या संदर्भातील व्हिडिओ यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. ब्रम्हपुत्रा नदीचे वर्णन करा.उत्तर : मानस सरोवराजवळील ‘चेयुंगडुंग’ (तिबेट) येथे ही नदी उगम पावते. सुरूवातीला ही पूर्वाभिमुख वाहात जाऊन अरुणाचल प्रदेशातील रुंद अशा खोèयातून भारतात प्रवेश करते. नंतर पश्चिमेकडे बांग्ला देशात वाहात जाते व गंगा नदीला मिळते. या नदीची लांबी 2589 कि.मी. आहे. ब्रम्हपुत्रा या नदीस तिबेटमध्ये ‘त्साँग पो’ म्हणतात व बांग्ला देशात ‘जमुना’ असे म्हणतात या नदीमुळे ‘मुजली’ बेट तयार झाले आहे. ते जगातील सर्वात मोठे नदीनिर्मित बेट आहे.
2. पाणी पुरवठा म्हणजे काय?
उत्तर : शेतीला कृत्रिम पद्धतीने पाण्याचा पुरवठा करणे यालाच ‘पाणीपुरवठा’ असे म्हणतात.म्हणजे नद्या, धरणे, तलाव व अंतर्जल या स्त्रोतापासून शेतीला पाण्याचा पुरवठा करणे.
3. भारतातील प्रमुख पाणी पुरवठयाचे प्रकार कोणते आहेत?
उत्तर : भारतात पाणी पुरवठ्याच्या पद्धतीवरून त्याचे तीन प्रकार केलेले आहेत. 1. विहिरीने पाणी पुरवठा 2. कालव्याने पाणी पुरवठा 3. तलावाने पाणी पुरवठा. विहिरींचे पुन्हा दोन प्रकार आहेत. 1. उघड्या विहिरी 2. कूपनलिका. कालव्याचे दोन प्रकार आहेत. 1. पुराचे कालवे 2. बारामाही कालवे. अलिकडे ठिबक सिंचन व फवारा सिंचन ह्या पद्धती अंमलात आल्या आहेत.
4. भारतात पाणीपुरवठ्याची आवश्यकता का आहे?
उत्तर : भारत हा शेती प्रधान देश आहे. त्यामुळे शेतीला आवश्यक व सतत पाणीपुरवठा करणे अगत्याचे आहे. भारतातील शेती ही प्रामुख्याने मान्सून पावसावर अवलबून आहे. पर्जन्याची विभागणी ही असमान असून काहीवेळा अवकाळी पाऊसही पडतो. काही पिकांना मुबलक प्रमाणात व सतत पाणीपुरवठयाची आवश्यकता असते. उदा. ऊस, भात इ. भरघोस पीक व अधिक उत्पादनासाठी जास्त पाणीपुरवठा करणे महत्वाचे आहे. या करिता पाणी पुरवठा पद्धतींची भारत देशाला आवश्यकता आहे.
5. बहुदेशीय नदीखोèयातील योजना म्हणजे काय?
उत्तर : विविध उद्देशांसाठी निर्माण केलेल्या नदीखोèयातील योजनांना ‘बहुद्देशीय नदी खोèयातील योजना’ असे म्हणतात
6. ‘आलमट्टी’ योजनेबद्दल टीप लिहा.
उत्तर : उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीवरील ही एक बहु उद्धेशीय नदी खोèयातील योजना आहे. या योजनेत आलमट्टी व नारायणपूर येथील दोन धरणे व एक जलविद्युतशक्ती निर्मिती केंद्र यांचा समावेश होतो. पाणीपुरवठा करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जलविद्युतशक्तीनिर्मिती हे या योजनेचे प्रमुख उद्देश, आहेत.
विजयपूर जिल्हयातील बसवन बागेवाडी तालुक्यातील ‘आलमट्टी’ येथे आलमट्टी धरण व मुद्देबिहाळ तालुक्यातील सिद्धापूर गावाजवळ ‘नारायणपूर’ हे धरण बांधण्यात आले आहे. बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी, यादगिरी व बेळगावी जिल्हयातील काही भागाला या योजनेचा लाभ मिळाला आहे
7. विहिरीने पाणी पुरवठ्याचे महत्त्व व त्याची विभागणी याबद्दल माहिती लिहा.
उत्तर : ही भारतातील अतिशय महत्वाची पाणीपुरवठयाची पद्धत आहे. भारतामध्ये शेकडा 60.7 % भागाला या पद्धतीने पाणीपुरवठा होतो. ही पद्धत कमी पावसाच्या प्रदेशात ही शक्य आहे. कमी खर्चाध्ये सहजपणे विहीर खोदता येते आधुनिक व खर्चिक तंत्रज्ञानाची गरज भासत नाही. अल्पभूधारक शेतकèयांना पण ही पद्धत परवडण्यासारखी आहे. गंगा नदीच्या मैदानात विहिरीने पाणीपुरवठा करण्याची पद्धत मोठया प्रमाणात सुरु आहे. त्यामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल ही राज्ये येतात. दक्षिण भारतात तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यात विहिरीने पाणी पुरवठयाची पद्धत रुढ आहे.
विहिरींचे दोन प्रकार आहेत. 1) खुल्या विहिरी 2) कूपनलिका आज भारतात कूपनलिका ही पद्धत मोठया प्रमाणात प्रचलित आहे.
No comments:
Post a Comment