1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. संविधानाच्या ........... कलमानुसार बालमजुरीस मनाई आहे.2. ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ ........... मध्ये लागू करण्यात आला.
3. बालमजुरांच्या कल्याणासाठी ........... मध्ये ‘राष्ट्रीय निती’ ची स्थापना झाली.
4. ‘स्त्री-भ्रूण हत्त्या प्रतिबंधक कायदा’ ........... मध्ये लागू करण्यात आला
5. लैंगिक अत्याचारापासून बालकांच्या संरक्षणासाठीचा कायदा ........... मध्ये लागू करण्यात आला
उत्तरे : 1. 24 व्या 2. 2006 3. 1987 4. 1994 5. 2012
2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या
1. भारतातील सामाजिक समस्यांची नावे सांगाउत्तर : 1) बालमजुरी 2) लिंगभेद 3) बालविवाह 4) बालकांवरील लैंगिक अत्याचार 5) भूक आणि कुपोषण 6) बालकांचे अपहरण 7) स्त्री-भ्रूणहत्त्या
2. बालमजूर कोणाला म्हणतात?
उत्तर : सामान्यपणे लहान वयात पैसे मिळविण्यासाठी काम करणे म्हणजेच बालमजुरी होय. भारतीय संविधानानुसार पैसे मिळविण्यासाठी काम करणारी 14 वर्षाखालील मुले म्हणजेच बालमजूर होय.
3. स्त्री-भूण हत्त्या म्हणजे काय?
उत्तर : मातेच्या गर्भातील स्त्री-भ्रूण गर्भातच मारुन टाकणे अथवा सक्तीने गर्भपात करणे म्हणजेच ‘स्त्री-भ्रूण हत्त्या’ होय.
4. बालविवाह म्हणजे काय?
उत्तर : कायद्याने 21 वर्षाखालील मुलाचे व 18 वर्षाखालील मुलीचे लग्न हे बालविवाहामध्ये मोडते. दोघांपैकी एकाचे वय जरी कमी असले तरी त्याला ‘बालविवाह’ असेच म्हटले जाते.
5. लिंगभेद म्हणजे काय?
उत्तर : स्त्री व पुरुष असे वर्गीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी संकल्पना म्हणजेच लिंग होय.
हा भेद फक्त स्त्री व पुरुषांच्या शारीरीक लक्षणांवर आधारित नसून सांस्कृतिक आचरण व सामाजिक स्तरावर अवलंबून असतो. सामाजिक स्तरावर प्रत्येकाचा दर्जा सामावलेला असतो
6. बाल-अपहरण म्हणजे काय?
उत्तर : 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला शोषणाच्या हेतूने, रोजगारी दिल्यास, बदली केल्यास, इतर ठिकाणी हलविल्यास, आसरा दिल्यास, कुठेतरी पाठविल्यास अथवा विकत घेतल्यास त्याला बालकांचे अपहरण किंवा तस्करी असे म्हटले जाते.
2. खालील प्रश्नांची उत्तरे द्या -
1. बालमजुरीची कारणे कोणती? स्पष्ट करा.उत्तर : बालहक्कांचे संरक्षण व सन्मान करण्यासाठी लागणाèया सामाजिक परिसराचा अभाव हे बालमजुरी, बालविवाह व बालकांच्या अपहरणाचे प्रमुख कारण आहे. कमी पैशात जास्त राबवून घेणारे लोभी मालक हेही बालमजुरीचे एक कारण आहे. ओल्या व सुक्या दुष्काळामुळे शेतीव्यवसायात चढउतार येतात. व रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकत नाहीत. यामुळे बहुतांश कुटुंबे शहराकडे स्थलांतरीत होतात. अशा कुटुंबातील मुले हॉटेल्स, फटाक्यांचे कारखाने, इतर धोकादायक अथवा जोखिमीच्या असंघटित क्षेत्रात मिळतील ती कामे कमी पैशात करतात.
मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्कांची अंलबजावणी योग्य प्रकारे झालेली नाही. सर्व मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण संपूर्णपणे मोफत मिळत नाही. त्यामुळे बालमुजुरीचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अल्पमजुरी व भूसुधारणा कायद्यातील अंल बजावणी मधील उणिवा यामुळेही बालमजुरीचे प्रमाण वाढलेले आहे.
2. बालविवाहाचे दुष्परिणाम कोणते ?
उत्तर : बालविवाहामुळे बालकाचा समग्र/सर्वांगीण विकास खुंटतो आणि मुले त्यांच्यामध्ये असणारे प्रश्र विचारण्याचे सामर्थ्य गमावून बसतात. परिणामतः मुलांवरील हिंसक व लैंगिक हल्ल्यांचे प्रमाण वाढते. मुलांचे बरेच हक्क उदा. शिक्षण, बालपण, मनोरंजन, मित्रांधील संवाद इ.चे उल्लंघन केले जाते. मुले कुपोषणाच्या, रक्तक्षयाच्या, रोगांच्या, गर्भपाताच्या, बालहत्त्येच्या आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. मुलींना लहान वयातच वैधव्य येण्याची शक्यता जास्त असते. तसेच आपोआपच ती हिंसाचाराची व अत्याचाराची बळी होते
बालविवाह फक्त विवाहित जोडप्यालाच अपायकारक ठरत नसून अशा विवाहाद्वारे जन्मलेल्या मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यालाही हितावह नसतो.
3. बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठीच्या उपाय योजना कोणत्या?
उत्तर : बालमजुरीची ही समस्या निवारण करण्याचा एक प्रमुख उपाय म्हणजे 18 वर्षाखालील मुलांना शाळेत दाखल करून घेवून ती दररोज शाळेत हजर रहाण्याची सक्ती करणे हा होय. यासाठी सर्वांचे सहकार्य, सहभाग व समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे
उपाय
1. सर्व क्षेत्रात लिंग समानतेची हमी देणे 2. असहाय्य कुटुंबांचे स्थलांतर रोखणे 3. बालविवाह व अपहरणाबद्दल जागृती निर्माण करणे. 4. ग्रामपंचायतीमार्फत बालहक्ककायदे लागू करणे
4. स्त्री-भ्रूणहत्त्येचे दुष्परिणाम कोणते?
उत्तर : 1. मुलींच्या संख्येत लक्षणीय घट 2. स्त्री पुरुष असंतुलन 3. लिंग भेद 4. स्त्रियांचा दर्जा ढासळणे.
5. लिंगभेदाचे प्रकार कोणते?
उत्तर : थोर अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी खालीलप्रमाणे लिंगावर आधारित स्त्री-पुरुष असमानतेचे वर्गीकरण केले आहे.
1. जन्मदरातील असमानता 2. पायाभूत सुविधांमध्ये असमानता 3. संधीमधील असमानता 4. मालकी हक्कांमध्ये असमानता 5. कौटुंबिक असमानता
6. भूकेचे दुष्परिणाम कोणते?
उत्तर : एक जगण्यासाठी आवश्यक आणि हवे तेवढे अन्न उपलब्ध
असणे. दुसरा सतत अपुèया व कुपोषित आहारामुळे अशक्तपणा येणे, शारीरिक व्यंग निर्माण होणे, कांहीवेळा तर अकाली मृत्यूही येत
सर्वांचा संबंध बालमृत्यूदर, जन्मदर, मुलांचे चलन-वलन आणि आर्थिक विकासाशी आहे
7. बालमजुरीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ?
उत्तर : यामुळे बालकांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य खुंटते. त्यामुळे ती शिक्षणापासून वंचित रहातात आणि त्यांच्यातील कला, कौशल्ये विकसित होण्याआधीच खुंटतात.
8. 2016 साली सरकारने बालमजुरी संदर्भात कोणता कायदा संमत केला ?
उत्तर : किशोरवयीन मजुरी प्रतिबंधक तथा नियंत्रण कायदा.
No comments:
Post a Comment