Tuesday, January 31, 2023

जागतिक महायुद्धे आणि भारताची भूमिका


 

9. जागतिक महायुद्धे आणि भारताची भूमिका

 

I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१. --------------  या साली पहिले जागतिक महायुद्ध समाप्त झाले.

२. --------------  या साली व्हर्सेलीसच्या तहावर सह्या झाल्या.

३. फॅसिस्ट हुकूमशहा  --------------  हा होता.

४. --------------  हे जर्मनीतील नाझी पक्षाचे पक्षाचे नेते होते.

५. दुसरे जागतिक महायुद्ध  --------------  या साली सुरू झाले.

६. जपानने अमेरिकेच्या  --------------  या नाविक तळावर हल्ला केला.

७. म्हैसूर लान्सर्सचे  प्रमुख म्हणून यांना  --------------  युद्ध क्षेत्रात पाठविण्यात आले.

8.  वंशभेदाचा प्रसार करण्यासाठी हिटलरने -------------   नावाच्या खास मंत्र्यांची नेमणूक केली होती.  

9. हिटलरच्या खाजगी सैन्याचे नाव ------------ असे होते.

10. हिटलरने ----------- नावाचे स्वत:चे कायदे बनविले.

11. मुसोलिनी ---------- या देशाचा पंतप्रधान होता.

 उत्तरे : 1. 1918  2. 1919  3. बेनेटो मुसोलिनी 4. अॅडोल्फ हिटलर  5. 1939  6. पर्ल हार्बर  7. बी. चामराज अर्स 8. गोबेल्स 9. ब्राऊन शर्टस 10. न्यूरेंबर्ग लॉज 11. इटली


II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. पहिल्या जागतिक महायुद्धाची तात्कालिक कारण विवरण करा.

उत्तर :  पहिल्या महायुद्धाचे प्रमुख कारण म्हणजे २८ जुलै १९१४ रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रान्सीस फर्डिनांड याची विेशासघाताने केलेली हत्या  विेशासघाताने केलेली हत्या हे होय. या घटनेुळे ऑस्ट्रिया आणि सर्बीया या दोन देशांध्ये ताणतणाव निर्माण झाला.

2. पहिल्या महायुद्धाची कारणे कोणती ?

उत्तर :  1. युरोपीय देशांमध्ये उत्कट राष्ट्रभक्ती वाढीस लागली. 2. सामाज्यवादी विस्तार प्रवृत्ती बळावली. 3. • वसाहती नियंत्रित करण्यासाठी स्पर्धा    • युरोपीय देशांमधील सीमा विवाद  देशादेशांत मैत्री करार करण्यात आले. 4. युरोपमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागली. 5. वसाहतवाद वाढीस लागला. 6. ऑस्ट्रियाचा युवराज आर्कड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड  याची हत्या    • युरोपमधील युतींची निर्मिती

 

3. "नाझी विचारधारेमुळे जर्मनीचा नाश झाला' या विधानाचे समर्थन करा.

उत्तर : नाझी विचारसरणीने जर्मनीमध्ये सत्ता हस्तगत केली आणि अनेक गोष्टींना ते कारणीभूत ठरले

  साम्यवादी आणि समाजवाद्यांना दडपून टाकले.  कामगार संघटना व राजकीय पक्षांवर बंदी घातली. •नाझी हा एकमेव राजकीय पक्ष आहे असे त्याने घोषित केले    गोबेल्सची नियुक्ती  होलोकॉस्ट नरसंहार  न्यूरेंबर्ग कायदे लागू करणे  कॉन्सन्ट्रेशन  शिबिरांची स्थापना  संपूर्ण जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा  आर्य वंशाचे लोकप्रियीकरण जर्मन लोकच जगावर राज्य करू शकतात. इतर सर्व जमाती फक्त स्वतःवरराज्य करून घेण्यास लायक आहेत ज्यु लोक जर्मनीच्या सर्व समस्यांना जबाबदार आहेत.  साम्यवादी, कॅथॉलिक आणि समाजवादी लोक जगण्यास असमर्थ आहेत.     दुसऱ्या महायुद्धाचे मुख्य कारण आणि बळी बनणे.


4. दुसऱ्या जागतिक महायुद्धाची कारणे कोणती?

उत्तर : युरोपीय देशांमध्ये अत्यंत राष्ट्रवादाचा विकास.

 जर्मनी आणि इटलीमध्ये हुकूमशहांचा उदय.

अपमानास्पद व्हर्साय करार.  लष्करी युतीची निर्मिती.  युरोपमधील शस्त्रास्त्रांची शर्यत.  संपूर्ण जग जिंकण्याची घातक महत्वाकांक्षा  •1939 मध्ये पोलंडवर जर्मनीचा हल्ला

 

5. म्हैसूर लान्सर्सच्या कमांडंरची (सेनाधिकारी) नावे लिहा.

उत्तर : म्हैसूर लान्सर्सचे काही महत्त्वाचे कमांडंट -  ए. टी. त्यागराजा, लिंगराज अरस, सुब्बराज अरस, बी.पी. कृष्ण अरस, मिर तूराब अली, सरदार बहादुर, रेजिमंटदार  बी. चामराज अरस आणि कर्नल देसीराज अरस.

 

6. तीन मूर्ती चौक कोठे आहे?

उत्तर : नवी दिल्ली येथे आहे.

7. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनने भारतातील संसाधनांचा उपयोग कसा करून घेतला.

उत्तर :  ब्रिटिशांनी भारतीय सैन्य पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये पाठवले होते. भारताची कृषी उत्पादने इंग्लंडला पाठवली.   औद्योगिक वस्तूही इंग्लंडलाही पाठवण्यात आल्या.   युद्धसामुग्रीच्या निर्मितीसाठी शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांचे अपग्रेडेशन करण्याचे नवीन धोरण स्वीकारले. त्यामुळे भारतीय लष्कराला युद्धात गुणात्मक आणि परिमाणात्मक युद्धसाहित्याचा वापर करायला मिळाला. भारतीय सैन्याने लहान युद्ध तंत्र वापरून इटालियनचा पराभव केला.  जर्मन युद्धात भारतीय सैन्यानेही भाग घेतला होता.

8.  दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या पराक्रमाबद्दल माहिती लिहा.

वायव्य सरहद्दीत भारतीय सैन्याने युद्धाचे जे तंत्र शिकले होते. ते पूर्व आफ्रिकेतील इटालियन लोकांशी लढतांना वापरले. 2. सखोल प्रशिक्षण आणि एकत्रित शस्त्रास्त्रांच्या तंत्रामुळे भारतीय सैन्याने आयर्विन रोमेलच्या आफ्रिका मार्गे रोखण्यास यशस्वी झाले. 3.   जर्मन सैन्याच्या पराभवात भारतीय सैन्याचा सहभाग हा देखील एक प्रमुख घटक होता. 4.  1942 साली  जपानी सैन्याकडून भारतीय सैन्याचा पराभव झाला.  5. परंतु 1942-45 च्या  ब्रह्मदेश मोहिमेमुळे   भारतीय लष्कराला सखोल लष्करी प्रशिक्षण मिळाले. त्यामुळे  भारतीय सैन्याला तेथे विजय मिळविता आला.

9. होलोकॉस्ट म्हणजे काय ?

उत्तर : हिटलरने केलेल्या जू लोकांच्या सामूहिक हत्याकांडाला होलोकॉस्ट ' म्हणतात.

10. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी शत्रूराष्ट्र (ॲक्सीस) गटात कोणती राष्ट्रे होती ?

उत्तर : दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान शत्रूराष्ट्र (ॲक्सीस) गटात जर्मनी, जपान व इटली ही राष्ट्रे होती.   

11. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी मित्रराष्ट्र (अलाइज) गटात कोणती राष्ट्रे होती ?

उत्तर : दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान मित्रराष्ट्र (अलाइज) गटात ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि इतर काही देश होते.

12. रशियाने जर्मनीबरोबर कोणता करार केला होता ?

उत्तर : २४ ऑगस्ट १९३९ मध्ये रशियाने जर्मनीबरोबर "युद्धबंदीचा अनाक्रमण करार' (नो वॉर पॅक्ट करार).

13. सलोखा करार केलेले देश कोणते ?

उत्तर : ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या तीन देशांनी सलोखा करार केला.

14. मैत्रीचा करार केलेले देश कोणते ?

उत्तर : जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि इटली या तीन देशांनी आपापसात मैत्रीचा करार केला.

15. रशियामध्ये समाजवादी क्रांती केव्हा झाली ?

उत्तर : नोव्हेंबर १९१७ साली रशियामध्ये समाजवादी क्रांती झाली.

16. पहिल्या महायुद्धाचे परिणाम सांगा.

उत्तर : 1.  मित्रराष्ट्रांना व्हर्सेलिसच्या तहावर सह्या कराव्या लागल्या.  2. ऑस्ट्रो-हंगेरी आणि ऑटोमन साम्राज्याने त्यांचे अस्तित्व गमावले.  3.  जर्मनीने पराभव स्वीकारला 4. जर्मनीने आपला बराचसा भाग गमावला. 5. युरोपच्या नकाशात आमूलाग्र बदल झाला. 6. अनेक छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्रे उदयाला आली. 7.  ‘राष्ट्रसंघाची’  (लीग ऑफ नेशन्स) स्थापना 8.  शरम आणि मानखंडनेच्या भावनेमुळे पराभूत राष्ट्रांमध्ये आक्रमक देशभक्ती निर्माण झाली. 9. युद्धामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई आणि  जर्मनीवर लादलेल्या अनेक निर्णयांमुळे जनतेवर विपरित परिणाम झाले. 10. बेरोजगारी, गरिबी आणि आर्थिक मंदीमुळे सर्वत्र असंतोषाचे वातावरण पसरले.   11. स्वत:च्या फायद्यासाठी जर्मन उद्योजकांकडून शोषण केले जावू लागले.  12. अपरिमित जिवीत हानी, रक्तपात, नागरी मालमत्तेचे प्रचंड  नुकसान झाले. 13. हिटलर आणि मुसोलिनीसारख्या हुकूमशहांचा उदय झाला.


17. फॅसिझमची (आक्रमक राष्ट्रवाद) प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर : 1. प्रखर राष्ट्रवादी वृत्ती 2. शत्रूंचा नायनाट 3.  हिंसेचा गौरव  4. वंशश्रेष्ठता 5.  साम्राज्यवादी विस्तार, 6. हत्याकांडाना पाठिंबा ही फॅसिझमची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

18. मुसोलिनीने स्थापन केलेला पक्ष कोणता ?

उत्तर : मुसोलिनी हा राष्ट्रीय फॅसिस्ट पक्षाचा संस्थापक होता.

19. दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी कोणता ?

उत्तर :  १९३९-१९४५.

20. १९४२ च्या कोणत्या  युद्धामध्ये रशियाने जर्मनीच्या तुकड्यांचा पराभव केला ?

उत्तर :  स्टॅलीनग्राड युद्धामध्ये रशियाने जर्मनीचापराभव केला

21.  दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम सांगा

उत्तर :  लाखो लोकांचे प्राण गेले  मालमत्तेचे नुकसान  संपूर्ण जगामध्ये अनेक सामाजिक व राजकीय बदल घडून आले. संयुक्त राष्ट्रसंघानची  (युनो) ची स्थापना झाली अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रान्स हे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे कायमचे सदस्य बनले.  रशिया आणि अमेरिका हे देश आक्रमक प्रतिस्पर्धी बनले. शीतयुद्ध सुरू झाले.   आशियाई आणि आफ्रिकन देशांना स्वातंत्र्य प्राप्त झाले. अमेरिकेने  अण्वस्त्रांचा वापर सुरू केला. सर्व बलाढ्य राष्ट्रे अण्वस्त्र संग्रहासाठी स्पर्धा करू लागली.  

 

22. पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला कसा पाठिंबा दिला?

 अनेक संस्थानिकांनी  लष्करी, आर्थिक आणि अन्य उत्पादनाचा पुरवठा करून मदत केली. भारतीय राष्ट्रीय  काँग्रेसनेही इंग्लंडला पाठिंबा दिला.  भारताकडून या युद्धात 15 लाख सैनिकांनी भाग घेतला होता.  म्हैसूर लान्सर्स, जोधपूर लान्सर्स आणि हैदराबाद लान्सर्स सहभागी झाले. भरपूर कपड्यांचा  कच्चा माल आणि लाकूड  पुरवले गेले.  मॅंगनीज, अभ्रक,  चहा आणि रबर देखील इंग्लंडला निर्यात केले गेले.

 

 


No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024