Sunday, May 12, 2019

भारतातील नैसर्गिक आपत्ती


1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा

1. ........... ही वातावरणाशी संबंधित एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
2. भारताची पूर्वकिनारपट्टी ........... ग्रस्त आहे.
3. भारतात द्वीपकल्पीय प्रदेशात ........... कमी प्रमाणात संभवतात.
4. ........... हे भारतातील डोंगराळ व पर्वत, प्रदेशातील उतारावर वारंवार संभवतात.
5. ........... मुळे किनारपट्टीची झीज होते.
उत्तरे : 1. चक्रीवादळे 2. वादळ 3. भूकंप  4. दरडी कोसळणे  5.  समुद्राच्या लाटांमुळे

2.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय?
उत्तर : नैसर्गिकरित्या घडून येणारी जीवितहानी व आर्थिक हानीला ‘नैसगिक आपत्ती’ असे  म्हणतात.

2. महापूर म्हणजे काय? महापूर येण्याची नैसर्गिक कारणे कोणती?
उत्तर : काहीवेळा नद्या आपले पात्र सोडून पात्राबाहेर वाहू लागतात व नदीकाठावरील प्रदेश पाण्याखाली जातो. यालाच महापूर असे म्हणतात. अधिक पाऊस, बर्फ वितळणे, वादळे, ढगफुटी, नदी प्रवाहात येणारे अडथळे, नदीत गाळ साचणे इ. नैसर्गिक कारणे आहेत

3. वादळे म्हणजे काय? त्यांचे प्रमुख परिणाम कोणते?
उत्तर : कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे चक्राकार पद्धतीने वाहतात. यालाच चक्रीवादळे म्हणतात.
 परिणाम
उष्णकटिबंधातील वादळे फारच भयंकर व अधिक विंध्वंसक असतात. जीवहानी व संपत्तीची हानी मोठ्या प्रमाणात होते. इमारतींना धोका पोहचतो. वाहतूक व संपर्क माध्यमांना हानी पोहोचते विद्युत पुरवठा खंडीत होतो. पिके, वृक्षवेली व प्राणी यांची फार मोठ्या प्रमाणात हानी होते.

4. दरडी कोसळण्याची कारणे लिहा? त्याची विभागणी कशी झाली आहे ते लिहा. 
उत्तर : दरडी कोसळण्याची कारणे :  मानवनिर्मित व निसर्गनिर्मित ही दोन्ही कारणे आहेत.
नैसर्गिक कारणे : समुद्र किनाèयावर मोठमोठ्या लाटा जोराने आदळतात व किनाèयावरील जमीन झिजते, भरपूर पाऊस, भूकंप इ.
मानवनिर्मित कारणे : अरण्यांचा नाश, रेल्वोर्ग, रस्ते, धरणे, जलसाठा, जलविद्युत निर्मितीच्या योजना, मोठ्या प्रमाणातील खाणकाम व डोंगर पोखरणे. इ.
विभागणी : पर्वतरांगा, डोंगर असलेल्या राज्यात दरडी कोसळणे ही आपत्ती जास्त प्रमाणात उद्भवते. उदा. जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व ईशान्ये कडील राज्ये.

5. भूकंपापासून होणारी हानी टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत?
उत्तर : सावधगिरीचे उपाय :
1. भूकंप प्रदेशात लोकवस्ती कमी करणे 2. भूकंप प्रतिकारक इमारतींची निर्मिती करणे 3. इमारतीच्या बांधकामासाठी उच्च दर्जाच्या बांधकाम साहित्याचा वापर करणे व  जास्त मजली इमारती बांधण्यावर निर्बंध घालणे 4. जास्त खोल असणाèया विहीरी खोदण्यास मनाई करणे 5. भूकंपाची जास्त तीव्रता असलेल्या प्रदेशात शहरीकरणाचा विकास थांबविणे 6. अति मोठे धरण व जलसाठा निर्मितीवर निर्बंध घालणे 7. अरण्यांचा नाश व मोठया प्रमाणातील खाणकाम थांबविणे 7 भूकंपानंतर सर्व लोकांना मूलभूत पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणे हे फार महत्वाचे आहे. उदा अन्न धान्यांचा पुरवठा, बेघरांना आश्रय, साथीच्या रोगांपासून संरक्षण इ.

6. भारतातील किनारपट्टीची झीज होण्याची कारणे व त्याची विभागणी याबद्दल लिहा.
उत्तर : कारणे व विभागणी :  समुद्रात अति प्रचंड लाटा निर्माण होऊन किनारपट्टी प्रदेशावर येऊन आदळतात यामुळे किनारपट्टीची झीज होते. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
अ) नैऋर्त्य मान्सून वारे : या वाèयामुळे पश्चिम किनारपट्टीची झीज होते. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू किनारपट्टीवर ही झीज मोठ्या प्रमाणात दिसून येते.
आ) उष्ण कटिबंधातील आवर्त वारे : ईशान्य मान्सूनच्या वाèयामुळे ही झीज होते. हे वारे जास्त विनाशकारी असतात. यामुळे पूर्वकिनारपट्टीची जास्त झीज होते. तमिळनाडू, आंध्रप्रदेश व ओडिशा राज्यातील किनारपट्टीवर ही झीज मोठ्या प्रमाणात दिसून येते.
इ) त्सुनामी : समुद्राच्या तळाशी उद्भवणाèया मोठ्या प्रमाणातील भूकंपामुळे निर्माण होणाèया प्रचंड लाटांना त्सुनामी असे म्हणतात यामुळे भारतातील किनारपट्टीची झीज होत आहे. पूर्व किनारपट्टी व अंदमान निकोबार बोटांवर याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. कांही मानवी कृत्याुंळे किनारपट्टीची झीज होत आहे. अमर्यादित वाळूचा उपसा व डोंगर पोखरणे इ

7. भूमीच्या अंतर्गत क्रियेमुळे घडणाèया नैसर्गिक आपत्ती कोणत्या ?  
उत्तर : भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, दरडी कोसळणे, हिमवृष्टी इ. भूमीच्या अंतर्गत क्रियेमुळे संभवतात.

8. वातावरणाशी संबंधित नैसर्गिक आपत्ती  कोणत्या ?
उत्तर : वादळे, दुष्काळ, महापूर व साथीचे रोग या वातावरणाशी संबंधित नैसर्गिक आपत्ती आहेत.

9. भारताला कोणत्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते ?
उत्तर : वादळे, महापूर, दरडी कोसळणे, किनारपट्टीची झीज, भूकंप इ.

10. भारतात वादळ होणारी राज्ये कोणती ?
उत्तर : तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यातल्या किनारपट्टीवर  वादळे होत असतात.

11. महापुराचे परिणाम कोणते ?
उत्तर : 1. जीवितहानी 2. संपतीची हानी 3.पिकांची हानी 4. झाडांची हानी  5. वाहतूक व्यवस्था कोलमडणे 6.जमिनीची धूप होते. 7. लोकांना आवश्यक सुविधा पुरविण्यामध्ये अडचणी येतात.

12. दरडी कोसळू नये यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय करता येतात ?
उत्तर : प्रतिबंधक उपाय : 1. उतारांचा प्रदेश कमी करणे 2. महामार्ग व इतर उतार प्रदेशातील दरडी  कोसळणार नाहीत याची काळजी घेणे. 3. उतार प्रदेशात व लोकवस्तीच्या ठिकाणी खाणकाम व डोंगर पोखरणे यावर निर्बंध घालणे 4.अरण्ये वाढविणे इ.

13. भूकंप  म्हणजे काय ?
उत्तर : पृथ्वीच्या भूभागातील आंतरिक कंपनाने अचानकपणे पृथ्वीवरील पृष्ठभागावर झालेल्या हालचालीस ‘भूकंप’ असे म्हणतात

रणजित ल. चौगुले

सहशिक्षक, सरकारी सरदार्स हायस्कूल, बेळगाव. 


या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 







No comments:

Post a Comment