1. चर्चा करून उत्तरे लिहा.
1. हैदर अली सत्तेवर कसा आला?
हैदर अली |
उत्तर : हैदर अली हा म्हैसूरच्या सैन्यामध्ये एक साधा शिपाई हैदर अली म्हणून रुजू झाला. परंतु अल्पावधीतच आपल्या राजकीय मुत्सद्देगिरी विषयी तो सर्वपरिचित झाला. म्हैसूरच्या राजकीय विकासाचा तो बारकाईने अभ्यास करत होता निजामाविरुद्ध अर्काटच्या लष्करी कारवायामुळे आणि देवनहळ्ळीच्या वेढ्यामुळे तो प्रकाशझोतात आला. त्यांने सर्व सैनिकांची मने जिंकली. अल्पावधीतच तो ‘नबाब हैदर अली’ म्हणून प्रसिद्धीस आला. नवनवीन शस्त्रास्त्रांच्या वापराबद्दलही त्याची ख्याती होती. आपल्या चतुर चालींनी त्यांने दळवायांची ताकद कमी केली. तसेच कृष्णदेवराय वडेयर यांनाही मागे टाकून आपले प्रशासकीय वर्चस्व प्रस्थापित केले.
2. दुसèया अँग्लो - म्हैसूर युद्धाचे परिणाम कोणते?
उत्तर : 1. सर्व बाबी लक्षात घेवून टिपूने मंगलोर व कोंकण किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे ठरविले. 2.त्यांने ब्रिटीशांचा पराभव केला. 3. 1784 मध्ये ‘मंगलोरचा तह’ झाला आणि दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध संपुष्टात आले.
3. श्रीरंगपट्टणच्या तहातील अटी कोणत्या?
उत्तर : श्रीरंगपट्टणच्या तहातील अटी - 1. आपले अर्धे राज्य ब्रिटीशांना देणे. 2.युद्धाची नुकसानभरपाई म्हणून तीन कोटी रूपये देणे. 3. या पैशाच्या बदल्यात जामीन म्हणून आपले दोन पुत्र ब्रिटीशांकडे ओलीस ठेवणे. 4. आपल्या ताब्यात असणाèया ब्रिटीश सैन्याची तुरूंगातून सुटका करणे इ.
4. चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धामुळे म्हैसूरमध्ये ब्रिटीशांची सत्ता बळकट कशी झाली?
टिपू सुलतान |
उत्तर : ब्रिटिशांनी टिपूचा भक्कम असा किल्ला उध्वस्त केला. 1799 मध्ये या युद्धात लढता लढता टिपूचा मृत्यू झाला. टिपूच्या मृत्यूुळे जणू कांही सारा भारतच आपल्या अधिपत्याखाली आल्याचा आनंद ब्रिटीशांना झाला. टिपूच्या ताब्यातील बराचसा प्रदेश ब्रिटीशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यातील कांही भाग मराठे व निजामांना वाटून दिला. एक छोटासा भाग म्हैसूरच्या प्रतिष्ठित वडेयर राजघराण्याला देण्यात आला. हाच भाग पुढे ‘म्हैसूरचे संस्थान’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
5. सुरपूरच्या बंडाची थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : सुरपूरचे बंड - 1857 मध्ये ब्रिटीश सुरपूरमधील विविध प्रकारच्या सुधारणांवर बारीक लक्ष ठेवून होते. नानासाहेबांचे प्रतिनिधी सुरपूरमध्ये आहेत. हे सरकारच्या लक्षात आले. यामुळे राज्यकर्त्यांच्या मनसुब्याबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. राज्यकर्त्यांच्या हालचाली बद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी कॅम्पबेल या अधिकाèयाची नेणूक केली. हैद्राबादच्या राजाचे प्रशासन चांगले नसल्याबद्दलचा अहवाल कॅम्पबेलने सरकारला दिला. वेंकटप्पा नायक हा 1857 च्या बंडातील एक प्रमुख नेता असे इतिहासकारांनी नमूद केले आहे. 1858 मध्ये ब्रिटीशांनी सुरपूर काबीज केले. तेथील राजा हैद्राबादच्या निजामाला आणि ब्रिटीश अधिकाèयाला शरण झाला. त्याला अटक करून सिकंदराबादच्या तुरुंगात ठेवण्यात आले. वेंकटप्पा नायकाचा मृत्यू कसा झाला याबद्दल मतभेद आहेत.
रिकाम्या जागा कुठे आहेत
ReplyDelete