प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. विविध उद्देशाने
केलेल्या शेतीला ................. असे म्हणतात.
2. सर्वात जास्त
सुपीक जमीन ................. मध्ये आहे.
3. कर्नाटकाची
................. आणि ................. ही मुख्य खाद्य पिके आहेत.
4. कर्नाटकामध्ये ऊस
पिकविणारा जिल्हा ................. हा आहे.
5. तंबाखूमध्ये
................. नावाचा मादक पदार्थ असतो.
उत्तरे : 1. मिश्र शेती 2. गुलबर्गा 3. भात आणि ज्वारी 4. बेळगाव 5. निकोटीन
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. कर्नाटकातील विविध वापराखालील जमीन सांगा.
उत्तर : कर्नाटकातील
विविध वापराखालील जमीन पुढीलप्रमाणे आहे - 1. मशागतीची एकूण जमीन 2. अरण्य प्रदेश 3. शेतीला अप्राप्य असलेली भूमी 4. बिगरशेतीची जमीन 5. पडीक जमीन.
2. कर्नाटकातील
शेतीचे महत्त्व यावर माहिती लिहा.
उत्तर : कर्नाटकातील 61.4% जनता ही खेड्यात राहते. ती आपल्या उपजीविकेसाठी
शेतीवर अवलंबून आहे. शेती हा आपल्या राज्याचा अत्यंत प्राचीन आणि प्रमुख व्यवसाय
आहे. अनेकांच्या उपजीविकेचे ते प्रमुख
साधन आहे. आपल्या राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा हा कणा आहे. शेतीमुळे लोकांना
उद्योगधंदा मिळतो. शिवाय लोकांना अन्न आणि कारखान्यांना कच्चा माल मिळतो. राज्याला
महसूल आणि विदेशी चलन मिळण्याचे हे एक साधन आहे. कॉफी, रेशीम, मसाले, तंबाखू, कापूस इ. शेतीतून
उत्पादित झालेल्या मालाची निर्यात केली जाते. तृतीतय क्षेत्रात विभाणारे दळणवळण, बँकिंग, विमा इ. सारख्या
उद्योगांना यामुळे चालना मिळते. शेती ही राज्याच्या राजकीय आणि सामाजिक
व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
3. कालवे म्हणजे काय
? कालव्यावर काढलेली पिके कोणती ?
उत्तर : नदी, तळी, विहिरी यांतून पाणीपुरवठा करण्यासाठी जो पाट काढला
जातो त्याला कालवा असे म्हणतात. या पाण्यावर काढली जाणारी प्रमुख पिके म्हणजे भात
आणि ऊस होय.
4. मिश्र शेती
म्हणजे काय ?
उत्तर : शेती करण्याबरोबरच त्याला पूरक व्यवसाय
म्हणून दुग्धोत्पादन, रेशमी किडे पाळणे, मेंढ्या पाळणे, कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन, मत्स्यशेती इ. व्यवसाय केले जातात त्याला मिश्र शेती
असे म्हणतात.
5. नाचणीचे उपयोग
सांगा ?
उत्तर : नाचण्याच्या पिठाचे गोळे, आंबिल अथवा लापशी, अंकुरित नाचणीचे
पीठ, सत्त्व आंबोळ्या इ. पदार्थांनी याचा उपयोग आहारात केला जातो. भात आणि
ज्वारीच्या खालोखाल हे तिसरे महत्त्वाचे खाद्यअन्न आहे. या धान्याचा उर्वरित भाग
जनावरांच्या चाèयासाठी उपयोगात आणला जातो. नाचणीचा
साठा फार काळपर्यंत सुरक्षित ठेवला जाऊ शकतो.
प्रश्न 3 - जोड्या जुळवा
अ ब
1. कॉफी अ)
व्यापारी पिके
2. कापूस ब)
मिश्र शेती
3. ऊस क)
तंबाखू
4. निपाणी ड)
तंतुयुक्त पिक
5. मेंढ्या पालन इ)
मळ्यातील पिके
फ) उत्तेजक पेय
उत्तरे : - 1. इ) मळ्यातील पिके 2. ड) तंतुयुक्त पिक 3. अ) व्यापारी पिके 4. क) तंबाखू 5. ब) मिश्र शेती
No comments:
Post a Comment