेखकाच्या पत्नीने चिडून त्यांना हा प्रश्न विचारला आहे.

प्र.6  खालील प्रश्नाचे सात ते आठ वाक्यात उत्तर लिहा.

1) लेखकाने काकूंना कामावरून काढून का टाकले? सविस्तर लिहा.
उत्तर : लेखकाने आपल्या सौभाग्यवतीची प्रकृती बिघडल्यामुळे  स्वयंपाक करण्यासाठी एका वयस्कर बाईची निवड केली. परंतु घरात आल्यापासून त्या स्वत: मालकिणीसारख्या वावरत होत्या. त्यांच्या वागण्याला सारेजण कंटाळले होते. स्वत: काम करण्याऐवजी घरातील सर्व लोकांनाच त्या काम लावत होत्या. आपला वेळ त्या देवपूजेत व भजनात घालवत होत्या. घरातील लोण्याचा डबाही त्यांनी चोरून गाठोड्यात लपवून ठेवला होता. इतर गोष्टींपेक्षा त्यांना आपल्या विठू बोक्याचे व राघू पोपटाचे ममत्व होते. त्यामुळे ज्यादिवशी काकूंच्या बोक्याने दुधाच्या पातेल्यात तोंड घातले आणि मोरूने त्याच्या पाठीत क्रिकेटची यष्टी जोराने घातली. तेव्हा काकूंनी आकाशपाताळ एक केल्याचे पाहून त्याचदिवशी लेखकाने त्यांना झाल्या दिवसांचा पगार देऊन कामावरून काढून टाकले.

1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024