परिचय :
कृष्णाजी विनायक सोहनी (1784-1854) यांनी ‘पेशव्यांची बखर’ हा एकमेव ग्रंथ लिहिला आहे. उत्तर पेशवाई पाहिलेल्या आणि समकालीन राजकारणात वावरलेल्या या माहीतगाराने पेशवेकुलाची ही जीवनगाथा आत्मीयतेने व समरसतेने लिहिलेली आहे. बखर वाङ्मयाला इतिहासात अस्सल साधनाचा दर्जा नसला तरी काही प्रमाणात ते इतिहासाशी सुसंगत असते. यातील चित्रदर्शी वर्णने, रंगीत आख्यायिका वेगळाच नाट्यानुभव देतात. या पाठाचा प्रकार ‘बखर वाङ्मय’ असून ‘पेशव्यांची बखर’ यामधून हा पाठ निवडला आहे.
मूल्य : लढाऊवृत्ती
साहित्य प्रकार : बखर वाङ्मय
संदर्भ ग्रंथ : पेशव्यांची बखर ले. कृष्णाजी विनायक सोहनी
मध्यवर्ती कल्पना :
* चिमाजी अप्पा - बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने कोकणघाट आणि किनाèयावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला.
* तळा घोसाळा - तळे घोसाळे, अवचितगड, बिरवाडी हे किल्ले मराठ्यांनी सिद्दीकडून जिंकून घेतले. व करनाळे, बेलापूर, रेवदंडे, साष्टी (ठाणे) हा भाग पोर्तुगीजांकडून घेतला.
* तीन वर्षे वसई भांडली - वसई हा ठाणे जिल्ह्यातील किल्ला. 1536 साली पोर्तुगीजांनी बांधला तो दोनशे वर्षे त्यांच्याच ताब्यात होता. इ.स. 1737 ते 1939 या काळात मराठ्यांनी वसई घेण्याचे प्रयत्न केले अखेर 17 मे 1739 ला किल्ला घेतला.
* आंजूरकर - गंगाजी नाईक आणजूरकर यांनी चिमाजीअप्पास वसईच्या मोहिमेत साहाय्य केले त्याबद्दल आणजूर ता. भिवंडी जि. ठाणे हे गाव इनाम मिळाले.
* खंडोजी माणकर - पेशव्यांनी कोकणात केलेल्या लढायात हा आपल्या पराक्रमाने प्रसिद्धीस आला. त्याच्या शौर्याबद्दल खरवली ता. माणगाव जि. रायगड या त्याच्या राहत्या गावासह आणखी काही गावे इनाम मिळाली.
* फिरंग्याची बायको - किल्ल्याचा प्रमुख असलेल्या पोर्तुगीज अधिकाèयाची बायको.
* पालख्या - शूर सरदारांना पालखीत बसण्याचा दिला जाणारा मान.
* बालपरवेशी - लढाईत मरण पावलेल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनासाठी दिलेला बैठा पगार, जमीन इत्यादी.
* नानापरवेशी - लढाईत मरण पावलेल्या सैनिकांच्या संततीहिन पत्नीस तिच्या निर्वाहापुरता दिलेला पगार, जमीन इत्यादी.
* शाहू महाराज यांस भेटून - वसईच्या वेढ्याची हकीकत चिमाजीच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकण्याची छ. शाहूंची इच्छा होती. तथापि चिमाजी अप्पांची प्रकृती खालावलेली असल्याने प्रत्यक्ष भेटण्याऐवजी सारी हकीकत त्यांनी पत्राने कळविली.
* बाजीरावसाहेब - (1720-1740) बाळाजी विश्वनाथचा पुत्र. थोरले बाजीराव पेशवे व राऊ म्हणून परिचित. संभाजी पुत्र शाहूच्या पदरी हा पराक्रमी पेशवा होता.
![]() |
चिमाजी अप्पा |
स्वाध्याय
प्र.1 खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1) चिमाजी अप्पा कोणत्या स्वारीला निघाले?उत्तर : चिमाजी अप्पा कोकणपट्टीच्या स्वारीला निघाले.
2) वसईवर कोणाचा अंमल होता?
उत्तर : वसईवर पोर्तुगीजांचा (फिरंगींचा) अंमल होता.
3) वसईचा किल्ला कोठे होता?
उत्तर : वसईचा किल्ला समुद्रात होता.
4) वसईचा किल्ला घेण्यासाठी अप्पासाहेबांनी किती वर्षे प्रयत्न केले?
उत्तर : वसईचा किल्ला घेण्यासाठी अप्पासाहेबांनी तीन वर्षे प्रयत्न केले. (इ.स. 1737 ते 1739)
5) खंडोजी माणकरने कोणते कार्य पत्करले?
उत्तर : खंडोजी माणकरने गुराखी होऊन गुरे राखावयाचे काम पत्करले.
6) किल्ल्यात सुतारकाम करण्यास कोण गेले?
उत्तर : आंजुरकर पंचकळसे सुतार (गंगाजी नाईक आंजुरकर) हे सरदार सुतारकाम करण्यास किल्ल्यात गेले.
7) फिरंग्याची बायको कशी होती?
उत्तर : फिरंग्याची बायको खूप देखणी व रूपवान होती.
8) वसईमध्ये किती लाखाचा मुलूख होता?
उत्तर : वसईमध्ये नऊ लाखाचा मुलूख होता.
प्र.2 खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1) किल्ला समुद्रात एक अंग ........... ला. (खुष्कीला)2) किल्ल्यातील ........... समजल्याशिवाय किल्ला घेणे अवघड. (भेद)
3) भेद आणल्यावर किल्ल्याच्या बुरुजाखाली ........... नेला. (सुरुंग)
4) असे बोलून फिरंग्याच्या बायकोस ........... नेसवून सोडून दिले. (साडी चोळी)
5) तुम्हास दुसरीकडून ........... येत नाही. (कुमकही)
6) आम्हाला ........... दिवसांची मुदत द्यावी. (आठ)
7) अप्पासाहेब यांनी किल्ल्यात शिरून ........... चढविले. (भगवे झेंडे)
8) लढाईतील जखमी लोकांना ........... दिल्या. (पालख्या)
9) लढाईत पडलेल्या लोकांची ........... चालविली. (बालपरवेशी)
10) चिमाजीअप्पा साताèयास जाऊन ........... ना भेटून आले. (शाहू महाराजांना)
प्र.3 खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.
1) चिमाजीअप्पांनी कोकणात कोणकोणता मुलूख जिंकला?उत्तर : चिमाजी अप्पानी सिद्धीकडून कोकणातील तळा, घोसाळा, अवचितगड, बिरवाडी आणि पोर्तुगीजांकडून करनाळा, रेवदंडा, बेलापूर, साष्टी व वसईचा प्रदेश जिंकून घेतला.
2) चिमाजीअप्पांनी कोणता निश्चय केला?
उत्तर : सतत तीन वर्षे लढाईकरूनही पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर सर्व सरदारांना एकत्र बोलावून तो किल्ला जिंकून ताब्यात घेण्याचा निश्चय केला.
3) सर्व सरदारांनी चिमाजीअप्पांना काय सांगितले?
उत्तर : किल्ला हस्तगत होत नसेल तर माझे डोके तरी किल्ल्यात पाडा असे चिमाजी अप्पानी आपल्या सरदारांना सांगितले तेव्हा सरदारांनी त्यांना सांगितले तुमच्यासारखाच किल्ला जिंकण्याचा आमचा निश्चय आहे. परंतु किल्ल्यातील भेद समजल्याशिवाय किल्ला जिंकणे कठीण आहे. तेव्हा सर्वप्रथम किल्ल्यातील भेद (रहस्य) शोधून आणावा.
4) फिरंग्याची बायको पाहून श्रीमंत काय म्हणाले?
उत्तर : फिरंग्याच्या पकडून आणलेल्या बायकोस पाहून श्रीमंत (चिमाजी अप्पा) म्हणाले, हिला कशाला धरून आणलेत? असे बोलून तिला साडी चोळी नेसवून सोडून दिली.
प्र.4 खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.
1) फिरंग्याची बायको नवèयाला काय म्हणाली?उत्तर : फिरंग्याच्या बायकोने माघारी जाऊन सारी हकीकत आपल्या नवèयाला सांगितली. ती नवèयाला म्हणाली, तुम्ही त्यांच्याशी कशासाठी भांडता ? चिमाजी अप्पा हे पुण्यवान आहेत. मी तेथे गेले असताना मला त्यांनी वाकड्या दृष्टीने पाहिलेदेखील नाही. तेव्हा त्यांच्याशी लढून यश येईल असे दिसत नाही. व तुम्हाला दुसरीकडून मदतही येत नाही. यासाठी त्यांच्याशी सल्ला करून, स्नेह ठेवून आपण निघून जाऊ.
2) फिरंग्याने तहात काय सांगितले?
उत्तर : फिरंग्याने तहात सांगितले की, आमच्याकडे जे कारकून आहेत. त्यांचा तुम्ही सांभाळ करावा. आणि आम्हास आठ दिवसांची मुदत द्यावी म्हणजे आम्ही आमचा सर्व सरंजाम घेऊन जाऊ व किल्ला तुमच्या हवाली करू.
3) लढाईतील जखमी लोकांसाठी व इतरांसाठी श्रीमंतांनी काय केले?
उत्तर : मोहिमेच्या दरम्यान लढाईत जखमी झालेल्या कित्येक लोकांना श्रीमंतांनी पालख्या दिल्या. कित्येकांना गावे इनाम दिली. कित्येकांना जमिनी दिल्या. पडलेल्या लोकांची बालपरवेशी चालविली. ज्यास संतती नव्हती त्यांची नानापरवेशी चालविली. अशाप्रकारे श्रीमंतांनी आपल्या सैनिकांची काळजी घेतली.
प्र.5 खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.
1) माणकर, आंजूरकर आणि मोरे सरदारांनी काय केले? उत्तर : वसईचा किल्ला जिंकायचा असेल तर त्यातील भेद प्रथम आणला पाहिजे यासाठी खंडोजी माणकर यांनी गुराखी म्हणून किल्ल्यातील लोकांची गुरेे राखावयाचे काम पत्करले. रोज किल्ल्यात जाऊन लोकांची गुरे चारावयास न्यायची आणि फिरून किल्ल्यात पावती करायची. गंगाजी नाईक आंजूरकर सरदारांनी किल्ल्यातील लोकांच्या घरी जाऊन सुतारकाम करायचे ठरविले. तर दुल्लबाजी मोरे सरदारांनी कासारपण पत्करून रोज किल्ल्यातील बायकांच्या बांगड्या भरायचे काम पत्करले. हे करीत असताना किल्ल्यातील भेद जाणून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला.
2) लढाईत जखमी झालेल्यांची काळजी कशी घेतली जाई?
उत्तर : लढाईत जखमी झालेल्या सैनिकांना पालखीत बसण्याचा मान देण्यात आला. कित्येकांना गावे इनाम दिली. कित्येकांना जमिनी दिल्या. लढाईत मरण पावलेल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनासाठी बैठा पगार, जमीनी दिल्या. तर मरण पावलेल्या सैनिकांच्या संततीहिन पत्नीस पगार, जमीन दिली. अशा रितीने आपल्या सैनिकांची काळजी चिमाजी अप्पांनी घेतली.
3) फिरंग्याने श्रीमंतांकडे कोणता तह केला?
उत्तर : फिरंग्यांने श्रीमंतांकडे तह करताना सांगितले की, आमच्याकडे जे कारकून आहेत त्यांचा सांभाळ करावा. आणि आम्हाला आठ दिवसांची मुदत द्यावी म्हणजे आम्ही आमचा सरंजाम गोळा करून निघून जाऊ व किल्ला तुमच्या हवाली करू.
प्र.6 संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) ‘मजला तोफेच्या तोंडी बांधून माझे डोके तरी किल्ल्यात पाडावे.’’स्पष्टीकरण : तीन वर्षे लढाई करूनही वसईचा किल्ला ताब्यात येईनासा झाला तेव्हा चिमाजी अप्पांनी आपल्या सरदारांना एकत्र बोलावून रागांनी त्यांना सांगितले की किल्ला हस्तगत होत नसेल तर मला तोफेच्या तोंडी बांधून माझे डोके तरी किल्ल्यात पाडावे नाहीतर किल्ला घ्यावा.
2) ‘‘तुम्ही त्यांशी कशासाठी भांडता? तो पुण्यवान आहे.’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य वसईचा वेढा या पाठातील असून पाठाचे लेखक कृष्णाजी विनायक सोहनी हे आहेत. हे वाक्य फिरंग्याच्या बायकोने आपल्या नवèयाला (फिरंग्याला) उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : फिरंग्याची बायको समुद्रातून जात असताना तिला पकडून सरदारांनी चिमाजी अप्पासमोर तिला उभे केले होते परंतु साडीचोळी देवून चिमाजी अप्पाने सन्मानाने तिला परत पाठविले होते. चिमाजी अप्पाच्या वागणुकीने किल्ल्यात गेल्यानंतर तिने आपल्या पतीला उद्देशून हे वाक्य म्हटले आहे.
3) ‘‘आमचे पदरी कारकून आहेत त्यांचा सांभाळ आपण करावा.’’
उत्तर : संदर्भ : सदर वाक्य वसईचा वेढा या पाठातील असून पाठाचे लेखक कृष्णाजी विनायक सोहनी हे आहेत. हे वाक्य फिरंग्याने चिमाजी अप्पांना उद्देशून म्हटले आहे.
स्पष्टीकरण : वसईचा किल्ला हवाली करण्याबाबत चिमाजी अप्पाबरोबर ज्यावेळी फिरंग्याने तहाची बोलणी सुरू केली त्यावेळी त्यांने सांगितले की आमच्या पदरी जे कारकून आहेत त्यांचा सांभाळ आपण करावा.
प्र.7 खालील प्रश्नांची सात ते आठ वाक्यात उत्तरे लिहा.
1) वसईचा किल्ला घेण्यासाठी चिमाजीअप्पांनी कोणकोणते प्रयत्न केले?उत्तर : वसईचा किल्ला हा समुद्रात असल्यामुळे तो जिंकून घेण्यासाठी चिमाजी अप्पांनी सर्वप्रथम जहाजे तयार करून आरमाराच्या सहाय्याने लढाई केली परंतु तीन वर्षे लढाई करूनही त्यांना त्यात यश आले नाही. परंतु किल्ला घेण्याचा चिमाजी अप्पांचा निश्चय पक्का होता म्हणून त्यांनी सर्व सरदारांना बोलावून किल्ला जिंकावा नाहीतर तर मला तोफेला बांधून माझे मुंडके तरी किल्ल्यात पाडा असे सांगितले. त्यासाठी किल्ल्यातील भेद (रहस्य) शोधण्यासाठी आंजूरकर, माणकर, मोरे सरदार यांनी वेषांतर करून भेद आणला. नंतर किल्ल्याच्या बुरुजापर्यंत सुरुंग बनवून तो उडविण्याचा प्रयत्न केला. सर्वतोपरी किल्ला हस्तगत करण्याचा प्रयत्न केला.
2) वसईच्या किल्ल्यातील भेद जाणून घेण्यासाठी कोणीकोणी कसे प्रयत्न केले?
उत्तर : वसईचा किल्ला जिंकायचा असेल तर त्यातील भेद समजणे आवश्यक आहे असे सरदारांचे मत होते. तो भेद जाणून घेण्याची जबाबदारी माणकर, आंजूरकर, मोरे सरदारांवर सोपविण्यात आली. खंडोजी माणकर यांनी गुराखी म्हणून किल्ल्यातील लोकांची गुरेे राखावयाचे काम पत्करले. रोज किल्ल्यात जाऊन लोकांची गुरे चारावयास न्यायची आणि फिरून किल्ल्यात पावती करायची. गंगाजी नाईक आंजूरकर सरदारांनी किल्ल्यातील लोकांच्या घरी जाऊन सुतारकाम करायचे ठरविले. तर दुल्लबाजी मोरे सरदारांनी कासारपण पत्करून रोज किल्ल्यातील बायकांच्या बांगड्या भरायचे काम पत्करले. हे करीत असताना किल्ल्यातील भेद जाणून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. नंतर या रहस्याच्या आधारेच किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली.
Nice ouestion and answer
ReplyDelete