Sunday, May 12, 2019

20 व्या शतकातील राजकीय घडामोडी


प्र.1 गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

1. .............. यांनी रशियामध्ये साम्यवादी सरकार स्थापन केले.
2. पहिले महायुद्ध .............. साली संपले.
3. .............. हा फॅसिस्ट हुकूमशहा होता.
4. दुसरे महायुद्ध .............. साली सुरू झाले.
5. जपानने अमेरिकेच्या .............. या नाविक तळावर हल्ला केला.
उत्तरे  : 1. लेनिन  2. 1918   3. मुसोलिनी   4. 1939  5. पर्ल हार्बर

प्र. 2.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. ‘रशियन राज्यक्रांतीमध्ये लेनिनची भूमिका’ याबद्दल चर्चा करा.




उत्तर :  1.व्लादिमीर लेनिनने शेतकरी व कामगारवर्गाला  क्रांतीकारी कौशल्याविषयी मार्गदर्शन केले. परिणामत: कामगारवर्ग अधिकाधिक चळवळींमध्ये गुंतला. 2.लेनिनला देशातून हद्दपार करण्यात आले.  3. शेतकèयांनी व कामगारांनी दुसरा निकोलस या झारच्या विरोधात बंड पुकारून क्रांती घडवून आणली.तेव्हा तो देश सोडून पळाला. 4. मॅनशेवीक्सने रशियाला लोकशाही प्रजासत्ताक बनविल्यानंतर लेनिन रशियाला परत आला. त्यांने शांती, अन्न व भूमी  यासारख्या साध्या व सोप्या घोषणा  लोकांसाठी दिल्या. 5.   लेनिनने ऑक्टोबर 1917 मध्ये बोलशेविक्स क्रांती घडवून आणली व रशियाला समाजसत्तावादी प्रजासत्ताक बनवले. 6. लेनिन रशियाचा राष्ट्राध्यक्ष बनला.


2. पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण कोणते?
उत्तर : पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण म्हणजे 28 जुलै 1914 रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फ्रान्झ फर्डीनंडची विश्वासघाताने केलेली हत्या होय. हा युवराज बोस्नीयाची राजधानी सॅराजेव्हो येथे गेलेला असताना एका जहाल सर्बियन नागरिकाने त्याची हत्या केली.

3. ‘नाझी विचारधारेमुळे जर्मनीचा नाश झाला’ या विधानाचे समर्थन करा.


अ‍ॅडॉल्फ हिटलर.


उत्तर : नाझी विचारधारेचा सारांश असा होता.... 1. जगातला सर्वांत श्रेष्ठ वंश म्हणजे जर्मनीचा आर्यवंश होय. 2. फक्त जर्मन लोकच जगावर राज्य करण्यास पात्र आहेत. 3. इतर सर्व जमाती फक्त स्वत:वर राज्य करवून घेण्यास लायक आहेत. 4. ज्यू लोक, साम्यवादी, कॅथॉलिक्स व समाजवादी हे जर्मनीच्या सर्व समस्यांना जबाबदार आहेत. 5. हे लोक जगण्यास असमर्थ आहेत. असे समजून त्यांची हत्या करण्यात येत होती.  अशा प्रकारची अत्यंत तीव्र देशभक्तीची भावना खूपच क्रूरतेने आचरली जात होती. ही विचारधारा दुसèया महायुद्धाचे एक कारण बनली होती.





4. दुसèया महायुद्धाची कारणे कोणती ?
उत्तर :   1. संपूर्ण जग जिंकण्याची हिटलरची महत्त्वाकांक्षा व मुसोलिनीचा साम्राज्यवादाचा पुरस्कार 2. हिटलरचे आर्यवंशविषयक आक्रमक धोरण  3. जर्मनीला व्हर्सायचा करार अमान्य होता. 4. आशिया खंडात जपानने आक्रमक साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. 4. शस्त्रास्त्र स्पर्धा, लष्करात व नौदलात प्रचंड वाढ करण्यात आली. 5. राष्ट्रसंघ युरोपीयनांच्या आक्रमक साम्राज्यवादाला पायबंद घालू शकला नाही.  6.आर्थिक मंदी, अमेरिकेचे जागतिक राजकारण तटस्थ धोरण दुसèया महायुद्धाला कारणीभूत ठरले.

5. शीतयुद्ध म्हणजे काय?
उत्तर : दुसèया महायुद्धानंतर अमेरिका व रशिया या दोन जागतिक सत्ताधाèयांमध्ये राजकीय, आर्थिक, लष्करी आणि इतर गोष्टींमध्ये सतत भीती, तिरस्कार, द्वेष आणि काळजीचे वातावरण निर्माण झाले त्यालाच शीतयुद्ध म्हटले जाते. अमेरिकेच्या प्रभावाखालील भांडवलशाही राष्ट्रे आणि रशियाच्या प्रभावाखालील समाजवादी राष्ट्रे यांच्यातील अघोषित युद्ध म्हणजेच शीतयुद्ध होय.


6. चीनच्या क्रांतीचे परिणाम कोणते?




उत्तर : चीनच्या क्रांतीचे परिणाम : 1. सामूहिक शेतीचा अवलंब करण्यात आला. 2. सर्वांना मोफत शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा या मूलभूत सुविधा देण्यात आल्या. 3.औद्योगिक विकास साधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला खूपच महत्त्व देण्यात आले. 4. लीप फॉरवर्ड पॉलीसी (विकासाची झेप) राबविण्यात आली. 5. खासगी मालमत्तेचे रूपांतर सामाजिक मालमत्तेत करण्यात आले. 6. 1966 च्या सांस्कृतिक क्रांतीमुळे घडलेल्या चुका सुधाण्यास डेंग शिओपिंग सत्तेवर आला. त्यांने बèयाच सुधारणा  केल्या. 7. या पार्श्वभूमीवर चीनने भांडवलशाही उत्तमप्रकारे आत्मसात केली.




7. अमेरिकेने आर्थिक मंदीवर कशी मात केली याचे वर्णन करा.
उत्तर : 1929 मधील आर्थिक मंदीमुळे अमेरिकेतील आर्थिक विकास पूर्णपणे मंदावला. औद्योगिक व कृषी उत्पादन पूर्णपणे ढासळले. याशिवाय खाणकाम, जहाज बांधणी, मोटारगाड्या आणि घरगुती उपकरणे यासारख्या वस्तुंचे उत्पादनही तोट्यात आले होते. 1933 साली फ्रँकलिन डी रूझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी न्यू डील (नवा करार) नावाची आर्थिक योजना आखली. या योजनेद्वारे कामाचे तास कमी करून कामगारांना योग्य वेतन देण्यास कारखान्यांना भाग पाडले. गरीब, शेतकरी आणि कामगार वर्गाला निरुद्योग वेतनाचा बटवडा केला.

1. ब्रिटन, फ्रान्स व रशियातील कराराचे नाव काय ?
उत्तर : सलोखा करार.

2. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगरी आणि इटली या तीन देशांनी केलेला करार कोणता ?
उत्तर : मैत्री करार.

3. पहिल्या महायुद्धाचा कालावधी कोणता ?
उत्तर : 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918.

4. पहिल्या महायुद्धात प्रारंभी तटस्थ असलेला देश कोणता ?
उत्तर : अमेरिका.

5. 1919 मध्ये मित्रराष्ट्रांनी कोणत्या करारावर सह्या केल्या ?
उत्तर : व्हर्सेलिस करार.

6. पहिल्या महायुद्धानंतर युद्धांना आळा घालण्यासाठी स्थापन झालेली संघटना कोणती ?
उत्तर : राष्ट्रसंघ (लीग ऑफ नेशन्स)

7. जर्मनीच्या हुकूमशहाचे नाव काय ?
उत्तर : अ‍ॅडॉल्फ हिटलर.

8. 19 व्या शतकात रशियात कोणाची राजवट होती ? 
उत्तर : झारची.

9. 1905 मध्ये रशियाला कोणत्या राष्ट्राने हरविले ?
उत्तर : जपान.

10. कोणाच्या नेतृत्वाखाली रशियात राज्यक्रांती झाली ?
उत्तर : व्लादीमीर लेनिन.

11. देश सोडून पळून गेलेल्या रशियन झारचे नाव काय ?
उत्तर : दुसरा निकोलस.

12. लेनिनने कोणत्या घोषणा दिल्या ?
उत्तर : शांती, अन्न व भूमी.

13. ऑक्टोबर क्रांतीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण झाले ?
उत्तर : लेनिन.

14. कार्ल मार्क्स यांचे विचार अंमलात आणणारा पहिला राज्यकर्ता कोण ?
उत्तर : लेनिन.  

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024