प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. उन्हाळा
..................... या महिन्यात असतो.
2. अत्यंत जास्त
पाऊस पडणारा ..................... हा ऋतु आहे.
3. .................... प्रकारची माती उत्तर कॅनरामध्ये आढळते.
4. .................... या भागात सदाहरित अरण्ये आहेत.
5. .................... जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत.
उत्तरे : 1. मार्च ते मे 2. पावसाळा 3. बाजूकडील/लॅटराईट 4. पश्चिम घाट 5. उत्तर कॅनरा.
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1. कर्नाटकातील
हवामानाचे चार मोसम लिहा.
उत्तर : कर्नाटकातील हवामानाचे चार मोसम 1. उन्हाळा (मार्च
ते मे) 2. पावसाळा (जून ते सप्टेंबर) 3. मान्सूनचा परतीचा मोसम (आक्टोबर ते नोव्हेंबर) 4. हिवाळा (डिसेंबर
ते फेब्रुवारी)
2. कर्नाटकातील
पावसाळी मोसमांची माहिती लिहा.
उत्तर : या मोसमाला नैऋत्य मान्सून वारे असेही
म्हणतात. अरबी समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे पश्चिमघाट अडवितात परिणामी
मुसळधार पडतो. जसजसे आपण पूर्वेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे
पूर्वेकडचे मैदान पर्जन्यछायेच्या प्रदेशात परावर्तीत होते. आगुंबे येथे सर्वात
जास्त पाऊस पडतो म्हणून या ठिकाणाला दक्षिणेची चेरापुंजी असे म्हणतात. चित्रदुर्ग
जिल्ह्यातील चेलाकेरीजवळ नायकनहट्टी हे सर्वात कमी पावसाची नोंद असलेले ठिकाण आहे.
या ऋतुमध्ये संपूर्ण राज्यात जास्त उष्णतामानाबरोबरच हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण
जास्त असते. सर्वत्र ढगाळ वातावरण असते. कर्नाटकात 80 टक्के पाऊस पडतो. रब्बी पिकांना याची मदत होते.
3. कर्नाटकात
कोणकोणत्या प्रकारची माती आढळते ?
उत्तर : कर्नाटकात विविध प्रकारची माती आढळते. त्याचे
चार प्रकार आहेत. 1. लाल माती 2. काळी माती 3. लॅटराईट माती (बाजूकडील माती) 4. गाळाची माती.
4. कर्नाटकातील
नैसर्गिक अरण्यांची नावे लिहा.
उत्तर : पावसाची विभागणी, भूपृष्ठाचे
स्वरूप आणि मातीच्या प्रकारावरून कर्नाटकातील वनस्पतीचे वेगवेगळे विभाग करण्यात
आले आहेत. 1. सदाहरित अरण्ये 2. पानझडीची अरण्ये 3. संमिश्र अरण्ये 4. उष्ण कटिबंधातील कुरणे.
5. कर्नाटकाला
चंदनभूमी असे का म्हटले जाते ?
उत्तर : कर्नाटकात चंदनाचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर
आहेत. त्यापासून सुगंधी अत्तरे, नाजूक नक्षी कामाच्या वस्तू, साबण आणि औषध
निर्मिती केली जाते. त्यामुळे याची निर्यात देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात केली
जाते. यामुळेच कर्नाटकाला चंदनाची भूमी असे म्हटले जाते.
6. येथील जंगलात
आढळणाऱ्या जंगली प्राण्यांची नावे लिहा.
उत्तर : कर्नाटकातील जंगलात वाघ, सिंह, जंगली म्हैस, हत्ती, चित्ता, अस्वल, गवा, सांबर हरीण, डुक्कर, साळींद्र शिवाय
साप आणि रंगीबेरंगी पक्षी आढळून येतात.
प्रश्न 3 - जोड्या जुळवा
अ ब
1. आदि चुंचनगिरी अ) पक्षीधाम
2. मुंदगट्टे ब) राष्ट्रीय उद्यान
3. नागरहोळे क)
पानझडी अरण्ये
4. चंदन ड) मयूरधाम
इ) तांबडी माती
उत्तरे : 1. ड) मयूरधाम 2. अ) पक्षीधाम 3. ब) राष्ट्रीय
उद्यान 4. क) पानझडी अरण्ये
No comments:
Post a Comment