Thursday, May 23, 2019

भौगालिक विभाग



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. ...................... हे बेट माल्पेजवळ आहे.

2. ...................... यांना सह्याद्री म्हटले जाते.

3. आगुंबे घाट ...................... व ...................... यांना जोडतो.

4. ...................... जिल्हा कर्नाटकाचे काश्मीर म्हणून ओळखला जातो.

उत्तरे : 1. सेंट मेरीज द्वीप 2. पश्चिम घाट 3. शिमोगा व उडपी 4. कोडगु

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


1. कर्नाटकाचे प्रमुख स्वाभाविक विभाग लिहा.
उत्तर : येथील भूस्वरूप आणि स्वाभाविक विभागानुसार कर्नाटकाचे तीन स्वाभाविक विभाग पडतात. 1. किनारपट्टीचा प्रदेश 2. मलनाडू प्रदेश 3. पठारी प्रदेश.

2. मलनाडूची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : आपल्या राज्यातील पश्चिम घाटाचा उल्लेख मलनाडू अथवा पर्वतमय प्रदेश असा केला जातो. याला सह्याद्री पर्वत देखील म्हटले जाते. 2. मलनाड हा प्रदेश किनारपट्टीला समांतर उत्तर ते दक्षिणेपर्यंत विस्तारला आहे. 3. या पर्वतरांगामध्ये पश्चिमेकडे खडे उतार तर पूर्वेकडे उंच टेकड्या असल्यामुळे या प्रदेशाला घाट म्हटले जाते. त्याची लांबी 650 कि.मी. तर रुंदी 50 ते 76 कि.मी. आहे. 4. याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणता 900 ते 1500 मी. आहे. 5. या डोंगररांगा अरबी समुद्रावरून वाहणारèया पावसाच्या ढगांना अडवतात त्यामुळे याठिकाणी 200 सें.मी. पाऊस पडतो. 6. येथे अनेक उंच पर्वत आढळतात. त्यातील सर्वात उंच पर्वत म्हणजे मलयगिरी.

3. कर्नाटकच्या किनारपट्टी मैदानाची माहिती लिहा.
उत्तर : भाषावार प्रांतरचनेमुळे कर्नाटक किनारपट्टी आणि किनाèयालगतची मैदाने लाभलेली आहे. हा स्वाभाविक विभाग अरबी समुद्र आणि मलनाडच्या डोंगर रांगात विस्तारलेला आहे. ही किनारपट्टी दक्षिणेकडील मंगलोरपासून उत्तरेकडे कारवारपर्यंत 320 कि.मी. विस्तारलेली आहे. तिची रुंदी 12 ते 64 कि.मी. आहे. हा प्रदेश दक्षिणेकडे रुंद तर उत्तरेकडे अनेक उतारामुळे चिंचोळा झाला आहे. याची समुद्रसपाटीपासूनची  उंची 200 मी पेक्षा अधिक आहे. या प्रदेशाला कॅनरा किंवा कर्नाटकची किनारपट्टी म्हटले जाते. या किनारपट्टीवर अनेक नद्या वेगाने वाहत समुद्राला मिळतात. यामुळे याठिकाणी अनेक खाजण किंवा उथळतळी तयार झाली आहेत. या किनारपट्टीवर अनेक बंदरे आहेत. न्यू मंगळूर हे कर्नाटकातील सर्वात मोठे बंदर आहे. भटकळ, माल्पे, कारवार, कुमठा, बेळकेरी, होन्नावर ही मासेमारीची केंद्रे आहेत. अनेक सुंदर समुद्रकिनारे प्रवाशांना आकर्षित करतात. उदा. सोमेश्वर, पानंबूर, उल्लाळ, माल्पे, मुर्डेश्वर, मार्वथे,ओम इ.

4. दक्षिण कर्नाटकातील प्रमुख टेकड्यांची नावे लिहा.
उत्तर : दक्षिण कर्नाटकातील प्रमुख टेकड्या चित्रदुर्ग बेट्टगळू बिळगिरी रंगन बेट्ट, मलय महादेश्वर, बेंगळूर जिल्ह्यातील नारायण दुर्ग, सावनदुर्ग, शिवगंगा. तुमकुर जिल्ह्यातील  मधुगिरी ही आशियातील सर्वात मोठी अखंड पाषाणातील टेकडी आहे. चिक्कबळापूर जिल्ह्यातील नंदी, चन्नकेशव, केवलदुर्ग, स्कंदगिरी, मंड्या जिल्ह्यातील आदी चुंचनगिरी, बेळगिरीरंगय्या, मलयमहादेश्वर, चामराज जिल्ह्यातील हिमदगोपाल स्वामी, म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडी या महत्त्वाच्या टेकड्या आहे.

5. पश्चिम घाटातील घाटमार्गांचा उल्लेख करा.
उत्तर : पश्चिम घाटातील प्रमुख घाटमार्ग 1. चारमडी घाट 2. शिराडी घाट 3. आगुंबे घाट 4. हुलीकल घाट.

प्रश्न 3 - जोड्या जुळवा

                                                                         
            1.          जोग फॉल्स                               अ) मंगळूर
            2.         ओम बीच                                  ब) उत्तरेकडील पठार
            3.         नंदी हिल रिसॉर्ट                         क) शरावती नदी
            4.         एक शिळा टेकडी                       ड) गोकर्ण
            5.         उष्ण टेकडी                               इ) चिक्कबळ्ळापूर
                                                                      फ) मधुगिरी

उत्तरे : - 1. क) शरावती नदी  2. ड) गोकर्ण   3. इ) चिक्कबळ्ळापूर  4. फ) मधुगिरी  5. ब) उत्तरेकडील पठार
------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024