Sunday, May 12, 2019

भारतातील भूमी संसाधन

 

1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. जमिनीची वापरानुसार विभागणी म्हणजे काय?
उत्तर : अरण्ये, मशागत, गवताळ प्रदेश इत्यादी विविध उद्देशांसाठी जमिनीचा उपयोग करून घेतला जातो. त्याला ‘जमिनीचा वापर’ असे म्हणतात. जमिनीच्या गुणधर्मानुसार त्याचा वापर निश्चित केला जातो. भूस्वरूप, हवामान, माती, लोकसंख्येची घनता, सामाजिक, आर्थिक व तांत्रिक घटकांवर त्याचा वापर अवलंबून असतो. जमीन ही प्रत्येक देशातील एक महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. आर्थिक विकासासाठी जमिनीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणे गरजेचे आहे.
2. जमिनीचे वापरानुसार  करण्यात आलेले विभाग कोणते ?
उत्तर :  भारतात असलेल्या जमिनीच्या वापरानुसार 7 प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. 1. लागवडीखालील एकूण जमीन 2. अरण्यव्याप्त जमीन 3. बिगर लागवडीखालील जमीन 4. पडित जमीन  5. वापरात नसलेली परंतु लागवडीस योग्य जमीन 6. गवताळ कुरणे व गायरान 7. इतर जमीन
3. लागवडीची शेती म्हणजे काय? उदाहरणे द्या
उत्तर : लागवडीची शेती (मळ्याची शेती) : विशाल अशा भूप्रदेशात एकाच प्रकारचे पिक पिकविणे याला लागवडीची शेती म्हणतात. यासाठी जास्त भांडवल व मजुरांची आवश्यकता असते. चहा, कॉफी, रबर व नारळ ही लागवडीच्या शेतीतील प्रमुख पिके आहेत.
4. खरीप मोसम व रब्बी मोसम यांच्यामध्ये कोणता फरक आहे?
उत्तर : अ) खरीप मोसम : पावसाळ्यात पिके पिकविणे याला ‘खरीप मोसम’ असे म्हणतात. नैऋर्त्य मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून, जुलै महिन्यात पेरणी करतात. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पिकांची कापणी केली जाते. भात, नाचणी, ज्वारी, कापूस, शेंगदाणा, तंबारवू इ. पिके या अवधीत घेतली जातात.
आ) रब्बी मोसम : ईशान्य मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पेरणी करतात. फेब्रुवारी मार्च महिन्यात कापणी केली जाते. याला ‘रब्बी मोसम’ असे म्हणतात. गहू, बार्ली, हरभरा, जवस इ. पिके या अवधीत पिकविली जातात.
5. ऊस पिकासाठी आवश्यक असणारे भौगोलिक घटक कोणते?
उत्तर : हे भारतातील प्रमुख व्यापारी पिक आहे. जगातील अतिविशाल असा ऊस उत्पादक प्रदेश भारतात आहे. ऊस उत्पादनात ब्राझील नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. साखर, गूळ व खांडसारी तयार करण्यासाठी ऊसाचा कच्चामाल म्हणून वापर करतात. ऊस हे वर्षभर घेतले जाणारे पीक आहे. आणि ते पाणी पुरवठ्याच्या प्रदेशात पिकणारे पिक आहे. यापिकाला अधिक उष्णता 210 ते 260 सेल्सियस व अधिक पाऊस 100 ते 150 सें.मी. लागतो. ऊसाला गाळाची व चिकणमातीची (वाळूमिश्रित) जमीन उपयुक्त आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजराथ व आंध्रप्रदेश या राज्यात ऊस हे प्रमुख व्यापारी पिक आहे.
6. पेय पिके म्हणजे काय? उदाहरणे द्या.
उत्तर : आल्हाददायक पेय तयार करण्यासाठी जी पिके पिकविली जातात. त्या पिकांना पेय पिक असे म्हणतात. चहा व कॉफी ही प्रमुख पेयपिके आहेत.
7. भारतातील बागायती शेतीचे महत्त्व विशद करा.
उत्तर : फळे, भाजीपाला, फुले, औषधी व अलंकारिक पिके मळ्यामध्ये पद्धतशीरपणे पिकवितात. यालाच ‘बागायती शेती’ असे म्हणतात. जामिनीचा समर्पक व योग्य वापर नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य उपयोग व ग्रामीण भागातील लोकांना पर्यायी उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे यामुळे बागायती शेतीला भारतीय शेतीमध्ये भरपूर उत्तेजन मिळत आहे. त्यातून निर्यात व्यापार वृद्धिंगत होऊन पौष्टिक आहाराचाही पुरवठा होतो. 

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024