पृथ्वी |
अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते |
प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दानी भरा.
1. पृथ्वीचे एकूण भौगालिक क्षेत्र 510 मिलीयन चौ.कि.मी. इतके आहे.
2. पृथ्वीचा आकार गोलाकार आहे.
3. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास 12756 कि.मी. व धु्रवीय व्यास 12714 कि.मी. एवढा
आहे.
4. 23 1/2 उत्तर अक्षांशाला
कर्कवृत्त म्हणतात.
5. भारतीय प्रमाणवेळ 821/2 पूर्व रेखांशावर आधारलेली आहे.
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. पृथ्वीला ‘सजीवांचा ग्रह’ असे का म्हणतात ?
उत्तर : पृथ्वी हा ग्रह मनुष्य, पशुपक्षी, वनस्पती अशा सर्व प्रकारच्या
सजीवांची मायभूमी आहे. म्हणून त्याला सजीवांचा ग्रह म्हणतात.
2. उत्तर गोलार्धाला भू गोलार्ध व
दक्षिण गोलार्धाला जल गोलार्ध असे का म्हणतात ?
उत्तर : उत्तर गोलार्धात 60 टक्के जमीन व 40 टक्के पाणी आहे. म्हणून
त्याला भू गोलार्ध म्हणतात. तर दक्षिण गोलार्धात 81 टक्के पाणी असून 19 टक्के पाणी जमीन
आहे. म्हणून त्या गोलार्धाला जल गोलार्ध म्हणतात.
3. अक्षांश आणि रेखांश म्हणजे काय ?
उत्तर : एखादे ठिकाण नेमके कोठे आहे, ते किती अंतरावर आहे आणि कोणत्या दिशेला आहे. हे कळण्यासाठी नकाशावरील किंवा
पृथ्वीच्या गोलावरील काल्पनिक रेषांचे जाळे आवश्यक आहे. या काल्पनिक रेषा
पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पुन्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेल्या आहेत. त्यांना
अनुक्रमे अक्षांश आणि रेखांश म्हणतात.
4. प्रमाणवेळ आणि स्थानिक वेळ यातील फरक
लिहा.
उत्तर : प्रमाण वेळ : एखाद्या ठिकाणाची
स्थानिक वेळ ही विस्तृत क्षेत्र असलेल्या संपूर्ण देशाची वेळ असे मानण्यात येते.
तेव्हा तिला त्या देशाची प्रमाणवेळ मानण्यात येते. 2.प्रमाणवेळ ही त्या देशाच्या मध्यवर्ती रेखांशावर आधारित त्या देशाची समानवेळ
असते.
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. CLICK ME
स्थानिक वेळ : एखाद्या ठिकाणाची येथील
रेखांशानुसार वेळ किंवा तेथील मध्यान्हानुसारची (दुपारी 12 वा.) वेळ म्हणजे स्थानिक वेळ. ही त्या ठिकाणावरून जाणाèया रेखावृत्तावर अवलंबून असते. एकाच रेखावृत्तावरील सर्व ठिकाणी त्यावेळी
दुपारचे 12 वाजलेले असतात. भिन्न
रेखावृत्तावरील प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ वेगवेगळी असते. प्रत्येक
रेखावृत्ताला स्वत:ची स्थानिक वेळ असते.
5. आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय ?
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. CLICK ME
उत्तर : आंतरराष्ट्रीय वार रेषा (1800) हे मूळ रेखावृत्ताच्या (00) विरुद्ध बाजूला असलेले रेखांश आहे. याचा उपयोग जगातील विविध भागातील वार आणि तारीख यातील फरक ओळखण्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय वार रेषा ही पॅसिफिक महासागरात काढलेली नागमोडी रेषा आहे.
प्रश्न 3 - खालील संज्ञांचे अर्थ लिहा.
1. अद्वितीय ग्रह : सौरमालेतील
ग्रहामध्ये केवळ पृथ्वीवर सजीव सृष्टी आढळते. या ग्रहावर मनुष्य, पशुपक्षी, वनस्पती अशा अनेक प्रकारचे सजीव
आढळतात. कारण त्याचे सूर्यापासूनचे सुयोग्य अंतर तापमानाचा आवाका, जीवनावश्यक वायू, वातावरण, जलचक्र वगैरे गोष्टी अनुकूल आहे. त्यामुळे पृथ्वीला अद्वितीय ग्रह
म्हणतात.
2. पृथ्वीचा आकार : पृथ्वी हा
सूर्यमालेतील पाचवा मोठा ग्रह आहे. पृथ्वीचा व्यास हा चंद्राच्या व्यासाच्या 4 पट मोठा आहे. तर सूर्यापेक्षा 107 पट लहान आहे. या पृथ्वी ग्रहाचे एकूण भौगालिक क्षेत्र 510 मिलीयन चौ.कि.मी. इतके आहे. यापैकी 371 मिलीयन चौ.कि.मी. (70.78टक्के) भाग
पाण्यानेे व्यापलेला आहे. आणि 149 मिली चौ.कि.मी.
(29.22टक्के) इतका भाग जमिनीने व्यापलेला आहे.
म्हणूनच पृथ्वीवर जमीन व पाणी यांची असमान विभागणी झालेली आहे. जमीन व पाण्याचे
पृथ्वीवरील गुणोत्तर प्रमाण 1:2:43 असे आहे.
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
3. गोलाकार : पृथ्वीचा आकार हा गोलाकार (जिऑइड) आहे. कारण
ती धु्रवाजवळ थोडीशी सपाट असून विषुववृत्तावर थोडीशी फुगीर आहे. पृथ्वीचा
विषुववृत्तीय परीघ 40,076 कि.मी. आणि ध्रुवीय
परीघ 40,008 कि.मी.आहे. पृथ्वीचा
विषुववृत्तीय व्यास 12756 कि.मी. आणि ध्रुवीय
व्यास 12714 कि.मी.आहे. परीघामधील फरक 68 कि.मी. आणि व्यासामधील फरक 42 कि.मी.आहे.
यावरून पृथ्वीचा आकार गोलाकार आहे हे ही सिद्ध होते.
4. खंड : पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या
तुकड्यांना खंड म्हणतात. पृथ्वीवरील भूखंडाचे प्रामुख्याने 7 खंडात विभाजन केले आहे. ते म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका, अंटार्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. हे खंड
म्हणजे विस्तृत आकाराचे भू प्रदेश आहेत.
आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड, तर ऑस्ट्रेलिया
हा सर्वात लहान खंड आहे.
5. मूळ रेखावृत्त : इंग्लंडमधील ग्रीनीच
शहराजवळून जाणाèया रेखावृत्तास मूळ रेखावृत्त किंवा
ग्रीनीच प्रमाणवेळ जीएमटी म्हणतात. हे 00 रेखांश मानतात. ही रेखावृत्ते समान लांबीची असून अर्धवर्तुळाकार आहेत.
ग्रीनीचच्या पूर्वेला 1800 रेखांश तर
पश्चिमेला 1800 रेखांश आहेत अशाप्रकारे एकूण 3600 रेखांश आहेत. मूळ रेखावृत्तापासून 180 पूर्व रेखांशापर्यंतच्या भागाला पूर्व गोलार्ध आणि त्याच्या विरुद्ध भागास
पश्चिम गोलार्ध म्हणतात.
6. भारतीय प्रमाणवेळ : ही भारताच्या
मध्यवर्ती रेखांशावर आधारित आहे. ते म्हणजे 811/2 पूर्व रेखांश. हे अलाहाबाद शहराच्या अगदी जवळून गेले आहे. ही वेळ मूळ
रेखावृत्ताच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.
Prathamesh
ReplyDeletePrathamesh
ReplyDeletePrathamesh
ReplyDelete