Tuesday, May 14, 2019

हिरवे सांगाती

 
परिचय : 




संपूरन सिंग (1936) हे कवी, गीतकार, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आहेत. ‘गुलजार’ या नावाने हिंदी आणि उर्दू भाषेत लेखन केले आहे. चाळीस वर्षाहून अधिक काळ चित्रपटांसाठी लेखन केले आहे. ‘मेरे अपने’, ‘आँधी’, ‘मौसम’, ‘परिचय’, ‘इजाजत’ व अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांची हिंदी व उर्दूत ‘कुसुमाग्रजकी चुनी सुनी नगमें’ या नावाने अनुवाद केला आहे. त्यांना 2002 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना 2004 चा ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला आहे. गीतलेखनासाठी ग्रॅमी, ऑस्कर अ‍ॅवार्ड मिळाले आहेत.




अनुवाद : सविता दामले
मूल्य :  वृक्षप्रेम
साहित्य प्रकार :  ललित लेख
संदर्भ ग्रंथ :  ऋतुरंग दिवाळी अंक. अनुवाद - सविता दामले

टिपा 


राखी - सुप्रसिद्ध अभिनेत्री

शैलेंद्र - सुप्रसिद्ध हिंदी गीतकार


अमलतास
चिनार
 बहावा - एक वृक्ष याला पिवळीधमक फुले लागतात.
अमलतास - याचे वृक्ष फार मोठे असतात यालाच घनबहिडा असे म्हणतात. या वृक्षास काळी लांबट फळे लागून ती झाडावर लोंबत असतात.
चिनार - थंड प्रदेशात आढळणारा सूचिपर्णी वृक्ष.

गुलझार यांची विविध रूपे 



 



खालील पश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या. 

१) गुलजार यांचे मूळ नाव कोणते? 
उत्तर : गुलजार यांचे मूळ नाव संपूरनसिंग हे. होय. 

२) माणूस कोणाप्रमाणे आहे? 
उत्तर : माणूस झाडाप्रमाणे आहे.

३) लेखकाचे बालपण कोणत्या गल्लीत गेले? 
उत्तर : लेखकाचे बालपण दिल्लीतील रोशनआरा  गल्लीत गेले. 

४) कोणत्या साली गुलजार यांना पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला? 
उत्तर : २००४ साली गुलजार यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

५) वृक्षांना गुलजार काय म्हणतात? 
उत्तर : वृक्षांना गुलजार सांगाती म्हणतात. 

६) जांभळाचे झाड लेखकाला कशाप्रमाणे वाटते? 
उत्तर : जांभळाचे झाड लेखकास आजोबांप्रमाणे वाटते. 

७) पपईचे झाड केव्हा मरते? 
उत्तर : तीन वेळा फळ दिल्यानंतर पपईचे झाड मरते.

८) बांबूला केव्हा फुले येतात? 
उत्तर : बांबूच्या वनाचा नाश होताना त्याला फुले येतात. 

९) कुसुमाग्रजांच्या कवितांच्या गुलजारांनी केलेल्या अनुवादाचे नाव काय?
 उत्तर : कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी व उर्दूत । अनुवाद कुसुमाग्रजकी गीनी चुनी नगमे आहे. 

१०) कोणत्या झाडाचा प्रत्येक अवयव औषधीच्या रूपात असतो? 
उत्तर : पिंपळ या झाडाचा प्रत्येक अवयव औषधीच्या रूपात असतो.

११) कडूलिंबाच्या पांढ-या, पिवळ्या फुलांना लेखक काय म्हणतात? 
उत्तर : कडूलिंबाच्या पांढ-या, पिवळ्या फुलांना लेखक झुमके म्हणतात.

12 ) पूर्वजांनी पिंपळाला कशाचे स्वरुप दिले आहे? 
उ. : पूर्वजांनी पिंपळाला देवाचे स्वरुप दिले आहे.

13) लेखकाचे बालपण कोणत्या गल्लीत गेले? 
उ. : लेखकाचे बालपण दिल्लीतील ‘‘रोशनआरा या गल्लीत गेले.

14) बंगाली परंपरा कोणती? 
उ. : झाडांशी सतत बोलत राहणं ही बंगाली परंपरा आहे.


खालील पश्नांची उत्तरे तीन-चार वाक्यात लिहा. 

1) जांभळाच्या झाडाला लेखक ‘‘गारवा का म्हणतात? 
उ : जांभळाचे झाड विस्ताराने खूपच मोठे होते. त्यामुळे त्या झाडाखाली भरपूर सावली मिळत होती. दुपारच्या उन्हाच्यावेळी अनेक लोक जांभळीच्या सावलीत बसायचे. सर्व मुले याच झाडाच्या सावलीत खेळ मांडायची. म्हणून लेखक जांभळाच्या झाडाला ‘‘गारवा असे म्हणतात.

२)  लेखक व त्यांचे मित्र लहानपणी कोणकोणते खेळ खेळत? 
उत्तर : लेखक गुलजार व त्यांचे मित्र लहानपणी जांभळाच्या झाडाखाली विविध खेळ खेळत. पिंपळाच्या झाडाच्या पानांचा वापर करून कधी कुल्फीवाला होत, तर कधी पानांचा वापर करून खोटखोटा कात-चुना लावून विडे विकत असत. कधी कधी ते विटीदांडू क्रिकेटही खेळत.

3) राखीने दिलेले झाड वाढत का नव्हते? 
उत्तर : राखीने झाड देतानाच सांगितले होते की या झाडाशी बोलावे लागते. कारण ती बंगाली परंपरा आहे. लेखकाने झाडाची निगा राखली पण ते त्याच्याशी बोलले नव्हते म्हूणून ते वाटत नव्हते.


4) लेखकाने गुलमोहोराची काळजी कशी घेतली? 




उ : लेखकाने आपल्या घरासमोरील छोट्ययाशा जागेत फाटकाशेजारी गुलमोहराचे रोपटे लावले होते. सुरवातीला गुलमोहोर अतिशय नाजूक असतो. म्हणून त्याची वाढ होताना विशेष काळजी घ्यावी लागते. लेखकानीही गुलमोहोराभोवती छोटस कूंपण घालून त्याची काळजी घेऊन वाढ केली होती.



* संदर्भासहित स्पष्टीकरण करा. 

1) ‘‘तो वृक्ष राखीचा आहे. 
उ. संदर्भ : वरील वाक्य ‘‘हिरवे सांगाती या पाठातील असून या पाठाचे लेखक गुलजार आहेत.
स्पष्टीकरण : अभिनेत्री राखाने एका वृक्षाचे रोपटे गुलजार यांना भेटीदाखल दिले होते. ते रोपटे आपल्या अंगणात लावून त्यांनी काळजीपूर्वक वाढवले होते. त्या वृक्षाचे वर्णन करताना लेखकांनी हे वाक्य म्हटले आहे.

2) झाडे चैतन्यशील असतात 
उत्तर : हे वाक्य हिरवे सांगाती पाठातील असून, लेखक गुलजार असून, हा ललित लेख आहे.
झाडांबद्दल बोलताना लेखकांनी म्हटले की, झाडांवर लेखकाचे अपार प्रेम आहे. त्यांनी झाडांवर खूप कविता केल्या आहेत. झाडांजवळ त्यांना शांत वाटते. मन आनंदीत होते. झाडांसाठी ते प्रवासालाही पहाटेच निघतात.


३. खालील पश्नांची उत्तरे आठ-दहा वाक्यात लिहा. 

१. हिरवे सांगाती या पाठात आलेल्या सर्व वृक्षांची  वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : पिंपळ हा  पुरातन वृक्ष असून त्यामध्ये बरेचसे औषधी गुणधर्म आहेत. त्यातले अणुरेणू हे मानवी शरीरातील रेणूशी मिळते जुळते आहेत. पूर्वजांनी त्याला देवाचे रूप दिले आहे. 
जांभळाचा वृक्ष  म्हणजे जणू गारवाचं  आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तो अनेकांना सावली देतो. फळेही.
बांबूचे झाड, अनेक वर्ष फळ (बांबू) देते. बांबूच्या वनात जर वाऱ्याचा झोत आला तर बांबू ‘‘साई-साई असे देवाचे नाव घेतो असे वाटते. बांबूच्या वनांचा नाश व्हायची वेळ आली की त्यांना फुले येतात.
कडूलिंबाचे झाड औषधी, कडुनिंबाची छोटी-छोटी पांढरी फुले म्हणजे कानातील झुमक्यासारखी वाटतात. 
पांढया चाफ्याच्या पानाफुलांचा तर फक्त लपंडाव चालतो. याला फुलं आली की पानं गळून पडतात आणि पानं आली की फुले गडप होतात. त्यांच्यी फांदी किंवा पानं तोडले तरी  तेथून  दुधासारखा  पंधरा चीक येतो. चाफ्याच्या झाडाला लेखक बड़ी माँ म्हणतात. 
पपईचा वृक्ष तीनवेळा फळ दिल्यावर मरतो
बहावा लाल, चिनार वृक्ष पानगळीच्या मोसमात आपल्या सर्व हिरव्या पानांचा त्याग करतात. व लाल पिवळ्या, केशरी रंगाची पाने धारण करतात. 
गुलमोहरला लाल लाल मुकुटासारखी फुले येतात  व सर्वत्र पसरतात.   जून ते सप्टेंपर्यंत पाने आणि तलवारीसारख्या शेंगांनी मढलेला असतो. या झाडांची विशेष काळजी घ्यावी 

२) ‘‘हिरवे सांगाती या शीर्षकाची यथार्थता स्पष्ट करा. 
उ. : ‘‘सांगाती या शब्दाचा अर्थ सोबती किंवा सखा असा होतो. या पाठाला हिरवे सांगाती हे नाव अगदी समर्पक वाटते. कारण खया अर्धाने पाहयला गेल्यावर आपल्या अवती भोवतीचे वृक्ष, लता, वेली हेच आपले मित्र आहेत. कारण ही सर्व मित्रमंडळी आपल्याला भरभरून देतात. कोणत्याही पकारची स्वार्थभावना त्यांच्यात नसते. निसर्गाकडून आपण अनेक गोष्टी शिकतो. संकटाचा मुकाबला कसा करावा, नेटाने कसे उभे राहावे हे आपल्याला निसर्ग शिकवतो. निसर्ग हा आपला सांगाती तर आहेच पण गुरूही आहे. या मित्राच्या सहाय्याने मानावाने गरुडझेप घेतली आहे. त्याच्यावर पेम केल्याने आपल्याला मनस्वी आनंद होतो. म्हणून हिरवे सांगाती हे शिर्षक यथार्थ वाटते.

पाठात आलेली विविध झाडांची चित्रे 


बांबू 
चाफा 


चिनार 

कडुलिंब 


पिंपळ 





1 comment:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024