Monday, September 10, 2018

युरोपियनांचे भारतात आगमन

या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




भारत आणि युरोपियन यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते.  भारतातील जिरे, मिरी, लवंग, दालचिनी, वेलदोडे, सुंठ या  मसाल्याच्या पदार्थांना तेथे प्रचंड मागणी होती.  पूर्व रोमन साम्राज्याची (बायंझंटाईन) राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपलयेथून माल युरोपमध्ये जात. 
कॉन्स्टॅन्टिनोपल हे  युरोपियन व्यापाराचे महाद्वारम्हणून ओळखले जात होते.  आशियातील व्यापारावर अरब लोकांची मक्तेदारी होती; तर युरोपियन व्यापारावर इटलीच्या व्यापार्‍यांची मक्तेदारी होती.  १४५३ मध्ये अॅटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल काबीज केले. 


 स्पेन,पोर्तुगाल इ. युरोपियन देशानी भारताकडे जाणारा नवीन सागरी मार्ग शोधण्यास  सुरुवात केली. होकायंत्र, बंदुकीची दारू, अॅस्ट*ोलॅब (ग्रहोन्नतीमापक), अॅटलास, नकाशे या सारख्या शास्त्रीय शोधांुळे खलाशांना मदत झाली.
भारताकडे येणारा नवीन जलमार्ग   पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये शोधला. तो  कालिकतजवळील काप्पडूयेथे येऊन पोहोचला.  भारताबरोबर युरोपचे व्यापारी संबंध पुनर्स्थापित करणारे पोर्तुगीज हे प्रथम व्यापारी ठरले. 
पोर्तुगीजांच्या यशस्वी प्रयत्नांपासून प्रेरणा घेऊन इतर भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेले युरोपियन म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच होत.
पोर्तुगीज ः जलमार्गाद्वारे व्यापारासाठी भारतात सर्वात प्रथम आलेले युरोपियन म्हणजे पोर्तुगीज आणि सगळ्यात शेवटी भारत सोडून जाणारेही पोर्तुगीजच होते. 
पोर्तुगीजांचा पहिला व्हॉईसरॉय फ्रान्सिस्को-द-अलमिडाहा  होय.   त्याने निळ्या पाण्याचे धोरणअंमलात आणले. अल्मेडानंतर आलेला  अल्फान्सो अल्बुकर्कहा भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा खरा शिल्पकार म्हणून प्रसिद्धीस आला. त्याने १५१० मध्ये विजापूरच्या सुलतानाकडून गोवा जिकून घेतले.  
डच ः डच हे हॉलंड किवा नेदरलँड देशाचे रहिवासी होते. १६०२ मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून भारतामध्ये सुरत, भरूच, कँम्बे (खंभात), कोचीन, नागपट्टण, मच्छलीपट्टण, चिन्सुरा वगैरे ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या.
इंग्रज ः इ.स. १६०० मध्ये इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. मोंगल सम्राट जहांगीरने या कंपनीला सुरतमध्ये पहिली वखार (व्यापारीकेंद्र) स्थापन करण्यास परवानगी दिली. सर थॉमस रो जहांगीरच्या वकील म्हणून आला होता.  इंग्रजांनी आग्रा, अहमदाबाद आणि भरूचमध्ये वखारींची स्थापना केली. इंग्रजांनी  मद्रासमध्ये  सेंट जॉर्ज फोर्ट, हुगळी नदीच्या काठावर फोर्ट विल्यमनावाचा किल्ला बांधला.  पुढे इंग्लंडचा राजपुत्र दुसरा
चार्ल्स याने मुंबई बेट १६६८ मध्ये कंपनीला वार्षिक १० पौंड भाडेपट्टीने दिले. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी कलकत्ता ही त्यांची राजधानी बनविली. 
फ्रेंच ः फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी   १६६४ मध्ये सुरु झाली.  त्यांची सर्वात पहिली वखार (व्यापारी केंद्र) सुरतमध्ये सुरु केली. त्यानंतर मच्छलीपट्टण, चंद्रनगर, माहे, करैकल, कासीमबझार, बालासोर येथे त्यांची केंद्रे स्थापन झाली. फ्रेंचांनी राजधानी पुदुच्चेरीकिवा पाँडिचेरीहोय. फे्रंचांचा गव्हर्नर डुप्ले हा महत्त्वाकांक्षी होता.त्यामुळे फ्रेंचांचा इंग्रजांशी संघर्ष निर्माण होऊन  तीन कार्नाटिक युद्धे झाली.    
पहिले कार्नाटिक युद्ध (१७४६ ते १७४८)
 लाबोर्डिन नावाचा फे्रंच सेनापतीने ब्रिटीशांकडून मद्रास काबीज केले. यामुळे हतबल झालेल्या ब्रिटीशांनी कार्नाटिकचा  नबाब अन्वरुद्दिन याच्याकडे मदतीसाठी याचना केली. अन्वरुद्दीनने आपले सैन्य मद्रास परत मिळविण्यासाठी पाठविले. परंतु अन्वरुद्दीनच्या सैन्याला पराभूत व्हावे लागले. अखेरीस  लाबोर्डीनने डुप्लेला न सांगता मद्रास प्रांत ब्रिटीशांना विकून तो मॉरिशसला निघून गेला.  या युद्धाचा शेवट युरोपमध्ये प्रिन्स व इंग्लंड यांच्यातील एक्स - ला - चापेलकराराने झाला.
दुसरे कार्नाटिक युद्ध (१७४९ ते १७५४)
 फ्रेंचांनी असफ झाच्या दुसर्‍या मुलास सलाबतजंगला हैद्राबादचा निजाम म्हणून घोषित केले. व  त्याच्या दरबारात आपले सैन्य ठेवले आणि कॅप्टन बुसीची नेमणूक केली. दुसरीकडे फ्रेंचांच्या पाठिब्याने चंदासाहेब हा कार्नाटिकचा नबाब झाला. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी रॉबर्ट
क्लाईव्ह याने कार्नाटिकची राजधानी अर्काटवर आक्रमण करून फ्रेंचांचा व चंदासाहेबाचा पराभव केला. शेवटी या युद्धात चंदासाहेबाला अटक करून त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या जागेवर ब्रिटीशांनी अन्वरुद्दीनचा मुलगा, महंम्मद अली याची नबाब म्हणून नेमणूक केली शेवटी पाँडिचेरीच्या करारानुसार दुसर्‍या कार्नाटिक युद्धाचा शेवट झाला. 
तिसरे कार्नाटिक युद्ध (१७५६ ते १७६३)
फ्रेंचांचा सेनापती काऊंट-द-लाली याने वाँदिवॉशच्या किल्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. या वाँदिवॉशच्या युद्धात ब्रिटीश सेनाधिकारी सर आयर कूट याने फ्रेंचांचा दारूण पराभव केला व कॅप्टन बुसीला अटक केली. लाली पळून गेला आणि पाँडिचेरी मध्ये लपून बसला शेवटी सर आयरकूटने पाँडिचेरीलाही वेढा घातला. लालीने १७६१ मध्ये बिनशर्त शरणागती पत्करली.
या सर्व कार्नाटिक युद्धांचा परिणाम म्हणून फ्रेंचांचे भारतातील राजकीय वर्चस्व संपुष्टात आले. तरीसुद्धा १७६३ च्या पॅरिसच्या करारानुसार पाँडिचेरी फ्रंेचांच्या ताब्यात परत देण्यात आले. 
प्लासीची लढाई (१७५७) ः
बंगालचा नबाब अलिवर्दीखान याचा १७५६ मध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा नातू सिराजउद्दौला हा सत्तेवर आला. सिराजउद्दौला हा तरूण नबाब होता. सिराजउद्दौला व ब्रिटीश यांच्यामध्ये १७५७ मध्ये इतिहास प्रसिद्ध अशी प्लासीची लढाई झाली.
त्याची कारणे ः १) दस्तकाचा गैरवापर. २) विनापरवाना किल्ल्याची दुरुस्ती.३) कृष्णरंध्रशोकांतिका  
बक्सारची लढाई (१७६४)
 मीरकासीमने मोंगल सम्राट दुसरा शाह आलम व अवधचा (अयोध्या) नबाब शुजाउद्दौला यांच्याशी करार केला. या त्रिकूट सैन्याची व हेक्टरमन्रोच्या नेतृत्वाखाली असलेल्या ब्रिटीश सैन्याची १७६४ मध्ये बक्सारयेथे गाठ पडली. या युद्धात मीरकासीमचा पराभव झाला व तो पळून गेला शाह आलम हा शरण आला.
  हे तुम्हाला माहित असू द्या ः
*१७२४ मध्ये हैद्राबाद संस्थानची स्थापना आसफ झायांनी केली.
*  भारतात ब्रिटीश सत्तेचा पाया घालण्यास रॉबर्ट क्लाईव्ह कारणीभूत  ठरला.  क्लाईव्हने इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांतातील दिवाणी अधिकार मिळवून दिले. 
 *१७२४ मध्ये हैद्राबाद संस्थानची स्थापना आसफ झायांनी केली. १७४२ मध्ये फ्रेंच वसाहतींचा गव्हर्नर म्हणून डुप्लेची नेमणूक करण्यात आली. डुप्ले हा ब्रिटीशांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान होता.
* हैदर अलीने आपल्या सैन्याला फ्रेंचंामार्फत युद्धकौशल्याचे प्रशिक्षण दिले.
* १७१७ मध्ये मोंगल सम्राट फरूख सियार याने दस्तक  देण्यास प्रारंभ केला.
* दस्तक म्हणजे कोणताही कर न आकारता वस्तूंची आयात व निर्यात करणे; तसेच वस्तूंची ने आण करण्यास दिलेले परवानापत्र.
* ‘दिवाणी हक्कम्हणजे जमीन महसूल वसूल करण्याचा हक्क.
* १७६५ मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्थाअंमलात आणली. या पद्धतीनुसार ब्रिटीशांना जमीन महसूल गोळा करण्याचाहक्क प्राप्त झाला. परंतु न्यायदान, दैनंदिन राज्यकारभार आणि प्रशासकीय कामकाज नबाबाकडेच राहिले. 


या संदर्भातील विडिओ यु ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 









1 comment:

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...