Sunday, May 12, 2019

व्यवसायाचे जागतिकीकरण


प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. जागतिकीकरण म्हणजे काय ? स्पष्ट करा.
उत्तर : ‘‘आर्थिक विकासाकरिता जगभरातील देशांचे वाढणारे परस्परावलंबत्व, देशांच्या सीमारेखा ओलांडून वस्तू व सेवांच्या देवाण घेवाणीचे व्यवहार करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय.’’

2. जागतिकीकरण जगभरातील आर्थिक चलनाला कसे साहाय्य करते.
उत्तर : जागतिकीकरण म्हणजे जगातील तांत्रिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे घेवाणीमुळे आर्थिक चलनाला सहाय्यक ठरते. तसेच दळणवळणाच्या सोयी वाढविणे आणि परस्पर संबंध दृढ करणे. देशादेशातील राजकीय बंधने दूर करून आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल वाढविण्यास प्रोत्साहन देते. आयात निर्यातीवरील कराचे निर्मूलन करून मुक्त क्षेत्रे निर्माण करते. वाहतूक खर्च कमी करण्यास मदत करते. भांडवल गुंतवणकीवरील बंधने कमी करण्यास मदत करते. त्यामुळे भांडवलाचा ओघ वाढतो. देशाला जागतिक व्यापार संस्थेशी व्यवहार करण्यास मदत करते. जागतिकीकरण हितसंबंध जपण्याचे काम  करते.

3. जागतिकीकरणाचे फायदे कोणते ?
उत्तर :  जागतिकीकरणाचे फायदे : 1. आर्थिक विकास वृद्धिंगत होतो आणि उत्पादने व सेवांची व्याप्ती वाढते.  2. लोकांचे राहणीमान उंचावते. 3. एखादी विशिष्ट वस्तू संपूर्ण जगभरात कोठेही उपलब्ध होऊ शकते. 4. राष्ट्राच्या ढोबळ स्वदेशी उत्पादनाचा अंदाज बांधता येतो. 5. लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. 6. लोकांना त्यांच्या पसंतीनुसार वस्तू व सेवा घेता येतात. 7. व्यापाèयांसाठी काही नियम बनविल्यामुळे वस्तुंच्या किंमती कमी राहतात. 8. उत्पादनात निपुणता निर्माण केल्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या वस्तु मिळतात. 9. वेगवेगळी राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून राहिल्यामुळे त्यांच्यातील सामाजिक व राजकीय संंबंध सुधारतात.

4. जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर : जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये : 1. आंतरराष्ट्रीय व्यापाराला संरक्षण देऊन जागतिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करते. 2. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भांडवलाच्या ओघाला संरक्षण देते. 3. जागतिक व्यापारी संस्था आणि तेल उत्पादन आणि निर्यात करणाèया संस्था यासारख्या संस्थांशी करार करण्यास खतपाणी घालते. 4. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास करते. 5. आंतरराष्ट्रीय व्यवहार सांभाळणाèया जागतिक व्यापारी संस्था, जागतिक बुद्धिमत्ता आणि मालमत्ता संस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्थांचे कार्य वाढविते. 6. बहुराष्ट्रीय कंपन्याद्वारे अर्थव्यवस्था बळकट करते. 7. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण घेवाण वाढविते. 8. बहु संस्कृतीकरणाला गती देते आणि विविध सांस्कृतिक पद्धतीचा प्रसार होण्यास मदत करते. त्यामध्ये वैयक्तिक सहभाग घेण्यास मदत करते.

5. जागतिकीकरणाचे नकारात्मक परिणाम उदाहरणांसहित द्या.
उत्तर : जागतिकीकरणाचे नकारात्मक परिणाम : उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी काही राष्ट्रांनी तिसèयाच राष्ट्रातील लोकांना पांढरपेशी रोजगार दिले. कारण कमी पगारावर काम करण्यास कामगार मिळतात. जागतिकीकरणामुळे बालकामगार आणि गुलामांची संख्या वाढली आहे. 2. जागतिक बाजारपेठेत तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे याचा परिणाम व्यवसायामध्ये अवैध कारभार सुरू झाला. 3. जागतिकीकरण दहशतवाद्यांना व गुन्हेगारांना साहाय्य करते. वस्तू, अन्नपदार्थ, निधी इ. गोष्टी फुकटात सीमेबाहेर कशा पाठवायच्या याची कल्पना लोकांना येते. 4. जागतिकीकरणामुळे शहरे प्रगतशील व विकसित झाली आहे त्यामुळे घनकचरा टाकण्यासाठी जागा नाही. त्यामुळे कारखान्यातून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ एकाच ठिकाणी साठविले जातात व प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. 5.  फास्ट फूडसचा प्रसार जगभरात झपाट्याने होत आहे. लोक जंक फूडच्या मागे लागले आहेत. त्याच्या सेवनाने आरोग्य बिघडून रोगराई पसरत आहे. पारंपरिक अन्नपदार्थ हळूहळू लुप्त होऊ लागले आहेत. 6. श्रीमंत हे अतिश्रीमंत होत चालले आहेत तर गरिबांना दोन वेळच्या जेवणासाठीही झगडावे लागत आहे. 7. एड्स, कॅन्सर, डेंग्यू यासारखे जीवघेणे आजार जगभर पसरत आहेत. 8. परिसर प्रदूषण वाढत आहे. 9. कारखान्यांना व उद्योगधंद्यांना लागणाèया कच्च्या मालावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. यामुळे नैसर्गिक खनिज संपत्तीचा साठा कमी होऊन हवा प्रदूषित होत आहे. जगण्यासाठी ज्या हवेची गरज आहे तीच पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. 10. विकसित देशांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढले आहे. 11. लघुद्योगांना स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

6. जागतिक व्यापार संस्थेची उद्दिष्ट्ये कोणती ?
उत्तर :  1 जानेवारी 1995 रोजी अस्तित्वात आलेल्या जागतिक व्यापार संस्थेची प्रमुख ध्येये :  1. जागतिक जागतिक व्यापारी करारांचा कारभार पाहणे. 2. व्यापारी तडजोडीची बोलणी करणे. 3. व्यापारी वादविवाद सोडविणे. 4. जगभरात मुक्त आणि स्वतंत्र्य व्यापारावर जोर देणे. 5. आंतरराष्ट्रीय व्यापारातील कर कमी करणे. 6. जगातील साधन संपत्तीचा सामर्थ्याने उपयोग घेऊन उत्पादन आणि व्यापाराचे विस्तार करणे आणि सेवा क्षेत्रांना काळजीपूर्वक पाहणे. 7. विकसनशील सामान्य दर्जांच्या सदस्यांना तांत्रिक साहाय्य  व प्रशिक्षण देणे. 8. इतर आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्याने वागणे.
इतर उद्दिष्ट्ये : 1. जीवनावश्यक खर्च कमी करून सदस्य राष्ट्रांचे राहणीमान उंचावणे. 2. सदस्य राष्ट्रामधील वादविवाद मिटवून व्यापारी ताण कमी करणे. 3. आर्थिक विकास व रोजगाराला उत्तेजन देणे. 4. आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा खर्च कमी करणे. 5. चांगला राज्यकारभार करण्यासाठी प्रोत्साहन देणे. 6. सदस्य राष्ट्रांमध्ये शांतता व स्थैर्य निर्माण करण्यासाठी योगदान देणे.

7. कोणत्या क्षेत्रातील प्रगती जागतिकीकरणास साहाय्यभूत ठरली ?
उत्तर : माहिती आणि तंत्रज्ञान, दळणवळण, इंटरनेट इ. क्षेत्रातील अपार प्रगती जागतिकीकरणास कारणीभूत ठरली.

8. सर्व देशात चांगले संबंध निर्माण होण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरली ?
उत्तर : जागतिकीकरण.

9. पारंपरिक अन्नपदार्थ हळूहळू लुप्त होत आहेत, स्पष्ट करा.
उत्तर : जागतिकीकरणामुळे स्थानिक अन्नपदार्थाचा परदेशात प्रसार होतो. त्यामुळेच मॅकडॉनाल्ड, केएफसी यासारख फास्ट फूडसचा प्रसार जगभरात झपाट्याने होत आहे. लोक जंकफूडच्या मागे लागले आहेत. त्याच्या सेवनाने आरोग्य बिघडून रोगराई पसरत आहे. पारंपरिक अन्नपदार्थ हळूहळू लुप्त होत आहेत.

10. ....... मुळे कमी खर्चाने जगाच्या कोठेही वस्तुंचे उत्पादन करणे शक्य झाले आहे.
उत्तर : जागतिकीकरणामुळे.

11.डब्ल्यू.टी.ओ. चे विस्तारित रूप काय ?
उत्तर : वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (जागतिक व्यापारी संस्था)

12. आय.एम.ओ. चे विस्तारित रूप काय ?
उत्तर : इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी)

13. जी.डी.पी. म्हणजे काय ?
उत्तर : ढोबळ स्वदेशी उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट)

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024