Sunday, May 12, 2019

भारत आणि इतर राष्ट्रांचे नातेसंबंध


या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. पंचशील तत्त्वानुसार भारताचे ............ शी संबंध दृढ झाले.
2.आंतरराष्ट्रीय शांती आणि साहचर्यभाव याबद्दल आपल्या संविधानाच्या ............ कलमात तरतूद केली आहे.
3. 1962 मध्ये ............ ने भारतावर आक्रमण केले.
उत्तरे : 1. चीन  2. चौथ्या भागात 51 व्या  3. चीन

2. खालील  प्रश्नांची उत्तरे  लिहा.

1. इतर राष्ट्रांशी उत्तम नातेसंबंधाची आवश्यकता का आहे?
उत्तर : ज्याप्रमाणे एका कुटुंबाचे दुसèया कुटुंबाशी व्यावहारिक संबंध असल्याशिवाय त्या कुटुबांची प्रगती होवू शकत नाही त्याचप्रमाणे एका राष्ट्राचे दुसèया राष्ट्राशी व्यावहारिक संबंध असल्याशिवाय ते राष्ट्र प्रगत होवू शकत नाही. सध्याच्या या जागतिकीकरणाच्या व आधुनिकीकरणांच्या युगात एखाद्या देशाला दुसèया देशाशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे नव्हे तर आनिवार्यच झाले आहे.

2. भारत व पाकिस्तानमधील तणावाची कारणे कोणती?
उत्तर : जम्मू-काश्मीरवाद, दहशतवाद, पाणीवाटप यासारख्या समस्यांमुळे आत्तापर्यंत दोघांमध्ये 3 युद्धे झाली आहेत. हे द्वीपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ताष्कंद करार, सिमला करार, लाहोर बस यात्रा, आग्रा परिषद इ सारखे अनेक प्रयत्न केले गेले आहेत. याबाबतीत दोन्ही देशांतर्गत अनेकवेळा बोलणी होवूनसुद्धा 2001 साली भारतीय संसदेवर झालेला हल्ला, 2008 मधील मुंबई बाँबस्फोट आणि 2016 मध्ये झालेला पठाणकोटवरील हल्ला यासारख्या विध्वंसक घटनामुंळे दोन्ही देशातील संबंध बिघडतच चालले आहेत. जम्मू-काश्मीर वादामुळे भारत-पाकिस्तानमध्ये अनेक वर्षापासून संघर्ष सुरूच आहे.

3. भारत व चीनदरम्यान असलेले संबंध अलिकडेच बिघडलेले आहेत. कारणे द्या.
उत्तर :  पंचशील तत्त्वानुसार भारत-चीनने आपले परस्पर हितसंबंध जपले. परंतु 1962 मध्ये तिबेट वाद चिघळल्यांने भारत व चीनमध्ये युद्ध झाले. या युद्धानंतर सीमावाद उद्भवला आणि आजतागायत हा संघर्ष सुरूच आहे. चीन अरूणाचलवर आपला हक्क सांगत आहे आणि हेच या दोन्ही देशांधील संघर्षाचे प्रमुख कारण आहे.
 
4. भारत व रशियामधील संबंध कसे आहेत. स्पष्ट करा.
उत्तर : भारत आणि रशिया संबंध :  रशियाच्या विघटनाच्या पूर्वीपासून सोविएत युनियन व भारत यांच्यात मैत्रीचे नाते आहे. भारताने अलिप्ततावादी धोरण अवलंबिले असले तरी रशिया व भारताच्या दरम्यान राजकीय, आर्थिक आणि इतर क्षेत्रातील सहकार्य प्रगतीपथावर आहे. 1962 च्या चीनच्या आक्रमणाला रशियाने कठोर विरोध केला होता. 1961 च्या गोवा-मुक्ती संदर्भात पोर्तुगालच्या विरोधात भारताला पाठिंबा दर्शविला होता. 1966 साली भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या ‘ताश्कंद करारात’ रशियाने मध्यस्थी केली होती. 1971 मध्ये भारत-रशिया दरम्यान 20 वर्षांचा शांती, मैत्री व सहकार्याचा करार झाला होता. औद्योगिक आणि व्यापारवृद्धीसाठी बोकारो व भिलई येथील लोह-पोलाद उद्योगांच्या स्थापनेस रशियाने सहकार्य केले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या  सुरक्षा समितीत  भारताला कायमचे सदस्यत्व मिळावे यासाठी रशिया प्रयत्नशील आहे

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024