Sunday, May 12, 2019

सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



1. खालील रिकाम्या जागा योग्य पदांनी भरा.
1. 19 व्या शतकाला ............ चा काळ असेम्हटलेजाते.
2. राजा राम मोहन रॉय यांनी ............ हे वृत्तपत्र सुरू केले.
3. ............ यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
4. ‘तरुण बंगाली चळवळ’ ............ यांनी सुरू केली.
5. ............ हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते.
6. अँग्लो ओरिएन्टल कॉलेजची स्थापना ............ येथे झाली.
उत्तरे : 1. समाज सुधारणेचा काळ (पुनरुजीवनाचा कालखंड) 2. संवाद कौमुदी 3. डॉ. आत्माराम पांडुरंग  4. हेन्री विव्हियन डिरोजियो  5. रामकृष्ण परमहंस  6. अलिगढ


2.  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. ब्राम्हो समाजाची शिकवण कोणती?
राजा राममोहन रॉय


उत्तर : ब्राम्हो समाजाची शिकवण - 1. एकेश्वरवादाचे प्रतिपादन केले. 2. अर्थहीन चालीरितींना विरोध केला. 3. सर्वांनी प्रतिष्ठेचे जीवन जगावे व कोणतेही नियम व चालीरिती व्यक्ती प्रतिष्ठेला बाधक ठरू नयेत. 4. बहुपत्नीत्व पद्धतीचा निषेध केला व स्त्रियांच्या समानतेसाठी प्रयत्न केले. विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती दूर करण्यासाठी त्यांना संपत्तीत वारसा हक्क मिळावा, असे प्रतिपादन केले. ब्राम्हो समाजाने बालविवाहाला विरोध दर्शविला. 5. चांगुलपणा कोठेही असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे. वेदांत व उपनिषदे याच प्रकारचा बोध देतात. पाश्चिमात्य देशात जे चांगले आहे त्याचा स्वीकार करावा. असे त्यांचे मत होते. म्हणून इंग्रजी शिक्षणास त्यांनी महत्व दिले.

2. ‘वेदांकडे परत चला’ या दयानंद सरस्वतीच्या विधानाचे विश्लेषण करा.
दयानंद सरस्वती


उत्तर : वेदांमध्ये आधुनिक भारताच्या समस्यांवर उपाय आहे हे दयानंद सरस्वतीना वेदांच्या अध्ययनाने उमगले. ‘वेदांकडे परत चला’ अशी त्यांनी घोषणा केली.  2. सत्यज्ञानाचा मूलाधार वेद आहेत. वेदच प्रमाण मानावेत असे त्यांनी सागितले. 3. वेद हे अत्यंत श्रेष्ठ आहेत. प्राचीन, पवित्र ग्रंथाचे अध्ययन करून लोकांना बोध करावा. 4. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था व धार्मिक कर्मकांडे यामुळे काही लोक इतर धर्माकडे आकर्षित झाले. अशा संदिग्ध परिस्थितीतून हिंदू समाजाला एकत्र आणून वेदातील अर्थाचे नव्या पद्धतीने विवेचन केले.




3. सत्यशोधक समाजाने प्रतिपादन केलेल्या सुधारणांचे विवरण करा.
महात्मा ज्योतिबा फुले


उत्तर :  सत्यशोधक समाजाच्या सुधारणा : 1) महात्मा ज्योतिबा फुले यांनी इ.स. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 2)  जातिभेद व लिंगभेदाविरोधात आवाज उठविला.  3) ब्राह्मणेतर वर्गास व स्त्रियांना समान हक्क मिळण्यासाठी चळवळ सुरू केली. 4) शूद्र, अतिशूद्र व दलितांचे शोषण करणाèया वेठबिगारीला प्रखर विरोध केला. 5) वेठबिगारीला जबाबदार असणाèयाविरुद्ध आवाज उठविला.   6) अनेक शाळांची स्थापना करून शूद्रांना व स्त्रियांना शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली. 7) फुलेंनी आपल्या विहिरीतील पाणी अस्पृश्यांना व सर्व जातिधर्मांसाठी खुले केले. 8) मुलींच्यासाठी वसतीगृहाची स्थापना केली. इ.स. 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. 9) आधुनिक कालखंडात समानतेवर आधारित नव समाजनिर्मितीचे प्रयत्न फुले दांपत्याने केले. 10) शेतकèयांचा आसूड व गुलामगिरी ही पुस्तके लिहिली. 11) सामाजिक न्यायासाठी या समाजाने आंदोलन सुरू केले.  12) त्यांनी स्त्री-पुरुष असमानता, मानवी हक्कांची पायमल्ली, पिळवणूक व अस्पृश्यतेला कडाडून विरोध केला.

4. अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते?
 सर सय्यद अहमद खान


उत्तर :  1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता. 2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे. 3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. 4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले. 5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला. 6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला. 7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले. 8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला. 9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली. पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला. 10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

5. रामकृष्ण मिशनची उद्दिष्टे स्पष्ट करा.
रामकृष्ण परमहंस


उत्तर : 1. रामकृष्ण परमहंस यांची आदर्श तत्त्वे व  चिंतन आणि स्वतःचे सांस्कृतिक व  सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वामी  विवेकानंदांनी या मिशनची स्थापना केली.  2.  संन्यास, ध्यान व भक्तीद्वारे आध्यात्मिक मुक्ती मिळविता येते व याचे दर्शन रामकृष्णांनी आपल्या जीवनातून लोकांना घडविले. सर्व धर्माचे सार हेच आहे असे त्यांचे मत होते. 3. मुक्ती मिळविण्यासाठी व देवाचा साक्षात्कार  होण्यासाठी विविध मार्ग आहेत. त्याकरिता मूर्तीपूजा आवश्यक आहे. 4. भारतीय संस्कृतीचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याचे महत्त्व भारतीयांना व पाश्चिमात्यांना समजावून सांगण्याचे कार्य केले.



6. ‘स्वामी विवेकानंद हे तरुणांचे प्रेरणास्थान होते’ कसे ते स्पष्ट करा.
स्वामी विवेकानंद

उत्तर :  1. जातीव्यवस्था, दारिद्र्य,शूद्रांना  छळण्याचे विविध प्रकार, निरक्षरता, अज्ञान इत्यादीनी त्रस्त असलेल्या भारतीय समाजाला पिळवणूकमुक्त करण्यासाठी त्यांनी आजीवन अविरत प्रयत्न केला. 2. लोकांना प्रथम शिक्षण द्या मग सुशिक्षित समाज स्वतः सुधारणा घडवून आणेल असे त्यांचे मत होते. 3. शासकीय संस्था निर्माण होऊन त्यांच्यामार्फत समाज सुधारणे संदर्भातील कायदे अंमलात यावेत अशी त्यांची अपेक्षा होती.  4. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करू नये असे त्यांनी सांगितले. 5. अंधारात चाचपडणाèया लोकांना ज्ञान प्रकाशाच्या दिशेने नेणे हेच धर्माचे मुख्य कर्तव्य आहे, नाही तर तो धर्मच नव्हे. 6. जाती पद्धत, अस्पृश्यता धर्माच्या नावाखाली होणारी पिळवणूकीला त्यांनी विरोध केला. 7. स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक समानता ही त्यांची विचारप्रणाली होती. 8. इ.स. 1897 मध्ये विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 9.विवेकानंदांनी भारतीयांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सांगितले. 10) मोक्ष मिळवण्यासाठी प्रार्थना, योगसाधना, मनुष्यसेवा व शिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. 11. आपल्या भाषणातून भारतीय संस्कृतीची महती त्यांनी जगाला पटवून दिली.

7. अ‍ॅनी बेझंट यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या ?
अ‍ॅनी बेझंट

उत्तर : 1. भौतिक संपत्तीवर आधारित पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा आध्यात्मिक संस्कृतीवर आधारित भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे असे  प्रतिपादन अ‍ॅनी बेझंटनी केले. 2. हिंदू व बौद्ध धर्माचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला. 3. भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केला. म्हणून त्यांना ‘श्वेत सरस्वती’ नाव पडले. 4. सर्व स्तरातील लोकांना शिक्षण मिळावे  यासाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. 5. 1898 मध्ये बनारस येथे ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ सुरू केले. पुढे त्याचे बनारस हिंदू विश्वविद्यालयात रूपांतर  झाले. 6. तत्कालीन समस्यावर चर्चा करण्यास व संवाद घडविण्यासाठी तसेच होमरूल चळवळीचा प्रसार करण्यासाठी ‘न्यू इंडिया’ आणि ‘कॉमनवेल्थ’ व यंग इंडिया ही वृत्तपत्रे सुरू केली. 7.  1916 मध्ये ‘होमरूल लीग’ सुरू करून मद्रास प्रांतात होमरूल चळवळीस चालना दिली. 8.  थिऑसॉफिकल सोसायटीद्वारे भारतात नवीन धार्मिक व सामाजिक जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. 9. परदेशी नागरिक असूनसुद्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अमूल्य असे योगदान दिले.

8. ‘श्री नारायणगुरु धर्मपरिपालन योगम्’ या संघटनेचे योगदान कोणते?
श्री नारायण गुरु


उत्तर : 1.  मागासलेल्या व पिळवणूकग्रस्त जमातींना सक्षम करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. 2. नारायणगुरू व त्यांचे सहकारी पटापू आणि कुमारन आसन यांनी या चळवळींचे नेतृत्व केले. 3. सर्वांसाठी एकच जात, एकच धर्म व एकच परमेश्वर हे त्यांच्या चळवळीचे ब्रीदवाक्य होते. 4. हे साध्य करण्यासाठी त्यांनी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असे जाहीर केले. 5. मागासलेल्या जमातींना मंदिरात प्रवेश नव्हता म्हणून त्यांनी पर्यायी मंदिर बांधले. 6.  नारायण गुरु व त्यांच्या सहकाèयांनी ‘वैकम सत्याग्रह’ नावाची मंदिर प्रवेश चळवळ सुरु केली 6. ‘गुरु वायूर मंदिर प्रवेश चळवळ’ ही एक महत्वाची घटना होय. 


9. पेरियार चळवळीतील प्रमुख घटनांची यादी करा.
पेरियार


उत्तर :  1. काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या इ.व्ही. रामस्वामी यांनी आत्मगौरव चळवळ  सुरू केली. 2. लोक त्यांना आदराने ‘पेरियार’ (ज्येष्ठ व्यक्ती) असे म्हणत. 3. काँगे्रस पक्ष हा वर्णाश्रम पद्धतीच्या बाजूने आहे. म्हणून त्याला पर्याय म्हणून  ‘द्राविड वांशिक ओळख’  या नावाने नवीन चळवळ सुरू केली. 4. आर्य, ब्राह्मण यांचे श्रेष्ठत्व सांगणाèया विचारांना त्यांनी विरोध केला. 5. तामिळ भाषा ही द्राविड भाषा आहे. असे त्यांचे मत होते. 6.संस्कृतभाषा व साहित्याला त्यांनी विरोध केला.  7. रावणाला द्रवीडांचा नायक म्हणून त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवले आणि रामाचा वैदिक लोकांचा देव म्हणून तिरस्कार केला. 8. जातिभेद व लिंगभेद यांना विरोध करून समानतेचा पुरस्कार केला. 9.  केरळमधील ‘वैकम’ येथे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून चळवळ केली.  10. आदर्शवादी ब्राम्हणेतर चळवळीचे रूपांतर पेरियार यांनी सांस्कृतिक चळवळीमध्ये केले. 11. पिळवणूक मुक्त समाज, जातीभेद, लिंगभेदरहित सर्वधर्म सहिष्णुतेवर आधारित समाजाची रचना व्हावी हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.

या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024