परिचय :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891-1956) पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणारे क्रांतिकारक महापुरुष, आयुष्यभर ज्ञानसाधना करून कायदेशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इ. ज्ञान शाखांवर प्रभुत्व मिळविले. दलितांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले. ‘मूकनायक’, ‘जनता’ या नियतकालिकांचे ते संस्थापक होते. तसेच ‘हू वेअर दि शूद्राज?’, ‘थॉटस ऑफ पाकिस्तान’, ‘बुद्ध अॅण्ड हिज धम्म’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले.
मूल्य : शिक्षणप्रेम
साहित्य प्रकार : वैचारिक निबंध
संदर्भ ग्रंथ : 1938 साली पुणे येथे झालेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनातील अध्यक्षीय भाषण
प्र.1 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) विद्या कशाप्रमाणे आहे?उत्तर : विद्या ही महासागरासारखी आहे.
2) आंबेडकरांनी विद्या कशी संपादन केली?
उत्तर : डॉ. आंबेडकरांनी अपार वेदना व त्रास सोसून विद्या संपादन केली.
3) माणूस विद्येचा पुजारी केव्हा होईल?
उत्तर : जेव्हा माणूस पुस्तकांवर प्रेम करील तेव्हाच तो विद्येचा पुजारी होईल.
4) दैवी शक्ती कोणती?
उत्तर : आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे.
5) आंबेडकरांनी 24 तासापैकी किती तास अभ्यास केला?
उत्तर : आंबेडकरांनी 24 तासांपैकी 21 तास अभ्यास केला.
6) लोकांना कोण फसविते?
उत्तर : जे लोक शिकलेले आहेत परंतु ज्यांच्याकडे शील नाही तेच लोकांना फसवितात.
प्र.2 खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1) आज माझ्याजवळ ....................... पुस्तक आहेत. (वीस हजार)2) माझं दुसरं दैवत आहे ....................... . (विनय)
3) अनेक संकटांना मी तोंड दिले ते ....................... जोरावर. (आत्मविश्वासाच्या)
4) शिक्षणापेक्षा ....................... अधिक महत्त्वाचे आहे. (शील)
5) शिकले सवरलेले लोक ....................... शिवाय निपजू लागले तर राष्ट्राचा नाश आहे. (शीला)
प्र.3 खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.
1) विद्या महासागरासारखी आहे म्हणजे काय?उत्तर : विद्या ही महासागरासारखी आहे कारण विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. जशा गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी नद्या सागराला जाऊन मिळाल्या की त्यांचे पाणी कोणते हे सांगता येत नाही. तशी विद्या असावी. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असेल तर अन्नाची आवश्यकता असते. तशीच विद्येचीही आवश्यकता असते. ज्ञानाशिवाय माणूस काहीही करू शकणार नाही.
2) दुसèया दैवताबद्दल आंबेडकरांनी काय म्हटले आहे?
उत्तर : आंबेडकरांचे दुसरे दैवत विनय आहे. त्यांनी कोणाची याचना केली नाही. त्यांचे ध्येय असे होते की आपलं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे.
3) दीर्घोद्योग व कष्ट करण्याने यश प्राप्त होते म्हणजे काय?
उत्तर : आत्मविश्वासाच्या जोरावर आंबेडकरांनी इंग्लंडमधील जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यास 8 वर्षे लागतात. तो केवळ 2 वर्षे 3 महिन्यात पुरा केला. त्यासाठी दिवसातील 21 तास त्यांनी अभ्यास केला. आजही चाळीशी उलटून गेली तरी 18 तास खुर्चीवर बसून काम करीत होते. पण त्यासाठी तपकीर व किंवा सिगारेटचा आधार घ्यावा लागला नाही. किंवा गरजही भासली नाही. म्हणूनच त्यांना असे वाटते की दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.
4) आत्मविश्वासाने आंबेडकरांनी काय मिळविले?
उत्तर : आंबेडकर आत्मविश्वासाला दैवी शक्ती मानतात. आत्मविश्वासाच्या जोरावर काहीही करता येते असे त्यांना वाटते. मुंबईत डिपार्टमेंटच्या चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत राहून एक पैशाच्या घासलेट तेलावर त्यांनी अभ्यास केला व उच्च पदवी प्राप्त केली. जीवनातील अनेक संकटाना त्यांनी तोंड दिले तेही आत्मविश्वासाच्या बळावरच.
प्र.4 खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा.
1) विद्येसाठी आंबेडकरांनी कोण कोणते कष्ट घेतले?उत्तर : आंबेडकरांनी अपार वेदना, त्रास सोसून विद्या संपादन केली. विद्येचे महत्त्व समजल्यामुळेच त्यांनी तिला आपले पहिले दैवत मानले. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असेल तर अन्नाची आवश्यकता असते. तशीच विद्येचीही आवश्यकता असते. विद्येशिवाय शांतता नाही आणि माणुसकीदेखील नाही. शिक्षण घेताना पुस्तकसाठी पैसे नसत. एकवेळ उपाशी राहून ते पुस्तक घेत असत. पोयवाडीच्या दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत राहून एक पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास करावा लागला. चिमणीच्या प्रकाशात त्यांनी अभ्यास केला, तेवढ्या जागेत आई-वडील, भावंडे रहात होती. प्रसंगी कण्याभात भाकरीवरही दिवस काढले. इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले असता ८ वर्षांचा अभ्यासक्रम 2 वर्षे 3 महिन्यातच पूर्ण केला. दिवसाचे २१ तास ते अखंड अभ्यास करत असत. सतत विद्येची त्यांनी परीश्रमाने पूजा केली होती. एकवेळ उपाशी राहून २०,००० पुस्तके त्यांनी खरेदी केली होती.
2) आंबेडकरांचे ध्येय कोणते होते?
उत्तर : आंबेडकरांचे ध्येय होते की माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी कष्ट सोसले. पोयवाडीच्या नाक्यावरच्या छोट्याशा खोलीत कण्याभात व भाकरी खाऊन आपल्या समाजाची सेवा केली. परंतु संधी मिळत असूनही भारी पगाराच्या नोकरीकडे ते वळले नाहीत.
3) अनेक संकटांना आंबेडकरांनी कशाच्या जोरावर तोंड दिले?
उत्तर : आंबेडकर आत्मविश्वासाला दैवी शक्ती मानतात. आपल्या जीवनात आलेल्या सर्व प्रकारच्या संकटांना त्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावरच तोंड दिले. मी जे करीन ते होईल असे ते म्हणत असत ते आपल्या आत्मविश्वासाच्या बळावरच. छोट्याशा खोलीत राहून सर्व सुविधांचा अभाव असतानाही आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले होते.
4) ‘शील’ या गुणाबद्दल आंबेडकर काय म्हणतात?
उत्तर : आंबेडकर म्हणतात की, विद्येबरोबर आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या व्यर्थ आहे असे त्यांना वाटते. एखाद्याजवळ विद्येचं शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एखाद्याचे संरक्षण करेल परंतु एखाद्याजवळ शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसèयाचा घात करील. अडाणी माणूस कोणाला फसवू शकत नाही परंतु शिकलेल्या माणसाकडे फसविण्याचा युक्तिवाद असतो. लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते. परंतु त्याला सदाचाराची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी, फसवाफसवी करू शकणार नाही. म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकांत शीलाची अत्यंत जरूरी आहे. शीलाशिवाय शिकलेले लोक जन्माला येऊ लागले तर समाजा, राष्ट्राचा नाश होतो. म्हणून शीलाची किंमत शिक्षणापेक्षा अधिक आहे.
प्र.5 संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) ‘‘अपार वेदना व त्रास सोसून मी विद्या संपादन केली.’’उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा !’ या पाठातील असून हा पाठ म्हणजे 1938 साली पुणे येथे पार पडलेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनातील आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग आहे.
स्पष्टीकरण : आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना उपदेश करताना आंबेडकर म्हणतात की विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. अन्नासारखीच आपणास विद्येचीही आवश्यकता आहे.आज आपल्या देशात लाखो निरक्षर लोक आहेत. परंतु तसे न बनता अपार वेदना व त्रास सोसून मी विद्या संपादन केली.
2) ‘‘ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्षे लागतात, तो मी 2 वर्षे 3 महिन्यात पूर्ण केला’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा !’ या पाठातील असून हा पाठ म्हणजे 1938 साली पुणे येथे पार पडलेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनातील आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग आहे.
स्पष्टीकरण : आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आंबेडकरांनी आत्मविश्वासाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हे सांगितले आहे. हे स्पष्ट करताना आत्मविश्वासाच्या बळावरच आपण इंग्लंडमधील ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्षे लागतात, तो मी 2 वर्षे 3 महिन्यात पूर्ण केला असे सांगितले.
3) ‘‘प्रत्येक इसमात प्रथम शील असावे’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा !’ या पाठातील असून हा पाठ म्हणजे 1938 साली पुणे येथे पार पडलेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनातील आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग आहे.
स्पष्टीकरण : विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना आंबेडकरांनी सांगितले की, विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या ही व्यर्थ आहे. एखाद्याकडे विद्येबरोबरच चांगले शील असेल तर त्यायोगे तो दुसèयाचे संरक्षण करील. परंतु त्याच्याकडे शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दुसèयाचा घात करील. म्हणून शिक्षणापेक्षा शील महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटते.
4) ‘‘दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्त होते.’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य ‘विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा !’ या पाठातील असून हा पाठ म्हणजे 1938 साली पुणे येथे पार पडलेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनातील आंबेडकरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग आहे.
स्पष्टीकरण : आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आपण भरपूर कष्ट घेतले तर यश आपणास सहज प्राप्त होते. या कष्टामुळेच इंग्लंडमधील 8 वर्षाचा अभ्यासक्रम आपण 2 वर्षे 3 महिन्यात पुरा केला. विद्यार्थ्यांनीसुद्धा दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते हे लक्षात घ्यावे.
प्र.6 खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सात ते आठ वाक्यात लिहा.
1) विद्येबद्दल आंबेडकर काय म्हणतात?उत्तर : विद्येला डॉ. आंबेडकर पहिले दैवत मानतात. विद्या ही महासागरासारखी आहे कारण विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. जशा गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी नद्या सागराला जाऊन मिळाल्या की त्यानंतर त्या नद्यांचे पाणी कोणते हे वेगळे काढून दाखविता येत येत नाही. तशी विद्या असावी. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असेल तर अन्नाची आवश्यकता असते. तशीच विद्येचीही आवश्यकता असते. ज्ञानाशिवाय माणूस काहीही करू शकणार नाही. विद्या ही सर्वांनी अवगत केली पाहिजे. विद्या हे शस्त्र आहे. ती तलवारीसारखी आहे. परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाèयावर अवलंबून राहील. आत्मविश्वासाच्या जोरावर विद्या प्राप्त करता येते. विद्या ही शीलयुक्त असली पाहिजे.
2) विद्या, विनय, आत्मविश्वास व शील यांना आंबेडकरांच्या जीवनात कोणते स्थान आहे?
उत्तर : आंबेडकरांच्या जीवनात विद्या हे पहिले दैवत आहे. प्रत्येकाने विद्या अवगत केली पाहिजे असे त्यांना वाटते. त्रास सोसून त्यांनी विद्या संपादन केली आहे. त्यांना विद्येचे भयंकर वेड आहे. ते विद्येचे पुजारी असून 24 तास विद्येची पूजा करीत असत. विनय हे त्यांचे दुसरे दैवत आहे. त्यांनी कधी कोणाकडे याचनाही केली नाही. विनयशीलपणे आपल्या समाजाची सेवा केली. आत्मविश्वासाला तर ते दैवी शक्ती मानत. आत्मविश्वासाच्या जोरावर मनुष्य सर्व काही साध्य करू शकतो असे त्यांना वाटते. आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी शिक्षण पूर्ण केले शिवाय आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांचाही सामना केला. विद्येबरोबरच शील (चारित्र्य) त्यांनी महत्त्वाचे मानले. त्यामुळेच व्यसनापासून ते लांब राहू शकले. कोणाची फसवणूक केली नाही की पाप केले नाही. शिक्षणापेक्षा शील महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटते.
प्र. 6 : योग्य पर्याय निवडून लिहा.
१) स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात डॉ. आंबेडकर ------- होते.अ) शिक्षणमंत्री ब) कायदेमंत्री क) पंतप्रधान ड) सभापती
२) डॉ. आंबेडकरांना भारत सरकारने -- -- ही सर्वोच्च मानाची पदवी दिली.
अ) भारतरत्न ब) पदमभूषण क) महामहोपाध्याय ड) पद्मश्री
३) विद्यार्थ्यांनो जागृत व्हा! या पाठाचा प्रकार कोणता आहे?
अ) ललीतनिबंध ब) वैचारिक निबंध क) लघुनिबंध ड) राजकीय लेख
४) -------- माणूस काहीही करू शकणार नाही,
अ) पैशाशिवाय ब) विद्येशिवाय क) वाचनशिवाय | ड) ज्ञानाशिवाय
५) 'मूकनायक' या नियतकालीकाचे संपादक
कोण होते? | अ) आगरकर ब) टिळक क) राखालदास बॅनर्जी ड) डॉ. आंबेडकर
उत्तरे : १) ब- कायदेमंत्री, २) अ - भारतरत्न, ३) ब) वैचारिक निबंध, ४) ब) विद्येशिवाय, ५) ड) डॉ. आंबेडकर
No comments:
Post a Comment