या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
1. ........... या अरण्यातील झाडांची पाने वर्षातील एकाच ऋतूत व एकाचवेळी गळून पडत नाहीत.
2. ........... या अरण्यांना ‘मान्सून अरण्ये’ असेही म्हणतात.
3. हिमालय पर्वतात ......... प्रकारची अरण्ये आहेत.
4. नदीच्या मुखाजवळ ........... अरण्ये आढळतात.
5. ‘नागार्जुन सागर’ हे अभयारण्य ........... या राज्यात आहे.
उत्तरे : 1.सदाहरित अरण्ये 2.पानझडी अरण्ये 3. डोंगरी अरण्ये 4. मँग्रोव्ह अरण्ये (भरतीओहोटीची अरण्ये) 5. तेलंगाणा
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. अरण्ये म्हणजे काय?उत्तर : वृक्ष व इतर वनस्पती संकुलाने व्यापलेल्या विशाल भूप्रदेशाला अरण्य असे म्हणतात.
2. वाळवंटी अरण्ये कोणत्या प्रदेशात आहेत?
उत्तर : थरचे वाळवंट, पंजाबचा काहीभाग, हरियाणा, राजस्थान आणि दख्खनचे पठार या प्रदेशात वाळवंटी अरण्ये आढळून येतात.
3. अरण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या कोणत्याही चार उपाय योजना लिहा.
उत्तर : भारतात अरण्य संरक्षणासंबंधी केलेल्या उपाययोजना
1. अरण्यांच्या नाशावर नियंत्रण. 2. जनावरांच्या चरण्यावर निर्बंध.
3. वणव्यावर नियंत्रण ठेवणे. 4. अरण्य प्रदेशात अतिक्रमण होण्यावर बंधन 5. वनस्पतींवरील कीड व रोगांवर उपाय व नियंत्रण 6. बेकायदेशिररित्या झाडे तोडून त्याची तस्करी करण्यावर नियंत्रण 7. वैज्ञानिक पद्धतीने झाडे तोडणे 8. अरण्यतोड प्रतिबंधक कायदा अंलात आणणे 9. अरण्यवाढीसाठी प्रोत्साहन देणे 10. अरण्यांचे महत्त्व लोकांना पटवून देणे व जनजागृती करणे.
4. वन्यजीव अभयारण्ये म्हणजे काय?
उत्तर : वन्यजीवांना मुक्तपणे व निर्भयपणे फिरण्याची सोय करून देणे यालाच ‘वन्यजीव अभयारण्ये’ म्हणतात. वरिष्ठ अधिकाèयांच्या हुकूमाशिवाय कोणत्याही प्राण्यांची शिकार करणे व पकडणे यावर येथे निर्बंध घातलेले असतात.
5. कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय उद्यानांची नावे लिहा.
उत्तर : 1. बन्नेरू घाट (बेंगळूर) 2. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान -नागर होळे (म्हैसूर जिल्हा) 3. बंडीपूर राष्ट्रीय उद्यान ( चामराजनगर जिल्हा- वाघांसाठी प्रसिद्ध)4. अणशी राष्ट्रीय उद्यान (उत्तर कन्नड जिल्हा -वाघांसाठी प्रसिद्ध) 5. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान (चिक्कमंगळूर जिल्हा)
6. जैविक संरक्षण क्षेत्राची मुख्य उद्दिष्टे कोणती?
उत्तर : जीव संकुलाचे संरक्षण, संशोधन, शिक्षण, स्थानिक लोकांचा सहभाग ही जैविक संरक्षण क्षेत्राची उद्दिष्टे आहेत.
No comments:
Post a Comment