प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. विशिष्ट प्रदेशात
सामान्य सामाजिक जीवन जगण्याची परिकल्पना म्हणजे ..................
2. भारतीय जीवनाचा
आधारस्तंभ .................. हा समाज आहे.
3. ईशान्य भागातील
आदिवासी .................. या वंशातील आहे.
उत्तरे : 1. समुदाय किंवा समाज 2. ग्रामीण समुदाय 3. मंगोलियन
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
आदिवासी समाज कोणाला म्हणतात ?
उत्तर : नागरिक समुदायापासून दूर, दुर्गम, जंगली भाग, डोंगर, दèया खोèयांच्या प्रदेशात
राहणाèया समाजाला आदिवासी समाज म्हणतात.
शब्दकोशात ‘आदिवासी’ची व्याख्या कशी
करण्यात आली आहे ?
उत्तर : मानवी जीवनशास्त्राच्या शब्दकोशात ‘आदिवासी’ म्हणजे
सामान्यपणे एका विशिष्ट भूप्रदेशात राहणारे ज्यांची भाषा संस्कृती सामाजिक जीवन
नागरी जीवनापेक्षा वेगळे असते, अशा लोकांच्या सामाजिक संघटना म्हणजे आदिवासी होय.
खेडे म्हणजे काय ?
उत्तर : साधे जीवन जगणाèया, सीमित भूप्रदेशात
राहणाèया लोकांच्या समुदायाला ‘खेडे’ असे म्हणतात.
1. नगर म्हणजे काय ?
उत्तर : आकाराने, लोकसंख्येची घनता जास्त असलेला आणि सामाजिक वैविधता
असलेला, लोकांच्या विशिष्ट प्रदेशातील कायमचे वसतीस्थान म्हणजे नगर होय.
2. औद्योगिकीकरण काय
सुचविते ?
उत्तर : औद्योगिकीकरण उत्पादक उद्योगधंद्याची वाढ
सुचविते.
3. मानव
शास्त्राच्या शब्दकोशानुसार ‘आदिवासी’ या शब्दाचा अर्थ काय होतो ?
उत्तर : मानवी जीवन शास्त्राच्या शब्दकोशात ‘आदिवासी’ म्हणजे
सामान्यपणे एका विशिष्ट भूप्रदेशात राहणारे, ज्यांची भाषा, संस्कृती सामाजिक जीवन नागरी जीवनापेक्षा वेगळे असते, अशा लोकांच्या
समाजिक संघटना म्हणजे आदिवासी होय.
4. नगराची लक्षणे
कोणती ?
उत्तर : नगराची लक्षणे पुढीलप्रमाणे होत - 1. सामाजिक
वैविध्यता दिसते. 2. अनभिज्ञता (अपरिचितता) 3. समाजात जास्तीत
जास्त देवाण घेवाण नसते. (आत्मकेंद्रीपणा) 4. वैयक्तिकता (गुप्तता), सुखासीनता (विलासी जीवन) याला महत्त्व 5. संघ, संघटनांचा विकास 6. छोटी किंवा विभक्त
कुटुंबपद्धती 7. सामाजिक परिवर्तनाचा तीव्र वेग.
5. ग्राम समुदायाची
लक्षणे कोणती ?
उत्तर : ग्राम समुदायाची लक्षणे - 1. छोटा समुदाय 2. आत्मीयतेचे संबंध
3. सामाजिक ऐक्य 4.अनौपचारिक नियंत्रण 5. अविभक्त कुटुंबाना प्राधान्य 6. कृषीप्रधान 7. निसर्गाचा प्रभाव
8. शेजारपाजाèयांचा प्रभाव 9. सरळता किंवा साधेपणा 10. अतिशय धार्मिक व श्रद्धाळू 11. सांप्रदायिक
दृष्टिकोन 12. व्यापकतेने दिसून येणारी जाती व्यवस्था 13. निरक्षरता आणि गरिबी.
6. ग्राम
समुदायाच्या समस्या कोणत्या ?
उत्तर : ग्राम समुदायाच्या समस्या पुढीलप्रमाणे होत -
1. कृषी समस्या 2. कुटिरोद्योगांची समस्या 3.निरक्षरता 4. दारिद्रय, निरुद्योगाची
समस्या. 5. आरोग्य व्यवस्थेची कमतरता
7. आदिवासी समाजाची
विशिष्ट लक्षणे कोणती ?
उत्तर : आदिवासी समाजाची विशिष्ट लक्षणे म्हणजे 1. सामान्य भूप्रदेश
2. कुटुंब समूह 3. आपलेपणा 4. सामान्यभाषा 5. सरलता आणि स्वावलंबन 6. सामान्य धर्म 7. सामान्य संस्कृती 8. सामान्य नावे 9. एकीची दृढ भावना 10. निरक्षरता किंवा अज्ञान.
8. भारतीय आदिवासी
समाजाचे विभाग कोणते ?
उत्तर : भारताच्या आदिवासी समाजाचे भौगोलिक घटकानुसार
तीन विभाग केले आहेत. 1. ईशान्य भागातील आदिवासी 2. मध्य भारतातील
आदिवासी 3. दक्षिणेकडील आदिवासी समाज. या व्यतिरिक्त अंदमान आणि निकोबार बेटावर राहणाèया आदिवासींचा
चौथा समाज आहे.
---------------------------------------------------------------------------- -------------------------------
No comments:
Post a Comment