प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. कावेरी नदीचा उगम
कोडगु जिल्ह्यातील .................... येथे होतो.
2. प्रसिद्ध जोग
जलप्रपात हा .................... नदीवर आहे.
3. कृष्णराजसागर धरण
.................... या नदीवर आहे.
4. कर्नाटकातील
जलविद्युत निर्मिती शक्ती प्रकल्प .................... होय
5. आलमट्टी धरण
.................... या नदीवर बांधले आहे.
उत्तरे : 1. तलकावेरी 2. शरावती 3. कावेरी 4. शिवसमुद्र 5. कृष्णा
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. कर्नाटकातील
प्रमुख नद्यांची नावे लिहा.
उत्तर : कर्नाटकातील नद्यांचे त्यांच्या प्रवाहावरून
दोन विभाग केले आहेत. 1. पूर्ववाहिनी नद्या -पेन्नार, पालार, कृष्णा, कावेरी, 2. पश्चिम वाहिनी
नद्या - शरावती, काळी, गंगावळी (बेडती), नेत्रावती, वराही, अघनाशिनी इ.
2. कृष्णा नदीची
थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : कृष्णा ही दक्षिण भारतातील महत्त्वाची नदी
आहे. ती पूर्ववाहिनी नदी आहे. तिचा उगम महाबळेश्वर येथे झाला असून ती 1392 कि.मी.
पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कर्नाटकात कृष्णा नदीचा प्रवाह 480 कि.मी. आहे.
भीमा, कोयना, तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा या तिच्या उपनद्या आहेत. उत्तर कर्नाटकात पाणीपुरवठा आणि जलविद्युत
शक्ती निर्मितीला कृष्णा नदीचा फार मोठा फायदा झाला आहे.
3. कावेरी नदीच्या
उपनद्यांची यादी बनवा.
उत्तर : कावेरी नदीच्या उपनद्या - हेमावती, हारंगी, लोकपावनी, अर्कावती, शिमशा, लक्ष्मणतीर्थ, कपिला, कबिनी, सुवर्णवती आणि
भवानी.
4. कर्नाटकातील
पाणीपुरवठ्यांच्या पद्धतीची नावे लिहा.
उत्तर : कर्नाटकात विहिरी, कालवे, तळी यामधून
पाणीपुरवठा केला जातो.
5. आपल्या राज्यातील
प्रमुख जलविद्युत केंद्रांची नावे लिहा.
उत्तर : कर्नाटकातील प्रमुख जलविद्युत केंद्रे -
शिवनसमुद्र, शिमशा (कावेरी नदी), शरावती, लिंगनमक्की, गिरसप्पा आणि महात्मा गांधी जलविद्युत प्रकल्प
(शरावती नदी), सुपा, नागझरी, कद्रा, कोडसक्की (काळी नदी), वराही, मारीकण्णीवे (वराही नदी), भद्रा, तुंगभद्रा, घटप्रभा, आलमट्टी (कृष्णा
नदी)
6. राज्याराज्यामध्ये
ऐक्य निर्मितीसाठी नद्यांचा सहभाग कसा असेल.
उत्तर : भारतात एकच नदी अनेक राज्यातून प्रवास करते
उदा. कावेरी नदी कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि पाँडीचेरी राज्यातून वाहते. कृष्णा नदी
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून वाहते. त्यावेळी उभय राज्यामध्ये समंजसपणा व सलोखा निर्माण
होतो. पाणी हे मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. त्यामुळे अनेक राज्ये ही एकाच
नदीच्या पाण्यासाठी अवलंबून असतात. भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी
ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरावरून दोन राज्यात तंटे, वाद निर्माण होत
असतील तर ते टाळून सर्वांनी सामंजस्याने पाणी वापरले पाहिजे.
प्रश्न 3 - जोड्या जुळवा
अ ब
1. लिंगनमक्की धरण अ)
जलविद्युत प्रकल्प
2. गगनचुक्की, भाराचुक्की ब) नदी
3. वाणीविलास सागर क)
काळी नदी
4. नागझरी ड)
कावेरी नदी
5. सुपा जलाशय इ) शरावती
फ) मणिकणिवे
उत्तर : 1. इ) शरावती 2. ड) कावेरी नदी 3. फ) मणिकणिवे 4. अ) जलविद्युत प्रकल्प 5. काळी नदी
No comments:
Post a Comment