डॉ.प्रताप रेड्डी |
नरेश गोएल |
नारायण मूर्ती |
वर्गीस कुरियन |
धीरूभाई अंबानी |
अजीम प्रेमजी |
एकता कपूर |
किरण मुजुमदार शॉ |
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. ‘उद्योजक’ हा शब्द फ्रेंच भाषेतील ........... या शब्दावरून घेण्यात आला.2. उद्योजकांनी उद्योग स्थापण्याकरिता हाती घेतलेल्या प्रक्रियेला ........... म्हणतात.
3. अपोलो हॉस्पीटल सुरू करणारी व्यक्ती ........... ही होय.
4. विप्रोचे अध्यक्ष ........... हे होत
उत्तरे : 1. एन्टरप्रेन्डे (शपीींशिीशपवश) 2.उद्योजकता 3. डॉ. प्रताप रेड्डी 4.अझीम प्रेमजी
2. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
1. ‘उद्योजक’ म्हणजे काय?उत्तर : आपल्या व्यवसायासाठी बाजारपेठेतील गरजा ओळखून त्याची निर्मिती करतो व संधीचा फायदा घेतो त्याला उद्योजक असे म्हणतात.
2. उद्योजकता ही एक सृजनशील प्रक्रिया आहे. कशी ?
उत्तर : उद्योजकता ही काहीतरी नवीन निर्माण करण्याची कला आहे. कारण उद्योजकता ही मनाची एक धारणा आहे ज्यामध्ये संधी शोधणे, जोखीम घेणे आणि फायदा करून घेणे यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविल्या जातात. बदल घडवून आणण्यासाठी ती एक हेतूपूर्ण आणि संघटितपणे केलेली क्रिया होय. उद्योजकाच्या विचार आणि क्रियेवर हे सर्व अवलंबून आहे.
3. उद्योजकांची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर : उद्योजकांची वैशिष्ट्ये : 1. सृजनात्मकता 2. समस्यांचे निराकरण 3. जोखीम घेणे 4. संघटन कौशल्य 5. वचन बद्धता 6. नावीन्य 7. नेतृत्व 8. ध्येयपूर्तीसाठी प्रोत्साहन 9. उद्दिष्टपूर्ती 10. निर्णय क्षमता.
4. उद्योजकांचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर : उद्योजक हे आर्थिक बाजारपेठेचा केंद्रबिंदू असतात. इंजिनरूपी अर्थव्यवस्था क्रियाशील करण्यात आणि त्याला उत्तेजन देण्यात उद्योजक स्पार्कप्लगप्रमाणे काम करतात. देशाच्या आर्थिक विकासासाठी जगभर प्रक्रिया राबविल्या जातात. म्हणूनच त्यांना प्रोत्साहन आणि पुरस्कार दिला गेला पाहिजे. समाजाचा उत्कर्ष हा फल उद्योजकीय उपक्रमाद्वारे प्रोत्साहित व पुरस्कृत केलेल्या सामाजिक दर्जावर अवलंबून असतो. उद्योजक हे देशाच्या यशाचे, उत्कर्षाचे, विस्ताराचे आणि संधीचे प्रवर्तक असतात. ज्या देशामध्ये उद्योजकांची संख्या जास्त तो जगातील उत्कर्षवादी देश असतो. आपल्या उद्योेगाचा जम बसविण्यासाठी समाजातील निष्क्रिय बचत ठेवी आणि साधन संपत्तीचा वापर करून भांडवलाचा उपयोग करतो. अशा उद्योगशीलतेमुळे औद्योगिक आर्थिक विकास होण्यास मदत होते. उत्पादकीय उर्जा, सर्जनशीलता किंवा निर्मिती आणि प्रेरणेमुळेच नवीन उत्पादनांना आणि सेवांना उद्योजकांमुळे चालना मिळते. उद्योजकच एखाद्या उद्योगाच्या नफ्याची जोखीम घेतो तसेच जादा फायदा कोठून मिळेल अशा संधी शोधून देतो. त्यामुळे आवश्यक गरजा भागविल्या जातात आणि स्वंयरोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देतात.
No comments:
Post a Comment