मोहेंजोदारो स्नानगृह |
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. बोलन खिंडीजवळील सुपीक प्रदेश मेहेरगड हा होय.
2. पुरातत्त्व संशोधकांनी हरप्पा हे शहर नव्वद
वर्षापूर्वी शोधून काढले.
3. हरप्पा संस्कृतीतील लोक शेती आणि व्यापारावर अवलंबून
होते.
4. सगळ्यात प्राचीन वेद ऋग्वेद हा होय.
हराप्पा शहर व हातविरहित मानवी पुतळा |
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा.
1. हरप्पा शहराची नगर वैशिष्ट्ये वर्णन करा.
उत्तर : हरप्पा शहराचे दोन किंवा
दोनापेक्षा जास्त भाग दिसून येतात. पश्चिम भाग हा अरुंद आणि उंचावर आहे.
संशोधकांच्या मते हा किल्ला असावा. पूर्व भाग मात्र विस्तीर्ण आणि सखल भागी आहे.
या भागाला खालचे गाव असे संबोधले आहे. प्रत्येक भागाची भिंत जळावू विटापासून केली
आहे. विटांची रचना एकमेकामध्ये गुंतवून केली असल्यामुळे घरांच्या भिंती मजबूत
आहेत. या किल्ल्यात काही वैशिष्ट्यपूर्ण इमारतीदेखील आहेत.
2. मोहेंजोदारोमधील सार्वजनिक स्नानगृहाचे वर्णन करा.
उत्तर : हा एक पोहोण्याचा तलाव आहे.
अभ्यास तज्ज्ञांच्या मते ते स्नानगृह असावे. तलावातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी
त्याचे बांधकाम पक्क्या विटांनी केले आहे. तलावात उतरण्यासाठी त्याच्या दोन्ही
बाजूंनी पायèयांची
रचना केली आहे. तसेच सभोवताली खोल्यादेखील आहेत. या स्नानगृहाला पाण्याचा पुरवठा
बहुतेक विहिरीमार्फत केला जात असे. त्याचबरोबर घाण पाण्याचा निचरा करण्याची सोय
होती. या स्नानगृहाचा वापर विशिष्ट प्रसंगी महनीय व्यक्ती करीत असावेत.
3. शहर रचना कशी होती ?
उत्तर : शहराची रचना पद्धतशीर होती.
व्यवस्थितपणे बांधलेली एकमजली अथवा दुमजली घरे, रस्ते आणि गटारे
या ठिकाणी दिसून येतात. घराचे बांधकाम विटांचा वापर करून केलेले असे. भिंती मजबूत
होत्या. अंगणाच्या सभोवताली खोल्यांची रचना आढळून येते. घराचे प्रवेशद्वार
रस्त्याला लागून असे. खिडक्यांची रचना रस्त्यावर उघडणारी नव्हती. घरात स्नानगृहे
होती. काही घरांना पाणी पुरवठ्यासाठी विहिरीदेखील होत्या.
सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी जमिनी
अंतर्गत गटारांची रचना होती. गटारी विटांनी बांधलेल्या आणि दगडी आच्छादन असलेल्या
होत्या. घरातील सांडपाण्याचा निचरा मुख्य गटारामध्ये होत असे. सार्वजनिक गटारांची
वारंवार स्वच्छता करण्यासाठी त्यावर काढता येणारी झाकणे असत.
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. CLICK MECLICK ME
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. CLICK MECLICK ME
4. वेदांची नावे लिहा.
उत्तर : वेद चार आहेत. 1. ऋग्वेद 2. सामवेद 3. यजुर्वेद 4. अथर्ववेद.
5. वैदिक काळात कोणकोणते यज्ञ केले जात असत ?
उत्तर : वैदिक काळात राजसूय, वाजपेय, सर्वमेध आणि
अश्वमेध यज्ञ केले जात.
6. वेदकाळानंतर लोक कोणकोणते व्यवसाय करत असत.
उत्तर : वेदकाळानंतर लोक सोनार, चांभार, बुरुड, लोहार, दोरखंड तयार
करणारे, विणकर, सुतार, कुंभार इ.
व्यावसायिकांचा उल्लेख आढळतो.
या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा CLICK MEब्रॉंझचा नर्तिकेचा पुतळा |
No comments:
Post a Comment