Tuesday, January 31, 2023

स्वातंत्र्योत्तर भारत

 

 

8. स्वातंत्र्योत्तर भारत

 

१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

१. -------------- हे भारतातील शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते.

२.  --------------  हे भारताचे पहिले गृहमंत्री होते.

३. --------------  हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते.

४. --------------  साली पॉंडिचेरी केंद्रशासित बनला.

५. राज्य पुनर्रचना कायदा --------------  या साली अस्तित्वात आला.

 

उत्तरे : 1. लॉर्ड माऊंटबॅटन 2. सरदार वल्लभभाई पटेल 3. डॉ. बाबु राजेंद्रप्रसाद 4.इ. स. 1963 5. इ. स. 1956

 

II.  एका वाक्यात उत्तरे लिहा.

5. राज्य पुनर्रचना कायदा केव्हा लागू करण्यात आला?

उत्तर : इ. स. 1956

6. सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘भारताचे लोहपुरुष’ का म्हटले जाते?  

उत्तर :  त्यांनी  संस्थानांचे विलिनीकरणाचे कठीण काम यशस्वी करून दाखविले.

7. भारतातील भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते?

उत्तर :   आंध्र प्रदेश

8. आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी आमरण उपोषण सत्याग्रह कोणी सुरू केला?

उत्तर : पोटी श्रीरामुलू

9. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर :  न्यायमूर्ती फाजल अली

10. म्हैसूर राज्याची स्थापना केव्हा झाली?

उत्तर :  १ नोव्हेंबर १९५६

 

11. म्हैसूर राज्याचे 'कर्नाटक' असे नामकरण केव्हा करण्यात आले?

उत्तर :  १ नोव्हेंबर १९७३

 

12. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

 उत्तर :  जवाहरलाल नेहरू

 

२. खालील प्रश्नांची उत्तरे समूह चर्चा करून लिहा.

१. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतापुढे कोण कोणत्या समस्या होत्या ?

उत्तर : • निर्वासितांची समस्या • जातीय दंगली • सरकारची निर्मिती • संस्थानांचे विलिनीकरण •अन्न उत्पादन • शेतीचा विकास  •उद्योगधंद्याचा विकास   

 

२. निर्वासितांच्या समस्या कशा पद्धतीने सोडविल्या ?

उत्तर : देशाने पश्चिम बंगाल, ओरिसा, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये निर्वासित छावण्या सुरू करून  आणि निर्वासितांना अन्न. वस्त्र, निवारा, रोजगार, जमीन, शिक्षण आणि आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता पुरवली.

 

३. पॉंडिचेरी फ्रेंचांच्या ताब्यातून कसे मुक्त झाले?

उत्तर :  • काँग्रेसने आंदोलन सुरू केले • कम्युनिस्ट आणि इतर संघटनांनी पाँडिचेरीच्या मुक्तीसाठी आग्रह केला. • शेवटी, फ्रेंच सरकारने पाँडिचेरी सोडले

 

४. गोवा पोर्तुगीजांच्या पासून कसा मुक्त झाला.

उत्तर :  • गोव्याच्या विलिनीकरणासाठी जोरदार चळवळ सुरू झाली.  • 1955 मध्ये भारतातील विविध प्रांतातील लोक एकत्र आले आणि त्या सत्याग्रहींनी गोवा मुक्ती चळवळ सुरू केली. • पोर्तुगीजांनी आफ्रिका व युरोप येथून ज्यादा सैन्याच्या तुकडया मागवून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. • 1961 मध्ये भारतीय सैन्याने गोव्यात घुसून आपल्या ताब्यात घेतले

 

५. भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेचे वर्णन करा.

उत्तर : • राज्यकारभार सुरळीतपणे चालण्यासाठी भाषावर प्रांतरचनेची मागणी करण्यात आली. •ब्रिटिशांच्या काळात संस्थानाद्वारे राज्यकारभार चालविण्यासाठी वापरली जाणारी भाषा ही सामान्य माणसाची भाषा नव्हती. अशा परिस्थितीत भाषावार प्रांत रचना करणे हे गरजेचे होते. •आंध्र महासभेतर्फे पोट्टी श्रीरामलू यांनी ५८ दिवस उपोषण करून १९५२ मध्ये प्राण त्याग केला. • 1953 मध्ये सरकारने न्यायमूर्ती फाजल अली आयोगाची स्थापना केली. • 1953 मध्ये समितीने आंध्र प्रदेशच्या निर्मितीची शिफारस केली. • अंतिम अहवाल 1956 मध्ये अंमलात आला. • 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.

 

6. जुनागढ संस्थान भारतीय संघराज्यात कसे सामील झाले?

उत्तर : • जुनागढचा नवाब पाकिस्तानात सामील होण्यास इच्छुक होता • लोकांनी नवाबाच्या निर्णयाविरुद्ध बंड केले. • नवाब पाकिस्तानात पळून गेला  • भारतीय सैन्य जुनागढ मध्ये घुसले. आणि शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. • भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी जनतेने इच्छा व्यक्त केली.  

 

7. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात कसे सामील झाले?

उत्तर : • स्वतंत्र राहण्याच्या उद्देशाने निजामाने भारतीय संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. • साम्यवादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणातील शेतकऱ्यांनी निजामाविरुद्ध बंड केले. • लोकांनी रझाकारच्या निजामाच्या क्रूर सैन्याला विरोध केला. • निजामाने युद्धाची तयारी केली. • भारतीय सैन्याने निजामाचा युद्धात पराभव केला.  • १९४८ मध्ये हैदराबाद भारतीय संघराज्यात सामील झाले.

 

 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024