Thursday, May 23, 2019

कर्नाटकाची लोकसंख्या



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. 2011 च्या जनगणनेनुसार कर्नाटकाची एकूण लोकसंख्या .....................

2. कर्नाटकातील ..................... जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे.

3. स्त्रियांची संख्या जास्त असलेला जिल्हा .....................

4. सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा .....................

5. कर्नाटकातील सरासरी लोकसंख्येचे घनत्व दर चौ.कि.मी. ..................... व्यक्ती आहे.


उत्तरे : 1. 6,11,30,704  2. बेंगळूर शहर 3. उडपी  4. कोडगु  5. 319


प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


1. कर्नाटकातील लोकसंख्येच्या वाढीबद्दल लिहा.
उत्तर : 2001 च्या च्या जनगणनेनुसार कर्नाटकाची लोकसंख्या 5,28,50,562 इतकी होती. 2011 च्या जनगणनेनुसार ती 6,11,30,704 इतकी आहे. 2001 ते 2011 या दशकामध्ये 80,80,142 इतके लोक वाढले आहेत. याच काळात लोकसंख्यावाढीचा दर 15.67 टक्के इतका आहे. हा दर भारताच्या लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा (17.64 टक्के) कमी आहे. याला कारण म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रम, जन्मदर नियंत्रण वगैरे.

2. जास्त व कमी लोकसंख्येचे घनत्व असलेल्या जिल्ह्यांची नावे लिहा.
उत्तर :  2011 च्या जनगणनेनुसार बेंगळूर शहर जिल्ह्यात लोकसंख्येचे घनत्व सर्वात जास्त आहे तर कोडगू जिल्ह्यात कमी घनत्व आहे.

3. कर्नाटकातील ग्रामीण व शहरी लोकसंख्येच्या विभागणीबद्दल माहिती लिहा.
उत्तर : कर्नाटक हा खेड्यांनी बनलेला असून येथे 29,406 खेडी आहेत. तेथे एकूण 3.75 कोटी लोकसंख्या आढळते, याचा अर्थ असा की कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येच्या भारताच्या शेकडा 61.4 टक्के लोक खेड्यात आणि शेकडा 38.6 टक्के लोक (2.35 कोटी) शहरी भागात राहतात. भारताच्या सरासरी शहरी लोकसंख्येची तुलना केल्यास कर्नाटकची शहरी लोकसंख्या अधिक आहे. सर्व जिल्ह्यामध्ये हे प्रमाण समान नाही. बेंगळूर शहर जिल्ह्यात शहरी लोकसंख्येचे प्रमाण जास्त असून कोडगू जिल्ह्यात शहरी लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे.

4. कर्नाटकातील साक्षरतेबद्दल माहिती लिहा.
उत्तर : 2011 मध्ये कर्नाटकातील सरासरी साक्षरता प्रमाण 75.6 टक्के होते. हे प्रमाण भारताच्या 74 टक्के सरासरीपेक्षा उत्तम आहे. जिल्ह्यानुसार पाहणी केल्यानंतर दक्षिण कन्नड जिल्ह्यात साक्षरता प्रमाण 88.6 टक्के असून तो प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर बेंगळूर शहर जिल्हा दुसèया स्थानावर असून तेथे 88.5 टक्के प्रमाण आहे. उडपी आणि कोडगु जिल्हा तिसèया स्थानावर आहे. याउलट यादगिरी जिल्हा 52.4 टक्के हा अति कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे. कर्नाटकातील पुरुष साक्षरांचे प्रमाण 82.9 टक्के तर महिला साक्षरांचे प्रमाण 68.2 टक्के इतके आहे. शहरातील साक्षरतेचे प्रमाण हे ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे.

No comments:

Post a Comment

सामाजिक स्तर