Friday, May 24, 2019

विविध व्यापारी संघटना



प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. एका व्यक्तीच्या मालकीच्या संस्थांना वैयक्तिक मालकीच्या संघटना असे म्हटले जाते.
2. भारतीय भागीदारी व्यवसाय नोंदणी कायदा 1932 या वर्षी अंमलात आला.
3. बँकिंग व्यवसायात भागीदारांची कमाल संख्या दहा इतकी असावी लागते.
4. भारतीय अविभक्त कुटुंब व्यवसायाच्या प्रमुख सदस्याला कर्ता असे म्हटले जाते.
5. फक्त भारतात आढळून येणारी वैयक्तिक व्यवसाय संघटना हिंदू अविभक्त एकत्र कुटुंबातील व्यवसाय संघटना ही होय.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिहा.

1. लघु उद्योगधंद्यांच्या संघटना कोणत्या ?
उत्तर : लघु उद्योगधंद्यांच्या संघटना :1.वैयक्तिक मालकीच्या संस्था 2.भागीदारीतील व्यवसाय संघटना 3.हिंदू अविभक्त (एकत्र) कुटुंबातील व्यवसाय संघटना.
2. लघु उद्योगधंदे ग्राहकांना कोणत्या सेवा पुरवितात ?
उत्तर : 1.त्यांचा ग्राहकांशी सरळ संपर्क येतो. 2.ते अनेक प्रकारच्या सेवा पुरवितात 3.काही व्यक्तींना रोजगार पुरवितात. 4.संपत्तीच्या वाटपात त्यांचा सहभाग असतो. 5.ग्राहकांच्या आवडीनुसार ते वस्तू पुरवितात.
3. भागीदारी व्यवसाय म्हणजे काय ?
उत्तर : भागीदारी व्यवसायात दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यापार सुरू करतात. वैयक्तिक व्यापारी संघटनांतील दोषामुळे भागीदारी व्यवसाय अस्तित्वात येतात. भागीदारी व्यवसायातील सर्व भागीदारांनी होणारे नफा नुकसान वाटून घेण्यास तयार असावे लागते.
4. नाममात्र भागीदार म्हणजे काय ?
उत्तर : जे भागीदार धंद्यामध्ये भांडवलही गुंतवित नाहीत आणि कोणत्याही व्यवहारात भाग घेत नाहीत. धंद्यातील कोणत्याही फायद्या तोट्यामध्ये त्यांची वाटणी नसते. पण त्या क्षेत्रातील विश्वासावर किंवा त्यांच्या नावावर व्यवसाय चालतो. त्याला नाममात्र भागीदार म्हणतात.
5. भागीदारी व्यवसायाचे विसर्जन कसे करता येते ?
उत्तर : भागीदारीतील व्यवसाय सहजपणे विसर्जित केला जातो. कोणताही भागीदार 14 दिवसांची नोटीस देऊन किंवा इतर भागीदारांची अनुमती घेऊन आपली भागीदारी रद्द करू शकतो.

प्रश्न 3 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. वैयक्तिक मालकीच्या व्यवसायाचे चार फायदे लिहा. 
उत्तर : 1. यासाठी कोणत्याही कायदेशीर औपचारिकतेची गरज भासत नाही. 2. स्वत:च्या भांडवलाने व्यवसाय सुरू करता येतो. 3. एकटा मालक सगळे फायदे व तोटे सहन करतो. त्यांचा ग्राहकांशी थेट संपर्क येतो. 4. व्यापारात कोणताही तातडीचा निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. ते व्यापाराची गुपिते पाळतात.
2. वैयक्तिक मालकीच्या व्यवसायाचे चार तोटे लिहा.
उत्तर : 1.भांडवल मर्यादित असल्यामुळे व्यापाराचा विस्तार करू शकत नाहीत. 2.एकाच व्यक्तीकडून चालविण्यात येत असल्यामुळे व्यापारी व्यवस्थापनासाठी लागणारी निर्णयक्षमता मर्यादित असते. 3.सगळे तोटे एकाच व्यक्तीला सहन करावे लागतात. 4.वैयक्तिक व्यापारी संघटनांचे अस्तित्व मालक असेपर्यंत टिकू शकते. मालकांच्या मृत्यूनंतर अशा संघटना बंद पडू शकतात.
3. भागीदारी व्यवसाय कसा सुरू केला जाऊ शकतो ? थोडक्यात सांगा.
उत्तर : दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी व्यवसाय व्यापार सुरू करू शकतात. वैयक्तिक व्यापारी संघटनांतील दोषामुळे भागीदारी व्यवसाय अस्तित्वात येतात. भागीदारी व्यवसायातील सर्व भागीदारांनी होणारे नफा नुकसान वाटून घेण्यास तयार असावे लागते. बँकासारख्या धंद्यात जास्तीत जास्त दहा भागीदार आणि सामान्यपणे इतर व्यवसायात वीस भागीदार असावे लागतात.
4. भागीदारांचे वेगवेगळे प्रकार कोणते ?
उत्तर : भागीदारांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे : 1.क्रियाशील भागीदार  2.तटस्थ भागीदार  3.नाममात्र भागीदार  4. अल्पवयीन भागीदार
5. भागीदारी व्यवसायाचे फायदे लिहा.
उत्तर : भागीदारी व्यवसायाचे फायदे : 1.सहज प्रारंभ : भागीदारी व्यवसाय सुरू करण्यास सोपे असतात. असा व्यवसाय सुरू करण्यास कोणत्याही कायदेशीर बाबींची गरज नसते. भागीदारी  व्यवसाय संघटनेची नोंदणी करणे देखील बंधनकारक नसते. 2.अधिक भांडवल : या व्यवसायात दोन किंवा अधिक व्यक्ती सहभागी असल्याने भांडवलाची अधिक गुंतवणूक होऊ शकते. 3.उत्तम क्षमता : एकापेक्षा अधिक भागीदार असल्याने कामाचा व्याप विभागला जाऊन अधिक चांगल्या प्रकारे व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याची क्षमता येते. 4.विश्वासार्हता :भागीदारांची क्षमता आणि संख्या अमर्यादित असल्यामुळे विश्वासार्हता  वाढते. 5.तोट्याची वाटणी : व्यवसायात येणारे नुकसान किंवा फायदा सर्व भागीदारांनी सम समान वाटून घ्यावयाचा असतो. त्यामुळे तोटा झाला तरी एकट्यावरच नुकसानीचा भार पडत नाही. 6. व्यवसायातील गुप्तता : व्यवसायात अनेक भागीदार असले तरी ते आपले आर्थिक व्यवहार उघड करीत नाहीत. त्यामुळे व्यवहारातील गुप्तता पाळली जाते. 7. सहज विसर्जन : कोणताही भागीदार 14 दिवसांची नोटीस देऊन किंवा इतर भागीदारांची अनुमती घेऊन आपली भागीदारी रद्द करू शकतो.
6. भागीदारी व्यवसायाचे तोटेे लिहा.
उत्तर : भागीदारी व्यवसायाचे तोटेे : 1.काही वेळा भागीदारांच्यामधील मतभेद किंवा भांडणे व्यवसायावर परिणाम करतात. 2.भागीदारांच्या मर्यादेनुसार गुंतविलेले भांडवल देखील मर्यादित असते. 3. जास्त जबाबदारी असल्यामुळे बरेच लोक भागीदार म्हणून पुढे येण्यास कचरतात. 4.काही भागीदारांचे निष्काळजीपणाचे आणि मूर्खपणाचे निर्णय एकूण व्यवसायाला नुकसानकारक ठरतात. 5.एखाद्या भागीदाराने काढलेले दिवाळे किंवा मृत्यूमुळे भागीदारी व्यवसाय चालू रहात नाही. 6. भागीदारी व्यवसायात भागीदाराचा हिस्सा हस्तांतरीत करणे अवघड जाते. 7.सरकारी नियंत्रण नसल्यामुळे किंवा पारदर्शक हिशोब न ठेवल्यामुळे भागीदारी व्यवसायाला कायदेशीर पाठिंबा मिळू शकत नाही. 8.एक किंवा अधिक भागीदार असल्यामुळे व्यवसायातील गुप्तता पाळली जाऊ शकत नाही.
7. भागीदारी व्यवसायाची नोंदणी करण्याचे फायदे कोणते ?
उत्तर : भागीदारी व्यवसायाची नोंदणी करण्याचे फायदे :1.नोंदणीकृत संस्था तिसèया पक्षाबद्दल न्यायालयात दावा दाखल करू शकतात, पण अनोंदणीकृत संस्थांना हे शक्य नाही. 2.नोंदणीकृत संस्था कर्जाच्या वसुलीसाठी इतर भागीदारांच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतात. 3.नोंदणीकृत नसलेल्या संस्थांच्या विरोधात तिसरा पक्ष कर्जाच्या वसुलीसाठी दावा दाखल करू शकतो. नोंदणीकृत संस्था किंवा त्यातील भागीदारांच्या विरुद्ध यातील एखाद्या भागीदार संस्थेचे विसर्जन करण्यासाठी किंवा हिशोबातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करू शकतात.
8. हिंदू अविभक्त कुटुंबातील व्यवसायाबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : हिंदू अविभक्त (एकत्र) कुटुंबातील व्यवसाय बहुतेक करून फक्त भारतात आढळून येतात. ज्या हिंदू कायद्यानुसार चालविल्या जातात. या संस्थांमध्ये फक्त हिंदू एकत्र कुटुंबातील पुरुष असतात. ज्यामध्ये तीन पिढ्यातील मुलगा, नातू व पणतू त्यांना जन्मानुसार हा हक्क प्राप्त झालेला असतो. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती (सदस्य) व्यवसाय सांभाळते त्याला कर्ता असे म्हणतात. व्यवसायातील सर्व गोष्टी कर्ता सांभाळतो. कर्त्याचा अधिकार मोठा असतो. त्यामानाने इतरांचे हक्क मर्यादित असतात.

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024