Tuesday, January 31, 2023

ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध आणि म्हैसूरचे वडेयर

 

  

 

4. ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध आणि म्हैसूरचे वडेयर

 

I. खालील रिकाम्या जागा योग्य पदांनी भरा.

1. पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध _______ आणि _______ यांच्यामध्ये झाले.

उत्तर : हैदरअली आणि ब्रिटिश

2. दुसऱ्या  अँग्लो-म्हैसुर युद्धाचा शेवट _______ च्या तहाने झाला.

उत्तर : मंगळूरचा तह .

3. राजा वडेयरने _______ ही आपली राजधानी बनविली.

उत्तर : श्रीरंगपट्टण

4. कित्तूर चेन्नम्माने _______ नावाचा मुलगा दत्तक घेतला.

उत्तर : शिवलिंगप्पा

5. कित्तूर संस्थानातल्या रायण्णाचे गाव _______ हे होय.

उत्तर : संगोळ्ळी

6. सुरपूर हे सध्याच्या _______ या जिल्ह्यात आहे.

उत्तर : यादगीर

7. बागलकोट जिल्ह्यातील _______ गावच्या बेरडांनी ब्रिटिशाविरुद्ध बंड पुकारले.

उत्तर : हलगली

8. अमरसुळ्याचे बंड हे प्रामुख्याने _______ यांचे बंड होते.

उत्तर : शेतकरी

 

II. समूहात चर्चा करून उत्तरे लिहा.

 

1. चिक्कदेवराज वडेयरच्या कामगिरीचे वर्णन करा.

उत्तर :  चिक्कदेवराज वडेयरचा कालावधी १६७३-१७०४ होता.  

·        तो एक कार्यक्षम योद्धा आणि प्रशासक होता.

·        मदुराई, इक्केरी आणि विजापूर येथे शिवाजीच्या सैन्याचा त्यांनी पाठलाग केला.

·        त्याने मागडी, मधुगिरी, कोराटगेरे व इतर ठिकाणे काबीज केली.

·        त्याने मोगल सेनापतीकडून बंगलोर विकत घेतले.

·        त्यांना कर्नाटक कविचक्रवर्ती, अप्रतिम वीर, तेंकनराजा आणि नवकोटी नारायण या पदव्या होत्या.

·        प्रशासनात मदत करण्यासाठी त्यांनी मंत्रिपरिषद (अठरा कचेरी) सुरू केली.

·        त्यांच्या काळात टपाल व्यवस्था अस्तित्वात आली.

·        कावेरी नदीवर एक धरण बांधण्यात आले

·        सिंचनासाठी चिक्क देवराज आणि दोड्ड देवराज कालवे बांधण्यात आले.

·        त्याने आपल्या दरबारात तिरुमलार्य,  सांची होनम्मा इ.   कवींना आश्रय दिला होता.  

 

2. हैदर अली सत्तेवर कसा आला?

उत्तर : चिक्कदेवराज यांच्या मृत्यूनंतर शासनव्यवस्था ढासळली. म्हैसूरचा राजकीय प्रभाव कमी झाला. या अनियंत्रित परिस्थितीत म्हैसूर व कार्नाटिकच्या प्रदेशात हैदर अलीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. 


   ·           शस्त्रे वापरण्यात आणि प्रयोग करण्यात हैदर अलीची ख्याती होती.

        ·        त्याने सक्रिय लष्करी कारवाया करून दळवायांवर नियंत्रण मिळविले. 

        ·        दुसरा कृष्णराज वडेयरला नजरकैदेत ठेवले व सत्ता आपल्या हाती घेतली.

        ·        अल्पावधीतच तो नवाब हैदर अली या नावाने प्रसिद्ध झाला.  

 

3. दुसऱ्या अँग्लो - म्हैसूर युद्धाचे परिणाम कोणते?

उत्तर : हैदर अलीच्या मृत्यूचा फायदा घेत ब्रिटीशानी मंगलोर व बिदनूर प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न केला.

·  ब्रिटिशांनी टिपूसुलतान विरुद्ध कालिकत व मलबारच्या राज्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले

·    या सर्व बाबी लक्षात घेऊन टिपूने मंगलोर व कोंकण किनारपट्टीवे संरक्षण करण्याचे ठरविले

·        त्याने ब्रिटिशांचा पराभव केला

·        1784 मध्ये मंगलोरचा तह झाला आणि दुसरे अँग्लो - म्हैसूर युद्ध थांबले.

 

4. श्रीरंगपट्टणच्या तहातील अटी कोणत्या?

उत्तर : ब्रिटिशांनी या तहात टिपूवर जाचक  अटी लादून   दुर्बल बनविले.

·        आपले अर्धे  राज्य देणे भाग पाडले .

·        युद्धाची भरपाई म्हणून तीन कोटी रुपये देणे

·        पैशाच्या बदल्यात जामीन म्हणून आपले दोन पुत्र ब्रिटिशांकडे ओलीस ठेवणे.

·        आपल्या ताब्यात असणाऱ्या ब्रिटिश सैन्याची तुरूंगातून सुटका करणे

 

5. चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धामुळे म्हैसूरमध्ये ब्रिटिशांची सत्ता बळकट कशी झाली?

उत्तर : 1799 मध्ये हे युद्ध टिपू सुलतान विरुद्ध ब्रिटिश यांच्यात झाले

·        ब्रिटिशांनी टिपूचा भक्कम किल्ला उद्ध्वस्त केला

·        या युद्धात लढताना टिपूचा मृत्यू झाला  

·        टिपूच्या मृत्यूमुळे ब्रिटिश आनंदी झाले

·        टिपूच्या ताब्यातील बराचसा प्रदेश ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला

·        त्यातील  काही भाग मराठे व निजामाला वाटून दिला

·        एक छोटासा भाग म्हैसूरच्या  वडेयर घराण्याला देण्यात आला

·        तेच म्हैसूर संस्थान ' म्हणून ओळखले जाऊ लागले .  

 

6. चौथ्या कृष्णदेवराज वडेयरच्या कामगिरीचे वर्णन करा.  

उत्तर :  आपल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात त्यांना खूप रस होता.

·      प्राथमिक शिक्षणाच्या  विकासासाठी सर्व प्राथमिक शाळांमधील फी रद्द केली. 

·        म्हैसूर विद्यापीठ सुरू केले

·        परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही सुरू केली.

·        1905 मध्ये टाटांच्या मदतीने बेंगळूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली.

·        सिंचन विकासावर विशेष लक्ष दिले.

·   बेळगोळजवळ कावेरी नदीवर एक धरण बांधले.

·        नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात आले. 

·        अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू झाले

·        लोह आणि पोलाद कारखाना,

·        सिमेंट कारखाना,

·        भद्रावती येथील कागद कारखाना,

·        मंड्या येथील साखर कारखाना.

·        म्हैसूर येथे चंदनी तेलाचा कारखाना,

·        बेंगळुरू येथे साबण कारखाना.

·        बेळगोळ येथील रसायने व खताचा  कारखाना  सुरू केला.

·        न्यायालयीन सभेची स्थापना केली.

·        ललित कलांमध्ये खूप रस होता अनेक  संगीतकारांना प्रोत्साहन दिले

·        कृष्णराजा वडेयर हे अतिशय साध्या स्वभावाचे परंतु  कार्यक्षम प्रशासक होते.  

 

7. ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याची धोंडिया वाघ यांने कोणती पद्धत अवलंबिली?

उत्तर : धोंडियाला त्याच्या शौर्यामुळे त्याला ' वाघ' असे संबोधले जात.



·  हैदर अलीच्या सैन्यात सामान्य शिपाई म्हणून काम केले व आपल्या पराक्रमाने ' लष्करप्रमुख पदापर्यंत पोहोचला

·        आपले स्वतंत्र सैन्य निर्माण करून टिपूच्या सैन्यात सेवा बजावली.

·        टिपू बरोबर मतभेद झाल्यामुळे त्याला कैद करण्यात आले

·        चौथ्या अँग्लो - म्हैसूर युद्धानंतर ब्रिटिशांनी त्याची तुरुंगातून सुटका केली

·        सुटकेनंतर छोटीशी सैन्य तुकडी तयार केली व कारवाया सुरू केल्या.

·    टिपूच्या सैन्यातील असंतुष्ट सैनिक आणि सत्ता नसलेले जहागीरदारांना त्यांने आपल्या सैन्यात सामावून घेतले.

·  त्याने बिदनूर व शिवमोगाचे  किल्ले काबीज करून चित्रदुर्गचा किल्ला येण्याचा अयशस्वी प्रयत्न केला

·        लॉर्ड वेलस्लीने धोंडिया वाघाला पकडण्याचा प्रयत्न केला

·     शिमोगा, होनाळ्ळी, हरिहर इत्यादी भागावर त्याने हल्ला केला पण त्याचा पराभव झाला.

· शिकारीपूर ताब्यात घेतल्यानंतर धोंडिया निजामांच्या अधिपत्याखाली असलेल्या गुत्ती येथे पळाला

·        मराठ्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे बरेच घोडे, उंट व शस्त्रे ताब्यात घेतली

·        अनेक पाळेगारांनी त्याला प्रोत्साहन दिले.

·        मलबार मधील माहे येथील फ्रेंचांनी त्याला मदतीचा हात दिला

·   हरिहर , चित्रदुर्ग , शिकारीपूर , सावनूर , राणेबेन्जूर , कित्तूर व लोंढा अशा   भूप्रदेशात ब्रिटीश सैन्याने त्याचा पाठलाग केला.

·        शिरहट्टीवर ताबा मिळवून ब्रिटीश सैन्याने धोंडियाच्या अनेक सैनिकांना ठार केले.

 

8. रायण्णा ब्रिटिशांविरुद्ध कशा पद्धतीने लढला सविस्तरपणे लिहा?

उत्तर : संगोळी रायण्णा एक शूर शिपाई होता.


·        तो कित्तूरच्या स्वातंत्र्यासाठी तेथील राणी चन्नम्मासह ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढला

·        मातृभूमीला मुक्त करणे हे आपले परम कर्तव्य असे.

·        सैन्याची जमवाजमव करीत त्याने त्यांच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत केली

·        काही संवेदनशील ठिकाणी त्याने गुप्त सभा घेतल्या

·        त्याने ब्रिटिशांच्या तालुक्याच्या ठिकाणी असणारे खजिने लुटण्याची योजना आखली.

·        त्याच्याकडे पाचशे सैनिकांची तुकडी होती. त्यासह तो लढला.

·        ब्रिटिशांना मदत करणाऱ्या गावकऱ्यांबद्दल  त्याच्या मनात तीव्र संताप होता.

 

9. स्वातंत्र्य चळवळीत कोडगूच्या पुट्टबसप्पाचे योगदान कोणते?

·        उत्तर : कल्याणस्वामीच्या निधनानंतर कोडगूच्या खालच्या भागातील लोकांनी बंड चालूच ठेवले. सुळ्या, बेळ्ळारे, पुत्तुर आणि कॅनरातील कांही प्रमुख भाग हे अमरसुळ्यामध्येच मोडत असत.

·        पुट्टबसप्पा या शेतकऱ्यांने स्वतःच कल्याणस्वामी असल्याचे भासविले आणि नंतर स्वामी अपरांपरही आपणच असल्याचे सांगितले व या बंडाचे नेतृत्व केले.

·        हे बंड डोंगराळ भागात सुरू झाले.

·        पुट्टबसप्पा बंडाचे आयोजन करीत असे आणि लोकांना शांत बसवित असे.

·   बंडखोरांच्या हाती सत्ता आली तर तंबाखू व मीठावर कर बसविला जाणार नाही. असे  जाहीर केले.

·        वेल्लोरमधील सरकारी कचेरीवर ताबा मिळविणे ही या बंडाची पहिली चाल होती.

· क्रूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या एका अंमलदाराला ठार मारल्यांने पुट्टबसप्पाची ख्याती आणखीनच वाढली.

·        या घटनेपासून या बंडाला जास्तच पाठिंबा व प्रसिद्धी मिळाली.

·        त्यांनी बंटवाळच्या खजिन्याची व तुरुंगाची लुटालूट केली.

·        कोडगूमधील लोकांच्या सहाय्याने ब्रिटिशांनी त्यांना पकडले.

·        पुट्टबसप्पा, लक्ष्मप्पा, बंगारप्पा, केंदबाडी रामय्यागौडा आणि गुड्डेमने अप्पय्या यांना फाशी देण्यात आली.

·        हे बंड अयशस्वी झाले; तरी ब्रिटिश विरोधी बंडामध्ये याला अनन्यसाधारण स्थान आहे.

 

10. सुरपूरच्या बंडाची थोडक्यात माहिती लिहा.

उत्तर : सुरपूर हे सध्याच्या यादगीरपासून 50 कि. मी. अंतरावर आहे.

वेंकटप्पाच्या कारकिर्दीत त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध बंड पुकारले.  

·        1857 मध्ये ब्रिटिश सुरपूरमधील विविध प्रकारच्या सुधारणांवर बारीक लक्ष ठेवून होते.

·        नानासाहेबांचे प्रतिनिधी सुरपूरमध्ये आहेत. हे सरकारच्या लक्षात आले. यामुळे राज्यकर्त्यांच्या मनसुब्याबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण झाली.

·        राज्यकर्त्यांच्या हालचाली बद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी कॅम्पबेल या अधिकाऱ्याची नेमणूक केली.

·        हैद्राबादच्या राजाचे प्रशासन चांगले नसल्याबद्दलचा अहवाल कॅम्पबेलने सरकारला दिला.

·        वेंकटप्पा नायक हा 1857 च्या बंडातील कर्नाटकातील एक प्रमुख नेता होता

·        1858 मध्ये ब्रिटिशांनी सुरपूर काबीज केले.

·        त्यामुळे तेथील राजा हैद्राबादच्या निजामाला आणि ब्रिटिश अधिकाऱ्याला शरण आला.

वेंकटप्पा नायकाचा मृत्यू कसा झाला याबद्दल मतभेद आहेत.

 


No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...