Sunday, May 12, 2019

श्रम


1.. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. श्रमविभागणीमुळे  ......... ला प्रोत्साहन मिळ्ते.
2. भूमीहीन शेतमजुरांना ............ कामगार असे म्हणतात.
3. वैद्यकिय संस्थेमधील कर्मचाèयांना ............ कामगार असे म्हणतात.
उत्तरे : 1. विशेष नैपुण्याला 2. असंघटित  3. संघटित

2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. श्रमविभागणी म्हणजे काय?
उत्तर : एकादे काम लोकांची आवड, अभिरूची, सामर्थ्य, वय, विशेष नैपुण्य, कौशल्य आणि लिंगभेद यावर आधारित विभागले जाते यालाच श्रमविभागणी म्हटले जाते.
2. मजुरी सहित श्रम म्हणजे काय?
उत्तर : ठराविक मोबदल्यावर अथवा वेतनावर तासांवर, दिवसावर, आठवड्यावर अथवा महिन्यावर आधारित केलेल्या शारीरिक, अर्धकुशल, कुशल कामाला मजुरीसहित श्रम असे म्हणतात.
3. मजुरी रहित श्रम म्हणजे काय?
उत्तर : एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या
रूपात अथवा वस्तूच्या रूपात मोबदला न देता करून घेणे म्हणजेच मजुरीरहित श्रम होत.
4. संघटित श्रमाचे क्षेत्र म्हणजे काय?
उत्तर : जी क्षेत्रे सरकारी नोंदणीकृत असून कायदेशीर सर्व सुविधा कामगारांना दिल्या जातात; त्याला ‘संघटीत क्षेत्र’ असे म्हणतात.
5. असंघटित श्रमाचे क्षेत्र म्हणजे काय?
उत्तर : ज्या क्षेत्रात श्रमांना कोणत्याही कायदेशीर सुविधांची तरतूद केलेली नसते त्या क्षेत्रास  ‘असंघटित क्षेत्र’ असे म्हणतात.
6. असंघटित कामगारांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
उत्तर : असंघटीत क्षेत्रातील कामगारांना अनेक सामाजिक, आर्थिक समस्यांना तोंड द्यावे  लागते. या क्षेत्रातील कामगारांना उद्योगाची हमी, निश्चित वेतन, मूलभूत सुविधा इ. गोष्टी मिळत नाहीत. त्यांच्या कामासाठी त्यांना किमान वेतनसुद्धा मिळत नाही.

7. असंघटित क्षेत्रा वर कोणते परिणाम झाले आहेत?
उत्तर : स्थलांतर, सामाजिक सुरक्षितता, कायद्याचे संरक्षण, बालमजूर, शारीरिक व मानसिक शोषण 

3. खालील प्रश्रांची उत्तरे लिहा.

1. संघटीत श्रमांचे प्रकार कोणते? स्पष्ट करा.
उत्तर : संघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने शाळा, दवाखाने, कारखाने, सरकारी प्रशासकीय सेवा, वाणिज्य बँका, जीवन विमा कंपनी, लष्कर इ. विविध खात्यांचा समावेश होतो

2. श्रमातील असमानता म्हणजे काय? स्पष्टीकरण द्या.
उत्तर :  ‘समान कामासाठी समान वेतन’ या नियमाच्या विरोधात जर वेतन/मोबदला मिळत  असेल तर त्याला श्रमातील असमानता असे म्हणतात. दोन व्यक्ती एकाच प्रकारचे काम एकाच वेळी करत असतांना, एका व्यक्तीला जास्त मोबदला व एका व्यक्तीला कमी
मोबदला मिळत असेल तर त्याला ‘श्रमातील असमानता’ असे म्हणतात. 
3. असंघटित कामगारांना सामोरे जाव्या लागणाèया सामाजिक सुरक्षिततेच्या समस्या कोणत्या?
उत्तर :  असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षितता असत नाही. सामाजिक सुरक्षितता म्हणजे जगण्यासाठी मानवाला लागणाèया मूलभूत गरजा (अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यसुविधा, पिण्याचे पाणी, कामाच्या समान संधी, समानता इ) सार्वजनिक अथवा सामूहिकरित्या उपलब्ध करुन देणे होय. परंतु असंघटित क्षेत्रातील कामगारांना एवढयासुद्धा सुविधा मिळत नाहीत. 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024