Thursday, May 23, 2019

आपले राज्य कर्नाटक



प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. आपण कर्नाटक राज्योत्सव ...................... या दिवशी साजरा करतो.

2. कर्नाटक हे नाव ...................... या साली आपल्या राज्याला प्राप्त झाले.

3. कर्नाटकाच्या पूर्वेकडे ...................... हे राज्य आहे.

4. आकाराने सर्वात मोठा ...................... हा जिल्हा आहे.

5. कर्नाटकाचे क्षेत्रफळ ...................... चौ.कि.मी. आहे.

उत्तरे : 1. 1 नोव्हेंबर 2. 1973 3. आंध्र प्रदेश 4. बेळगाव 5. 1,91,791 चौ.कि.मी.

प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1.  कर्नाटकाचा अक्षांश आणि रेखांशामधील विस्तार सांगा.
उत्तर : कर्नाटक 110-310 उत्तर रेखांश, 180-450 दक्षिण अक्षांश आणि 740-120 पश्चिम, 780-400 पूर्व रेखांशामध्ये स्थित आहे.

2. आपल्या शेजारील राज्यांची नावे सांगा.
उत्तर : कर्नाटकाच्या उत्तरेकडे महाराष्ट्र राज्य, पूर्वेकडे आंध्र प्रदेश, दक्षिण आणि आग्नेयेला तामिळनाडू, नैऋत्येला केरळ, वायव्येला गोवा ही राज्ये आहेत.

3. कर्नाटकाचे राज्य व्यवस्थापनासाठी पाडलेले चार विभाग कोणते ?
उत्तर : कर्नाटकाचे राज्य व्यवस्थापनासाठी पाडलेले चार विभाग - 1. बेंगळूर 2. म्हैसूर 3. बेळगाव 4. गुलबर्गा.

4. कर्नाटक हे भारताच्या कोणत्या भागात आहे ?
उत्तर : कर्नाटक हे दक्षिण भारतात पश्चिम द्विपकल्पीय भागात वसले आहे.

2 comments:

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024