1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. ‘ग्राहक’ असे कुणाला म्हणतात?उत्तर : सेवा व वस्तू विकत घेणाèया व्यक्तींना स्वयंसेवी संस्थांनी ‘ग्राहक’ असे संबोधले आहे./
ग्राहक म्हणजे वस्तू व सेवा विकत घेणारी, तसेच वेतन देऊन सेवा घेणारी व्यक्ती होय.
2. ग्राहक चळवळीचे प्रमुख उद्देश कोणते?
उत्तर : आपण दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात बाजारातून योग्य दर्जाच्या वस्तू व सेवा मिळविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावा हेच ग्राहक चळवळीचे उद्दिष्ट आहे.
3. प्रत्येक ग्राहकाचे हक्क कोणते?
उत्तर : 1) अपायकारक वस्तूंच्या विक्रीला प्रतिबंध करण्याचा हक्क
2) माहिती मिळविण्याचा हक्क 3) वस्तू निवडण्याचा हक्क 4) तक्रार निवारण्याचा हक्क 5) पिळवणुकीविरुद्ध भरपाई मिळविण्याचा हक्क 6) ग्राहक शिक्षण हक्क 7) निकोप व उत्तम भौतिक परिसर उपलब्ध करून देऊन जीवनमान उंचावण्याचा हक्क.
4. भारत देशात ग्राहक संरक्षण कायदा केव्हा अंमलात आला?
उत्तर : 1986 साली.
5. जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष कोण असतात व त्यांची नेणूक कोण करते?
उत्तर : जिल्हा न्यायाधीश किंवा तत्सम अधिकारी हे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष असतात.
2. दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. ग्राहकांच्या समस्या कोणकोणत्या?उत्तर : ग्राहकांकडे दुर्लक्ष करून त्याचे शोषण व फसवणूक केली जाते. त्यामुळे त्याचे प्रचंड नुकसान होते. उत्पादक ग्राहक यांच्यात दलालांचा शिरकाव झाला. दलालांच्याद्वारे वस्तुंची विक्री होऊ लागली.
2. ग्राहकांच्या शोषणाची कारणे कोणती?
उत्तर : पूर्वी उत्पादक ग्राहकांना वस्तूंचा पुरवठा थेट करीत असत. उदा : दूध, फळे, भाज्या इ वस्तू दलालांच्या मध्यस्थी शिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात असत. जेव्हा शेती आणि उद्योगांचा विकास झाला तेंव्हा वस्तूंच्या विक्रीच्या पद्धतीत बदल घडून आला. उत्पादक व ग्राहक यांच्यामध्ये दलालांचा शिरकाव झाल्यामुळे त्यांच्यातील थेट व्यवहार पूर्णपणे बंद झाला. उत्पादक आणि ग्राहक या दोघांनी मिळून वस्तूची किंमत ठरविण्या ऐवजी दलाल ती किंमत ठरवू लागले. त्यामुळे ग्राहकांच्या होणाèया हाल अपेष्टा, नुकसान व समस्या उत्पादकांना समजेनाशा झाल्या. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज घरबसल्या ‘टेलिशॉपिंग’ द्वारे ग्राहकाला वस्तूंची थेट खरेदी करता येणे शक्य झाले आहे.
3. ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्वाचे उद्देश लिहा.
उत्तर : 1. ग्राहक संरक्षण कायद्यान्वये सुरक्षितता व उत्तम दर्जा याला प्राधान्य देणे. 2. अपायकारक वस्तूंची निर्मिती व विक्री थांबविणे.
3. बाजारातील गैरव्यवहार रोखणे. 4. दर्जा, वजन, माप व किंमती यावर नियंत्रण ठेवणे. 5. ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू व सेवा याबद्दल काही तक्रार आल्यास त्याला योग्य ती नुकसानभपाई देणे
6. ग्राहक शिक्षणाद्वारे लोकांध्ये जागृती निर्माण करणे
एकंदरित निकोप स्पर्धा, योग्य किंमत व दर्जेदारवस्तू व सेवा पुरविणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
4. ग्राहक न्यायालयाचे तीन टप्पे कोणते ते स्पष्ट करा.
उत्तर : 1.जिल्हा ग्राहक मंच 2. राज्य आयोग 3. राष्ट्रीय आयोग
6. ग्राहक न्यायालयाकडे तक्रार करताना कोणती माहिती असावी लागते?
उत्तर : कोणत्या न्यायालयात तक्रार करायची. त्यासाठी आपले किती लाखापर्यंत नुकसान झाले आहे हे माहित असणे आवश्यक आहे.
3. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. ग्राहकाला असलेले दुसरे नाव ...........2. पैसे घेऊन वस्तू व सेवा पुरविणारा ...........
3. ‘जागतिक ग्राहक दिन’ दरवर्षी ........... रोजी साजरा करतात.
4. भरपाईची रक्कम वीस लाखांपेक्षा जास्त असल्यास ........... या आयोगाकडे तक्रार करावी लागते.
उत्तरे : 1. उपभोक्ता 2. व्यापारी 3. 15 मार्च 4. राज्य ग्राहक आयोग
4. खालील चित्राचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. पाकीटावर नमूद केलेल्या कंपनीचे नाव काय?
उत्तर : खोजाती त्रिफळांजन
2. नमूद केलेल्या वस्तूची छापील किंमत किती?
उत्तर : फक्त 30 रुपये. महाराष्ट्राबाहेर रु.31.
3. या वस्तूची उत्पादित तारीख कोणती?
उत्तर : फेब्रुवारी 13
4. या वस्तूच्या वापराची अंतिम तारीख किती आहे?
उत्तर : जानेवारी 16
प्र. 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. व्यापाèयांचे कर्तव्य काय आहे ?उत्तर : ग्राहकांनी दिलेल्या किमतीच्या मोबदल्यातदर्जेदार वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हे व्यापाèयांचे कर्तव्य आहे.
2. टेलिशॉपिंग म्हणजे काय?
उत्तर : ग्राहक वस्तू खरेदीसाठी बाजारात जाण्याऐवजी आंतरजालाद्वारे (इंटरनेट) आपल्याला हव्या असणाèया वस्तू, हव्या त्या दुकानातून घरबसल्या मागवू शकतो. वस्तू हातात मिळाल्यावर त्याची रक्कमही अदा करू शकतो. याच प्रमाणे दूरदर्शन (टी.व्ही.) वरील काही वाहिन्यांवरील जाहिराती पाहून सेलफोनवरून एसएमएस द्वारे वस्तू मागवू शकतो. या जाहिरातदांरांशी लँडलाईन फोनवरूनही संपर्क साधता येतो. या व्यवहारालाच ‘टेलिशॉपिंग’ असे म्हणतात.
3. व्यापार म्हणजे काय ?
उत्तर : नफा मिळविण्याच्या उद्देशाने केलेला व्यवहार म्हणजेच व्यापार होय.
4. ग्राहक संरक्षण म्हणजे काय ?
उत्तर : व्यापारी आणि उत्पादकांकडून होणाèया शोषणापासून ग्राहकाचे रक्षण करणे म्हणजेच ग्राहक संरक्षण होय.
5. ग्राहक संरक्षण चळवळीस का सुरुवात झाली ?
उत्तर : : जेव्हा व्यापाèयांकडून काही ग्राहकांची सतत पिळवणूक होऊ लागली तेव्हा ग्राहक संरक्षण चळवळीस सुरुवात झाली.
6. ग्राहकहितासाठी सरकारने कोणते कायदे लागू केले ?
उत्तर : आवश्यक वस्तूंचा कायदा, वजन मापाचा कायदा, अन्नधान्य भेसळ प्रतिबंधक कायदा इत्यादि. 1986 चा ग्राहक संरक्षण कायदा
7. ग्राहक संरक्षण कायद्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते ?
उत्तर : निकोप स्पर्धा, योग्य किंमत, दर्जेदार वस्तू व सेवा पुरविणे.
8 ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या राज्यात लागू करण्यात आलेला नाही ?
उत्तर : जम्मू व काश्मीर
9 ग्राहक शिक्षण हक्क म्हणजे काय ?
उत्तर : ग्राहकांना आपल्या अधिकाराबद्दल जाणून घेण्याचा हक्क
10. राष्ट्रीय पातळीवरकोणत्या ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे ?
उत्तर : केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची
11. ग्राहक न्यायालयाकडे तक्रार करण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते ?
उत्तर : 1. अर्ज हाताने लिहिलेला अथवा टाइप केलेला असावा. 2. अर्जामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाइल नंबर नमूद करावा. 3. कुणाविरुद्ध तक्रार करायची आहे त्याचे पूर्ण नाव नमूद करावे. 4. कोणत्या वस्तूच्या खरेदीद्वारे किती रूपयांचे नुकसान झाले आहे याची सविस्तर माहिती द्यावी. 5. वस्तूखरेदीची पावती जोडावी. 6. यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. 7. वकिलाच्या मध्यस्थीशिवाय ग्राहक आपली तक्रार थेट नोंदवू शकतो.
Inka janm kab hua thaa
ReplyDelete