Sunday, May 12, 2019

भारतातील उद्योगधंदे


1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

1. जिंदाल विजयनगर पोलाद कारखाना ........... राज्यात आहे.
2. कच्चे बॉक्साईट हे ........... उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आहे.
3. ........... हा उद्योगधंदा अरण्याधारित आहे.
4. भारतात प्रथम आधुनिक कागद कारखान्याची स्थापना 1932 मध्ये ........... येथे झाली.
उत्तरे : 1. कर्नाटक 2. अ‍ॅल्युमिनियम  3.कागद  4.  सेहरामपूर (प. बंगाल)

2.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. उद्योगधंदे म्हणजे काय? उद्योगधंद्यांच्या स्थायीकरणासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात?
उत्तर :  उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचे जास्त उपयुक्त अशा पक्क्या मालामध्ये परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेला उद्योगधंदे असे म्हणतात. उदा. ऊसापासून साखर, कच्च्या लोखंडाचे पोलाद, कापसापासून कापड, लाकडाच्या लगद्यापासून कागद बनविणे.
उद्योगधंद्याच्या स्थायीकरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे 1) कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा 2) उर्जा व इंधनाची उपलब्धता 3) वाहतूक व दळणवळण साधनांची व्यवस्था 4) बाजारपेठांची सोय 5) भांडवल 6) कामगार व पाण्याची उपलब्धता 7) अनुकूल हवामान 8) सरकारचे धोरण

2. भारतातील प्रमुख औद्योगिक प्रदेशांची नावे लिहा.
उत्तर : भारतात एकूण 8 प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत. ते म्हणजे
1) हुगळी कोलकत्ता प्रदेश  2) मुंबई पुणे प्रदेश 3) अहमदाबाद वडोदराप्रदेश 4) मदुराई कोईतूर - बेंगळूरु प्रदेश 5) छोटा नागपूरचा पठारी प्रदेश 6) दिल्ली - मीरत प्रदेश 7) विशाखापट्टण - गुंटूर प्रदेश
8) कोल्लम - तिरुवनंतपूर प्रदेश

3. भारतातील अ‍ॅल्युमिनियम उद्योगधंद्याची माहिती सविस्तर लिहा.
उत्तर : अल्युमिनियम हा एक प्रमुख लोखंडेतर धातू आहे. हा विविधोपयोगी धातू आहे. याचा  उपयोग विमाने, स्वयंचलित वाहने, रेल्वे वाहतूक, जहाज, रंग तयार करणे, गृहोपयोगी वस्तू तयार करणे, विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये, विद्युत तारा तयार करणे, याचा पत्रा पॅकिंग करण्यासाठी वापरला जातो. याचा वापर पोलाद व तांब्याचा पर्याय म्हणून करतात.
अ‍ॅल्युमिनीयमच्या स्थायीकरणासाठी पुढील घटक आवश्यक असतात. 1) बॉक्साईट सारखी मूळ कच्च्या मालाची उपलब्धता 2) जलविद्युतशक्तीचा पुरवठा 3) भांडवल व विशाल बाजारपेठ.
विभागणी
भारतात लोखंड व पोलाद उद्योगधंद्यानंतर दुसरा महत्त्वाचा लोह आधारित उद्योगधंदा म्हणजे अ‍ॅल्युमिनियम. पहिला अ‍ॅल्युमिनियमचा कारखाना 1942 मध्ये पश्चिम बंगालमधील ‘जयकाय’ या शहरात सुरु करण्यात आला. आज भारत देशात एकूण 9 अ‍ॅल्युमिनियमचे
कारखाने आहेत. ते म्हणजे   जयकायनगर (प. बंगाल),    अलुपुरम (केरळ), मेहुरु (तामिळनाडू),  बेळगाव (कर्नाटक),  हिराकूड व दामनजोडो (ओडिशा), रेनूकूट (उत्तर प्रदेश),  कोरब (छत्तीसगड) व रत्नागिरी (महाराष्ट्र) इ.
अ‍ॅल्युमिनीयमच्या उत्पादनात भारत जगात 11 व्या क्रमांकाच्या देश आहे. भारताला मोठ्या प्रमाणात याची आवश्यकता असल्याने अ‍ॅल्युमिनियमची आयात करावी लागत आहे.

4. भारतात सुती वस्त्रोद्योगांची विभागणी कशी झाली आहे त्याचे विवरण करा.
उत्तर : भारतातील विविध अशा 76 पेक्षा जास्त शहरांमध्ये सुतीवस्त्रोद्योगांची विभागणी झाली आहे. जास्त प्रमाणत कापूस पिकणाèया राज्यांध्ये हे उद्योग केंद्रीकृत झाले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, तमिळनाडू, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब व  हरियाणा या राज्यात हे उद्योग आढळतात. यामध्ये महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये देशाच्या सुती वस्त्रांच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत. मुंबई हे प्रसिद्ध सुतीवस्त्रोद्योग केंद्र आहे. मुंबईला भारताचे ‘कॉटनोपोलिस’ व ‘मँचेस्टर’ म्हणतात.

5. भारतात ज्ञानावर आधारित उद्योगधंद्यांचे महत्त्व कोणते?
उत्तर : 1. तांत्रिक व वैज्ञानिक प्रगती जलद होते.2. अधिक प्रमाणात उत्पादन घेणारे उद्योगधंदे. 3.  शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक क्षमतेची गरज असते. 4. सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर जास्त परिणाम होतो. 5. भारतात अधिक प्रमाणात युवा वर्ग असून त्यांच्याकडे वाढते माहिती तंत्रज्ञान आहे. त्यामुळे भारतात ज्ञानावर आधारित उद्योगधंद्याचा जलदगतीने विकास होत आहे.
भारतात बेंगळूरु, हे शहर सॉफ्टवेअर उद्योगात अतिशय महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.बेंगळूरुला ‘भारताची सिलिकॉन व्हॅली’ असे संबोधले जाते. म्हैसूर, मंगळूर, हुब्बळ्ळी, उडपी ही कर्नाटकातील इतर सॉफ्टवेअर उद्योगकेंद्रे आहेत. 

6. जीडीपी म्हणजे काय ?
उत्तर :   Gross Domestic Product  - देशात एका वर्षात उत्पादन झालेल्या वस्तू व सेवांची एकूण किंमत

7. कर्नाटकात खासगी क्षेत्रातील लोह व पोलाद कारखाना कोठे आहे ?
उत्तर : जिंदाल विजयनगर पोलाद लि. (गतडङ) तोरणगल - बळ्ळारी जिल्हा - कर्नाटक

8.  लोखंड व पोलाद उद्योगाला मूळ उद्योग असे का म्हणतात ?
उत्तर : याला कारण  हे उद्योगधंदे यंत्रसामुग्री, रेल्वे, जहाजबांधणी, विद्युतयोजना, पाणीपुरवठा योजना, इमारतींची निर्मिती, गृहनिर्मिती इ. अनेक उद्योगांना आवश्यक कच्च्यामालाचा पुरवठा हे उद्योग करतात.

9. अ‍ॅल्युमिनियमचे उपयोग सांगा.
उत्तर : अ‍ॅल्युमिनियम हा एक प्रमुख लोखंडेतर धातू आहे. हा विविधोपयोगी धातू आहे. याचा उपयोग विमाने, स्वयंचलित वाहने, रेल्वे वाहतूक, जहाज, रंग तयार करणे, गृहोपयोगी  वस्तू तयार करणे, विविध प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये, विद्युत तारा तयार करणे, याचा पत्रा पॅकिंग करण्यासाठी वापरला जातो. याचा वापर पोलाद व तांब्याचा पर्याय म्हणून करतात.

10.  कागद उद्योगासाठी लागणारा कच्चा माल कोणता ?
उत्तर :  1. बांबू 2. लाकडाचा लगदा 3. मृदू झाडे 4. बाभळी व साबाई सारखे गवत. 5. भात, गहू, बार्ली, गवत, ऊसाचा चोथा, रद्दी कागद, कापडाच्या चिंध्या यांचा वापर कागद उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून केला जात आहे.

11.  साखर उद्योगातून मिळणारे उपपदार्थ कोणते ?
उत्तर : 1. साखर  2. काकवी 3. मोलॅसिसपासून  दारू 4. मोलॅसिसपासून खत  5. ऊसाचा चोथा (भुसा)  कागद तयार करण्यासाठी वापरतात 6. इंधन म्हणून चोथा वापरतात.7. गूळ, खडीसाखर 

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 






No comments:

Post a Comment