Thursday, May 23, 2019

खनिज संपत्ती



प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. कुद्रेमुख येथे ................ हे खनिज आढळते.

2. उत्तम दर्जाचे कच्चे लोखंड ............... येथे आढळते.

3. बळ्ळारी जिल्ह्यातील सोंडूर येथे ............... खाणी आढळतात.

4. ............... हा धातू बॉक्साईटपासून तयार होतो.

5. ............... ही सर्वात खोल सोन्याची खाण आहे.

उत्तरे : 1. कच्चे लोखंड 2. बळ्ळारी (होस्पेट-सोंडूर) 3. मँगनीज 4. अ‍ॅल्युमिनीयम 5. चँपियन रीफ


प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1. कर्नाटकाला सुवर्णभूमी असे का म्हटले जाते.
उत्तर : भारतात सुवर्ण उत्पादनात कर्नाटकाचा पहिला क्रमांक आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन कर्नाटकात घेतले जाते म्हणून कर्नाटकाला सुवर्णभूमी म्हटले जाते.

2. कर्नाटकामध्ये मिळणारी प्रमुख खनिजे कोणती?
उत्तर : कर्नाटकात अनेक खनिजे मिळतात त्यामध्ये कच्चे लोखंड, सोने, मँगनीज, चुनखडी, तांबे, बॉक्साईट, क्रोमाईट, अभ्रक, अ‍ॅस्बेस्टॉस आणि ग्रॅनाईट ही खनिजे महत्त्वाजी आहेत.

3. कोणते खनिज मिश्रधातू म्हणून वापरले जाते?
उत्तर : मँगनीज हे खनिज मिश्रधातू म्हणून वापरले जाते.

4. कर्नाटकाच्या कोणत्या भागात कच्चे लोखंड आढळते?
उत्तर : कर्नाटकात कच्चे लोखंड मुख्यत: बळ्ळारी, चिक्कमंगळूर, बागलकोट, चित्रदुर्ग, तूमकूर, शिमोगा, दक्षिण कॅनरा, उत्तर कॅनरा आणि गदग जिल्ह्यात आढळते.

5. बॉक्साईट उत्पादन करणारे प्रमुख जिल्हे कोणते ?
उत्तर : कर्नाटकातील बेळगाव, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दक्षिण कॅनरा आणि उडपी या जिल्ह्यात बॉक्साईटच्या खाणी आढळून येतात.

6. कर्नाटकातील प्रमुख सोन्याच्या खाणी कोणत्या ?
उत्तर : कर्नाटकात1885 मध्ये कोलार गोल्ड फिल्डची स्थापना झाली. इथे चार प्रमुख खाणी आहेत त्या म्हणजे नंदीदूर्ग, उरीगाव, चँपियन रीफ आणि म्हैसूर माईन्स होय.  सध्या रायचूर जिल्ह्यातील हट्टी येथे देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. तूमकूर जिल्ह्यातील बेल्लारा आणि शिराजवळील अजनहक्की येथेही सोन्याचे उत्पादन केले जाते. मुळगुंद, गदग जिल्ह्यातील कप्पटगुड्डा आणि हासन जिल्ह्यातील केंपिनकोटे ही सोन्याच्या साठ्याची इतर ठिकाणे आहेत. 

प्रश्न 3 - जोड्या जुळवा

                                                        
            1.          सुपा                  अ) मँगनीज
            2.         हट्टी                  ब) बॉक्साईट
            3.         कुमसी              क) चुनखडी
            4.         खानापूर            ड) कच्चे लोखंड
                                               इ) सोन्याची खाण

उत्तरे : -  1. अ) मँगनीज  2. इ) सोन्याची खाण   3. ड) कच्चे लोखंड   4. ब) बॉक्साईट
---------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024