प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. खेड्यांना आणि
नगरांना .................... जोडतात.
2. कर्नाटकामधून
जाणाèया राष्ट्रीय महामार्गाची संख्या .................... इतकी आहे.
3. बेंगलोर
शहरांतर्गातील रेल्वे वाहतुकीला .................... म्हटले जाते.
4. .................... बंदराला कर्नाटकाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.
5. कर्नाटकातील
किनारपट्टीवरील रेल्वेमार्गाला .................... असे म्हणतात.
उत्तरे : 1. रस्ते 2. 14 3. नम्म मेट्रो 4. मंगळूर 5. कोकण रेल्वे
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. रस्ते वाहतुकीचे
महत्त्व सांगा.
उत्तर : कर्नाटकात बहुतांश जनता ग्रामीण भागात राहते.
त्यामुळे खेड्यातून नगरांना जोडणाèया रस्त्याचे महत्त्व खूप आहे. रस्ते सहज आणि कमी
खर्चात तयार होऊ शकतात. राज्याच्या प्रत्येक कानाकोपèयात मालांची व
माणसांची ने आण कमी श्रमात, सुलभतेने होऊ शकते. राज्यातील कृषीव्यवसाय, उद्योग, खनिज उद्योग, व्यापार आणि
वाणिज्य यांचा विकास निश्चितपणे रस्त्यांच्या विकासावरच अवलंबून आहे.
2. कर्नाटकातील
विविध प्रकारच्या रस्त्यांची नावे लिहा.
उत्तर : भारतातील इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकातील
रस्त्यांचीही विभागणी चार प्रकारात केली आहे. ते म्हणजे 1. राष्ट्रीय
हमरस्ते 2. राज्य हमरस्ते 3. जिल्हा मार्ग 4. ग्रामीण रस्ते.
3. कर्नाटकातील
महत्त्वाच्या रेल्वेमार्गाची यादी करा.
उत्तर : कर्नाटकात रेल्वेमार्गाची विभागणी असमान आहे.
बेंगळूर, बळ्ळारी, बेळगाव, हासन, उ.कॅनरा, चित्रदुर्ग, उडपी, रामनगर आणि द. कॅनरा जिल्ह्यात सरासरी 150 ते 200 कि.मी. रेल्वेमार्ग आहेत.
4. हवाई वाहतुकीचे
फायदे कोणते ?
उत्तर : हवाई वाहतूक हे अत्यंत जलद वाहतुकीचे साधन
आहे. या माध्यमामुळे लोक पोस्ट आणि हलक्या वस्तू दूरवर कमी वेळेत नेणे शक्य होते.
नैसर्गिक आपत्ती, युद्धे किंवा आपत्कालीन स्थितीत मदत पुरविण्यास हवाई
वाहतूक मदतीची ठरते.
5. कर्नाटकातील
बंदरांची नावे लिहा.
उत्तर : कर्नाटकात 23 लहान मोठी बंदरे आहेत. न्यू मंगळूर हे महत्त्वाचे
बंदर असून विकसित झालेली इतर 10 बंदरे आहेत ती म्हणजे जुने मंगळूर बंदर, माल्पे, हंगरकट्टे, कुंदापूर, पूडबिद्री, भटकळ, होन्नावर, काद्री, बेळकेरी आणि
कारवार होय.
प्रश्न 3 - जोड्या जुळवा
अ ब
1. सोनेरी चतुर्भुज योजना अ) बंदर
2. ब्रॉडगेज ब)
बेंगलोर
3. एच.ए.एल. क) एन.एच.4
4. बेळकेरी ड)
विमानतळ
5. आमची मेट्रो इ) रेल्वे
मार्ग
फ) जल मार्ग
उत्तरे : 1. क) एन.एच.4 2. इ) रेल्वे मार्ग 3. ड) विमानतळ 4. अ) बंदर 5. ब) बेंगलोर
No comments:
Post a Comment