Tuesday, May 14, 2019

जपानी स्त्री


जपानी स्त्रीची विविध रूपे 



 परिचय : 

इंदू दिनकर साक्रीकर   (1923-1963) सामाजिक कार्यकर्त्या आणि कथालखिका. ‘निळाई’, ‘अपूर्ती’, ‘मोहर’ हे कथासंग्रह आहेत. ‘सापशिडी’ हा एकांकिका संग्रह. ‘पूर्वेच्या परिसरात’ हे प्रवास वर्णन आहे. सामाजिक भान ठेवून भोवतालच्या जीवनाचे रेखीव अन सुबोध शैलीत चित्रण करणे ही इंदू साक्रीकर यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.

मूल्य :  कुतूहल
साहित्य प्रकार :  प्रवास वर्णन
संदर्भ ग्रंथ :  पूर्वेच्या परिसरात

टीपा : पिंग पाँग -पिंग पाँग इ.स. 1800 मध्ये युरोपात छोटा चेंडू आणि गोल लाकडी बॅट घेऊन डायनिंग टेबलावर हा खेळ खेळला जाई. नंतर सेल्युलाईडचा बॉल वापरून व बॅटवर रबराचे कव्हर घेऊन खेळू लागले. 1926 मध्ये राष्ट्रीय टेबल टेनिस असोसिएशनची स्थापना झाली. 1950 ते 1960 या काळात जपानमध्ये, 1960-70 मध्ये चीनमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. 1980 पासून याचा समावेश ऑलिंपिक मध्ये करण्यात येऊन तो खेळ जगप्रसिद्ध झाला.



प्र. १:   योग्य पर्याय निवडून लिहा. 

१) जपानी स्त्री हा पाठ ------ या  प्रवासवर्णनातून निवडला आहे.
अ) पूर्वेच्या परिसरात, ब) अपूर्वाई, क) पूर्वरंग, ड) वाटचाल.

२) अपूर्ती हा ------- आहे. 
अं) कथासंग्रह, ब) लोकसंग्रह, क)सोहळा, ड) ग्रंथ.

३) हाऊज वाइव्हज या संघटनेच्या देशभर ------ शाखा आहेत.
अ) ३००, ब) २००, क) २०७, ड) ४००.

४) जपानी दुकानात नेहमी आढळते. 
अ) लबाडी, ब) फसवणूक, क) सचोटी, ड) । शालीनता.

उत्तर : १)-अ) पूर्वेच्या परिसरात, २)-अ) उ कथासंग्रह, ३)-क) २०७, ४)-क) सचोटी. 


प्र. 2 :  एका वाक्यात उत्तरे द्या. 

1) जपानी स्त्री कशी आहे? 
उ. जपानी स्त्री गोड, पेमळ, नम्र व हसरी आहे.

2) जपानी तरुण मुलींची चेष्टा केव्हा होते? 
उ. जपानी तरुण मुली नोकरी न करता घरात बसू लागल्या तर त्यांची चेष्टा होते.

3) हाऊस वाइव्हज या संस्थेची स्थापना केव्हा झाली? 
उ. हाऊस वाईव्हज या संस्थेची स्थापना 1948 साली झाली.

4) जपानी स्त्रियांची कोणती श्रद्धा आहे? 
उत्तर : जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या लग्नासाठीही पैसा जमा करायची या गोष्टी केल्या पाहिजेत, अशी त्यांची श्रद्धा आहे.

5) जपानी स्त्रीचा कोणता हट्ट असतो? 
उत्तर : कपडे धुवायचे यंत्र, टेलिव्हीजन, टेलिफोन घरात असलाच पाहिजे, अशी जपानी स्त्रीची श्रद्धा असते.

प्र. ३ :   रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 

१) जपानमध्ये ------ महत्त्वाच्या संघटना आहेत.

२) हिंदुसंस्थानात स्वयंपाक घरात दडलेला ----- सामाजिक करणारा जपान देश आहे.

३) जपानमध्ये--------- घेणे कमीपणाचे मानतात.

४) टोकिओतील ------ हॉटेलमध्ये पार्टी होती.

 उत्तरे : १) दोन,  २) शालीनपणा,  ३) टीप,  ४) फॅशनेबल.



तीन ते चार वाक्यात उत्तरे द्या. 

1) जपानमध्ये कोणते निरुउद्योगी  प्रकार आढळत नाहीत? 
उ. जपानमध्ये रस्त्यात उगीचच घोटाळत उभं राहून मुलींची चेष्टा करणं किंवा त्यांना काही त्रास देणं असले निरुद्योग पकार आढळत नाहीत. उलट मुली नोकरी न करता घरी बसल्या तर त्यांची चेष्टा होते.

2) जपानी स्त्रिया कोणकोणती कामे करतात? 
उ. जपानी सित्रयांचे जीवन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या सारख्या क्षेत्रात पुढारलेले असून, तेथील स्त्रिया ट्राम  कंडक्टर, बस कंडक्टर, दुकानातील विक्रेत्या, हॉटेलमधील वाढपी, लिप्टमन आणि त्याचबरोबर बूट पॉलीश आणि केस कापण्याचा व्यवसायही करतात.

3) जपानच्या प्रगतीस कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या? 
उत्तर : १८१९ साली झालेला भूकंप आणि १९४५ मध्ये झालेला बाँब हल्ला या दोन संकटांनी जपानचा आधारच नाहीसा झाला होता. पण त्यामुळेच जपान आपल्या पायावर उभारला व प्रगती केली.


सात-आठ वाक्यात उत्तरे लिहा. 

1) मदर्स युनियन या संस्थेची माहिती लिहा. 
उ. : एका मोठ्या तीन मजली इमारतीत ‘‘मदर्स युनियन ही संस्था आहे. पहिल्या मजल्यावर मदर्स युनियनच ऑफीस आहे. दुसया मजव्यावर पालकांची संस्था आणि तिसया मजल्यावर शिक्षकांच्या संघटनेचं ऑफीस. या संघटनेच्या अध्यक्षा 70-75 वर्षाच्या होत्या. नावावरून ही संस्था केवळ मातांची मार्गदर्शक असेल असे वाटते. पण 1945 मध्ये जेव्हा हिरोशिमावर बॉम्ब हल्ला झाला तेव्हा अनेक घरे जमीनदोस्त झाली. कित्येक संसार धुळीला मिळाले. देशातील तरुण पुरुषांच्या संख्या कमी झाली. अनेक दीनवाणी मुलं दारोदार हिंदू लागली. त्या मुलांना आश्रय देण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली.

2)  'हाऊज व्हाइव्हज' या संस्थेची माहिती लिहा. 

उत्तर : इंदूताई साक्रीकरांनी पूर्वेच्या परिसरात या प्रवासवर्णनात जपानी स्त्रीची थोरवी जणू गायली आहे. जपानच्या निर्मितीत स्त्रियांचा मोलाचा हात आहे. महायुद्धामुळे आणि भूकंपामुळे जपान नामशेष होत असताना १९४८ साली या संस्थेची स्थापना झाली. स्त्रियांनी स्वतः वर्गणी काढून स्थापना केलेली ही संस्था ६ मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर १ विषयाचा वर्ग चाले. त त्यामध्ये पुष्परचना, हस्तव्यवसाय, आहारशास्त्र, 7 बाजारहाट, बजेट तयार करणे हेही शिकवलं जातं. न तेथील एका प्रयोगशाळेत अन्नधान्यातील भेसळ 7 ओळखण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. त्यानुसार एखाद्या वस्तूत भेसळ आढळली तर त्या वस्तूवर बहिष्कार टाकला जातो, मोर्चे काढले जातात. या संस्थेच्या २०७ शाखा आहेत. सरकारही या संघटनेला घाबरतं. सर्व स्त्रिया त्यांची खूण ‘लाकडी हात' घेऊन रस्त्यावर उतरतात. त्यामुळे जपानी दुकानात सचोटीच आढळते.   






No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024