या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दानी भरा.
1. भूखंडीय शिलावरणाला सियाल असेही
म्हणतात.
2. पसरट भांड्याच्या आकाराचा व
शंकूसारख्या मुखाच्या ज्वालामुखीस कॅलडेरा म्हणतात.
3. सर्वात जास्त विध्वंसक भूकंप लहरी
म्हणजे भूपृष्ठ लहरी.
4. अधोमुखी लवणस्तंभ आणि उर्ध्वमुखी
लवणस्तंभ भूमी अंतर्गत पाण्याच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतात.
5. सागरी लाटाच्या कार्यामुळे पुळण तयार
होतात.
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. पृथ्वीच्या अंतर्भागाचे तीन थर कोणते
?
उत्तर : पृथ्वीच्या अंतर्भागाचे तीन थर : 1.शिलावरण किंवा भूकवच 2. मध्यावरण
(प्रावरण) 3. गाभा
2. वारंवार होणाèया उद्रेकावरून होणारे ज्वालामुखीचे प्रकार कोणते ?
उत्तर : वारंवार होणाèया उद्रेकावरून होणारे ज्वालामुखीचे प्रकार : 1.जागृत ज्वालामुखी 2.सुप्त
(निद्रिस्त) ज्वालामुखी 3.लुप्त (मृत)
ज्वालामुखी.
3. जगातील भूकंप होणाèया प्रदेशांची नावे लिहा.
उत्तर : 1. पॅसिफिक महासागराभोवतीचा किनारवर्ती प्रदेश - जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको, फिलीपाईन्स, पेरू, न्यूझीलंड, चिली वगैरे. 2. भूमध्य सागरीय भूकंप क्षेत्र - भूमध्य समुद्राभोवतालचे किनाèयाचे प्रदेश. 3. भारतातील हिमालय पर्वत
पट्टा (शिवालिक प्रदेश)
4. विदारण (अपक्षय) म्हणजे काय ? अपक्षयाचे तीन प्रमुख प्रकार लिहा.
उत्तर : खडक ठिसूळ होऊन फुटतात व त्याचा
भुगा होतो. या नैसर्गिक प्रक्रियेस विदारण किंवा अपक्षय क्रिया म्हणतात. अपक्षय
क्रियेचे प्रकार पुढीलप्रमाणे : 1. भौतिक अपक्षय 2.रासायनिक अपक्षय 3.जैविक अपक्षय
5. नदीच्या कार्यामुळे कोणकोणती
भूस्वरूपे निर्माण होतात ?
उत्तर : नदीच्या कार्यामुळे निर्माण
होणारी भूस्वरूपे भिन्न आणि विशिष्ट प्रकारची असतात. 1. प्रवाहाचा वरचा टप्पा : येथे नदी
डोंगराळ प्रदेशातील उंचावरून उताराकडे वाहते त्यामुळे झिजेचे कार्य प्रभावीपणे
होते. त्यामुळे खोल दèया तयार केल्या जातात.
याचा परिणाम म्हणून खिंडी, घळई, व्ही आकाराची दरी, धबधबे (एन्जल धबधबा, नायगारा, जोग) कुंभगर्ता (रांजण खळगा) वगैरे
भूस्वरूपे निर्माण होतात. 2. प्रवाहाचा मधला
टप्पा : येथे नदी मैदानी भागातून वाहते. उतार मंद होतो तसा नदी प्रवाहाचा वेग कमी
होतो. पाण्याचे प्रमाण वाढलेले असते. येथे नदीचे प्रमुख कार्य म्हणजे तळातील गाळ
वाहून नेते. यामुळे ती पंखाकृती मैदाने, नागमोडी वळणे निर्माण करते.3. प्रवाहाचा खालचा
टप्पा : उतार कमी होऊन सपाट प्रदेश सुरु झालेला असल्यामुळे येथे नदी फारच संथ वाहत
असते. येथे पूर मैदाने, नैसर्गिक बांध
(पूरतट) कुंडल कासार, त्रिभूज प्रदेश वगैरे
भूस्वरूपे निर्माण होतात.
प्रश्न 3 - जोड्या जुळवा (उत्तरासह)
अ ब
1. सीमा सागरी भूकवच
2. वालुकाश्म गाळाचा खडक
3. अपिकेंद्र भूकंप
4. हिमनदी भूम्यांतर्गत
पाणी
5. लोएस पिवळी माती
प्रश्न 3 - खालील शब्दांचा अर्थ स्पष्ट करा.
1. जलजन्य खडक : अग्निजन्य खडकांचे
बारीक बारीक तुकडे होऊन त्यापासून गाळाचे खडक बनतात. यांनाच जलजन्य खडकसुद्धा
म्हणतात. कारण ते सागर, नदी, सरोवरे, तळी यांच्या तळाशी निर्माण होतात.
2. पॅसिफिकचे अग्निकंकण : पॅसिफिक
महासागराच्या किनाèयावरील प्रदेशास
पॅसिफिकचे अग्निकंकण असे म्हणतात. जगातील प्रमुख ज्वालामुखीच्या प्रदेशापैकी एक हा
आहे. यामध्ये जपान, फिलिपाइन्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मध्य अमेरिका आणि
दक्षिण अमेरिका या देशाच्या किनारपट्टींचा समावेश होतो.
3. भौतिक अपक्षय : हवामानातील तापमान, पाऊस, गुरुत्वाकर्षणशक्ती, धुके या घटकांचा परिणाम खडकांवर होऊन त्यांचा चुरा होतो. या क्रियेस भौतिक
(यांत्रिक) अपक्षय म्हणतात. उदा. कण विघटन, अपपर्णन (पापुद्रे निघणे), हिम विलगीकरण, खडक विघटन.
4. त्सुनामी : सागराच्या किंवा
महासागराच्या तळाला भूकंप झाल्यामुळे अतिशय उंच व प्रचंड आकाराच्या भयंकर लाटा
किनाèयावर आदळतात. त्यांना त्सुनामी असे
म्हणतात. हा जपानी शब्द असून ‘त्सुनामी’ या शब्दाचा अर्थ किनाèयावर आदळणाèया उंच व प्रचंड लाटा असा होतो. हा शब्द आता जगातील अत्यंत भयंकर लाटांचे
वर्णन करताना उपयोगात आणला जातो.
5. वनस्पतीजन्य खडक : जलाशयाच्या तळाशी
संचयन होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतींवर उष्णता व दाब यांचा परिणाम होतो.
वनस्पतींच्या लाकडाचा दगडी कोळसा बनतो. यालाच वनस्पतीजन्य खडक असेही म्हणतात.
6. खंडांतर्गत हिमनद्या : शीत
कटिबंधातील अंटार्टिका आणि ग्रीनलँडसारख्या विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेशात ज्या
हिमनद्या आहेत. त्यांना खंडांतर्गत हिमनद्या म्हणतात.
7. गरम पाण्याचे झरे : काही झèयातून गरम किंवा उष्ण पाणी नैसर्गिकरित्या बाहेर येते. त्यांना गरम पाण्याचे
झरे म्हणतात. हे सामान्यत: ज्वालामुखीच्या प्रदेशात आढळतात.
No comments:
Post a Comment