Monday, September 10, 2018

साधने

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 




प्रश्न १ - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
१. इतिहासाची बांधणी करण्यासाठी महत्वाचे घटक साहित्यिक व पुरातत्त्व साधने.
२. अश्वघोषाचे बुद्धचरित्र हे साहित्यिक साधन आहे.
३. कानडी भाषेत प्रथम आढळून आलेला शिलालेख म्हणजे हाल्मीडी होय.
प्रश्न २ - थोडक्यात उत्तरे लिहा.
१. साधने म्हणजे काय ?
उत्तर ः इतिहासाची मांडणी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार्‍या घटकांना साधने असे म्हणतात. यामुळे भूतकाळातील घटना सहज समजतात.
२. स्थानिक आणि विदेशी साहित्याची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या.
उत्तर ः स्थानिक साहित्याची उदाहरणे ः विशाखादत्तचे मुद्राराक्षस, कल्हणचे राजतरंगिणी, अश्वघोषाचे बुद्धचरित्र, कौटिल्याचे अर्थशास्त्र, बौद्ध साहित्य त्रिपिटक, अमोघवर्षाचे कविराजमार्ग.
विदेशी साहित्याची उदाहरणे ः मॅगेस्थिनीसचे इंडिका, ह्यू एन त्संगचे सियुकी, फा हियानचे फु को कि, सिलोनचे दीपवंश व महावंश
३. पुरातत्त्व साधने कोणती ? उदाहरणासहित स्पष्ट करा.
उत्तर ः लिपी, नाणी, स्मारके, गाडगी-मडकी व इतर कलाकृती ज्या उत्खनना दरम्यान मिळाल्या आहेत त्यांना पुरातत्त्व साधने म्हणतात. उदा. अशोक स्तंभ, अजंठा वेरूळ येथील गुंफा, एलिफंटा गुंफा, प्राचीन मंदिरे, स्तूप, बस्ती, किल्ले वगैरे

अवांतर प्रश्न
प्रश्न १ - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१. साधने किती व कोणत्या गटात विभागली आहेत ?
उत्तर ः  साधने दोन गटात विभागली आहेत. १. साहित्यिक साधने २. पुरातत्त्व साधने.
२. साहित्यिक साधने म्हणजे काय ?
उत्तर ः  मानवाने जे काही पाहिले, विचार केला आणि अनुभवले ते त्याने लिखित स्वरूपात संग्रहीत करून ठेवले आहे. यालाच लिखित साधने अथवा साहित्यिक साधने म्हणतात.
३. साहित्यिक साधने कोणती ?
उत्तर ः  साहित्यिक साधने दोन प्रकारची असतात. १. भारतीय साहित्य (स्थानिक साहित्य) २. विदेशी साहित्य
४. स्थानिक साहित्य म्हणजे काय ?
उत्तर ः  भारतीयांनी निर्माण केलेल्या साहित्याला स्थानिक साहित्य म्हटले जाते.
५. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख कोणत्या भाषेत लिहिले आहेत.
उत्तर ः सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख ब्राम्ही व प्राकृत भाषेत तर काही आर्मिक व खरोष्ट*ी भाषेत लिहिले आहेत.
६. हाल्मीडी शिलालेख केव्हा लिहिला आहे ?
उत्तर ः कदंब राजा काकुत्सवर्माच्या कारकीर्दीत हाल्मीडी शिलालेख लिहिला गेला आहे.
७. नाणेशास्त्र म्हणजे काय ?
उत्तर ः नाण्यांची उत्क्रांती, स्वरूप आणि विकास यांचा अभ्यास म्हणजे नाणेशास्त्र होय.
८. भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी स्मारके कोणती ?
उत्तर ः भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी स्मारके म्हणजे अशोक स्तंभ, अजंठा, वेरूळ येथील गुहा, एलिफंटा गुहा, कर्नाटकातील बदामी, ऐहोळे व पट्टदकल इ.
९. मौखिक साधने इतिहासाच्या अभ्यासाला कशी पूरक ठरतात ?
उत्तर ः मौखिक साधनांमध्ये पारंपरिक गीते, काव्य, कथा, गोष्टी, आख्यायिका यांचा समावेश होता. ही मौखिक साधने अनुभव व आठवणीच्या रूपातील असतात. ती एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे सुपूर्द केली जातात. लेखनकलेच्या अगोदरपासून ही परंपरा अस्तित्वात आहे. वेदांची जपणूकही काही काळापर्यंत मौखिक पद्धतीनेच केली गेली आहे. ही साधने भारताचा वारसा जाणून घेण्यास सहाय्यक ठरू शकतात. 

प्रश्न २ - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
१. लिपी ही त्या विशिष्ट कालखंडाची वास्तवता प्रकट करते.
२. सम्राट अशोकाचे लेख कर्नाटकात मस्की व ब्रह्मगिरी येथे आढळले आहेत.
३. स्मारके ही राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात.
४. भारतीय इतिहासाची सुरुवात मौखिक परंपरेतून होते.
५. वेदांची जपणूक पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने केली गेली.
७. भारतातील परंपरांना स्थळपुराणे म्हटले जाते.


या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 











No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...