1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
1. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या ........... कोटी होती2. सध्या जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी शेकडा ........... भाग भारतामध्ये आहे.
3. ........... हे राज्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य होय.
4. केंद्रशासित प्रदेशापैकी ........... मध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे.
5. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य ........... होय.
उत्तरे : 1. 121 कोटी 2. 17.5 टक्के 3. बिहार 4. लक्षद्विप 5.अरुणाचल प्रदेश
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. लोकसंख्या म्हणजे काय?उत्तर : एखाद्या, विशिष्ट ठिकाणी रहात असलेल्या लोकांच्या एकूण संख्येला ‘लोकसंख्या’ असे म्हणतात.
2. लोकसंख्येच्या घनतेची व्याख्या लिहा.
उत्तर : दरचौरस किलोमीटरमध्ये राहणाèया लोकांच्या संख्येला ‘लोकसंख्येची घनता’ असे म्हणतात.
3. भारतामध्ये लोकसंख्यावाढीची प्रमुख कारणे कोणती?
उत्तर : लोकसंख्यावाढीची कारणे
भारताच्या लोकसंख्यावाढीला अनेक कारणे आहेत. त्यापैकी कांही प्रमुख कारणे खालील प्रमाणे.
जादा जन्मदर
भारताच्या लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीचे हे एक प्रमुख कारण आहे. बालविवाह धार्मिक व सामाजिक परंपरा, बहुपत्नीत्व, गरिबी, निरक्षरता, उष्ण भौगोलिक हवामान इ. जादा जन्मदराची कारणे होत.
कमी मृत्यूदर
लोकसंख्यावाढीचे हेही एक प्रमुख कारण आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा, साथीच्या रोगावरील नियंत्रण, शिशुंच्या मृत्यूचे घटलेले प्रमाण, शैक्षणिक प्रसार इ. गोष्टी मृत्यूदर कमी करण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
4. लोकसंख्यावाढीचे भारतावर कोणकोणते परिणाम झाले आहेत?
उत्तर : लोकसंख्यावाढीचे परिणाम
झपाट्याने वाढणाèया लोकसंख्येुळे अनेक समस्या उद्भवल्या. त्यापैकी कांही महत्त्वाच्या समस्या बरोजगारी, अन्नतुटवडा व कुपोषण, सामाजिक व मूलभूत नागरी सुविधांचा अधिक बोजा, कमी दरडोई उत्पन्न, आर्थिक विकासाची धीमी गती, गरिबी, हलक्या दर्जाचे राहणीमान, परिसरमालिन्य इ.
5. भारतातील लोकसंख्येची विभागणी नियंत्रित करणारे प्रमुख घटक कोणते?
उत्तर : लोकसंख्येची विभागणी नियंत्रित करण्याचे घटक भौगोलिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक इ. गोष्टी भारतातील लोकसंख्येच्या विभागणीवर प्रभाव पाडतात. त्यापैकी कांही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत.
1) भौगोलिक वैशिष्ट्ये : सामान्यतः पर्वतीय व डोंगराळ (टेकड्यांच्या ) भागात लोकसंख्या विरळ असते. उदा. उत्तर आणि ईशान्येकडील डोंगराळ प्रदेश (ईशान्य टेकड्यांचा प्रदेश)
2) हवामान : उत्तम हवामानाच्या प्रदेशात लोकवस्ती दाट असते तर अति उष्ण अथवा अति थंड तसेच कोरड्या प्रदेशात लोकवस्ती विरळ असते. उदा. वाळवंटे व हिमालयातील प्रदेश.
3) माती : सुपीक मातीच्या प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती असते उदा. उत्तरेकडील मैदाने, पूर्व व पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश. याउलट पडित अथवा वालुकामय माती असणाèया भागात लोकवस्ती विरळ असते.
4) साधनसंपत्ती : खनीजसंपत्तीनी समृद्ध असलेल्या व उर्जा-साधनांनी परिपूर्ण असणाèया प्रदेशात लोकवस्ती दाट असते. उदा. प.बंगाल, ओरिसा इ.
5) उद्योग व व्यापार : औद्योगिक क्षेत्र, व्यापारी केंद्रे व शहरी भागामध्ये लोकवस्ती दाट असते. उदा. नवी दिल्ली, बेंगळूरु, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, हैदराबाद इ.
तसेच पाणीपुरवठा, पर्यटन, मानवाला उत्तमपणे जगण्यासाठी व संपत्तीसाठी आवश्यक असणारे संरक्षण, अत्याधुनिक व अत्यावश्यक सुविधा या गोष्टींचाही लोकसंख्येच्या विभागणीवर
बराच प्रभाव पडतो.
6. भारतातील काही भागात लोकसंख्येची घनता विरळ (कमी) आहे. याची कारणे स्पष्ट करा.
उत्तर : पर्वतीय व डोंगराळ प्रदेश, अत्यंत कमी उष्णता असणारे प्रदेश, ओसाड प्रदेश इ. भागात लोकसंख्येची घनता विरळ असते. सामान्यतः पर्वतीय व डोंगराळ (टेकड्यांच्या ) भागात लोकसंख्या विरळ असते. तर अति उष्ण अथवा अति थंड तसेच कोरड्या प्रदेशात लोकवस्ती विरळ असते. पडित अथवा वालुकामय माती असणाèया भागात लोकवस्ती विरळ असते. कारण त्या भागातील पाणीपुरवठा, पर्यटन, मानवाला उत्तमपणे जगण्यासाठी व संपत्तीसाठी आवश्यक असणारे संरक्षण, अत्याधुनिक व अत्यावश्यक सुविधा या गोष्टींचाही लोकसंख्येच्या विभागणीवर प्रभाव पडतो.
7. लोकसंख्येध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर : चीननंतर लोकसंख्येमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो
8. जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या ........ इतकी आहे
उत्तर : 17.5 टक्के
9. मृत्यूदर घटत आहे. का ?
उत्तर : 1. साथीच्या रोगांवरील नियंत्रण 2. स्वच्छता 3.उत्तम आरोग्यसुविधा यामुळे मृत्यूदर घटत आहे.
10. भारतातील जादा जन्मदराची कारणे कोणती ?
उत्तर : बालविवाह, धार्मिक व सामाजिक परंपरा, बहुपत्नीत्व, गरिबी, निरक्षरता, उष्ण भौगोलिक हवामान इ. जादा जन्मदराची कारणे होत.
11. भारतातील कमी मृत्यूदराची कारणे कोणती ?
उत्तर : आधुनिक वैद्यकीय सुविधा, साथीच्या रोगावरील नियंत्रण, शिशुंच्या मृत्यूचे घटलेले प्रमाण, शैक्षणिक प्रसार इ. गोष्टी मृत्यूदर कमी करण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
12. जनगणना म्हणजे काय ?
उत्तर : लोकसंख्येची अधिकृतरित्या केलेली गणना/मोजणी.
13. जन्मदर म्हणजे काय ?
उत्तर : एका वर्षात प्रति 1000 जन्मलेल्या शिशुपैकी जगलेल्या बालकांची संख्या.
14. मृत्यूदर म्हणजे काय ?
उत्तर : एका वर्षात प्रति 1000 व्यक्तींपैकी मृत पावलेल्या लोकांची संख्या
15. लोकसंख्यावाढीवरील नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना कोणत्या ?
उत्तर : 1. कुटुंब नियोजन 2. महिला कल्याण योजना 3. जाहिराती व प्रचार 4. ग्रामीण लोकांध्ये जनजागृती इ.
उत्तर : लक्षद्वीप (64,429)
No comments:
Post a Comment