या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रश्न 1 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. जीवावरण म्हणजे काय ?
उत्तर : शिलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा एकत्रित परिणाम म्हणजे जीवावरण होय. याला जैविक
आवरण असेही म्हणतात.
2. पारिस्थितीकी शास्त्राची व्याख्या
लिहा.
उत्तर : पर्यावरण, प्राणिजीवन आणि वनस्पती यांच्या आंतरिक संबंधाचा अभ्यास करणारी विज्ञानाची
शाखा म्हणजे पारिस्थितीकी शास्त्र होय.
3. पर्यावरण प्रदूषणाच्या विविध
प्रकारांची नावे लिहा.
उत्तर : पर्यावरणाच्या प्रदूषणाचे विविध
प्रकार आहेत. प्रदूषण आणि प्रदूषणाचे माध्यम यांच्या आधारे त्यांचे पुढील प्रकार
केले जाऊ शकतात. 1.वायू प्रदूषण 2.जल प्रदूषण 3.मृदा प्रदूषण 4.ध्वनी प्रदूषण
4. जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणते उपाय
योजावेत ?
उत्तर : कारखान्यातून बाहेर पडणारी अशुद्ध
रासायनिक द्रव्ये पाण्यात मिसळणार नाहीत याची काळजी घेणे. पिण्याच्या पाण्याची
स्वच्छता राखणे, मैला, सांडपाणी वाहून नेणाèया पाईपलाईन नदीत
मिसळणार नाही तसेच टाकावू पदार्थ, केरकचरा, निर्माल्य जलाशयात मिसळण्यावर नियंत्रण आणले पाहिजे.
5. जैव विविधता म्हणजे काय ?
उत्तर : एकाच भूप्रदेशात दिसून येणाèया सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना जैव विविधता असे
म्हणतात.
प्रश्न 2 - खालील पदांचा अर्थ लिहा.
1. जीवावरण : शिलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा एकत्रित परिणाम म्हणजे जीवावरण होय.
2. पारिस्थितीकीय असंतुलन : मानव
पृथ्वीवरील विविध नैसर्गिक संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असल्यामुळे
पर्यावरणावर जास्त परिणाम होत आहे. त्याशिवाय निसर्ग आणि पर्यावरणाचा विध्वंस होत
आहे. अशाप्रकारे मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणाèया निसर्ग आणि पर्यावरणाच्या नाशाला पारिस्थितीकीय असंतुलन म्हणतात.
3. वैश्विक तापमान वाढ : पृथ्वीचे
तापमान दिवसेंदिवस हळूहळू वाढत आहे. गेल्या काही वर्षात वातावरणातील तापमान थोड्या
प्रमाणात वाढले आहे. यालाच वैश्विक तापमान वाढ म्हणतात.
4. हरित गृह परिणाम : अलीकडे जीवाश्म
इंधनाच्या वापरामुळे हरितगृह वायू बाहेर पडण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. कार्बनडाय
ऑक्साईड आणि इतर हरित गृह वायू भूमीपासून बाहेर पडणारी उष्णता शोषून घेतात व साठवून
ठेवतात. त्यामुळे वातावरणातील तापमानाचे प्रमाण अधिक वाढले यालाच हरित गृह परिणाम
असे म्हणतात.
5. ओझोनचा विरळपणा : अलीकडे एअर कंडीशनर, रेफ्रिजरेटर, स्प्रे आणि डिओड्रंट इ.
अतिवापरामुळे क्लोरोफ्लुरो कार्बन बाहेर पडून वातावरणातील ओझोन थराचा नाश करत आहे.
यालाच ओझोनचा विरळपणा म्हणता येईल.
6. आम्लीय पाऊस : पावसाच्या पाण्यात
सल्फ्युरिक आम्ल आणि कार्बन मोनोक्साईड वगैरे आम्लांचे प्रमाण जास्त असल्यास
त्यांना आम्लीय पाऊस म्हणतात.
No comments:
Post a Comment